Site icon My Marathi Status

जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध | Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh

Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh – मित्रांनो आज “जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आव्हान केले जाते.

‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात सर्व लोकांच्या सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते.

Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh –

जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो. यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम यासारखे उपक्रम राबविले जातात.

हा दिवस साजरा करून आपण स्वतःला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.  “Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh”

दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून सुयोग्य अशा पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध

त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या चांगल्या स्वरुपाबरोबरच त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागतील ह्याची प्रखर जाणीव झाली. म्हणून इ. स. 1960 मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले. तसे पाहिले तर मानव हा पर्यावरणाचाच एक अत्यंत बुध्दीमान सजीव भाग म्हणा वा सजीव घटक आहे. Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh

मात्र पर्यावरणाच्या इतर बहुतांशी सर्वच सजीव असो वा निर्जीव अशा प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.

Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh

सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे मात्र पर्यावरणाच्या इतर बहुतांशी सर्वच सजीव असो वा निर्जीव अशा प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे.

म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे.

नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh

जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध

पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने सहमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण ख-या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करू, यात शंका नाही.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करूया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणा-या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पुनर्निर्मिती करुया.

हातांनी जे काम करू शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करू या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणा-या कागदी पिशव्या वापरूया. ‘Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh’

Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh

अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियमच्या वस्तुत ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया.

गरज नसल्यास घरातील टी. व्ही. बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बदं करुया.

याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणा-या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया. Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh

जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे.

हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि ख-या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.

तर मित्रांना “Jagatik Parayavarn Din Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जातो?

जागतिक पर्यावरण दिवस 5 जून ला साजरा केला जातो.

जागतिक पर्यावरण दिन – निबंध

प्रस्तावना:
पर्यावरण म्हणजेच पृथ्वीवरील हवामान, वनस्पती, प्राणी आणि निसर्गाचे एक सुसंगत संकलन. हे सर्व घटक आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. परंतु, मानवी क्रियाकलापांमुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले आहे. म्हणूनच, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक वर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरण जागरूकतेसाठी समर्पित असतो.

जागतिक पर्यावरण दिनाची महत्त्व:
जागतिक पर्यावरण दिन ५ जून १९७२ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम शहरात झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत सुरू झाला. त्यानंतर १९७४ पासून हा दिवस जगभर साजरा केला जातो. या दिवशी, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक कार्यक्रम, कार्यशाळा, आणि रॅली आयोजित केल्या जातात. या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रेरणा देणे आहे.

पर्यावरणाचे महत्व:
पर्यावरण हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हवेची शुद्धता, जलसंपदा, वनस्पती, प्राणी आणि माती हे सर्व पर्यावरणाचे घटक आहेत. आपल्याला स्वच्छ हवा श्वास घेण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी पर्यावरणावर अवलंबून राहावे लागते. जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला, तर आपले जीवन अस्तित्वात राहणार नाही. म्हणून, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्याच्या शुद्धतेचे पालन करणे आवश्यक आहे.

पर्यावरणाची स्थिती आणि आपला प्रभाव:
आजकाल मानवी क्रियाकलापांनी पर्यावरणावर मोठा नकारात्मक प्रभाव केला आहे. जंगलांची तटस्थतेने कत्तल, औद्योगिक वायू उत्सर्जन, पाण्याची प्रदूषण, प्लास्टिकचा वापर आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढवणे, यामुळे पर्यावरणाची स्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः जलवायु बदल, हवामान बदल, आणि पर्यावरणीय आपत्ती यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे निसर्गाच्या संतुलनावर विपरीत परिणाम होत आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे उद्दिष्ट:
१. पर्यावरणाचे संरक्षण करणे. २. वृक्षारोपणाचे महत्त्व लोकांना समजावून सांगणे. ३. प्रदूषण कमी करणे आणि स्वच्छतेचा प्रचार करणे. ४. जलस्रोतांचे योग्य वापर आणि संरक्षण करणे. ५. जलवायु बदलांबद्दल जनजागृती निर्माण करणे. ६. पर्यावरणाशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी.

जागतिक पर्यावरण दिनाच्या उपक्रमांचा महत्त्व:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, आणि संस्थांमध्ये वृक्षारोपण, सफाई मोहिमा, जनजागृती अभियान आणि पर्यावरण संवर्धन कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये पर्यावरणीय समस्यांवर चर्चा केली जाते आणि उपाययोजना सुचविल्या जातात. हे सर्व उपक्रम लोकांमध्ये पर्यावरणाच्या महत्त्वाची जाणीव जागवतात आणि त्याला जपण्यासाठी प्रेरित करतात.

आपले योगदान:
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपले छोटे छोटे प्रयत्न देखील महत्त्वाचे आहेत. वृक्षारोपण करा, पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करा, प्लास्टिकचा वापर कमी करा, रीसायकल करा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा आणि वातावरणास शुद्ध ठेवण्यासाठी शाकाहारी आहार घेतल्यास आपले योगदान असू शकते. छोटे छोटे प्रयत्न एकत्र केल्यास मोठा परिणाम साधता येईल.

निष्कर्ष:
जागतिक पर्यावरण दिन आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगतो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो. सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. आपले छोटे छोटे योगदान पर्यावरणाची शुद्धता आणि संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे, या दिवशी आपला संकल्प असावा की, आपण पर्यावरणाचे रक्षण करणार आणि त्याच्या सौंदर्याचा आनंद घेणार.

“वृक्षारोपण करा, पर्यावरण रक्षण करा आणि आपले भविष्य सुंदर बनवा.”

Exit mobile version