हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला गुरूनानक जयंती माहिती, इतिहास मराठी | Guru Nanak Jayanti Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
| महिना : | कार्तिक. | 
| तिथी : | पौर्णिमा. | 
| पक्ष : | शुद्ध. | 
आणखी वाचा – नाताळ
Contents
गुरूनानक जयंती मराठी । Guru Nanak Jayanti Information in Marathi
भारतामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. सण साजरे करतात. त्यामध्ये ‘गुरू नानक जयंती’ हा सण शीख धर्मीय लोक साजरा करतात. धार्मिक महत्त्व विविध धर्मसंस्थापकांनी तपश्चर्या करून, अभ्यास करून मानवी जीवनउद्धारासाठी स्वत:चा एक मार्ग आखला. तो त्यांनी इतरांना दाखवला. त्यातूनच एक धर्म बनला. प्रत्येक धर्माला एक संस्थापक लाभला. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक हे होत. त्यांची जयंती शीख बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात. गुरू नानक यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी पंजाबमधील तळवंडी या खेडेगावात झाला.
गुरू नानक हे ज्या वयात खेळायचे, त्या वयात गावात जी साधू-संत मंडळी येत, त्यांचा उपदेश ऐकत बसत. त्यांना चिंतन करण्याचा नाद लागला. पुढे मोठे झाल्यावर त्यांचे मन संसारात रमेना. त्यांनी फकीरत्व स्वीकारले. गुरू नानक हे उत्तम व उपजत कवी होते. त्यांनी अनेक रचना केल्या. त्यांची रचना जपजी’ ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यांच्या एकत्रित काव्यरचना, पदे, ‘गुरुग्रंथसाहिब’ मध्ये समाविष्ट आहेत. गुरुग्रंथसाहिब हा शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ आहे.
शिखांच्या मंदिरांना ‘गुरुद्वारा’ म्हणतात. तेथे गुरुग्रंथसाहिबाची पूजा होते. हिंदू, मुसलमान, शीख ही सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. ही शिकवण गुरू नानक यांनी दिली. गुरू नानक जयंतीला शीखधर्मीय बांधव ‘गुरुद्वारा’ येथे जाऊन प्रार्थना करतात. पहाटेपासून गुरुद्वारामध्ये अनेक कार्यक्रम होतात. गुरुद्वाराला विद्युत रोषणाई करतात. पूजन, कीर्तनादी कार्यक्रम होतात. शीख धर्मीय बांधव जगाच्या कुठल्याही भागात असले तरी आपल्या आद्य गुरूंची जयंती आपल्या परंपरागत व धार्मिक पद्धतीने साजरी करतातच.
गुरूनानक जयंती । Guru Nanak Jayanti Information in Marathi
“परमेश्वर एकच आहे. तो कोणत्याही एका धर्माचा नाही. जो भक्तिभावनेने त्याला शरण जातो, त्याला तो मिळतो. तो सर्वत्र आहे. सर्व मानव एकमेकांचे बंधू आहेत. जातिभेद निरर्थक आहे,” असा अत्यंत मोलाचा उपदेश करणारे गुरुदेव नानक शीख पंथाचे संस्थापक-प्रवर्तक आहेत. शीख लोक नानकांना आपले धर्मगुरू मानतात. गुरुदेव नानकांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी लाहोरजवळील रावी नदीच्या तीरावरील तलवंडी या गावी झाला. शीख पंथाचे जे सण, उत्सव आहेत त्यांत al गुरुनानक जयंती हा सर्वाधिक महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी शीख बांधव गुरुदेव नानकांच्या प्रतिमेची मोठ्या थाटात मिरवणूक काढतात.
गुरुद्वारात (प्रार्थना मंदिरात) प्रार्थना-प्रवचन, भजन, ग्रंथसाहेब या ग्रंथाचे पठण, लंगर इत्यादी कार्यक्रम होतात. या उत्सवात हिंदू लोक सुद्धा सहभागी होतात. नानकांच्या वडिलांचे नाव काळुचंद व आईचे नाव तप्ता. ते खत्री म्हणजे क्षत्रिय होते. नानकांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे नानांकडे झाला म्हणून त्यांना नानक असे म्हणतात. असे म्हणतात की नानकांच्या जन्माच्या वेळी सहा योगी, नवनाथ, बावन पीर, चौसष्ट योगिनी, चौऱ्याऐंशी सिद्धी व तेहेतीस कोटी देव त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्या वेळी हा मुलगा छत्रधारी, चक्रधारी होणार असून सर्वांनी याची पूजा करावी असा होणार आहे.
हा एका परमेश्वराशिवाय कुणाचीही पूजा करणार नाही, असे भविष्य सांगण्यात आले होते. गुरुदेव नानक लहानपणापासूनच अत्यंत सात्विक, धार्मिक होते. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. साधुसंतांच्या संगतीत बसून चिंतन करण्यात, भजन करण्यात ते वेळ घालवीत. नानक सात वर्षांचे झाले तेव्हा त्यांना शाळेत घातले. त्यांनी हिंदी, संस्कृत व फारसी भाषांचा सखोल अभ्यास केला. नवव्या वर्षी वडिलांनी त्यांची मुंज केली; पण त्यांनी जानवे धारण करण्यास नकार दिला. त्या वेळी नानक म्हणाले, “मला वेगळ्या प्रकारचे जानवे हवे आहे. दयेचा कापस बनवा. त्यापासून संतोषाचे सूत काढा. त्या सुताला सत्याचा लेप द्या व त्यावर संयमाचे संस्कार करा. असे जानवे मला घाला, की जे कधी तुटणार नाही. मळणार नाही. जळणार नाही.”
नानकांचे शिक्षणातही मन रमत नसे. नानकांच्या या विचित्र वागण्याने लोक त्यांना वेडा समजू लागले. शिक्षणात नानकांचे लक्ष नाही हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यास घरची गुरे राखण्याचे काम सांगितले. परंतु नानक रानात गुरांना सोडून द्यायचा व देवाचे भजन करीत बसायचा. मग नानकाला व्यापारात गुंतविले. पण व्यापारासाठी दिलेले पैसे नानक गोरगरिबांना दान करीत असे. विक्रीसाठी आणलेल्या वस्तू गरजू लोकांना फुकट देत असे. चौदाव्या वर्षी नानकाचा विवाह झाला पण संसारातही ते रमेनात. एके दिवशी नानक घरादाराचा त्याग करून घरातन एकाएकी निघन गेले. वैन नदीच्या तीरावर ते तीन दिवस चिंतन करीत बसले. त्या तीन दिवसांत त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे त्यांना ज्ञान झाले.
परमेश्वराने त्यांना नामपठणाचा, जप करण्याचा व ॐ हेच संतनाम आहे असा संदेश दिला. त्यानंतर नानकांनी कायमचा गहत्याग केला. भारतभर प्रवास करून त्यांनी सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. लोकांना उपदेश केला. प्रवचने केली. त्यांच्या दर्शनासाठी सर्व धर्म, पंथांचे- जातिपातीचे लोक येत. लोकांचे दुःख दूर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मी हिंदू नाही – मुसलमान नाही, असे ते सांगत.
जगात परमेश्वर एकच आहे. त्याचे नाव सत्नाम. तोच या सृष्टीचा निर्माता आहे. तो स्वयंभू आहे. परमेश्वर मीत नाही. म्हणन मर्तिपजा व्यर्थ आहे. त्याचे खरे रूप हृदयात आहे जातिभेद, धर्मभेद, पंथभेद खरे नाहीत. हा मूलमंत्र सांगून नानकाना जा नवान धर्म स्थापन केला त्याचे नाव शीख. नाम व गान, दान, स्नान, देवाची व मानवाचा सवा व ईश्वराचे स्मरण या पाच तत्त्वांवर नानकांनी भर दिला होता. परमेश्वर निगुण, निराकार, ॐकारस्वरूप आहे. तो सत श्री अकाल म्हणजे सर्वशक्तिमान आदिपुरुष आहे.
तो सत्यस्वरूप असन अकाल म्हणजे कालातीत आहे. अनंत आहे. सर्वव्यापी आहे. यावर शीख बांधवांची गाढ श्रद्धा आहे. गुरुदेव नानक शांतीचे दूत होते. विश्वबंधुत्वाचे, सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते होते. मानवतेचे पूजक म्हणून त्यांनी केलेले कार्य फारच मोलाचे आहे. त्यांनी नुसत्या स्वतंत्र पंथाची स्थापना केली नाही तर त्या काळात विशेषतः उत्तर भारतात सामाजिक क्रांती घडवून आणली. संगत (धर्मसंघ) व लंगर (अन्नछत्र) यांचा पाया घालून जातिधर्मरहित सामाजिक परंपरा सुरू केली. शिखांचा पवित्र ग्रंथ ग्रंथसाहेब यात नानकदेवांची ९४७ पदे आहेत.
अशा प्रकारे शीखपंथीयांचे साक्षात् देवच असलेले, हिंदुमुसलमानांना एकत्र आणणारे, जगाला प्रेमाचा संदेश देणारे गुरुदेव नानक यांनी १५३८ साली कर्तारपूर (सध्या पाकिस्तानात) येथे आपले अवतारकार्य संपविले. आपल्या मृत्यूनंतर हिंदुमुसलमानांत तंटे होऊ नयेत म्हणून नानकानी अगोदरच सर्व व्यवस्था करून ठेवली होती. माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीरावर फुले वाहावीत. चोवीस तासांनंतर ज्यांची फुले टवटवीत राहतील त्यांनी माझे मृत शरीर घ्यावे.
नानकांच्या या आदेशानुसार हिंदू व मुसलमान यांनी नानकांच्या मृतदेहावरील चादर दूर केली तेव्हा सर्व फुले टवटवीत होती. मात्र नानकांचा पार्थिव देह अदृश्य झाला होता. लोकांनी ती चादर अधी अर्धी वाटून घेतली. मुसलमानांनी तिचे दफन केले तर हिंदूंनी तिचे दहन केले. अशा या थोर अवतारी पुरुषाच्या जयंतीदिनी आपण सर्वांनीच त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या शिकवणुकीनुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे व ‘सत् श्री अकाल’ असे म्हटले पाहिजे.
काय शिकलात?
आज आपण गुरूनानक जयंती माहिती, इतिहास मराठी | Guru Nanak Jayanti Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
गुरु नानक जयंती माहिती:
गुरु नानक जयंती, ज्याला गुरुपुराब देखील म्हटले जाते, ही सिख धर्माच्या संस्थापक गुरु नानक देव यांच्या जयंतीचा उत्सव आहे. सिख धर्माच्या श्रद्धावानांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असतो. गुरु नानक देव यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी पंजाबमधील तलवंडी (जो आता पाकिस्तानातील ननकाना साहिब म्हणून ओळखला जातो) येथे झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त सिख समाज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो. हा दिवस एक साधा आणि शांतिपूर्ण उत्सव असतो, ज्यामध्ये ध्यान, कीर्तन, भजन आणि सेवा यावर भर दिला जातो.
गुरु नानक देव यांच्या जीवनाची थोडक्यात माहिती:
गुरु नानक देव हे सिख धर्माचे पहिले गुरु होते. त्यांच्या जीवनाचा आणि शिकवणीचा मुख्य उद्देश होता—“ईश्वर एक आहे” हे शिकवणे आणि मानवतेच्या, शांततेच्या आणि प्रेमाच्या शिकवणीला जागरूक करणे. त्यांची शिकवण त्यावेळी असलेल्या पंथ, जातिवाद आणि इतर धार्मिक तणावांपासून मुक्त होण्यासाठी महत्त्वाची होती. गुरु नानक देव यांनी आपल्या जीवनात अनेक चमत्कारीक कार्ये केली आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला समान मानले. त्यांनी धर्म आणि कर्माची साधी आणि खरी शिकवण दिली.
गुरु नानक जयंतीचा महत्त्वपूर्ण अर्थ:
गुरु नानक जयंती हा दिवस सिख समाजात एक नवा आणि पवित्र प्रारंभ मानला जातो. हा दिवस सामूहिक प्रार्थना, कीर्तन, भजन, लंगर (सामूहिक भोजन) आणि समाजसेवा यांद्वारे साजरा केला जातो. सिख धर्मानुसार, गुरु नानक देव यांची शिकवण म्हणजे सर्व मानवतेसाठी एक आदर्श आहे. त्यांचं मुख्य संदेश “ईश्वर एक आहे” हे आहे, जे त्यांच्या सर्व वचनांमध्ये आणि शिक्षांमध्ये मांडले गेले आहे.
गुरु नानक जयंती उत्सवाचे प्रमुख घटक:
- 
नगर कीर्तन: गुरु नानक जयंतीच्या दिवशी सिख धर्माच्या अनुयायी मोठ्या प्रमाणात नगर कीर्तन आयोजित करतात. यामध्ये भक्त गाती चालत असलेल्या कीर्तने, भजन आणि धार्मिक गजरांमध्ये सामील होतात. हा कीर्तन विविध गल्ल्यांमध्ये आणि प्रमुख सिख गुरुद्वारांपासून सुरू होतो आणि समाजातील लोकांपर्यंत पोहोचतो. 
- 
लंगर: लंगर म्हणजे सिख गुरुद्वारांमध्ये आयोजित केलेली सामूहिक भोजनाची व्यवस्था. प्रत्येक धर्म, जात किंवा आर्थिक स्थितीच्या वेगळ्या असले तरी सर्व लोकांना एकत्र बसवून, एकसमान भोजन दिले जाते. लंगर हा समाज सेवा आणि समानतेचा प्रतीक आहे. 
- 
कीर्तन आणि भजन: गुरु नानक जयंतीच्या दिवशी अनेक सिख गुरुद्वारांमध्ये विशेष कीर्तन आणि भजनांचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमांमध्ये गुरु नानक देवांच्या उपदेशांवर आधारित धार्मिक गाणी गातात, ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक शांती मिळते. 
- 
पाठ आणि श्रद्धांजली: गुरुद्वारांमध्ये विशेष प्रार्थना आणि गुरु ग्रंथ साहिबचा पाठ केला जातो. गुरु ग्रंथ साहिब हे सिख धर्माचे पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये गुरु नानक देव आणि इतर गुरुंच्या उपदेशांचा समावेश आहे. 
- 
धार्मिक उपदेश: गुरु नानक जयंतीसाठी अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात गुरु नानक देव यांच्या शिक्षांवर आधारित उपदेश दिले जातात. 
गुरु नानक जयंतीचे महत्त्व:
- 
मानवतेची शिकवण: गुरु नानक देव यांनी सर्व मानवांना एकसमान मानले आणि धर्म, जात, वंश या बाबींना मान्यता दिली नाही. त्यांचा संदेश होता—“ईश्वर एक आहे” आणि सर्व मानवतेला समान मानले पाहिजे. 
- 
समाजसेवा: लंगर सेवा, भिक्षाटन आणि दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे हे गुरु नानक देव यांच्या शिकवणीचे महत्त्वपूर्ण अंग होते. 
- 
आध्यात्मिक जागरूकता: गुरु नानक देवांचे संदेश आणि त्यांचे जीवन आध्यात्मिक जागरूकतेचे प्रतीक आहे. त्यांनी लोकांना भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक उन्नतीवर भर देण्यास शिकवले. 
निष्कर्ष:
गुरु नानक जयंती हा एक पवित्र आणि आनंदमय दिवस आहे जो सिख समाजाच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या दिवशी सिख धर्माचे अनुयायी गुरु नानक देव यांच्या शिकवणीचे पालन करत, समाजातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम करतात. गुरुद्वारांमध्ये आयोजित केलेल्या विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे, हा दिवस प्रेम, एकता, आणि समर्पणाच्या मूल्यांचा उत्सव साजरा केला जातो. गुरु नानक देव यांची शिकवण आजही लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकते.

