Indira Gandhi Essay In Marathi – मित्रांनो आज “इंदिरा गांधी निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Indira Gandhi Essay In Marathi
भारताच्या पंतप्रधान पदावर दीर्घ काळ राहून नेतृत्वाची धुरा अनेक वर्ष सांभाळणाऱ्या भारताच्या ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत.
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 साली अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू, तर आईचे नाव कमला हे होते. त्यांचे आजोबा भारतीय स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरू हे होते.
बालपणापासून इंदिराजींच्या घरात राजकीय क्षेत्रातील व्यक्ती नेहरूजींकडे येत असत. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेक धडे बालपणीच त्यांना मिळाले.
इंदिरा गांधी निबंध मराठी
इंदिराजींनी जगातील अनेक विद्यापीठांमधून आपले शिक्षण पूर्ण केली. यामध्ये इकोले इंटरनॅशनल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित पीपल्स ओन स्कूल, बॅडमिंटन स्कूल, विश्वभारती, शांतिनिकेतन व ऑक्सफर्ड सारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतले.
इंदिरा गांधी यांना जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांमधून डॉक्टरेटच्या उपाध्यांनी गौरवण्यात आले होते. प्रभावी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कोलंबिया विद्यालयाकडून विशेष योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते.
इंदिरा गांधी या सुरुवातीपासून स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला. तसेच असहकार चळवळीच्या दरम्यान 1930 आली लहान मुलांच्या मदतीने ‘वानर सेना’ उभी केली.
सप्टेंबर 1942 साली त्यांना नैनिच्या तुरुंगात टाकण्यात आले. तर 1947 साली महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली दंगलग्रस्त भागात त्यांनी काम केले.
Indira Gandhi Essay In Marathi
इंदिरा गांधी यांचा विवाह 26 मार्च 1942 साली फिरोज गांधी यांच्याशी झाला. त्यांना दोन अपत्ये झाली. त्यांची नावे राजीव व संजय ही होती. त्यांच्या जीवनातील 1946 ते 1966 हा कालखंड महत्त्वाचा ठरतो. कारण या काळात त्यांनी आपले जीवन सार्वजनिक कार्यात घालवले.
स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेत्यांशी संपर्क आल्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक दौऱ्यामध्ये पंडितजी बरोबर इंदिरा गांधी ही जात असत. {Indira Gandhi Essay In Marathi}
1953 साली त्या स्वतः रशियाला जाऊन आल्या आणि त्यानंतर त्या राजकारणात खोलवर रस घेऊ लागल्या. 1957 साली त्यांची काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीवर नियुक्ती झाली. तर वयाच्या 41 व्या वर्षी म्हणजे 1959 साली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा झाल्या.
इंदिरा गांधी निबंध मराठी
1964 ते 1966 पर्यंत सूचना तथा प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले. शास्त्रींच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली. त्या 1966 ते 1977 पर्यंत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. आणि त्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कौशल्याने पार पाडल्या. हा काळ देशासाठी अनेक समस्यांचा होता.
यात केरळ मधील अत्यल्प तांदळाचा कोटा दिला म्हणून तर मध्य प्रदेशात दुष्काळामुळे निर्माण झालेली उपासमारीची परिस्थिती असो, की आसाममधील मिझो टोळ्यांचे आंदोलन असो अशा समस्या त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण हाताळल्या.
इंदिरा गांधींना आपल्या वडिलांकडून चिरतरुण मन, बुद्धिवादी दृष्टिकोण, अखंड कष्ट करण्याचे सामर्थ्य या गुणांचा वारसा मिळाला. आपल्या ध्येयाला त्यांनी कधीही सोडले नाही. त्यांच्या कार्यकालात त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. यामध्ये 1975 ते 1977 पर्यंत देशात आणीबाणी जाहीर केली.
Indira Gandhi Essay In Marathi
1972 साली इंदिराजींनी पाकिस्तान सोबत द्विपक्षीय शिमला करार केला. तसेच त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे 1971 साली भारताचा सर्वोच्च सन्मान म्हणजे ‘भारतरत्न’ देण्यात आला. आपल्या राजकीय कारकीर्दीत या 1966 ते 1977 व 1980 ते 1984 या कार्यकालात आपल्या देशाच्या पंतप्रधान ही राहिल्या. “Indira Gandhi Essay In Marathi”
अतिरेक्यांनी सुवर्ण मंदिरा सारख्या पवित्र ठिकाणी शस्त्रास्त्रे ठेवली. यावेळी इंदिराजींनी तेथे सैन्य पाठवले. यामुळे शीख समुदायामध्ये असंतोष पसरला. याचाच राग मनात धरून 31 ऑक्टोबर 1984 झाली त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
तर मित्रांना “Indira Gandhi Essay In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “इंदिरा गांधी निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
इंदिरा गांधी यांचा जन्म कधी झाला?
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला.
इंदिरा गांधी यांचा मृत्यू कधी झाला?
इंदिरा गांधी यांचा मृत्यू 31 ऑक्टोंबर 1984 रोजी झाला.
इंदिरा गांधी – निबंध
परिचय:
इंदिरा गांधी भारतीय राजकारणाच्या आकाशात एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होत्या. त्यांचा जन्म १९१७ साली पुण्यात झाला. त्यांचा जन्म नेहरू कुटुंबात झाला होता, जे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अत्यंत सक्रिय होते. इंदिरा गांधी यांच्या पित्याचे नाव जवाहरलाल नेहरू होते, जे भारताचे पहिले पंतप्रधान होते. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी भारतीय समाज, राजकारण, आणि अर्थव्यवस्थेवर अप्रतिम प्रभाव सोडला.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:
इंदिरा गांधी यांचे लहानपण अत्यंत कष्टप्रद होते. त्यांनी प्रारंभिक शिक्षण स्वित्झर्लंड आणि इंग्लंडमधील नामांकित शाळांमध्ये घेतले. पुढे त्यांनी भारतीय राजकारण आणि समाज यावर विचार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या जीवनाची दिशा ठरवण्यास त्यांचे आई-वडील, विशेषत: पंतप्रधान नेहरू यांच्या विचारांची आणि नेतृत्वाची गती फार महत्त्वाची ठरली.
राजकीय जीवनाची सुरूवात:
इंदिरा गांधी यांची राजकारणात प्रवेशाची सुरूवात त्यांच्या वडिलांच्या प्रभावामुळे झाली. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान नेहरू यांच्या सहाय्याने अनेक महत्त्वाचे पदे सांभाळली. १९६६ साली, नेहरूंच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले.
पंतप्रधान म्हणून काम:
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारतीय समाजातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
१. ग्रीन रिवोल्यूशन:
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतात ग्रीन रिवोल्यूशनचा आरंभ झाला. यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, आणि भारत अन्नधान्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर बनला.
२. भारत-पाक युद्ध (१९७१):
१९७१ साली भारताने पाकिस्तानसोबत युद्ध केले, ज्यात भारतीय सैन्याने विजय मिळवला. यामुळे पाकिस्तानचे बांगलादेश मध्ये विभाजन झाले, आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहिले. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताला अभिमानाची पराक्रम मिळाला.
३. आपत्काल (१९७५-१९७७):
१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आपत्काल लागू केला. यामुळे विरोधकांना तुरुंगात टाकले गेले, आणि त्यांचे राजकीय हक्क कमी केले गेले. परंतु, या निर्णयावर विवाद निर्माण झाला आणि त्याच्या परिणामस्वरूप १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारचा पराभव झाला.
इंदिरा गांधींची नेतृत्व क्षमता:
इंदिरा गांधी एक जबाबदार आणि दृढ नायक होत्या. त्यांचे निर्णय नेहमीच दूरदर्शी होते. त्यांची कडक नेतृत्व शैली आणि समोरच्या संकटांचा सामना करण्याची क्षमता या सर्व गोष्टींमुळे त्यांचे स्थान भारतीय राजकारणात अनमोल झाले. त्यांनी राजकीय समांतरतेचे महत्त्व पटवले आणि भारतीय महिलांना शक्ती दिली. त्यांनी भारतीय लोकांच्या हितासाठी नेहमीच कठोर निर्णय घेतले.
निष्कर्ष:
इंदिरा गांधी भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली महिला पंतप्रधान होत्या. त्यांचे नेतृत्व, निर्णयक्षमता, आणि कठोर परिश्रम हे त्यांच्या यशाचे मुख्य कारण होते. त्यांची कार्यशक्ती आणि त्यांचे कार्य आजही भारताच्या राजकारणात व समाजात लक्षात घेतले जाते. त्यांचा योगदान केवळ भारतीय राजकारणातच नाही, तर संपूर्ण जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले, पण त्यांचे कार्य आणि विचार भारताच्या मनात सदैव जिवंत राहतील.