Site icon My Marathi Status

मी कोरोना बोलतोय मराठी निबंध | Mi Corona Boltoy Marathi Nibandh

Mi Corona Boltoy Marathi Nibandh – मित्रांनो आज “मी कोरोना बोलतोय मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Mi Corona Boltoy Marathi Nibandh

हॅलो, माझ्यासोबत फ्रेंडशिप करता का? सध्या माझ्यामुळे तुम्ही खूपच ञस्त, भयग्रस्त आणि उध्वस्त झाल्यासारखे जीवन जगत आहात. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमची मनापासून माफी मागतो. यावरून तुम्हाला मी कोण हे समजून गेल असेल मी कोरोना व्हायरस बोलतोय.

परंतु मी स्वतःहून तुमच्यामधे घुसलेलो नाही किंवा मला तुमचे हसते खेळते जीवन उदास करण्याची अजिबातही इच्छा नाही. माझा जन्म हा खूप जुना आहे पण मी तेव्हा लोकांना त्रास देत नव्हतो. परंतु तुम्ही लोक पर्यावरणाचं संतुलन ठेवत नव्हती म्हणून निसर्गाने मला सांगितले की, “जा आणि शिकव धडा या लोकांना”

तुम्ही मानवांनीच स्वतःचा स्वार्थ आणि अती महत्वाकांक्षेपोटी मला निर्माण होण्याचे मार्ग मोकळे केले व संपूर्ण मानवजातीलाच संकटात टाकले आहे. मूठभर लोकांच्या सत्ता स्पर्धेमुळे कोट्यावधी लोकांना विनाकारण मरणाच्या दारात उभे करण्यात आले आहे. “Mi Corona Boltoy Marathi Nibandh”

मनुष्यजातीवर आलेल्या या महाभयानक आपत्तीसाठी मी संपूर्ण जगाची दिलगिरी व्यक्त करतो. मी कोरोना बोलतोय लोक म्हणतात की मी चीन च्या वुहान शहरातून मधून आलो. पण मी खूप जुना आहे. mi corona boltoy marathi nibandh

माझा जन्म इसवी सन 1960 मध्ये झाला होता. तेव्हा मी फक्त कोंबड्यांना व्हायचो. तेव्हा माझे नाव ब्रोंकायटिस विषाणू असे होते. तेव्हा मी संसर्गजन्य रोग होतो आणि माणसांना जेव्हा मी व्हायचो. तेव्हा फक्त त्यांना सर्दी-खोकला व्हायचा आता माझे नाव covid-19 असे आहे. त्याचा अर्थ असा आहे की मी खूपच छोटा आहे मी एक गटात असतो याचा अर्थ असा समजू नका की माझ्यात ताकद नाही, जे मोठे मोठे रोग करू शकले नाही ते मी करून दाखवले.

मिञांनो, ही आपत्ती संपूर्ण विश्वासाठी महाभयानक असली तरी मानवच याला संपुष्टातही आणू शकतो. त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने खूप काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मला मारण्याचे परफेक्ट औषध किंवा लस जरी सध्या उपलब्ध असली तरी रुग्णांच्या संख्येवरून तुम्ही समजू शकता.

mi corona boltoy marathi nibandh

त्यामुळे एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही.परंतु तुम्हाला निष्काळजीपणाही करून चालणार नाही. कारण मी एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात घुसत असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात न येणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. परंतु आता मला नष्ट करणेही तुमच्याच हाती आहे. त्याकरीता तुमची सर्वांची एकजूट व वज्रनिर्धार महत्वाचा आहे.

म्हणून मीच मला मारण्याचा किंवा नष्ट करण्याचा उपाय तुम्हाला सांगतो. तो उपाय म्हणजे तुम्ही फक्त स्वतःला अजून काही दिवस घरात कोंडून ठेवा. निश्चितच तुम्ही माझ्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. mi corona boltoy marathi nibandh

परंतु आता मला नष्ट करणेही तुमच्याच हाती आहे. त्याकरीता तुमची सर्वांची एकजूट व वज्रनिर्धार महत्वाचा आहे. म्हणून मीच मला मारण्याचा किंवा नष्ट करण्याचा उपाय तुम्हाला सांगतो. तो उपाय म्हणजे तुम्ही फक्त स्वतःला अजून काही दिवस घरात कोंडून ठेवा. निश्चितच तुम्ही माझ्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.

का रे बाबानो, मी काय बिघडवले जगाचे |
उलट शिणलेल्या लोकांना रस्ते दाखवले घराचे ||

लाभ उडालेली पाखरे परत आणली |
पुन्हा सगळी घरटी कुजबुजू लागली ||
मी कोरोना बोलतोय|||

आज हरवलेली पंगत पुन्हा बसली आहे |
जीवभावाची किमत समजली आहे ||

अरे, निसर्ग ही मोकळा श्वास घेतो आहे |
गरजा कमी करुन जगता येते हे सांगता येत आहे ||

आज जो तो स्वछतेचे धडे गिरवतो आहे |
म्हाताऱ्या आई बापाला धीर देतो आहे ||
मी कोरोना बोलतोय|||

ठीक आहे थोडा त्रास झाला असेल |
पण उद्यासाठी काहीतरी ठेवला पाहिजे हे ही पटल असेल ||

माझ्या येण्याने तुला जगण्याची किमत कळली आहे |
थोड्यातही सांसाराचे गाडे चालते हे उमगले आहे ||

आजार येत नाहीत का? तुमचा जीव घेत नाहीत का?
मी कोरोना बोलतोय|||

हे मानवा, घाबरू नकोस |
संकट पाहून धीर सोडू नकोस ||

हे ही दिवस जातील, आस सोडू नको ||
मी कोरोना बोलतोय|||

श्री.अविनाश पवार,
सहाय्यक प्राध्यापक,
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर [Mi Corona Boltoy Marathi Nibandh]

तर मित्रांना ” Mi Corona Boltoy Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मी कोरोना बोलतोय मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

भारतात कोरोना कधीपासून लागू झाला?

2019-20 कोरोनाव्हायरस साथीचा रोग 30 जानेवारी 2020 रोजी चीनमधून भारतात पसरल्याची पुष्टी झाली.

कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण कोठे आढळला?

चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरात हे पहिल्यांदा आढळून आले. याला कादंबरी किंवा नवीन म्हणतात कारण ती पूर्वी कधीही ओळखली गेली नव्हती.

“मी कोरोना बोलतोय” – निबंध

प्रस्तावना: कोरोना विषाणू हा एक अत्यंत घातक आणि प्रसार करणारा विषाणू आहे. २०१९ मध्ये या विषाणूने आपली हजेरी लावली आणि त्यानंतर जगभरात महामारीचे रूप घेतले. आज, प्रत्येक देश आणि त्याचे नागरिक कोरोनाशी लढत आहेत. या विषाणूच्या प्रसारामुळे सारा जगभरातील जीवन थांबले आहे. “मी कोरोना बोलतोय” हे निबंध असे आहे की, या विषाणूच्या परिणामांबद्दल जागरूकता आणि सुसंस्कारित संदेश देणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूची वैशिष्ट्ये: कोरोना विषाणू, ज्याला SARS-CoV-2 असेही म्हणतात, हा एक संसर्गजन्य विषाणू आहे जो मुख्यतः श्वसनमार्गाद्वारे पसरतो. या विषाणूचे लक्षणे बरेच असू शकतात – ताप, खोकला, श्वासाचा त्रास, अंगदुखी आणि जास्त प्रकरणांमध्ये श्वसनाच्या अडचणी. या विषाणूने मृत्यूचे प्रमाणही वाढवले आणि विशेषतः वृद्ध लोक आणि इतर काही गंभीर रोग असलेल्या व्यक्तींवर परिणाम झाला.

कोरोना विषाणू कसा पसरतो? कोरोना विषाणू आपल्या श्वसनप्रणालीतून एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. त्यामुळे, जर कोणत्याही व्यक्तीला कोरोना असेल, आणि तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला खोकला, शिंक किंवा थुंकी मारून संसर्ग देऊ शकते. हे संसर्गाच्या मुख्य मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे, मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, आणि सामाजिक अंतर ठेवणे यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येतो.

सामाजिक आणि मानसिक परिणाम: कोरोनाच्या महामारीने केवळ शारीरिक आरोग्याला धक्का दिला नाही, तर मानसिक आरोग्याचेही गंभीर परिणाम झाले आहेत. समाजिक आणि मानसिक अलगावामुळे अनेक लोक एकटेपणाचा अनुभव घेत आहेत. घरात राहून काम करणे, शाळा बंद करणे आणि सामान्य जीवनाची निवडकता ही त्याच्याशी संबंधित मानसिक दबाव निर्माण करते.

कोरोनाच्या काळात, लोकांनी त्यांचे प्रेम, देखभाल आणि समर्थन दर्शवले आहे. घरातून काम करणे, ऑनलाइन शिक्षण घेणे, आणि डिजिटल साधनांद्वारे संपर्क साधणे यामुळे एक सामाजिक समर्पण दिसून आले आहे. तथापि, एकटेपणा आणि निराशा हे गंभीर मुद्दे बनले आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनावर नियंत्रण कसा ठेवावा? कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत:

  1. मास्क वापरणे: प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर जाताना आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक आहे.

  2. सामाजिक अंतर: लोकांच्या बीच कमीत कमी अंतर ठेवणे आणि गर्दीत जाणे टाळणे.

  3. हात धुणे: बारंवार हात धुणे, विशेषत: जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो.

  4. टेस्टिंग आणि लसीकरण: कोरोना संक्रमित लोकांची लवकर ओळख आणि त्यांचे उपचार करण्यासाठी टेस्टिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरणाने जास्तीत जास्त लोकांना संरक्षण मिळवता येईल.

  5. स्वच्छता राखणे: घराची स्वच्छता आणि वेंटिलेशन महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष: “मी कोरोना बोलतोय” हे निबंध हे कोरोना विषाणूच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करतो. कोरोना विषाणूने जगाला चांगले आणि वाईट दोन्ही पैलू दाखवले आहेत. या संकटाला पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत बदलाव आणून, नियमांचे पालन करून आणि एकमेकांना मदत करून आपण या महामारीवर नियंत्रण मिळवू शकतो. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या या काळात एकमेकांच्या मदतीनेच आपल्याला यश मिळवता येईल.

Exit mobile version