मातृभाषा चे महत्व मराठी निबंध | Matrubhasha Che Mahatva

Matrubhasha Che Mahatva – मित्रांनो आज आपण मातृभाषा चे महत्व निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Matrubhasha Che Mahatva

२७ फेब्रुवारी निमित्ताने आपल्या राज्यात, महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस साजरा होतो. मातृभाषेला इतके अवाजवी महत्व का देण्यात येते? यापाठी काय कारण आहे? कधी विचार केला आहे का तुम्ही? मातृभाषेला मानवी जीवनात आणि समाजात काय स्थान देता?

मानवी समाजाच्या, संस्कृतीच्या विकासामध्ये भाषेची काही भूमिका काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न म्हणजेच आपल्या मातृभाषेचे महत्व नक्की काय आहे हे पाहणार आहोत.

संत ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेचे कौतुक करताना म्हणतात कि, matrubhasha che mahatva marathi nibandh

माझ्या मराठीची बोलू कौतुके |

परी अमृतातेही पैजा जिंके |

ऐसी अक्षरे रसिका मेळविन ||

मातृभाषा चे महत्व मराठी निबंध

सारांश-
अमृताहुनी गोड असलेली मराठी हि आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आपल्याला आई सारखी जवळची आणि प्रिय असलेल्या मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. matrubhasha che mahatva marathi nibandh

सुरुवातीला आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ, यानंतर अनेक विचारवंत आणि लेखकांनी लिहिलेली पुस्तके, कथा कादंबऱ्या यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात अमुलाग्र बदल होत गेला.

मराठी भाषेतील आद्यकवी शंकराचार्य यांनी आपल्या विवेक सिंधू ग्रंथामध्ये मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे. कि आपल्या मराठी भाषेत इतके ग्रंथ उपलब्ध आहेत. खूप सारे ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध आहे. मग आपण ज्ञान मिळवण्यासाठी इतर भाषांचा उपयोग का करावा.

Matrubhasha Che Mahatva Marathi Nibandh

भाषा म्हणजे काय? ‘matrubhasha che mahatva marathi nibandh’

तुमच्यापैकी प्रत्येकाला माहित आहे की भाषा म्हणजे नेमके काय? ते तुम्हाला सांगायची गरज नाही. शाळेत 5वी पर्यंत शिकलेला पोरगा पण सांगू शकतो तुम्हाला भाषा काय आहे ते!

हा देखील निबंध वाचा »  मी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी | Mi Phulpakharu Zale Tar Nibandh Marathi

आपल्या भावना, विचार, संवेदना, कल्पना, माहिती इ. चे देवाणघेवाण करण्याचे माध्यम म्हणजे भाषा. भाषेचा वापर करून आपण आपले विचार, भावना, माहिती इतरांशी शेअर करतो आणि त्यांच्याकडील माहितीप्राप्त करतो.

भाषेच्या माध्यमातून आपण व्यक्त होतो, बोलतो, मनाला मोकळ करतो. वर्तमान सांगतो तर इतिहास लिहतो; याच भाषेचा वापर करून आपण आपल्या सुंदर भविष्याची स्वपने पाहतो आणि दाखवतो देखील. “Matrubhasha Che Mahatva”

मराठी भाषेचे महत्व

मराठी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा, आदर करायला हवा. दुसऱ्यांना आपल्या भाषेचे आकर्षण वाटावे अशी अपेक्षा असेल तर आपल्याला आपली मातृभाषा बिनचूक आणि मुद्देसूदपणे बोलता आणि लिहिता आली पाहिजे.

जर लहान वयात हे साधले तर देश-परदेशात गेल्यावर सुद्धा भाषेच्या माध्यमातून लोकांच्या मनात जागा मिळवता येईल. भाषेचा पाया व्याकरणात असतो. व्यवहारात प्रभावी आणि अचूक भाषेमुळे फायदा होतो.

निबंधातले विचार, वाक्प्रचारांचा बोलताना उपयोग, पत्रलेखन आणि अर्जलेखन, वृत्तांत लेखन, जाहिराती आणि कार्यालयीन टिप्पणी यांची वेळोवेळी गरज भासते. याचा विचार करून हे लहानसे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, वाचक यांच्यासाठी हा निबंध सादर केले आहे. याचे स्वागत होईल असा विश्वास व्यक्त करतो. {Matrubhasha Che Mahatva}

मातृभाषेचे महत्व काय आहे?

मातृभाषेचे महत्व जगातील कोणताही मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ नाकारूच शकत नाही. जगातील कोणतीही व्यक्ती मातृभाषेत इतर भाषांच्या तुलनेत अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त होऊ शकते.

अस्सलिखीत इंग्रजी बोलणारा आपल्या गावाचा साहेब रागात आल्यास शिव्या मराठीतंच देतो हे पाहिलं असेल तुम्ही. ‘कोणी घर देता का घर?’ म्हणणारा श्रीराम लागू कितीही हाडाचा अभिनेता असला तरी हा संवाद इंग्रजीत बोलून तो दर्शकांच्या काळजाला हात घालून शकत नाही.

तुमच्यावर शेक्सपिअर तात्यांचा कितीही प्रभाव पडला तरी तुम्ही इंग्रजी दर्शकांची बरोबरी करून शकत नाही. कारण भाषा म्हणजे केवळ शब्दांचा जाल नसून भावनांची किनार आणि संवेदनांचा ओलावा जपणारं माध्यम आहे. ‘च्या आयला’ फक्त लिहलं तरी तुम्ही माझी मनस्थिती, माझी भावना आणि माझ्या संभाषणाची तीव्रता समजू शकता.

हा देखील निबंध वाचा »  कोविड-19 निबंध मराठी | covid 19 nibandh in marathi

हे इतर कोणत्याच भाषेबद्दल तुम्हाला जमणार नाही. कारण काय? कारण तुमची आणि माझी भाषा एकच आहे. शाब्दिक संवेदना एकच आहे. जगभरातील शिक्षणतज्ञ याची साक्ष देत आहेत की मातृभाषेतून प्राप्त केलेले ज्ञान चांगल्याप्रकारे आत्मसात केले जाऊ शकते.

त्यावर चिंतन, त्याची चिकित्सा आणि संशोधन अधिक चांगल्याप्रकारे केले जाऊ शकते. विकासाच्या आणि संशोधनाच्या नवनव्या वाटा मातृभाषेतूनच सापडतात. [Matrubhasha Che Mahatva]

मराठी मातृभाषा निष्कर्ष

माझी मराठी मला प्रिय आहे. परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेला मनाचे स्थान मिळताना दिसत नाही. हि आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ठिकठिकाणी मराठी भाषेची गळचेपी होताना दिसते.

मराठी शाळा बंद होऊन या शाळांची जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली. मराठी शाळांमध्ये मराठी हि ज्ञानभाषा असते म्हणजे सर्व विषयांचे ज्ञान आपण मराठी भाषेतून ग्रहण करत असतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी हि ज्ञानभाषा असते. सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेतून घ्यावे लागते.

मोठमोठ्या शिक्षणतज्ञांनी सांगितले आहे कि ज्ञान मिळवण्यासाठी आपली मातृभाषा उत्तम. परंतु हे आपल्या जनतेला आणि पालकांना कधी समजणार? आजच्या शिक्षणमहर्षीनी शिक्षणाचा बाजार उठवलाय. या बाजारात मराठी भाषेला नगण्य स्थान आहे. इंग्रजी पुढे चालले.चालली आहे.

मराठी भाषेचे महत्व निबंध मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहले खरेच धन्य एकतो मराठी...

खरच आपण सर्व या जगामध्ये भाग्यवान आहात कारण मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी ही भाषा खूप गोड आणि सुंदर आहे. प्रत्येक मराठी माणसाची एक खासियत अशी असते की तो हिन्दी संस्कृत या भाषा सहज आणि सोप्या रीतीने समजू आणि बोलू शकतो.

तसेच इंग्रजी बोलणे ही त्याला सोपे जाते कारण मराठी भाषा ही या भाषांमधूनच विकसित केली गेली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मायबोली आहे. तसेच तिचे विभाजन ही तेथील प्रदेशानुसार केले गेले आहे. 13 व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवतगीतेवर मराठीत “ज्ञानेश्वरी” ग्रंथ लिहिला.

हा देखील निबंध वाचा »  झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | jhade lava jhade jagva marathi nibandh

त्यांचे समकालीन, संत नामदेव यांनी मराठीत तसेच हिंदी भाषेत श्लोक, अभंग लिहिले. संत कवी एकनाथ यांनी “एकनाथी भागवत” लिहिले जे भागवत पुराणावरील भाष्य आहे.

संत तुकाराम महाराज यांनी मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनविली. संत तुकाराम यांनी सुमारे 3000 अभंग लिहिले. आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले.

परंतु हल्लीच्या जमान्यात आपले अनेक संवाद हे जागतिक स्तरावर होत असल्या कारणाने लोक इग्रजीचा वापर फार करत चालले आहेत. मात्र मराठी माणसाने आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा या करता परिश्रम करणे सुरू केले आहे आणि आता तर गूगल सारख्या नामवंत कंपनीला ही मराठी भाषेचे महत्त्व समजले आहे.

तर मित्रांना “Matrubhasha Che Mahatva Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मातृभाषा चे महत्व मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

मातृभाषेचे महत्त्व – निबंध

मातृभाषा म्हणजेच आपल्या जन्मापासून आपल्या कुटुंबातील, समाजातील आणि आपल्या वावरणातील संवादाची भाषा. हेच आपल्याला आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि इतिहासाशी जोडते. मातृभाषा आपली ओळख असते, तीच आपली मुळांची भाषा असते आणि तीच आपल्याला विचार करण्याचा आणि व्यक्त होण्याचा स्वाभाविक मार्ग आहे. आपली मातृभाषा केवळ संवादाचा एक साधन नसून ती आपल्या व्यक्तिमत्वाची, सांस्कृतिक परंपरेची आणि ऐतिहासिक समृद्धीची दुवाहिक असते.

मातृभाषेचे महत्त्व – भाषा आणि संवादाचे महत्त्व

मातृभाषेच्या माध्यमातूनच आपण आपले विचार, भावना आणि अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहचवू शकतो. जेव्हा आपल्याशी संवाद साधला जातो, तेव्हा आपली मातृभाषाच सर्वात प्रभावी, सहज आणि नैतिक आहे. शाळेतील शिक्षण किंवा कुटुंबातील वावरण हे सर्व आपल्या मातृभाषेतूनच प्रभावी होतात. शिक्षण घेणाऱ्यांसाठी मातृभाषा हे खूप महत्त्वाचे आहे, कारण शिक्षण मातृभाषेत घेतल्यास, ज्ञान अधिक प्रभावीपणे समजते आणि आत्मसात केले जाते.

सांस्कृतिक दृषटिकोनातून मातृभाषेचे महत्त्व

मातृभाषा आपल्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. आपल्या मातृभाषेतूनच आपली कला, साहित्य, काव्य, कथा आणि परंपरा प्रकट होतात. संस्कृती आणि परंपरेची गोडी मातृभाषेतच जास्ती अनुभवता येते. प्रत्येक समाजाची आणि समुदायाची एक खास मातृभाषा असते जी त्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे, चालीरीती आणि सामाजिक रचनांचे प्रकट करणारे असते.

मातृभाषेमुळेच आपल्याला आपले इतिहास, दंतकथा, पारंपरिक काव्य, गीत, आणि इतर सांस्कृतिक घटक अधिक प्रभावीपणे समजतात आणि त्यांचे महत्त्व काय आहे हे शिकता येते.

सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातून मातृभाषेचे महत्त्व

मातृभाषेतील संवादामुळे एक सामाजिक व आपुलकीचा बंध तयार होतो. एखादी व्यक्ती आपल्या मातृभाषेत बोलत असताना, ती अधिक आत्मविश्वासाने आणि आरामात व्यक्त होते. हेच कारण आहे की कोणत्याही व्यक्तीला तिच्या मातृभाषेत व्यक्त होणे अधिक सोयीस्कर आणि नैसर्गिक वाटते. त्याचप्रमाणे, मातृभाषेतूनच आपण आपल्या विचारांची स्पष्टता आणि भावनांची गोडी व्यक्त करू शकतो.

मातृभाषेतील शिक्षण आपल्याला मानसिकदृष्ट्या चांगले बनवते, कारण आपण जो शिक्षण घेतो तो भाषेचा प्रभाव आपल्या विचारशक्तीवर आणि बुद्धिमत्तेवर असतो. आपले विचार अधिक मांडता येतात आणि त्यामुळे बुद्धिमत्ता अधिक उंचावते.

मातृभाषेच्या संवर्धनाचे महत्त्व

आपली मातृभाषा जपणे आणि ती जास्तीत जास्त व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षण, सरकारी कार्यक्रम, मीडिया, काव्य वाचन, साहित्य लेखन इत्यादी सर्व ठिकाणी मातृभाषेचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. ह्या संदर्भात सरकारी धोरणे आणि सार्वजनिक संस्था यांना ही मातृभाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे.

विविध भाषांचा वापर करणे हा समृद्ध समाजाचा एक भाग असला तरी, त्याचवेळी आपली मातृभाषा जपून ठेवणे, तिचे महत्त्व सांगणे, तिचा वापर करण्याचे महत्त्व पटवून देणे हे आपले कर्तव्य आहे.

आंतरराष्ट्रीय दृषटिकोनातून मातृभाषेचे महत्त्व

जागतिक स्तरावर मातृभाषेचा आदर राखणे महत्त्वाचे आहे. ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ दरवर्षी २१ फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीला तिच्या मातृभाषेचे महत्त्व समजावण्यासाठी जागरूक करतो. एक संस्कृती, एक समुदाय, एक भाषेच्या माध्यमातून व्यक्त होतो. आपली मातृभाषा जरी खूप छोट्या ठिकाणी बोलली जात असली तरी, तिच्या असण्याचे महत्त्व मोठे आहे. हेच कारण आहे की, मातृभाषांचा संवर्धन आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील केला जातो.

निष्कर्ष

मातृभाषा आपल्या अस्तित्वाचा आणि ओळखीचा भाग आहे. ती केवळ एक संवादाची साधन नाही, तर ती आपली संस्कृती, परंपरा, आणि अस्तित्वाची ओळख आहे. मातृभाषेचे महत्त्व आपल्या जीवनात अनमोल आहे. त्यामुळे, आपल्याला मातृभाषेचा आदर राखून, त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मातृभाषेचा वापर आपल्या जीवनातील एक आवश्यक घटक आहे, जे जीवनातील सर्व आयामांमध्ये आपल्याला सर्वोच्च मार्गदर्शन देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: