What is share market in marathi? शेअर बाजार म्हणजे काय ?
Share market म्हणजे काय (what is Share market in marathi) मित्रांनो पैसे invest करण्याचं महत्व तर तुम्हाला माहीतच आहे. आज पैसे invest करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पैसे invest करण्यासाठी Share market एक उत्तम पर्याय आहे.
खूप लोक इंटरनेट वरती share market in marathi बद्दल मराठीतून माहिती शोधत आहेत. पण इंटरनेटवर शेअर मार्केट बद्दल सर्व आवश्यक माहिती मराठीतून उपलब्ध नाहीये. म्हणून आज या पोस्टमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त Share market बद्दल पूर्ण आवश्यक माहिती देणार आहे.
पण Share market चे नाव ऐकल्यानंतर खूप लोकांच्या मनात confusion आणि भीती असते. Share market म्हणजे काय? यात पैसे कसे invest करायचे? यात माझे पैसे बुडले जातील का? यात माझे नुकसान होईल का? इत्यादी.
काही लोकांना वाटते Share market मध्ये पैसे इन्वेस्ट करणं धोक्याचा आहे यात खूप रिस्क असते.
Contents
- 1 Share market म्हणजे काय? ( What is share market in marathi )
- 2 Share market मध्ये risk कशी घ्यावी ?
- 3 Share market मध्ये risk केंव्हा घ्यावी ?
- 4 Share market मध्ये तुम्हाला कसा फायदा व तोटा होऊ शकतो? ( Share market benefits and loss )
- 5 शेअर मार्केट मध्ये पैसे कसे invest करायचे ? (How to invest in share market )
- 6 Demat account कसे ओपन करायचे ? (How to open demat account)
- 7 Share market tips in marathi
प्रत्येक कंपनीला grow करण्यासाठी म्हणजेच कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट करण्याची आवश्यकता असते. कंपनीचा मालक जर श्रीमंत असेल त्याच्याकडे पैसे गुंतवण्यासाठी भरपूर पैसे असतील तर तो स्वतः त्यामध्ये पैसे गुंतवू शकतो.
जर कंपनीच्या मालकाकडे invest करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर तो इतर श्रीमंत लोकांना कंपनीमध्ये invest करण्याची संधी देऊ शकतो किंवा मग public fund द्वारे पैसे जमा करू शकतो.
कंपनी public funding च्या मदतीने सामान्य जनतेकडून पैसे जमा करते. यासाठी कंपनीचे शेअर्स मार्केट मध्ये विकन्यासाठी खुले केले जातात त्याला IPO असे म्हणतात. IPO म्हणजे initial public offer. या ipo च्या मदतीने सामान्य लोक कंपनीचे शेअर्स विकत घेतात आणि कंपनीमध्ये हिस्सेदारी मिळवतात. अशा प्रकारे कंपनीला public funding द्वारे कंपनीत पैसे invest करण्यासाठी फंड मिळतो.
अश्याच प्रकारे कंपनीचे शेअर्स विकत घेणे आणि ते विकून नफा कमावणे म्हणजेच याला शेअर मार्केट असे म्हटले जाते.
मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटबद्दल माहिती शोधत आहात तर तुम्हाला हर्षद मेहता स्कॅम बद्दल माहिती असेल. यावर एक चित्रपट देखील निघालेला आहे हर्षद मेहता स्कॅम 1992. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर यामध्ये हर्षद मेहता चा एक डायलॉग खूप फेमस आहे ” रीस्क है तो इश्क हैं “.
नक्कीच शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे पण तुम्हाला जर शेअर मार्केट बद्दल पूर्ण माहिती आणि अनुभव असेल तर ही रिस्क कमी होते. यात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात. पण त्यासाठी तुमच्याकडे धैर्य आणि संयम असणं फार महत्त्वाचा आहे. तर चला मग आजच्या या पोस्टमध्ये शेअर मार्केट बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया.
खूप लोकांना वाटतं शेअर मार्केट एक मटका आहे पण तुम्ही जर शेअर मार्केट बद्दल माहिती जाणून न घेता, मार्केटचा अभ्यास न करता जर पैसे इन्वेस्ट करत असाल तर तुमच्यासाठी शेअर मार्केट नक्कीच एक मटका आहे. यात रिस्क तर आहेच पण तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रिस्क कशी हाताळायची हेदेखील माहिती असणे गरजेचे आहे.
यामध्ये दोन प्रकारच्या रिस्क असतात calculated risk आणि uncalculated risk.
- calculated risk म्हणजे अशी रिस्क ज्यामध्ये तुम्ही अगोदरच शेअर मार्केटचा अभ्यास करून नफा-तोटा यांचा विचार करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करतात.
- uncalculated risk म्हणजे कुठलाही विचार न करता शेअर मार्केटचा अभ्यास न करता शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणे.
नेहमी शेअर मार्केटमध्ये कॅलक्युलेटेड रिस्क घेणे गरजेचे असते कारण यामध्ये फायदा होण्याची संभावना खूप जास्त असते. तुम्ही जर uncalculated risk घेत असाल तर यामध्ये ९०% तुमचे नुकसानच होईल.
शेअर मार्केटमध्ये पैसे invest करण्याअगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. तुम्ही जर तरुण असाल आणि महिन्याकाठी तुम्ही भरपूर पैसे वाचवत असाल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये खूप जास्त रिस्क घेऊ शकता. पण तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे कुठलाही active इन्कम सोर्स नसेल तर तुम्ही कमी रिस्क घ्यायला हवी.
त्याचबरोबर तुम्हाला या गोष्टीचा देखील विचार करावा लागेल की तुम्ही जी रिस्क घेत आहात त्यामध्ये तुम्हाला किती फायदा होत आहे. यामध्ये तुम्हाला फायदा कमी आणि जास्त नुकसान होण्याची संभावना असेल तर तुम्ही अशी रिस्क घेणे टाळावे. म्हणजे उदाहरणात तुम्हाला जर फक्त ५ रुपयांचा फायदा होत असेल आणि तुमचे २० रुपये जर दावावर लागले असतील तर अशी रिस्क टाळावी.
मी तुम्हाला ही गोष्ट एक उदाहरण देऊन समजून सांगेल जेणेकरून ती लवकर लक्षात येईल.
समजा एखादी कंपनी पाच करोडची आहे आणि त्या कंपनीने आपले पाच लाख शेअर्स विक्रीसाठी काढले. तर एका शेअरची किंमत होईल प्रत्येकी शंभर रुपये आणि तुम्ही जर यातील दहा शेअर्स खरेदी केले तर तुमच्याकडे कंपनीचे एक हजार रुपयांचे शेअर्स असतील. तुमचा कंपनीमध्ये एक हजार रुपयांचा हिस्सा आहे. तुमचा जो कंपनी मध्ये हिस्सा आहे त्यालाच शेअर्स असे म्हटले जाते.
भविष्यात जर ही कंपनी grow झाली तर यामध्ये तुमचा फायदा होईल. समजा भविष्यात या कंपनीची किंमत जर दहा करोड झाली तर प्रत्येक शेअर्स ची किंमत होईल २०० रुपये आणि तुमचा कंपनीमध्ये दहा शेअर्स चा म्हणजे २००×१०=२००० चा हिस्सा होईल. यामध्ये तुमचा हजार रुपयांचा फायदा होईल.
पण जर कंपनी घाट्यात गेली तर शेअर्स ची किंमत कमी होऊन तुमचे देखील नुकसान होईल. तुम्ही कंपनीचे शेअर्स हवे तेव्हा विकू शकतात. जर तुम्हाला वाटत आहे की कंपनी घाट्यात जात आहे. त्यापासून आपल्याला भविष्यात फायदा नाही होणार तर मी त्या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये विकू शकता.
खूप लोकांना माहिती नसतं की शेअर मार्केट मध्ये पैसे कसे invest करायचे. शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं खूप सोप आहे. यासाठी तुम्हाला एखाद्या ब्रोकर अॅप जसे की zerodha, sharekhan, upstock मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करावे लागेल.या अकाउंट ला तुमचे सेविंग अकाउंट कनेक्ट केलेले असते. येथून तुम्ही शेअर मार्केट मध्ये invest करू शकता. म्हणजेच शेअर मार्केट मधील कोणतेही शेअर्स विकत घेऊ शकता तसेच तुमच्याकडे असलेले शेअर्स विकू देखील शकता.
Demat account कसे ओपन करायचे ? (How to open demat account)
डिमॅट अकाउंट तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील ओपन करू शकता.
डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी काही ॲप मध्ये तुम्हाला पैसे लागतील तर काही ॲपमध्ये तुम्ही फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. या मधून तुम्ही शेअर मार्केट मधील कोणत्याही कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकता किंवा तसेच विकत घेतलेले शेअर्स दुसऱ्यांना विकू देखील शकतात.
डिमॅट अकाउंट ला तुमच्या बँकेचे saving account जोडलेले असते. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर त्याचे पैसे तुमच्या डिमॅट अकाउंट ला लिंक आलेल्या बँक खात्यातून कपात होतात. तुम्ही जर तुमच्या जवळ असलेले शेअर्स जर दुसऱ्यांना विकले तर त्याचे पैसे तुमच्या बँकेत जमा होतात.
- भारतामध्ये दोन stock market आहेत BSE (Bombay stock market) आणि NSE (National stock market)
- NSE (National stock market) हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक मार्केट आहे. या दोन्ही पैकी तुम्ही कोणत्याही मार्केट मध्ये तुम्ही पैसे invest करू शकता.
- यासाठी तुमच्याकडे एक demat account असणे फार गरजेचे आहे. यातून तुम्ही शेअर्स ची खरेदी आणि विक्री करू शकता. या डिमॅट अकाउंट ला तुमचे बँक खाते जोडलेले असते. तेथून तुमचे पैसे जमा आणि कपात होतात.
- Share मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अगोदर मार्केटचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे कोणती कंपनी जास्त नफा कमावत आहे, कोणती कंपनी घात्यात जात आहे, कोणती कंपनी भविष्यात नफा कमावू शकते, कुठे पैसे invest करणं फायद्याचं ठरेल, इत्यादी.
- त्यानंतर शेअर मार्केट मध्ये जे लोक एक्स्पर्ट आहेत त्यांच्या संपर्कात रहा, त्यांच्याकडून टिप्स घ्या.
- प्रत्येक कंपनीचा अभ्यास करा म्हणजे कंपनी कशी आहे, management कशे आहे, founder कोण आहे, तसेच dividend आहे का व सर्वात महत्वाचे म्हणजे या कंपनीत invest करणं फायद्याचं ठरेल का, इत्यादी
- त्यानंतर कंपनी निवडून शेअर्स विकत घ्या.
- अश्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या जी कंपनी सद्या जास्त नफा कमावत नाही पण भविष्यात तिचा नफा वाढण्याचे chances आहेत.
- अशा वेळेस तुम्हाला शेअर्स पण कमी किमतीत मिळतील आणि भविष्यात त्यांची किंमत वाढून त्यापासून भरपूर नफा मिळेल.
निष्कर्ष :
मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला शेअर मार्केट बद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. Share market म्हणजे काय (what is share market in marathi ), शेअर मार्केमध्ये पैसे कसे invest करावे, share market tips in marathi, demat account कसे ओपन करावे, इत्यादी.
Share market mhanje kay ही माहिती मित्रानो तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या पोस्टला तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की what is share market in marathi काय असते, धन्यवाद…!!!
शेअर मार्केट म्हणजे काय? – मराठीत
परिचय: शेअर मार्केट म्हणजेच एक अशी जागा आहे जिथे लोक आणि कंपन्या आपल्या शेअर्स (भागधारक हक्क) खरेदी आणि विक्री करतात. यामध्ये कंपन्यांचे शेअर्स, बॉंड्स, म्युच्युअल फंड्स आणि इतर वित्तीय साधनांचा व्यापार केला जातो. शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना कंपनीच्या कामकाजावर आधारित नफा मिळवता येतो, तसेच त्यांच्या गुंतवणुकीची किंमत वधारली तरी ते फायदा कमावू शकतात.
शेअर मार्केटचे प्रकार: शेअर मार्केट दोन मुख्य प्रकारात विभागले जाते:
-
प्राथमिक बाजार (Primary Market): प्राथमिक बाजार हा त्या बाजाराला म्हणतात, जिथे कंपन्या प्रथमच आपल्या शेअर्सची विक्री करतात. हे IPO (Initial Public Offering) किंवा समभाग विक्री म्हणून ओळखले जाते. यामध्ये कंपनी नवीन शेअर्स जारी करते आणि त्यांना गुंतवणूकदारांना विकते.
-
द्वितीयक बाजार (Secondary Market): द्वितीयक बाजार म्हणजेच तो बाजार जिथे शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जातो, ज्यामध्ये कंपनीचे नवीन शेअर्स समाविष्ट नसतात. यामध्ये गुंतवणूकदार आपसात शेअर्स खरेदी आणि विक्री करतात. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे BSE (Bombay Stock Exchange) आणि NSE (National Stock Exchange).
शेअर मार्केट कसे कार्य करते? शेअर मार्केट एक प्रकारचे व्यापाराचे प्लेटफॉर्म आहे, जिथे विक्रेते आणि खरेदी करणारे एका ठिकाणी एकत्र येतात. गुंतवणूकदार कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात आणि त्यांचे मूल्य (स्टॉक प्राइस) बाजारातील परिस्थितीवर आणि त्या कंपनीच्या कामकाजावर अवलंबून बदलते. बाजारातील किंमती सतत बदलत असतात कारण त्या कंपनीच्या कार्यप्रदर्शनावर, जागतिक घटनांवर, आर्थिक परिस्थितीवर आणि इतर घटकांवर त्याचा प्रभाव पडतो.
शेअर मार्केटचे महत्त्व:
-
कंपन्यांसाठी फंड उभारणे: कंपन्या शेअर मार्केटच्या माध्यमातून नवीन शेअर्स जारी करून त्यांना आवश्यक असलेला पैसा उभारू शकतात. हे पैसे त्या कंपन्या आपला व्यवसाय वाढविण्यासाठी, नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा इतर आर्थिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरतात.
-
गुंतवणूकदारांसाठी फायदा: गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये भाग घेऊन नफा कमवण्याची संधी मिळते. शेअर्सची किंमत वधारली की, त्यांना नफा मिळतो. त्याचप्रमाणे, डिव्हिडंड्स, जो नफा भागधारकांना वितरित केला जातो, तो देखील गुंतवणूकदारांसाठी एक फायदा असतो.
-
अर्थव्यवस्थेची वाढ: शेअर मार्केट हे देशाच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा कंपन्या अधिक पैसे उभा करतात, तेव्हा ते अधिक उत्पादन करत असतात, ज्यामुळे रोजगार निर्माण होतो आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबुत होण्यास मदत मिळते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही साधारण प्रक्रिया आहेत:
-
डिमॅट अकाउंट उघडा: शेअर बाजारात खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट (Dematerialized) अकाउंट अनिवार्य आहे. डिमॅट अकाउंटमध्ये तुमचे शेअर्स डिजिटल स्वरूपात जतन होतात.
-
ब्रोकरेज फर्म निवडा: आपल्याला एक मान्यताप्राप्त ब्रोकरेज फर्म किंवा ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची निवड करावी लागते, ज्याच्या माध्यमातून आपण शेअर बाजारात व्यापार करू शकता.
-
शेअर्सचे विश्लेषण करा: गुंतवणूक करण्याआधी आपल्याला कंपन्यांचे आर्थिक परिणाम, मार्केट ट्रेंड्स आणि इतर घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
-
गुंतवणूक योजना ठरवा: आपले गुंतवणूक उद्दिष्ट ठरवा – दीर्घकालिक, तात्कालिक, जोखीम घेणारी किंवा कमी जोखीम असलेली. त्यानुसार, आपली गुंतवणूक धोरण तयार करा.
जोखीम आणि फायदे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतांना जोखीम असतो. शेअर्सच्या किंमती वेळोवेळी वाढत-घटत राहतात. त्यामुळे, गुंतवणूकदारांना कधी कधी नुकसान होऊ शकते. तथापि, जोखीम व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास दीर्घकालीन लाभ मिळवता येऊ शकतात.
निष्कर्ष: शेअर मार्केट हा एक महत्त्वपूर्ण आर्थिक प्लॅटफॉर्म आहे, जो कंपन्यांना आवश्यक वित्तीय संसाधन मिळवण्यास मदत करतो आणि गुंतवणूकदारांना नफा मिळवण्याची संधी प्रदान करतो. तथापि, त्यामध्ये गुंतवणूक करतांना जोखीम लक्षात ठेवूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. शेअर मार्केटवर यशस्वी होण्यासाठी ज्ञान, अभ्यास, आणि जोखीम व्यवस्थापन आवश्यक आहे.