सर्वांगासन बद्दल माहिती मराठीत – Sarvangasana Information in Marathi
हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला सर्वांगासन बद्दल माहिती मराठीत – Sarvangasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.
लक्ष द्या – योगासने कारण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ
सर्वांगासन या आसनात जमिनीवर पहुडून संपूर्ण शरीर वर उचलले जाते, म्हणून याला सर्वांगासन असे म्हणतात.
ध्यान : विशुद्धाख्य चक्रात.
श्वास : रेचक, पूरक व दीर्घ.
कृती : जमिनीवर अंथरलेल्या आसनावर शांत चित्ताने सरळ (उताणे) पहुडा. श्वास बाहेर सोडून अर्थात् रेचक करून कंबरेपासून दोन्ही पायांपर्यंतचा भाग सरळ आणि एकमेकांना जुळलेल्या स्थितीत वर उचला.
हातांचे कोपरे जमिनीला लागलेले असावेत. नंतर पाठीचा भागही वर उचला. दोन्ही हातांनी कंबरेला आधार द्या. मान आणि खांद्यांच्या बळावर संपूर्ण शरीर वर उचलून ताठ उभे करा. हनुवटी छातीशी जुळलेली असावी.
दोन्ही पाय आकाशाकडे असावेत. दृष्टी पायांच्या अंगठ्यांवर किंवा डोळे मिटून चित्तवृत्ती कंठातील विशुद्धाख्य चक्रात स्थिर करा. पूरक करून श्वास दीर्घ, स्वाभाविक चालू द्या.
या आसनाचा चांगला सराव झाल्यानंतर दोन्ही पाय मागेपुढे झुकवत, जमिनीला लावून इतर आसनेसुद्धा करू शकता. सर्वांगासनाच्या स्थितीत दोन्ही पाय मांडीला लावून पद्मासनही करता येते. प्रारंभी तीन ते पाच मिनिटे हे आसन करावे. अभ्यासक तीन तासांपर्यंत या आसनाचा वेळ वाढवू शकतात.
लाभ : सर्वांगासनाच्या नियमित सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो. साधकाने आपल्या रुचीनुसार आहार वाढविला पाहिजे. सर्वांगासनाच्या सरावाने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. अंग कांतिमय होते.
केस अकाली पांढरे होणे, केस गळणे इ. समस्या उद्भवत नाहीत. रोज एक प्रहर सर्वांगासनाचा अभ्यास केल्याने मृत्यूवर विजय मिळतो. सामर्थ्य वाढते. त्रिदोषांचे शमन होते. वीर्याची ऊर्ध्वगती होऊन अंतःकरण शुद्ध होते.
मेधाशक्ती वाढते. चिरतारुण्याची प्राप्ती होते. या आसनाने थायरॉईड ग्रंथीची शक्ती वाढते. तेथे रक्तसंचार तीव्रतेने होऊ लागतो. त्यामुळे थायरॉईड अल्प विकसित असलेल्या रुग्णास या आसनाने अद्भुत लाभ होतो.
यकृत व प्लीहेचे रोग दूर होतात. स्मरणशक्ती वाढते. चेहऱ्यावरील फोड-पुटकुळ्या आणि अन्य डाग दूर होऊन चेहरा तेजस्वी होतो. जठर व खाली सरकलेले आतडे आपल्या मूळ स्थानी येऊन स्थिर होतात.
जननेंद्रियावर सर्वांगासनाचा चांगला प्रभाव पडतो, स्वप्नदोष दूर होतो. मानसिक व बौद्धिक काम करणाऱ्यांनी तसेच विशेषतः विद्यार्थ्यांनी हे आसन अवश्य केले पाहिजे.
मंदाग्नी, अजीर्ण, अपचन, मूळव्याध, थायरॉईडचा अल्प विकास, थोड्या दिवसांचा अपेंडीसायटीस आणि साधी गाठ, अंगविकार, अकाली वृद्धत्व, दमा, कफ, त्वचारोग, रक्तदोष, स्त्रियांच्या मासिक पाळीतील अनियमितपणा/वेदना, पाळी न येणे किंवा अधिक येणे इ. विकारांत या आसनाने लाभ होतो.
डोळ्यांची आणि मेंदूची शक्ती वाढते. त्यांचे रोग दूर होतात. थायरॉईड वाढलेले असताना तसेच अशक्त हृदयाच्या, अति लट्ठ व्यक्तींनी एखाद्या अनुभवी योगाभ्यासकाचा सल्ला घेऊनच सर्वांगासन केले पाहिजे.
शीर्षासन केल्याने जे लाभ होतात ते सर्व लाभ सर्वांगासन आणि पादपश्चिमोत्तानासनाने होतात. शीर्षासनात चूक झाल्यास जी हानी होते तशी हानी होण्याची शक्यता सर्वांगासन व पादपश्चिमोत्तानासनात नसते.
काय शिकलात?
आज आपण सर्वांगासन बद्दल माहिती मराठीत – Sarvangasana Information in Marathi पाहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
सर्वांगासन (Sarvangasana) विषयी माहिती – मराठीत
Contents
🧘♂️ सर्वांगासन म्हणजे काय?
सर्वांगासन (Sarvangasana) हे एक प्राचीन आणि प्रभावी योगासन् आहे. ‘सर्व’ म्हणजे सर्व, आणि ‘अंग’ म्हणजे शरीराचे अवयव – म्हणून हे आसन संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. हे आसन करताना संपूर्ण शरीर उलटे (शिर खाली आणि पाय वर) ठेवले जाते आणि शरीराचा भार खांद्यांवर असतो.
🧾 सर्वांगासन कसे करावे?
-
पाठीवर झोपा आणि हात शरीराच्या बाजूला ठेवा.
-
श्वास आत घेत हळूहळू पाय वर उचला.
-
कमरेखाली हात देऊन पाठीस आधार द्या.
-
शरीर सरळ आणि ताठ ठेवा.
-
पाय, कमरेपासून थेट वर असावेत, बोटं आकाशाकडे.
-
हि स्थिती 30 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत ठेवा.
-
हळूहळू पाय खाली आणा आणि विश्रांती घ्या.
✅ फायदे (Benefits):
-
मेंदूला अधिक रक्तपुरवठा होतो, एकाग्रता वाढते.
-
थायरॉईड ग्रंथी सक्रिय होते.
-
पचनक्रिया सुधारते.
-
पाठदुखी आणि पाठीच्या त्रासांवर फायदा होतो.
-
त्वचा चमकदार आणि तजेलदार होते.
-
मानसिक तणाव कमी होतो.
⚠️ सूचना (Precautions):
-
उच्च रक्तदाब, हृदयरोग, मुळव्याध, डोळ्यांचे त्रास असलेल्या व्यक्तींनी हे आसन डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय करू नये.
-
गर्भवती महिलांनी हे आसन टाळावे.
-
सुरुवातीला प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करणे श्रेयस्कर.
🕉️ योगशास्त्रातील स्थान:
सर्वांगासन याला “असनेराज” (असनांचा राजा) असंही म्हटलं जातं. हे आसन हठयोग आणि राजयोग या दोन्हीत महत्त्वाचे मानले जाते.
तुम्हाला ह्याचं चित्र, स्टेप बाय स्टेप गाइड किंवा पीडीएफ हवे असल्यास सांगू!