Site icon My Marathi Status

20+ मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ इन मराठी

म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती ‘म्हण’ होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.

  • म्हणी व अर्थ *

१) अती तेथे माती : - कोणत्याही गोष्टीचा अती वापर / अतिरेक हा नुकसान कारक ठरतो.

२) अती शहाणा त्याचा बैल रिकामा : – जो माणूस जादा शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते.

३) अडला हरी गाढवाचे पाय धरी : – शहाण्या माणसाला मूर्खाची विनवणी करावी लागते.

४) असतील शिते तर जमतील भुते : – आपल्या भरभराटीचा काळ असेल तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात.

५) आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी : – जेथे मदतीची गरज आहे तिथे ती न पोहचता भलत्याच ठिकाणी पोहचवणे.

६) आगीतून फुपाटयात :- लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.

७) आधी पोटोबा मग विठोबा :- आधी स्वतः च्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे.

८) अंथरून पाहून पाय पसरावे : – ऐईपतीच्या मानाने खर्च करावा.

९) आवळा देऊन कोहळा काढणे : – क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.

१०) आयत्या बिळात नागोबा : – दुसऱ्याच्या कस्टावर स्वत:चा स्वार्थ साधने.

११) आलिया भोगाशी असावे सादर : – जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे.

१२) आपला हात जगन्नाथ : – आपले काम पार करण्यासाठी स्वतःच कस्ट सोसणे योग्य ठरते.

१३) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार :- जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ.

१४) आंधळा मागतो एक देव देतो दोन :- किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षापेक्षा किती तरी अधिक लाभ होणे.

१५) इकडे आड तिकडे विहीर :- दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे.

१६)पी हळद हो गोरी :- उतावळेपणा दाखविणे

१७) अगं अगं म्हशी मला कुठं नेशी :- स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.

१८) चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे :- प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

१९)उंटा वरचा शाहना:- मूर्ख सल्ला देणारा

२०) छत्तिसाचा आकडा:- विरुद्ध मत असणे

Exit mobile version