Site icon My Marathi Status

बिटकोईन म्हणजे काय? Bitcoin Information Marathi

येत्या वर्षभरात भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा डिजिटल देश होण्याच्या वाटेवर आहे. झपाट्याने होत असलेल्या आधुनिकी  करणामुळे नवनवीन बदल आपल्या सभोवताल आपल्याला सध्या दिसायला लागलेत. जगभरात सर्वत्र  डिजिटल चलन, ई-मुद्रा किंवा सायबर कॅश म्हणून ओळखल्या जाणार्‍या चलनांची चर्चा आता सुरु आहे. ज्याप्रकारे रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी अनेक चलन आहेत, त्याच प्रकारे वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सी आहेत. यामध्ये, व्यवहार पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केले जाते. अलीकडेच, बिटकॉइन गुंतवणूकीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आज आम्ही तुम्हाला बिटकॉइन या ई-चलनां बद्दल सांगणार आहोत.

बिटकोईन म्हणजे काय?

बिटकोईन म्हणजे एक क्रिप्टो करन्सी, ज्याला आपण आभासी चलन असेही म्हणू शकतो. साधारणतः  चलनी नोटांचा नवा पर्याय म्हणजे डिजीटल किंवा व्हर्च्युअल करन्सी हा आहे. जगातल्या अनेक चलना प्रमाणेच म्हणजेच भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर, ब्रिटीश पौंड असे अनेक यासारखेच बिटकोईन हे देखील एक चलन आहे. परंतु बिटकोईन हे काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड स्वरूपात बनलेले आभासी चलन आहे.

ऑनलाईन साईटवर आपण ज्याप्रकारे आपण अनेक ऑनलाईन वस्तूंची खरेदी करतो तसेच बिटकोईन देखील आपण पैसे देऊन खरेदी करू शकतो.

बिटकोईन खरेदी केल्यावर आपले एक वॉलेट तयार होते, ज्यामध्ये आपण विकत घेतलेले बिटकोईन साठवून ठेऊ शकतो. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवीन ब्लॉक तयार होतो. या प्रक्रियेला माईनिंग असे म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेन मध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतात आणि तितकी अधिक माईनिंग होते.ब्लॉकचेन ही एक प्रकारची खातेवही आहे, ज्यामध्ये आपले सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने नोंदविले जातात, आणि ते अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने संरक्षित केले जातात. 

बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश अश्या विविध क्रिप्टोकरन्सी आज  प्रसिद्ध आहेत. फेसबुकही सदया त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी बाजारात आणण्याची योजना करतोय.

बिटकोईन चे फायदे

बिटकोईन चे अनेक चांगले फायदे आहेत.

बिटकोईन चे तोटे

बिटकोईन कसे खरेदी करायचे 

बिटकोईन खरेदी करणे अगदी सोपे आहे. आपण ज्याप्रकारे ऑनलाईन वस्तू खरेदी करतो किंवा ऑनलाईन व्यवहार करतो अगदी त्याचप्रमाणे आपण बिटकोईन खरेदी करू शकतो.  बिटकोईन विकत घेण्यासाठी अनेक वेबसाईट आहेत. त्याचा उपयोग करून आपण बिटकॉइन विकत घेऊ शकतो आणि विकू सुद्धा शकतो.

काही वेबसाइट्स ज्याचा उपयोग आपण बिटकॉइन खरेदी -विक्री करता करू शकतो .

वरील वेबसाईट वर आपले खाते उघडण्याकरता वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, बँक अकाऊंट डिटेल्स यासारख्या काही कागदपत्रांची आवश्यकता असते.

बिटकोईन सुरक्षित आहे का ?

बिटकोईन हे आभासी चलन आहे. सोबतच बिटकोईन व्यवहारावर कुठलेही किंवा कोणा मार्फत नियंत्रण ठेवलेले नाही, त्यामुळे बिटकोईन मध्ये गुंतवणूक करणे अतिशय धोक्याचे आहे. आपण जर निव्वळ नफा मिळवण्या करता आपल्या केलेल्या गुंतवणूकी सोबत धोका पत्करायची तयारी असेल तर  बिटकोईन  हा नक्कीच आपल्याकरता योग्य पर्याय आहे . तुम्हाला आमचा लेख बिटकोईन  माहिती मराठी  कसा वाटला 

Exit mobile version