+136 बाबांवर कविता व चारोळ्या | Poems On Father in Marathi

आज मी घेऊन आलोय आपल्या साठी बाबा विषयी काही चारोळ्या, कविता, quotes. लोक Father’s day दिवशी काही चारोळ्या कविता शोधत असतात.तर काही जण आापल्या बाबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळी शोधत असतो म्हणून आज आम्ही घेऊन आलोय काही चारोळ्या.

[तसेच तुम्ही बाबांसाठी टॉप 10 भेट वस्तु पण पाहू शकता इथे

तर काही जण काही keyword सर्च करत असतात. जसे की Father’s day kavita, Father’s day kavita in Marathi, father’s day quotes in marathi, father’s day kavita in marathi with images.

Marathi Kavita on बाबा…!!

Marathi Kavita on Father

माझे बाबा कविता

सारे वर्णिती आईची वेडी माया
तरी बाप असे कुटुंबाचा पाया
माया बापाची जणू नारळ खरे
राग जरी वर आत प्रेम झरे

घरासाठी बाप राबे दिनरात
देह झिजे त्याचा जळे जशी वात
ढाल बनुनी बाप उभा दारात
धजे ना कोणी उगा येण्या घरात

माया बापाची असे कस्तुरीपरी
दिसे न वरून जाणावी अंतरी
उलटेल जेव्हा वडिलांची साठी
बना तुम्ही त्यांच्या आधाराची काठी

माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी

माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी
स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन
आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही

पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन
आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही
पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

ज्याच॒ अस्तित्व कोणाला दिसत नाही
ज्याचे प्रेम कोणाला कळत नाही
दिवस-रात्र कष्ट करत असतो बिचारा
आपल्या परिवाराचा तोच असतो सहारा

बाप

सगळे फक्त आईचे गुणगान गातात
बाबा पण काहीँ कमी नसतात
आईच्या अश्रू सर्वांना दिसत असतात
पण बापाची धडपड कोणालाच नाही दिसत

मुलांशी जास्त बोलत नाहीत याचा अर्थ
त्याचं प्रेम नाही असं नसतं त्यांना पण
तुमच्या सारखेच काळीज असतं
न काही बोलता खूप काही करत असतो

आपल्याच मुलांसाठी जीवाचं रान करत असतो
त्यालाही वाटतं आपली मुलं मोठी व्हावी
त्याला समजून घेण्यासाठी थोडीशी बुद्धी हवी
कधी बाबांजवळ जाऊन दोन गोड़ गोष्टी

बोलून बघा नाही तुमचं प्रेम वाढलं तर मग सांगा
फक्त माझे बाबा स्ट्रिक्ट आहेत हे म्हणण्यापे
ते का स्ट्रिक्टपने वागतात याचा विचार करा
बाहेर जास्त वेळ फिरू देत नाहीत याचा अर्थ

त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही असं नाही
उलट त्यांना तुमची काळजी असते म्हणून
तें नाही तुम्हाला पाठवत नाही
कधी त्यांच्या त्या फाटक्या कपड्यांकडे आणि

त्या जुन्या चपला कडे पहा मग कळेल
प्रेम आणि काळजी काय असते
स्वत: फाटके कपडे घालून प्रत्येक सणाला
तुम्हाला नवीन कपडे घेऊन देणारा बापच असतो

दिवसरात्र काबाडकष्ट करून तुमची मौजमजा
चैणी आणि शिक्षण पूर्ण करतो
तो पण एक बापच असतो

वडील म्हणजे काय?

वडील म्हणजे अशी एक व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते,
तुम्हाला ओरडते,
जेव्हा एखादी चूक तुम्ही करता,

तुमच्या यशाचा आनंद
साजरा करता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते,
जेव्हा तुम्ही हरता,

कल्पतरू

बाप करुणेचा सागर
बाप डोईवरची झालर.,
बाप सुखाचा नागर
शेत करतो हिरवंगार..

बाप ग्रीष्मातली तहान
बाप देवाहून महान.,
बाप झिजवतो काया
घाले उभाजन्म लेकरांसाठी वाया..

बाप कल्पतरू च झाड
पुरवतो सगळेच लाड.,
बाप असावा सोबती
बाप जन्मभराचा सांगाती..

बापाची महती
कशी मांडावी शब्दांत.,
शब्दनाही असते धार
माझ्या बापाच्या हृदयात..

बाप बाप करता
जन्म जाईल सरून.,
तो असे पर्यंत
काढेल तुमची उणीव भरून..

बाप असावा सोबती
झिजवेल तो तुम्हा साठी काया.,
उभा जन्म माझा सार्थकी
अशीच माझ्या बापाची ही माया…

निलेश चंद्रभान पाटील
जामनेर जळगाव..✍️

🌺

🌺🌺
🌺

बाप’

महंती आईची,आम्ही खुप गातो,
मात्र,बापाच्या क्षत्राखालीही
आम्ही राहतो, हे सोयीस्करपणे विसरतो,
गाडा संसाराचा तोच चालवतो,
सुत्र अख्ख्या कुटुंबाचं मात्र..
तोच हलवत असतो,

आई जरी मुलांना आपल्या,
संस्काराचं बालकडू पाजत असली तरी,
बाप मात्र,कुटुंबातली अवघड
समीकरणं सोडवत असतो,

मुलांच्या गरजा भागवण्यातच,
त्याचं आयुष्य सारं सरतं,
मात्र, त्याच्या आस्तित्वाचं
कोणाला भानच नसतं,
मुलांचं पाहून सुख,

त्याच्या चेहऱ्यावर कधी तरळतं हास्य,
तर कधी तो…..मुलांना दुखात पाहून
एकटाच….. कोपर्यात रडत बसतो,
महंती आईची,आम्ही खुप गातो,

मात्र,बापाच्या क्षत्राखालीही
आम्ही राहतो,
हे सोयिस्करपणे विसरतो,

मंगेश शिवलाल बरं ई.
पंचवटी, नाशिक ४२२००३.

🌺🌺

🌺🌺

‘तरीही तो…’

बाप मुलांचा आधार असतो,
तरीही तो उपेक्षित राहतो,
तो स्वताचे अश्रू सावरून,
मुलांच्या डोळ्यातले अश्रू पुसतो,
तरीही तो उपेक्षित राहतो,
तो मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,
स्वताचं संपूर्ण आयुष्य झिजवतो,
तरीही तो उपेक्षित राहतो,
तो आपले दुःख लपवून,
मुलांचा आनंद आपल्या
नजरेत साठवतो,
तरीही तो उपेक्षित राहतो,
मुलांच्या भविष्याची स्वप्न रंगवतांना,
स्वताचं अस्तित्व हरवून बसतो,
तरीही तो उपेक्षित राहतो,
तो मुलांच्या सुखासाठी,
आयुष्यभर झुरत राहतो,
तरीही तो उपेक्षित राहतो,
मुलांवर आलेल्या मोठ्मोठ्या संकटांना,
तो सावरत असतो,
तरीही तो उपेक्षित राहतो,
तरीही तो उपेक्षित राहतो.

मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.

🌺

🌺🌺🌺

डोळ्यात न दाखवताही जो
आभाळा एवढं प्रेम करतो
त्याला वडील नावाचा
राजा माणूस बोलतात.

😊🙏

वडिलांची आठवण कविता

जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा
फक्त बापपाठीशी असतो..
😊🙏

Marathi Kavita on Baba

“बाप”
माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी
स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.

जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन
आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही
पैसे खर्च केले तरी मळणार नाही.

बाबा वर चारोळी

Marathi Kavita on Babaबाप चारोळी😊

❤️❤️

Marathi Kavita on वडिल बाबा वर चारोळी,बाबा वर कविता

साथ मिळो जन्मभर नसे
जीवा घोर व्याप आशीर्वाद
डोईवरी पाठी शाबासकी थाप।

mulgi baap kavita in marathi ,बापावर कविता

जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा
फक्त बापपाठीशी असतो..

बाबा वर चारोळी

स्वत: टपरा मोबाईल वापरुन,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल,
घेऊन देतो, तुमच्या प्रीपेडचे पैसै
स्वत: भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी
जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो,

मराठी बाप

ज्यांचा नुसता खांद्यावर

हात जरी असला,

तरी समोरच्या संकटांना,

लढा देण्याची प्रेरणा मिळते,

अशा माझ्या बाबांना, हॅपी फादर्स डे!

🍁

🍁🍁
🍁🍁

वडील म्हणजे काय कविता

बाबांचा मला कळलेला अर्थ…

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,

स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण…

🌺

🌺🌺🌺

शोधून मिळत नाही पुण्य,

सेवार्थाने व्हावे लागते धन्य,

कोण आहे तुझविणं अन्य?

‘बाबा’ तुजविण माझं जग आहे शून्य,

हॅपी फादर्स डे!

🌺🌺🌺🌺

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,

जी तुम्हाला जवळ घेते,

जेव्हा तुम्ही रडता,

तुम्हाला ओरडते,

जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,

तुमच्या यशाचा आनंद साजरा करते,

जेव्हा तुम्ही जिंकता,

आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,

जेव्हा तुम्ही हरता,

हॅपी फादर्स डे!

🍁🍁🍁🍁🍁

bap kavita

ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,

त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,

कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,

कारण बाप असतोच जीवनाचा आधार,

पितृदिनाच्या शुभेच्छा!

🍁🍁🍁🍁🍁

vadilanvar kavita in marathi

बाबा, तुम्ही आहात म्हणून

माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,

माझ्या यशाची चमक जेव्हा मला

तुमच्या डोळ्यात दिसते,

तेव्हा मी भरुन पावतो,

अशा माझ्या बापमाणसाला हॅपी फादर्स डे!

🍁🍁🍁🍁🍁

bap lek quotes in marathi

🍁🍁🍁🍁🍁

baba sathi kavita

माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे,

ती केवळ तुमच्यामुळे आहे,

माझ्या जगण्याला अर्थ आहे,

तो केवळ तुमच्यामुळे आहे,

माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे,

माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे,

हॅपी फादर्स डे!

🍁🍁🍁🍁🍁

वडिलांची कविता

काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या,

तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही,

कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही,

घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे

बापमाणूस,

तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज, हॅपी फादर्स डे!

🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁

बाप आणि लेक कविता

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही

मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि

तो म्हणजे बाबा

– पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🍁🍁🍁🍁🍁

baba quotes in marathi

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार

हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात

मी खूपच भाग्यशाली आहे की,

तुमची साथ मला लाभली

– Happy Fathers Day

🌺🌺🌺

माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे

मी आज या जगात आहे

तेही तुमच्यामुळे

– पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🌺🌺🌺🌞

कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर

अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट

प्रेम करतो आपल्यावर

🍁🍁🍁🍁🍁

short poem on father in Marathi

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात

तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि

तुम्ही माझे हिरो आहात

– Happy Fathers Day

🍁🍁🍁🍁🍁🍁

baba Marathi quotes

आईसाठी खूप लिखाण केलं जातं

पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण

आजचा दिवस आहे खास म्हणूनच

तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास

– पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🍁🍁🍁🍁🍁

बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे

म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे

🍁🍁🍁🍁🍁

baba Kavita in Marathi text

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे

कारण माझ्यासाठी भक्कम असा

वडिलांचा खांदा आहे

– पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🍁🍁🍁😊

Marathi Kavita on Baba

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

🌷🌷🌷🌷🌷

vadil kavita in marathi

वडील हे खंबीर नेतृत्वाचे प्रतिक आहे,

फणसाला बाह्यरुपाने जरी असले काटे

तरी अंतरी सदैव गोडवाच असतो,

स्वतः मात्र कश्याही परिस्थितीत राहून

मुलांच्या भवितव्यासाठी मोठी मोठी

स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणारे वडील असतात,

वडील घरचे आधारस्तंभ असतात, त्यांच्या

असण्याने कुणाही परकियांची वाकड्या नजरेने

बघण्याची हिंमत नसते,

असे हे संसार गाडा सुरळीत चालवणारे

आई बाबा असता

संस्कृत Kavita on वडिल

दैव होता तू, देव होता तू,
खेळण्यातला माझा खेळ होता तू |
शहाणी होती मी,वेडा होता तू,
माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू ||
आज तू फेडू दे, सारे पांग मला,
जगण्या रे मला अजुनही तूच हवा |||

बाप हाच देव ।मायेचा सागर ।

प्रेमाचे आगर । माझ्यासाठी… ॥

पकडले बोट । तात माझा गुरू ।

आयुष्य हे सुरू । बापामुळे… ॥

🌷🌷🌷🌷🌷

वडील आठवण कविता

कितीही अपयशी झाल्यावरही

विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो

तो म्हणजे बाबा

🌷🌷🌷🌷🌷

बाबांवर कविता (वडिलांवर कविता)

किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?

घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड

आपल्या आई वडीलांना

आपल्या सोबत ठेवण्यासाठी

कधीच नाही भांडत…

🌷🌷🌷🌷🌷

Father’s day special

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते

ती “आई”…

आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात

ते “बाबा”..

🌷🌷🌷🌷🌷

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर

आपले आईवडील

त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…

🌷🌷🌷🌷🌷

quotes for dad in Marathi

🌷🌷🌷🌷🌷

वडिलांवर Quotes

माझ पहिल प्रेम आई वडील

आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच

कमी झाल नाही..

papa quotes in Marathi

🌼🌼🌼🌼🌼

खरा आनंद तर तेव्हा होईल

जेव्हा पैसे माझे असतील

आणि खरेदी माझे आईबाबा करतील..

🍁🍁🍁🍁🍁

father quotes in marathi

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा

आपण भरारी मारत असू,

पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून

पहात असतील,

ते दोन डोळे म्हणजे आपले

आई-वडील..

🍁🍁🍁🍁🍁

मुलगी आणि बाबा कविता

आई बाबा वरती माया

अपार असायला पाहिजे

सागरासारखं प्रेम

अपार असायला पाहिजे

श्रावण बाळाने केली जशी सेवा

तशी आपण पण करायला पाहिजे

🍁🍁🍁🍁🍁

मराठी बाप

बाप चारोळी

“बाप”

माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी

स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.

मुलगी आणि बाबा कविता

जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा

फक्त बापपाठीशी असतो..

😊🙏🎈

Marathi Kavita on Father

वडिलांविषयी कविता
बाबा

तो कधीही स्तुती करीत नाही.

तो बढाई मारणारा कधीही नाही.

तो फक्त शांतपणे काम करतो

त्यांच्यासाठी त्याला सर्वात जास्त प्रेम आहे.

त्याची स्वप्ने क्वचितच बोलली जातात.

त्याची इच्छा खूपच कमी आहे,

आणि बहुतेक वेळा त्याची चिंता खूप बोलून जाईल.

तो तिथे आहे … एक भक्कम पाया

आमच्या सर्व जीवनातील वादळातून,

धरून ठेवण्यासाठी एक मजबूत हात तणाव

आणि कलहांच्या वेळी.

खरा मित्र आपण वळवू शकतो

जेव्हा काळ चांगला किंवा वाईट असतो.

आमच्या महान आशीर्वादांपैकी एक,

माणूस ज्याला आम्ही बाबा म्हणतो…

🌷🌷🌷🌷🌷

तुमच्या कविता

☀️सूर्याप्रमाणे तळपनाऱ्या
जीवनाच्या वाटेवर
मायेची सावली तुम्ही …
जीवनातील दु:खरूपी..
युद्ध व माझ्यातील…
ढाल बनता तुम्ही…
देव म्हनावे तरी कसे, तुम्हाला
तुम्ही तर त्याहुनी
श्रेष्ठ माझ्यासाठी…
देव देतो सुख दुःख दोन्ही …
पण तुम्ही ..
सुखाने आयुष्य भरले माझे तुम्ही….
पूर्व जन्माची पुण्याई माझी ..
लाभले पिता म्हणुनी तुम्ही…
हीच धन्यता माझी….

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: