Site icon My Marathi Status

वज्रातून प्रकटलेली आदिशक्ती वज्रेश्वरी

वज्रेश्वरी हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तहसिलात वसलेले गाव असून ते मुंबई शहरापासून पूर्व राजमार्गाने सुमारे ८५ कि. मी. तर वसईहून ३१ कि. मी. अंतरावर आहे. येथे येण्यासाठी ठाणे, वसई व विरार ही जवळची स्टेशने आहेत. वज्रेश्वरी या स्थळाचे पुरातन काळातील नाव वडवली’ असे होते. ‘वज्रेश्वरी’ देवीने येथे वास केल्याने या जागेला वज्रेश्वरी म्हटले जाऊ लागले.

देवीचे किल्लेवजा मंदिर पौराणिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून अर्वाचिन काळातही भक्त मंडळींना परिचित होते. वज्रेश्वरी हे पार्वतीचे शक्तिरुप मानले जाते. या संदर्भात नवनाथ चरित्रात बरीच माहिती दिसून येते ती अशी. उग्रासूर नावाचा दैत्य द्वापारयुगाच्या शेवटी होऊन गेला. त्याचा मोठा मुलगा चांगला होता. परतु धाकटा मुलगा कलिकाल हा पराक्रमी परंतु दुष्ट बुद्धिचा होता.

त्याने हजारो वर्षे तपशयो करुन अजिंक्य पदाचा शंकराकडून ‘वर’ मिळवून घेतला. ‘वर’ मिळताच त्याच्या दुष्ट बुद्धिने सर्वांना त्रास देण्याचे ठरविले आणि इंद्रादी देव घाबरले. त्याच्यापढे आपला टिकाव लागणार नाही, म्हणून सर्वांनी पार्वतीची आराधना केली. पार्वतीने सांगितल्याप्रमाणे देव व दानवांचे घनघोर युद्ध झाले. कलिकालाने देवांची शस्त्रेच गिळंकृत करुन टाकली. इंद्र भयभीत झाला.

आपला पराभव नक्की आहे, असे त्याला वाटले व शेवटचे वज्र त्याने कालिकालावर फेकले. वज्राचे तुकडे झाले आणि दैत्याचा वध झाला. अशाप्रकारे वज्रातून प्रकट झालेली ही वज्रेश्वरी प्रसिद्ध झाली. तर दुसरी पौराणिक कथा अशी आहे की, श्री रामचंद्राने आपले गुरु वसिष्ट यांच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या इंद्राशी युद्ध सुरु केले. इंद्राने या युद्धात रामचंद्रावर वज्र सोडले. रामाने शक्तिबाण सोडून त्या वज्राचे तुकडे केले आणि या तुकड्यातून वज्रेश्वरी देवी प्रगट झाली.

इंद्र नामोहरण झाला व वज्रेश्वरी देवाला शरण गेला. वज्रातून निर्माण झालेल्या त्या शक्तीला रामचंद्राने वज्रेश्वरी हे नांव दिले. रेणुकेचे माहात्म्य परशुरामाने वाढविले होते. मच्छिंद्रनाथांनी रामाचे माहात्म्य वाढवणाऱ्या वज्रेश्वरीची आराधना सुरु केली. पुढे वैश्यांना आपल्या संप्रदायात आणण्यासाठी महालक्ष्मीचा समावेश केला आणि रेणुका, वज्रेश्वरी व महालक्ष्मी या मूर्ती एकत्र आल्या.

पोर्तुगिजांच्या तावडीतून वसईची मुक्तता करण्यासाठी पुण्याच्या पेशव्यांनी श्रीमंत चिमाजी आप्पांना वसईच्या मोहिमेवर पाठवले. वसईचा किल्ला सर करणे तसे सोपे नव्हते. तानसा नदीच्या काठी मराठा सैनिकांचा तळ पडला होता. किल्ला कसा सर करता येईल या विचारात चिमाजी आप्पा असतांना त्यांना एक साधूपुरुष डोंगरावर जात असतांना दिसला. त्याच्या हातात पाण्याचे भांडे होते. त्याने डोंगरावरील देवीच्या मूर्तीला अभिषेक करुन ध्यानस्थ बसला.

साधूच्या मागोमाग जाणाऱ्या चिमाजी आप्पांनी सुद्धा देवीला भक्तीभावाने नमस्कार केला. त्या रात्री आप्पांच्या स्वप्नात देवी येऊन तिने दृष्टांत दिला व संकेताप्रमाणे किल्ल्यावर हल्ला करण्यास सांगितले. पुढे लढाईत चिमाजी आप्पांना यश आले. त्यांनी नवस फेडला व वसईच्या किल्ल्याप्रमाणे दिसणारे भव्य मंदिर वज्रेश्वरीत निर्माण केले.

वसईच्या विजयाची आठवण म्हणून मंदिरासमोर दीपस्तंभ व दीपमाळ बांधली. हे मंदिर भव्य व प्रेक्षणीय आहे. हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार लागते. दर्शनीय मोठा नगारखाना आहे. मंदिराच्या सभोवार भक्कम किल्ल्यासारखी तटबंदी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वर म्हटल्याप्रमाणे तीन देवता, गणपती व इतर देवता आहेत.

मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर छोटा सुंदर असा सभामंडप असून सिंहाची मूर्ती आहे. अंगणात दत्त मंदिर असून येथेच दोन समाध्या पण आहेत. देवस्थानातर्फे वर्षप्रतिपदेपासून अनेक उत्सव, कार्यक्रम चालूच असतात. यावेळी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होते. पुण्याहवाचन, शतचंडिपाठ, अभिषेक, घटपूजा, सुवासिनी, ब्राह्मण, कुमारिका भोजन असे कार्यक्रम चालू असतात.

रात्री कीर्तन, भजन, प्रवचन चालू असते. येथे चैत्र वैद्य ११ पासून यात्रा भरते. चैत्र वद्य १४ ला महापूजा होते. वैशाख शुद्ध १ ला मध्यरात्री अभिषेक व पूजा झाल्यावर देवीची पालखी निघते. देवीला दररोज पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. दुःखितांना अभय देणारी ही देवी म्हणून तिची ख्याती आहे. वज्रेश्वरीच्या परिसरात गरम पाण्याची कुंडे आहेत. अकलोली येथील शंकर मंदिर, गणेशपुरीतील नित्यानंद बाबांची समाधी आहे. मुक्तानंदाचे गुरुदेव सिद्धपीठ जगप्रसिद्ध आहे.

वज्रेश्वरी: वज्रातून प्रकटलेली आदिशक्ती

प्रस्तावना: भारताच्या धार्मिक परंपरेत विविध देवते आणि देवते रूपांत आपल्या शक्तीचा अविष्कार करतात. वज्रेश्वरी ही एक अशी देवता आहे जिने आदिशक्तीच्या रूपात आपल्या अद्भुत शक्तीचा प्रसार केला आहे. वज्रेश्वरी देवी ही वज्राच्या प्रतीकासोबत संबंधित आहे. “वज्र” म्हणजेच कठोर आणि अभेद्य शक्ती, ज्याच्यात सामर्थ्य आणि शौर्य दोन्ही असतात. वज्रेश्वरी देवीचा संबोधन म्हणजेच त्या शक्तीला आपल्या जीवनात प्रवेश देणे, जी प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम असते.

वज्रेश्वरी देवीचा महिमा: वज्रेश्वरी देवीला ‘वज्रपाणी’, ‘वज्रधरिणी’, ‘वज्रशक्ती’ अशा अनेक नामांनी ओळखले जाते. वज्रेश्वरी देवी ही आदिशक्तीची महाकाय आणि निर्बंध रूप आहे, जी जगाच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे. तिचा आधार वज्रावर असतो, जे त्याच्या कठोरतेसह सृष्टीच्या अडचणींना पार करणारी शक्ती दर्शवते. ह्याच रूपात, वज्रेश्वरी देवीचा पूजन करतांना भक्त तिच्या सर्वशक्तिमान रूपाला साक्षात्कार देतात.

वज्रेश्वरी देवीचा इतिहास आणि स्थान: वज्रेश्वरी देवीचे प्रमुख स्थान भारतात अनेक ठिकाणी आढळतात. यापैकी एक प्रमुख स्थान म्हणजे वज्रेश्वरी मंदिर, जे महाराष्ट्रातील किल्ला वज्रेश्वरी येथे स्थित आहे. या मंदिराचा ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व खूप मोठा आहे. या ठिकाणी देवीच्या वज्राच्या रूपात पूजा केली जाते आणि येथे ती शक्ती आणि सामर्थ्य याचा प्रतीक म्हणून पूजली जाते. वज्रेश्वरी देवीच्या पूजा आणि तंत्रविद्या यांमध्ये प्राचीन वेदशास्त्र आणि तंत्रशास्त्र यांचा उपयोग होतो, जे भक्तांना त्यांच्या जीवनात असलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ देतात.

वज्रेश्वरी देवीचे रूप:
वज्रेश्वरी देवीचे रूप हे अत्यंत दिव्य आणि शक्तिशाली आहे. ती एक सुंदर रूप घेऊन वज्रधारी आणि शस्त्रधारी आहे. तिच्या हातात वज्र किंवा शंकार चक्र असतो. तिच्या उभ्या आणि स्थिर स्थितीमुळे तिला अत्यंत स्थिर आणि समृद्ध शक्तीचे प्रतीक मानले जाते. तिच्या रूपाने भक्तांना मन:शक्ती आणि शौर्य मिळवण्याचा संदेश दिला जातो.

वज्रेश्वरी देवीचा पूजन:
वज्रेश्वरी देवीचा पूजन त्या भक्तांच्या जीवनातील संकटे दूर करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. येथे वज्रेश्वरी देवीच्या पूजेसाठी विशेष तंत्र आणि मंत्रांचा वापर केला जातो. हे तंत्र विशेषतः आत्मशुद्धी, जीवनातील अडचणींना सोडविण्यासाठी, आणि साकारात्मकतेच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरते. भक्त देवीच्या वज्रधारी रूपाचे ध्यान आणि पूजा करताना आपली अंतर्निहित शक्ती शोधू शकतात.

वज्रेश्वरी देवी आणि भक्तांची श्रद्धा:
वज्रेश्वरी देवीवर असलेली श्रद्धा अत्यंत प्रगाढ आहे. या देवीच्या भक्तांनी तिच्या शक्तीला स्वीकारून आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या उपास्य रूपात भक्तांनी तिला व्रत, उपास्य कृत्ये, आणि नियमित पूजा अर्चा केली आहे. वज्रेश्वरी देवीच्या आशीर्वादाने अनेक भक्त आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि बल प्राप्त करतात.

निष्कर्ष:
वज्रेश्वरी देवी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली देवता आहे, जिने आपल्या वज्राच्या रूपाने अत्यंत शक्तिशाली असलेल्या जीवनाची ओळख दिली आहे. तिच्या उपास्य रूपात भक्त तंत्रविद्या, प्रार्थना आणि साधना करून आपल्या जीवनात शांती, सुख आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त करू शकतात. वज्रेश्वरी देवीच्या व्रत, मंत्र आणि पूजा यांद्वारे आपल्या जीवनातील सर्व संकटांचा निवारण करणे शक्य आहे. “वज्रधारी देवीला वंदन, जीवनात शक्ती मिळवा!”

Exit mobile version