Site icon My Marathi Status

फ्रीलान्स म्हणजे काय | Freelancing Meaning in Marathi

फ्रीलान्सर Freelancing in Marathi  म्हणजे जर तुम्हाला एखादे स्किल येत असेल तर तुम्ही फ्रीलान्सर बनू शकता. समजा तुम्हाला ग्राफिक design येते तर तुम्ही घरी बसून कंपनीच्या गरजे नुसार काम करून देऊ शकता. कंपनी ला एखादे काम करायचे असेल तर ते काम करण्यासाठी एखादा कामगार ठेवण्यापेक्षा कंपनी फ्रीलान्सर कडून काम करून घेतात. कारण जेवढे काम तेवढे पैसे ठरलेले असतात त्यामुळे कंपनीला फायदा होतो आणि ती जगातील कोणत्याही चांगल्या व्यक्ती कडून काम करून घेऊ शकतात

फ्रीलान्सर साठी कोणते स्किल पाहिजे Freelancing in marathi

फ्रीलान्सर बनण्यासाठी तुम्ही कोणतेही एखादे स्किल शिकू शकता

या सारखे कोणतेही स्किल तुम्ही शिकू शकता ज्यामुळे तुम्हाला काम मिळू शकते. तुम्ही जे स्किल निवडाल त्याची मागणी सुद्धा असणे महत्वाचे आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले असेल तर त्या संबंधी फ्रीलान्सर ची कामे सुद्धा तुम्ही करू शकता. उदा. जर तुम्ही mechanical Engineering केले असेल तर तुम्ही फ्रीलान्स design बनवून देऊ शकता.

फ्रीलान्स कामे कुठे शोधायची

जर तुम्हाला फ्रीलान्सर बनायचे असेल तर तुम्हाला स्वतः कामे शोधावे लागतील. किंवा तुम्ही फ्रीलान्स app वरती रजिस्टर करू शकता. तुम्ही फ्रीलान्स अँप वरती तुमचे अकाउंट तयार करा आणि तुमच्या स्किल विषयी योग्य माहिती तिथे लिहा. अशा फ्रीलान्स अँप वरून तुम्हाला अनेक प्रोजेक्ट मिळू शकतात. पण त्यासाठी तुमचे रेटिंग पहिले जाते आणि तुम्ही केलेले प्रोजेक्ट. त्यामुळे सुरवातीचे प्रोजेक्ट मिळवणे थोडे कठीण असते पण एकदा तुम्हाला थोडे प्रोजेक्ट मिळाल्या नंतर तुमचे काम सोपे होते.

फ्रीलान्स प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अँप

या प्रकारे अनेक वेबसाईट इंटरनेट वरती उपलब्द आहेत. त्यामधून तुम्हाला जो मार्ग योग्य वाटतो तो तुम्ही नक्की निवडा.

फ्रीलान्स प्रोजेक्ट social media वरून घेऊ शकतो का?
तुम्ही सोसिअल मीडिया वरून सुद्धा फ्रीलान्स प्रोजेक्ट मिळवू शकता. तुम्ही इंस्टाग्राम,फेसबुक, Youtube, यामध्ये तुमच्या स्किल संबंधी पेज बनवू शकता आणि तुम्ही केलेली कामे तिथे दाखवू शकता. जर तुमच्या पेज वरील काम जर कोणाला आवडले तर त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट मिळू शकतील. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट मिळवू शकता

फ्रीलान्स साठी स्किल कुठून शिकायचे

फ्रीलान्स साठी स्किल शिकायचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही youtube, इंटरनेट वरून अनेक प्रकारचे स्किल मोफत शिकू शकता. जर तुम्ही त्या स्किल संबंधी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्या साठी अजूनच चांगले आहे. इंटरनेट हे नवीन गोष्टी शिकण्या साठी खूप फायदेशीर आहे त्याचा तुम्ही चांगल्या गोष्टी साठी नक्की वापर करा

Exit mobile version