Site icon My Marathi Status

सावित्रीबाई फुले बद्दल माहिती मराठीत – Savitribai Phule Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले बद्दल माहिती मराठीत – Savitribai Phule Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१] पूर्ण नाव – सावित्रीबाई जोतीराव फुले
२] जन्म – ३ जानेवारी इ.स.१८३१ नायगाव, सातारा, महाराष्ट्र
३] मृत्य – १० मार्च इ.स. १८९७ पुणे, महाराष्ट्र
४] आई – सत्यवती नेवसे
५] वडील – खंडोजी नेवसे

माहिती – Savitribai Phule Information in Marathi

स्त्रीशिक्षण चळवळीच्या आद्य क्रांतिकारक प्रणेत्या सावित्रीबाई फुले (३ जानेवारी १८२७ – १० मार्च १८९७) परिचय : महात्मा जोतिबा फुले यांच्याबरोबरच सावित्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते. कारण स्त्री- शिक्षणाच्या त्या आद्य. क्रांतिकारक होत्या.

पुण्यात स्त्री – शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा जोतिबांनी इ.स. १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिकाही मिळत नसत. तेव्हां जोतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकविले व तिची शिक्षिका म्हणून नेमणुक केली.

सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य झाले नाही, पण सर्व दीनदलितांना व अनाथांना जवळ करुन यांच्यावर सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणो प्रेम केले व त्यांना अनेक दुःखापासुन मुक्त करण्यासाठी, स्वतःच्या रक्ताचा थेंब व क्षण वेचला.

सावित्रीबाईंना मूल न झाल्यामुळे जोतिबांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला, पण जोतिबांनी त्याला साफ नकार दिला. कारण त्यांचे पत्नीवर अढळ प्रेम होते. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.

सर्वटीका, छळ सहन करुन एका थोर समाजसुधारकाची जीवनसहचरी म्हणून धैर्याने वागून जोतिबांचे जीवन धन्य करण्यास त्यांना सर्वतोपरी साह्य केले. सावित्रीबाईंना उत्तम शिक्षण मिळाले.

जोतिबा फुले व सावित्रीबाईंचे शिक्षणाचे हे पवित्र कार्य चालू असतांना त्यांच्या कार्यात अडचण आणण्याचा प्रयत्न जोतिबांचे वडील करत असे. त्या काळात स्त्रियांना शिकविले जात नसे. जोतिबांच्या वडिलांना असे वाटले की, त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यामुळे धर्माला कळिमा लागेल ४२ पिढया नरकात जातील.

पण सावित्रबाई डगमगल्या नाहीत, जोतिबांनी स्त्री शिक्षण चळवळीचे नेते होते. त्यांच्या मुलींच्या शाळेत, मुलींची संख्या हळुहळु वाढू लागली. पुण्यामध्ये त्या काळात हे कार्य म्हणजे एक चर्चेचा विषय झाला होता.

सावित्रीबाईजवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता. संत चोखामेळा मंदिरात सावित्रीबाईंनी महार, मांग,कुणबी इ. लोकांच्या मुलींसाठी शाळा काढली. स्त्री – शिक्षिकेचा हा पहिला गौरव होता.

असा मान आतापर्यंत कोणालाही मिळाला नव्हता. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले, ते प्रत्यक्ष कृतीत आणले. शाळेमध्ये सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्यावर त्या निर्मल ध्येयाने निस्वार्थपणे अध्यापनाचे काम करीत.

सावित्रीबाईंचा मानसिक छळ नातेवाईकांनी, समाजाने व सनातन्यांनी केला. तसाच शारीरिक छळ करण्याचा विचारही काहींनी केला. रस्त्यातून जात असतांना एखादी कर्मठ बाई शिव शिव करीत, तिच्या अंगावर शेणाचा गोळा भिरकावून मारी. त्या शेणाची घाण, सावित्रीबाईन रागावता स्वच्छ करीत.

थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी भगिनी झाडलेला कचरा माडीवरुन त्यांच्या अंगावर पडेल, अशा बेताने टाकीत. तेव्हा हसून सावित्रीबाई म्हणत, बरे झाले बाई, तुम्ही ही फुले टाकलीत, ही फुले उधळून तुम्ही माझा सत्कारच केला, ही फुलेच मला माझ्या विद्यार्थ्यानींना शिकविण्यासाठी उत्तेजन देतील. आणि ती भरभर शाळेकडे निघून जाई.

एकदा शाळेकडे जातांना, चौकात चार-पाच गुंड मुले बसली होती. सावित्रबाई तिथे आल्यावर त्यांच्यापैकी एकजण पुढे येऊन म्हणाला, नुलींना आणि महार मांगांना शिकविणे तू बंद कर,नाहीतर तुझी अबु शाबूत राहणार नाही. हे शब्द ऐकताच त्या गुंडाला तिने ताड ताड अशा तीन मुसटीत ठेवून दिल्या तो गुंड मुलगा गाल चोळतच राहिला.

अशा संकटांना तोंड देण्यास सावित्रीबाई समर्थ होत्या.तरी जोतिरावांनी एक पट्टेवाला यांच्यासोबत दिला. जोतिरावांनी काढलेल्या सर्व शाळांचा खर्च ते पदरमोड करुन करीत असत. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक असतांना, त्यांनी इतक्या थोडया वेळात शाळेने चांगली प्रगती केली,

हे त्या चालकांना भूषणावह आहे, असा शेरा दिला होता. त्याकाळात विधवा महिलांचे केशवपन होत असे. विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे अशी रुढी परंपरा त्या काळी होती. तिला अपशकु” समजले जाई. तिला पांढरे वस्त्र परिधान करुन घरातच कोंडुन ठेवले जाई.

सावित्रीबाईंनी स्त्रियांचे हे दुःख जवळून पाहिले. केशवपनाची दृष्ट रुढी नष्ट झाली पाहिजे, असे त्यांनी ठरविले. परंतु लोक ऐकेनात. तेव्हा जोतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची एक सभा बोलविली आणि आपण आपल्या भगिनीवर वस्तरा चालवितो हे केवढे पाप आहे, याची जाणीव त्यांना करुन दिली व त्यांना केशवपनास जाऊ नका असे सांगितले.

न्हाव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला . तो गाजला. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह २८ जानेवारी १८५३ ला सुरु केले. बालविधवांचे दुःख त्यांनी जाणले. भ्रूणहत्येचा प्रकार रोजच घडत आहे, असे त्यांनी पाहिले.

विधवांसाठी सुरक्षितपणे बाळंतपण व्हावे, म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाई शेकडो विधवांच्या माता झाल्या. अस्पृश्यांसाठी जोतिबांनी पाण्याचे हौद खुले केले, त्यात सावित्रीबाईंचा वाटा फार मोठा होता. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या.

तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. सावित्रीबाईंचा १८५० साली पहिला काव्यसंग्रह तर १८९० साली दुसरा काव्यसंग्रह प्रसिध्दी झाला. १० मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली.

सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले. आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला. स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषांइतकेच काम करु शकते. हे त्यांनी स्वतःच्या कृतीने सिध्द करुन दाखविले.

काय शिकलात?

आज आपण सावित्रीबाई फुले बद्दल माहिती मराठीत – Savitribai Phule Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

सावित्रीबाई फुले – माहिती

परिचय: सावित्रीबाई फुले (३ जानेवारी १८३१ – १० मार्च १८٩७) ह्या भारतीय समाजसुधारक, शिक्षिका आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महनीय व्यक्ती होत्या. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे एका सामान्य शेतकऱ्या कुटुंबात झाला. तेव्हा महिलांसाठी शिक्षण, समान हक्क, आणि सामाजिक बदल यावर फार कमी चर्चा होती, पण सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनाच्या कार्यात त्या सर्व वादविवादांना तोंड दिले. त्यांची कार्यक्षमता आणि समर्पण त्यांना भारतीय समाजात एक महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देणारी आहे.

प्रारंभिक जीवन: सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांचा विवाह ९ वर्षांच्या वयात १८४० मध्ये ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यांच्या पती ज्योतिराव फुले यांनाही समाजातील विविध दडपणांना तोंड द्यावं लागलं होतं, आणि दोघांनीही समाजातील पारंपरिक जडणघडणांना आव्हान देण्यासाठी संघर्ष केला. सावित्रीबाईंचं शिक्षण ही त्या काळात समाजाच्या मापदंडानुसार अप्रत्याशित होतं. त्या वेळी बहुतेक मुलींचं शिक्षण बंद करण्यात आलं होतं, परंतु सावित्रीबाई फुले यांनी जिद्दीने शिक्षण घेतलं आणि त्याला महत्त्व दिलं.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य:

  1. शिक्षणाचा प्रसार: सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं. त्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्या मदतीने भारतातील पहिले महिला शाळा सुरू केली. पुण्यात १८४८ मध्ये “हिंदू महिला विद्यालय” सुरू केलं, जे महिला शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल ठरलं. त्यांच्या या शाळेत महिलांना आणि मुलींना शिक्षण दिलं जात होतं, जे त्या काळात अत्यंत साहसी आणि क्रांतिकारी होते.

  2. समाज सुधारणा: सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्त्रियांवरील अन्याय, जडवाद आणि भेदभावावर अनेक वेळा बोट ठेवलं. त्यांनी मुलींचं आणि स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गावर अडचणी दूर करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले. त्या काळात स्त्रियांवर होणारे अत्याचार, जसे की बालविवाह, सती प्रथा, आणि जाती व्यवस्थेतील भेदभाव यावर त्यांनी आवाज उठवला.

  3. स्त्री शिक्षणाचे समर्थन: त्यांचा प्रमुख ध्येय स्त्री शिक्षणाचा प्रसार करणं होता. त्यांनी शाळेतील मुलींना शिक्षित करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड दिलं आणि त्या शिक्षणाच्या क्षेत्रात एक आदर्श ठरल्या. त्यांनी ‘शिक्षणानेच स्त्रीला तिचे हक्क मिळवता येतात’ या तत्त्वज्ञानावर ठाम विश्वास ठेवला.

  4. साहित्य क्षेत्रातील योगदान: सावित्रीबाई फुले यांनी कविता आणि लेखनातही योगदान दिलं. त्यांनी महिलांच्या स्थितीवर आधारित अनेक कवितांचं लेखन केलं आणि त्यांच्या काव्याद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी संदेश दिला. त्यांनी जातिवाद, शोषण आणि सामाजिक भेदभावावर अनेक कविता लिहिल्या.

सावित्रीबाई फुले यांचे समाजातील योगदान:

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनातील कार्यामुळे महिलांच्या शिक्षणासोबतच समाजातील इतर घटकांना सुधारणेची दिशा दिली. त्या काळात स्त्रियांना मिळणारे शिक्षण, हक्क आणि समानता यासाठी त्यांचा संघर्ष समाजातील इतर महिलांसाठी एक आदर्श ठरला. त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भाग घेण्याची प्रेरणा मिळाली.

निष्कर्ष:

सावित्रीबाई फुले ह्या समाजसुधारक, शिक्षिका आणि महिलाशक्तीकरणाच्या नेत्याच्या रूपात सदैव आदर्श असतील. त्यांचे जीवन आणि कार्य समाजातील खूप मोठे परिवर्तन घडवून आणणारे होते. त्यांचा ध्यास आणि समाजाशी संबंधित तत्त्वज्ञान यामुळे त्यांना आजही एक प्रेरणा मानली जाते. त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतीय समाजाने महिलांच्या शिक्षणावर आणि समान हक्कांवर विशेष लक्ष दिले आणि आजही त्यांचे कार्य प्रेरणादायक आहे.

Exit mobile version