Site icon My Marathi Status

आपल्या गावावर कविता आणि quotes

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गावावर मराठी गावीत ज्या तुम्हाला नक्की आवडतील जर तुम्हाला कविता आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा.

आम्ही ज्या लेखकाने ही कविता लिहाली आहे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जर तुम्हाला पण कविता पाठवायच्या असतील तर आम्हाला वर पाठऊ शकता किंवा आम्हाला कमेन्ट द्वारे सांगू शकता.

माझे गाव अजूनही तसेच का??

जुन्या विचारांचे गाव माझे
अजूनही तसेच का?
काळ्या पांढऱ्या रंगाच
रंगात रूपांतर झाले तरी
अजूनही जुनेच का??

प्रदूषणाच्या जगात
सुंदरतेने नटलेल गाव माझं
अजूनही तसेच का?
अंधविश्वासाच गाव माझं
अजूनही तसेच का??

तीच जुनी माणसं
जुन्या काळातील
अजूनही जुनेच का?
पांढरे कपडे घालून हि विचार
अजूनही तसेच का??

काळ बदलुनही माणसं
अजूनही जीव मला
लावतात का?
गावात माझ्या माणसं माझी
तरीही मी दूर का?
माझे गाव अजूनही तसेच का?

अंकिता आखाडे,मुंबई

गांव

गावाची शिव दिसता

हर्ष दाटतो उरात

उमलून पाकळीचे

फुल होते क्षणात ||१||

लवुनी वृक्ष-वेली

मुजरा करतात ऐटीत

घालूनी मुकुट शिरी

छाया पांथास देतात ||२||

वाटा अनेक वाकड्या

जातात थेट गावात

नको तुम्हा वाटाड्या

देव भेटेल वाटेत ||३||

ऐकत सुर पाखरांचे

वाट कधीच संपते

दारात उभ्या आईचे

दर्शन मजला घडते ||४||

कवी – प्रा.सदाशिव गुंडू कुंभार

गाव रहाट

पहाटेच्या रामप्रहरी
गुंजे गाणी जात्यावरी
गोठ्यात हंबरणे
किलबिल झाडावरी

अंगणात रांगोळी
तुळसीचे पूजन
चुल पेटे सत्वरी
बैलासवे नांगरन

शेतातच न्याहारी,जेवन
फुले सोन्यावाणी शेत
रास पडे धान्याची
पूजनानंतर घरी न्हेत

सणवारी,जत्रेत मजा
आनंद मिळे भारी
उत्साहाला भरती
गाव रहाट येई आकारी

सुंदर ती रहाट
झाली आता लुप्त
आता केवळ आठवण
मनाच्या कोप-यात फक्त

श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Exit mobile version