Site icon My Marathi Status

माझी आदर्श व्यक्ती मराठी निबंध | Essay On My Role Model In Marathi

Essay On My Role Model In Marathi – मित्रांनो आज “माझी आदर्श व्यक्ती  माझे बाबा मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Essay On My Role Model In Marathi

माया बाबांची असते, कस्तुरीपरी दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी |

आपल्या आयुष्यात आई-बाबा या दोघांचे समान महत्त्व आहे. ते दोघे देवासमान आहेत. तरीही जेथे तेथे आईचीच महती गायली जाते. आई वर खूप लेखन झाले. पण वडिलांवर भव्यदिव्य असे लेखन झालेले दिसून येत नाही. आई प्रमाणेच वडिलांचे अस्तित्वही आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. आज मी आमच्या शाळेतील एक आदर्श विद्यार्थी आहे.

मी घडण्यामागे माझ्या बाबांचा मोलाचा वाटा आहे. माझे वडील हे खूप प्रेमळ शिस्तप्रिय आहेत. माझी एखादी चूक झाल्यावर माझे बाबा मला रागावतात कारण माझे व्यक्तिमत्व चांगले बनावे असे त्यांना वाढत असते. [Essay On My Role Model In Marathi]

माझी आदर्श व्यक्ती माझे बाबा

आपला मुलगा भविष्यात एकही चूक करू नये म्हणून ते सदैव दक्ष असतात. माझ्या वडिलांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे. त्यांचे बालपण गरिबीत गेले असल्यामुळे त्यांचे शिक्षण जेमतेम झाले.

परंतु मुलांना खूप शिकवायचे, मुलांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, आपली मुलेही स्वतःच्या पायावर उभी राहावीत अशी माझ्या वडिलांची इच्छा. मला आठवते तेव्हापासून मी पाहतोय की माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांना कधीही गरिबीची झळ लागू दिली नाही. रोजचा दिनक्रम आहे.

कष्ट केल्याने कोणी मरत नाही असे त्यांचे तत्वज्ञान आहे. कष्ट करून संसाराचा गाडा चालविणे, उन्हातान्हाची पर्वा न करता कष्ट करून घाम गाळून कुटुंब चालवण्याचे काम हे वडील करीत असतात.

Essay On My Role Model In Marathi

शाळेतून घरी परत आल्यानंतर अभ्यास करावा, व्याख्या पाठांतर कराव्यातच हा त्यांचा आदेश. लेखन हे चांगले असावे, हस्ताक्षर सुंदर असावे अशी त्यांची आम्हाला शिकवण होय. त्यांच्या शिकवणीप्रमाणे माझे अक्षर देखील सुंदर आहे. {Essay On My Roll Model In Marathi}

त्यांच्या शिकवणीचा मला खूप खूप फायदा झाला. सणासुदीला भावंडांना नवीन कपडे घ्यायचे, शाळेमध्ये लागणारे साहित्य उदाहरणार्थ वह्या, पुस्तके, दप्तर इत्यादी वस्तू अत्यंत गरिबीत ते आम्हाला कधी कमी पडू देत नाहीत. एक उज्ज्वल यश संपादन करून मी माझ्या वडिलांचे स्वप्न साकार करेन अशी मला खात्री आहे. मी माझ्या आईवडिलांना कधीच विसरू शकत नाही.

मला नेहमी वाटते की आपण आईचे कौतुक जरूर करावे पण, त्याच वेळी बाबांचे कष्ट विसरू नये. देवकी यशोदेचं कौतुक करावे, पण त्याच वेळी पुरात डोक्यावरून पोराला घेवून जाणारा वासुदेव आठवावा.

माझी आदर्श व्यक्ती मराठी निबंध

चालताना बोटाला चुकून ठेच लागली तर तोंडातून शब्द बाहेर पडतो आई ग ! पण समोर मोठा साप पाहिला की मात्र मुखातून शब्द बाहेर पडतो तो बाप रे! मला खूप अभिमान आहे की बाबा माझ्या आयुष्यातले खरे शिल्पकार आहेत. ते माझे आदर्श आहेत, माझ्यासाठी हिरो आहेत. त्यांच्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. “Essay On My Role Model In Marathi”

अनंत उपकार बाबा तुमचे, 
घडवले माझे आदर्श जीवन,
भरारी घेतांना यशापर्यन्त, जपून
ठेवेन तुमच्या संस्काराचे धन.

तर मित्रांना “Essay On My Role Model In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझी आदर्श व्यक्ती  माझे बाबा मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे दे

खाली “माझा आदर्श व्यक्ती” (Essay on My Role Model in Marathi) या विषयावर विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि प्रेरणादायी निबंध दिला आहे:


✍️ निबंध : माझा आदर्श व्यक्ती (My Role Model in Marathi)

प्रस्तावना:

आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिला आपण आदर्श मानतो. तिच्या गुणांपासून प्रेरणा घेऊन आपणही तशीच व्यक्ती व्हावं अशी आपली इच्छा असते. माझ्यासाठी अशीच एक आदर्श व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद.


माझा आदर्श – स्वामी विवेकानंद:

स्वामी विवेकानंद हे भारताचे महान विचारवंत, योगी आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकातामध्ये झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते.


त्यांच्या जीवनातील प्रेरणा:


त्यांच्याकडून मिळालेली शिकवण:

  1. स्वतःवर विश्वास ठेवा.

  2. कधीही हार मानू नका.

  3. देश आणि समाजासाठी काहीतरी करा.

  4. योग, ध्यान, आणि सदाचार पाळा.


निष्कर्ष:

स्वामी विवेकानंद हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांनी माझ्या जीवनाला दिशा मिळाली आहे. त्यांच्या जीवनाचे अनुकरण करून मीही चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतो.


वैकल्पिक आदर्श व्यक्ती:

तुम्हाला हा निबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, आई-वडील, शिक्षक किंवा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर हवा असल्यास, मी तो तसाही लिहून देऊ शकतो.

तुमचा आदर्श कोण आहे हे सांगाल का?

Exit mobile version