सिंह पिंजऱ्यात अडकला
औरंगजेबाच्या दरबारातील जसवंतसिंग, जाफरखान इत्यादी महाराजांचे वैरी व जनानखान्यातील काही बायका महाराजांविरुद्ध औरंगजेबाचे कान फुकत होत्या. शिवाजीला एकदम मारून टाकावा असा आग्रह शाइस्तेखानाची बायको करीत होती. औरंगजेब सर्वांचे बोलणे ऐकत होता. अगदी शांतपणे, पण ही त्याची शंतता वरवरची होती. आतून तो धुमसतच होता. औरंगजेबाने गुप्त खलबत केले. शिवाजीचे काय करायचे? त्याला ठार मारावे, एखाद्या किल्ल्यात कायमचे डांबून ठेवावे की, तुरुंगात डांबावे? औरंगजेबाने मात्र मनाशी पक्के ठरविले होते की, शिवाजीला ठार मारायचे! महाराजांसंबंधी औरंगजेबाने आपले बेत अनेक वेळा बदलले.
प्रथम त्याने शिवाजीला रामसिंगाच्या ताब्यात न ठेवता आग्ऱ्याच्या मुसलमान किल्लेदाराच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण असे केले तर रामसिंग नामानिराळा राहील व शिवाजीला पळून जाण्यास मदत करील. मग रामसिंगाच्याच बरोबर काबूलच्या मोहिमेवर पाठवावे. त्यात अत्यंत क्रूर असा रादअंदाझखान हा आघडीवर राहणार होता. शिवाजीला वाटेत कुठेतरी ठार मारायचे व अपघातात शिवा ठार झाला अशी बातमी उठवायची असेही ठरविले, पण अमीनखानच्या रदबदलीने तोही बेत बदलला.
एकूण काय, औरंगजेबाला शिवाजीसंबंधी कोणताही सोक्षमोक्ष करता येईना. …आणि एक दिवस अचानक औरंगजेबाचा हुकूम सुटला, ‘आजपासून सगळी चर्चा बंद. शिवाजीने कोणाचीही गाठभेट घ्यायची नाही. रामसिंगाच्या घरी जायचे नाही.’ …आणि याहीपेक्षा भयंकर म्हणजे, औरंगजेबाने फुलादखान नावाच्या कोतवालाला हुकूम फर्माविला, नाममा ‘शिवाजीच्या निवासस्थानाला वेढा घाला, पहारे बसवा. पुरा बंदोबस्त करा. सावध राहा.’ हा हुकूम होताच फुलादखानाने महाराजांच्या निवासस्थानाला वेढा घातला. सैनिक किती होते, तर पाच हजार! आग्ऱ्याच्या बाहेर बळकट अशा ‘जयपूर महालात’ महाराजांना ठेवले होते आणि सभोवती पठाण आणि अरब यांचा कडक पहारा. तोफाही बसविल्या होत्या. त्यांची तोंडे जयपूर महालाकडे होती.
याचाच अर्थ महाराजांना कैद झाली! महाराष्ट्राचा सिंह औरंगजेबाच्या जाळ्यात अडकला! महाराजांचे मस्तक सुन्न झाले. सारे भीषण भविष्य त्यांच्या डोळ्यांपुढे दिसू लागले. घात झाला! आपले स्वराज्य, आपली माणसे आणि मांसाहेब यांची स्थिती कशी झाली . असेल? कल्पनाही करता येई ना. त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी शंभूराजांना पोटाशी धरले. महाराज औरंगजेबाच्या जाळ्यात अडकले ही बातमी राजगडावर मांसाहेबांना समजली तेव्हा त्यांच्या मनाची काय घालमेल झाली असेल? ‘मन चिंती ते वैरी न चिंती’. नको नको ते विचार मांसाहेबांच्या मनात येत होते.
महाराज सुखरूप परत यावेत; म्हणून अवघा महाराष्ट्र आपले दैवत पाण्यात घालून बसला होता, जगदंबेला साकडे घालीत होता. महाराज चिंताग्रस्त होऊन येरझाऱ्या घालीत होते. आता येथून सुटावे कसे? ही एकच काळजी. औरंगजेब शिवाजी महाराजांना ठार मारणार हे रामसिंगाला कळून चुकले. सभोवती फुलादखानाचा अहोरात्र जागता पहारा होता. रात्री अपरात्री फुलादखानाचे लोक महाराजांना ठार मारतील अशी त्याला भीती वाटत होती; म्हणून त्याने स्वत:च्या पूर्ण विश्वासातील खास माणसे महाराजांभोवती ठेवली होती. महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यांनी औरंगजेबाला पत्रावर पत्रे पाठविली, ‘मी माझ्या राज्यात परत जातो. सगळे किल्ले आपणास परत देतो.’ ‘मी संन्यास घेऊन काशीला जातो.’ ‘मी माझ्या मुलाला शाही चाकरीत ठेवून परत जातो.’ ‘पाहिजे ती शपथ घेतो.
आपण सांगाल त्या मोहिमेत दाखल होऊ.’ ‘आपले विजापूरशी युद्ध चालू आहे त्यात सामील होतो.’ अशी अनेक प्रकारे साखरपेरणीही केली, …पण बोलूनचालून तो औरंगजेब! महाराजांच्या असल्या भूलथापांवर तो थोडाच विश्वास ठेवतो? मात्र त्याने एक केले, रामसिंगाला महाराजांच्या जामीनकीतून मुक्त केले. औरंगजेबाच्या डोक्यात भलतेच काहीतरी शिजत होते. अगदी भयंकर! या वेळी आग्ऱ्यात फिदा-इ-हुसेन खानाच्या भक्कम वाड्याचे बांधकाम चालू होते. बांधकाम पूर्ण होत आले होते. औरंगजेबाचे या वाड्याकडे लक्ष होते. वाडा बांधून पूर्ण झाल्यावर शिवाजीला त्या वाड्यात डांबायचे.
तेथेच ठार मारायचे व पुरून टाकायचे असे त्याने अगदी पक्के ठरविले होते. शिवाजी महाराज मात्र गप्प बसले नव्हते. त्यांनी गुप्त मंत्र तंत्र सुरू केले. त्यांचे जिवलग सरदार रघुनाथपंत व त्र्यंबकपंत हे दोन वकील महाराजांच्या गुप्त मंत्र तंत्रानुसार गुप्त हालचाली करीत होते. अतिगुप्त, अतिदक्षतेने. कैदेत असलेल्या महाराजांनी दरबारातील व शहरातील प्रतिष्ठित लोकांवर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. अनेकांना भारी किमतीच्या भेटवस्तू पाठवून त्यांनी अगदी बेमालूम प्रेमाराधना सुरू केली. ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ असे म्हणतात ते काही खोटे नाही.
शिवाजीच्या प्रेमाराधनेमुळे ‘शिवाजी हा मोठा दिलदार, खानदानी चांगला राजा आहे’ अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. औरंगजेबाच्या तावडीतून निसटण्यासाठी महाराजांनी अनेक खटपटी केल्या, पण काही उपयोग झाला नाही. आता महाराजांच्या छावणीभोवतालची गस्त अधिकच कडक झाली. आपल्याला विठ्ठलदास किंवा फिदा-ई-हुसेन यांच्या वाड्यात हलविण्यात येणार असल्याच्या बातम्या महाराजांच्या कानावर आल्या. वेळ अगदी जवळ आली होती. बेत शिजला होता. बेत पक्का होता. महाराजांना आपला मृत्यू दिसू लागला. आता काहीही करून नवीन घरात जाण्यापूर्वीच सुटकेचा बार उडवून द्यायचा. औरंगजेबाच्या हातावर तुरी द्यायच्या. याचाच विचार महाराज करू लागले. पिंजऱ्यात अडकलेला सिंह बाहेर पडण्यासाठी धडपडत होता.
“सिंह पिंजऱ्यात अडकला” हा एक सामान्यत: दुःखद, चिंताजनक आणि अविचाराने घडलेल्या परिस्थितीचे प्रतीक होणारा वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ असा आहे की, शक्तिशाली, स्वातंत्र्यप्रेमी आणि साहसी व्यक्ती (जसे सिंह) ज्या परिस्थितीत मुक्तपणे फिरतो किंवा वावरतो, तो अचानक पिंजऱ्यात किंवा बंदिस्त परिस्थितीत अडकला आहे.
ही वाक्यप्रचार आपल्याला साधारणतः एका शक्तिशाली व्यक्तीच्या, गटाच्या किंवा संस्थेच्या दबावाच्या किंवा संकटाच्या परिस्थितीत अडकण्याची स्थिती दर्शवते. यामध्ये सिंहाची ताकद, धैर्य आणि सामर्थ्य असताना देखील, तो पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे, याचा अर्थ होतो की, जरी आपल्याकडे मोठा सामर्थ्य आणि शक्ती असली तरी, बाह्य परिस्थिती, निर्णय किंवा विविध कारणांमुळे आपल्याला अडकवले जाऊ शकते.
संवेदनशील संदर्भ:
-
राजकीय किंवा सामाजिक संदर्भ: एखादी शक्तिशाली संस्था, व्यक्ती किंवा नेता जो आपल्या स्वातंत्र्याशी किंवा तत्त्वावर विश्वास ठेवतो, तो एकदा संकटाच्या किंवा दबावाच्या परिस्थितीत अडकला, जिथे त्याला त्याचे निर्णय घेण्याची मुभा नाही किंवा त्याची अभिव्यक्ती मर्यादित आहे.
-
प्रेरणा: हे वाक्य असे देखील दर्शवू शकते की, जरी तुमच्याकडे बरीच शक्ती आणि सामर्थ्य असले तरी, बाह्य परिस्थितीवर कसा परिणाम होईल यावर नियंत्रण ठेवणे कठीण असू शकते.
उदाहरण:
कधी कधी एखादी जबाबदारी किंवा पर्यावरणीय दबाव एका महत्त्वपूर्ण नेता किंवा व्यक्तीस अशा परिस्थितीत आणतो की तो अधिक आश्रित किंवा निर्बंध होतो. याचे उदाहरण म्हणून, “सिंह पिंजऱ्यात अडकला” असे म्हणता येईल.
यामध्ये एक तत्त्वज्ञान आणि चेतावणी आहे – शक्ती किंवा सामर्थ्य यावरचं अधिकार कितीही असला तरी, बाह्य घटकांपासून पूर्णपणे सुरक्षित राहणं अवघड असतं.