Good Morning messages in Marathi In | शुभ सकाळचे संदेश मराठी मधून

Good Morning messages in Marathi:

“मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्तासुद्धा मिळेल”

शुभ सकाळ!

🌺

🌺🌺🌺
🌺🌺🌺
🌺

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते

शुभ सकाळ!

🌺🌺

🌺🌺🌺
🌺🌺🌺

“जीवनात जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे”

शुभ सकाळ!

🌺

🌺🌺
🌺🌺🌺
🌺🌺

“लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे असते”

शुभ प्रभात!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

थंडी क्षणांची पण गर्व कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी नाती मनांची

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

नाती तयार होतात हेच खूप आहे
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असे नाही
एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जच “शुभसकाळ” म्हटल्यावर दिवस चांगला जातो असे काही नाही किंवा….
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही….
पण “शुभसकाळ” पाठवल्यावर ज्यांना आपण पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते….
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखी वाटते..!!
“जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात”

शुभ प्रभात!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

बुद्धीला सत्याकडे,
भावनेला माणुसकीकडे
शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे संस्कार..!!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते ..!!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा….
।। आपला दिवस आनंदी जावो ।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.

शुभ प्रभात!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका…
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं”..
“मग ती वस्तु असो वा”….
“तुमच्यासारखी गोडं माणसं”…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्यासाठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
” मैत्री ” मैत्रीच नांत कस जगावेगळ असत,
रक्ताचं नसल तरी मोलाच असत…
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदाचा जाओ

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. –
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल “भविष्याला”…..
कधी निघून जाईल, “आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही..!!!

शुभ प्रभात!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी नाती हवी

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो

शुभ प्रभात!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली “आठवण” आहे

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही,
तर विचारांमधे आहे.
सौंदर्य भपक्यात नाही,
तर साधेपणांत आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं

शुभ प्रभात!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

निःशब्द होण्याची
वेळ तेव्हाच येते;
जेव्हा हृदयातील भावना
आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,
पण कानात गेलेले विष
हे हजारो नाते संपवून टाकते…
म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्यकिरणांची आवश्यकता असते
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देऊ नका.
कारण लोक नेहमी सोन्याच्या
शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही.

शुभ प्रभात!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..
क्षणा क्षणांच्या लाटांवर,
आयुष्य झुलत जावे..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
विनयशील रहा..
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
अगदी शांत रहा..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“शुभसकाळ” म्हणजे केवळ,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली “आठवण” आहे…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार…
एक हृदय घेऊन आलोय…
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स”
पुरेसा असेल तर “सुखाचा चेक”
कधीच “बाउंस” होणार नाही.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा..
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास

शुभ सकाळ!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते.

शुभ सकाळ!

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: