हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला छत्रपती राजर्षी शाहू महाराज बद्दल माहिती मराठीत – Shahu Maharaj Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – भगत सिंग
१] | नाव – | छत्रपती राजर्षी शाहू महाराज |
२] | जन्म – | २६ जून इ.स. १८७४ लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा, कोल्हापूर |
३] | मृत्यू – | ६ मे इ.स. १९२२ मुंबई |
४] | आई – | राधाबाई |
५] | वडील – | आबासाहेब घाटगे |
Contents
छत्रपती राजर्षी शाहू महाराज परिचय – Shahu Maharaj Information in Marathi
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे प्रबोधनपूर्व सुरु झाले, त्या प्रबोधनपर्वातील एक अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहूमहाराज होत.
अवघे ४८ वर्षाचे आयुष्य शाहुमहाराजांना लाभले. पण या आयुष्यातील त्यांची २८ वर्षाची कारकीर्द ही सामाजिक कार्याची होती. या काळात त्यांनी समाजउन्नतीचे नवे नवे प्रयोग केले.
राजकोट येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले १८९० ते १८९४ या काळात सर एफ्. एम्. फ्रेजर या गार्डियनच्या मार्गदर्शनाखालील इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास, राज्यकारभार इ. विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी धारवाड येथे केला.
बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्यांचा १८९० मध्ये विवाह झाला. त्यांना एक मुलगी झाली नंतर ३ अपत्ये झाली. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे त्यांनी हाती घेतली.
बहुविध सामाजिक व शैक्षणिक कार्य – Shahu Maharaj Information in Marathi
महाराजांच्या जीवनकार्यांची सुरुवात होते त इ.स. १८९४ पासून म्हणजे त्यांच्या राज्यरोहण समारंभपासून महाराजांनी दलित वर्गासाठी केलेले कार्य ऐतिहासिक स्वरुपाचे आहे. त्या काळात दलितांची शोचनीय स्थिती पाहून त्यांना फार वाईट वाटे.
दलितांच्या ठिकाणी स्वाभिमानाने व अस्मितेचे स्फुलिंग प्रज्वलित करण्यासाठी संपूर्ण भारतभर महाराजांनी व्याख्याने दिली. दलितांच्या परिषदेचे ते अध्यक्ष झाले. कायद्याचे विशेष अवबंडर न माजाविता वर्णवर्चस्वाला गाडण्यासाठी, महाराजांनी अस्पृश्यांना मानाच्या जागा दिल्या.
भर सभेत त्यांच्या हातचे पाणी पिणे, वाड्यावर अस्पृश्य नोकर ठेवणे, कोर्टात कारकून, गावात तलाठी नेमणे, वकिलीच्या सनदा देणे ही कामे त्यांनी दलितांना दिली.
महाराजांनी , हिंदू समाजातील अस्पृश्य आणि मागासवर्गीय यांना सर्वांच्या बरोबर अणण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरु केला, तेव्हा फार मोठा संघर्ष करावा लागला.
सामाजिक समता, स्वातंत्र्य , बंधुता आणि न्याय ही तत्वे व्यवहाराच्या पातळीवर म्हणजे आचरणात आणण्यासाठी शाहू महाराजांना धार्मिक, शैखणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात काम करावे लागले.
सरकारी खात्यात ज्या जागा रिकाम्या होतील, त्यातील ५०% जागांमध्ये मागसवर्गीय सुशिक्षित तरुणांची भरती करावी, असा जाहीरनामा त्यांनी काढला.
वर्णव्यवस्थेच्या कटू अनुभवामुळे आणि धर्मरुढीच्या प्रभावामुळे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व अबाधित मानणाऱ्या उच्चवर्णीयांच्या अहंकाराला शह देण्यासाठी त्यांनी अब्राह्मणांमधून वैदिक तयार करण्याची इच्छा बाळगली.
बहुजनसमाजातून वैदिक तयार होण्यासाठी त्यांनी १९ ऑगस्ट १९१९ रोजी शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केले येथील शाळेतील विद्यार्थी धर्मविधी सक्षमपणे पार पाडीत असत.
१९२० साली स्वतंत्र क्षात्र जगदगुरु धर्मपीठ सुरु करुन, त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुरुंग लावला. बालविवाहाला आळा घालण्याचे फर्मान काढले. कामगार लढ्याला उत्तेजन दिले. अनाथांसाठी अनाथालये चालविली. वेदाभ्यासाचा अधिकार सर्व लोकांना दिला.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक कार्य – Shahu Maharaj Information in Marathi
कोल्हापूर संस्थानात सर्व समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी केली. निरनिराळ्या खात्यांतील पदवीधरांची उणीव दूर करणे, राज्यकारभारातील एका विशिष्ट वर्गाच्या वर्चस्वाला आळा घालणे आणि राजकारण व राज्यकारभार यामध्ये सामाजिक शक्ती सबल असल्या पाहिजेत,
हा हेतू त्यांच्या शिक्षणकार्याच्या बुडाशी होता. त्यामुळे शिक्षणापासून वंचित असलेला समाज शाहूंच्या अथक परिश्रमामुळे जागृत झाला. त्यांनी समाजातील सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली व त्यांना अनुदाने दिली.
लोकांना शिक्षणाभिमुख केले. त्यांच्या प्रयत्नामुळे स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाणही झपाटयाने वाढले. सारांश, राजर्षी शाहू महाराज कृतिशील दलितोध्दारक होते. आधी केले मग सांगितले या भावनेने त्यांनी कार्य केले. म्हणून दलितांचा कनवाळू राजा म्हणून ते प्रसिध्दीस आले.
१९१३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली. सुधारित शेतीला प्रसार करण्यासाठी त्यांनी इन्सिटटयुट स्थापन केली. शेतीमालाला बाजरपेठ मिळाली पाहिजे, व्यापार मोठया प्रमाणावर सुरु झाला पाहिजे, तरच समृध्दी येईल यासाठी शाहुपुरी ही बाजारपेठ स्थापन केली.
क्रीडा, कला यांचेही महाराज भोक्ते होते. रोममध्ये पाहिलेल्या आखाड्यांसारखे कुस्त्यांचे त्यांनी कोल्हापूरला पहिले मैदान बांधले. नाटय, चित्रपट, संगीत या कलांनाही त्यांनी आपल्या दरबारात उदार आश्रय दिले.
अशा या युगप्रवर्तक राजाला अवघे ४८ वर्षाचे आयुष्य लाभले पण त्यांनी केलेले कार्य आज २१ व्या शतकातही प्रेरणादायी ठरेल. कारण ते कृतिशील सुधारक होते. त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा चिरंतन भावी पिढ्यांच्या मनात कोरला जाईल.
काय शिकलात?
आज आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज बद्दल माहिती मराठीत – Shahu Maharaj Information in Marathi पहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
खाली राजर्षी शाहू महाराज यांची माहिती मराठीत दिली आहे. ही माहिती शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी आहे.
👑 राजर्षी छत्रपती शाहू महाराज – माहिती मराठीत
✦ संपूर्ण नाव:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
✦ जन्म:
२६ जून १८७४, कागल (जि. कोल्हापूर)
✦ मृत्यू:
६ मे १९२२
✦ परिचय:
राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती आणि समाजसुधारक राजे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले.
✦ प्रमुख कार्य:
-
शिक्षणासाठी कार्य:
-
दलित व गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण.
-
छत्रवृत्ती योजना सुरू केली.
-
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
-
-
सामाजिक सुधारणा:
-
जातिभेद, अस्पृश्यता, बालविवाह यांना विरोध केला.
-
विधवांविवाहास प्रोत्साहन.
-
समाजातील मागासवर्गीयांना सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण देणारे पहिले राजे.
-
-
आंबेडकर यांना साथ:
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक व सामाजिक पाठिंबा दिला.
-
त्यांना “राजर्षी” ही उपाधी लोकांनी दिली.
-
-
शेतकरी व कामगार हितासाठी:
-
शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचे प्रयत्न.
-
कामगारांसाठी कामाचे तास निश्चित केले (८ तासांचा दिवस).
-
-
छत्रपती शाहू संग्रहालय आणि शिक्षण संस्था स्थापल्या.
✦ त्यांची ओळख:
-
राजर्षी म्हणजेच “राजा असूनही ऋषितुल्य जीवन जगणारे”.
-
ते खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी, द्रष्टे, आणि मानवतावादी नेते होते.
✦ निष्कर्ष:
शाहू महाराजांनी समाजात समानता, बंधुता आणि न्याय यांची पायाभरणी केली.
आज भारतात आरक्षण, शिक्षणाचा हक्क, महिला सक्षमीकरण यासारख्या गोष्टींमागे त्यांचेच बीजारोपण आहे.
“शाहू महाराज म्हणजेच न्याय, समता आणि शिक्षणाचा अधिष्ठान!”
हवे असल्यास, मी यावर:
-
भाषण (Speech)
-
१० ओळीतील संक्षिप्त माहिती
-
प्रोजेक्टसाठी मुद्देसूद माहिती
-
पोस्टरसाठी घोषवाक्य
हीही तयार करून देऊ शकतो.
कशासाठी वापरायचं आहे? (शाळा, स्पर्धा परीक्षा, प्रोजेक्ट)?