Site icon My Marathi Status

Top 51+ मराठी प्रेमावरच्या चारोळ्या, कविता

प्रेम हे येका विस्तवा सारखे असते जेवढं तुम्ही त्याला हवा द्याल ते अजूनच भडकत राहत… पकडण्याचा प्रयत्न केला तर भाजत देखील… आणि तसच सोडलं तर विझून ही जातं…प्रेम..! हे प्रेम म्हणजे तरी नेमक काय??याचं उत्तर असं की एखाद्यावर आपल्या जीवा पेक्षा जास्त जीव लावण. ठेच येकाला लागली तरी दुःख दुसऱ्याला होणे.

Marathi प्रेमावर kavita

चारोळी

कळेच ना कधी कधी कशास नाव काय ते

अबोल राहिल्यावारी असेच हेच व्हायचे…..

शब्द राहता मुकेच मौन सांगे काय ते

मौन ना कळेल तर हेच असेच व्हायचे…..

प्रेम म्हणजे विश्वास….
प्रेम म्हणजे काळजी….
प्रेम म्हणजे दोन जीव येक प्राण..

तूझ्या ओठांची तुलना

तुझ्या ओठांची तुलना करताच

गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात

बोटे मोडून कडा-कडा डोक्यावर

चटकन गालावर काळा तीळ लावतात.

#प्रेम चारोळ्या

प्रिये…

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,

माझा श्वास तुच आहेस…

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..

डोळे लावुन भिजुन जा..

माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

तू सोबत नसताना…

कोकिळेचा मधुर आवाज सुद्धा कर्कश वाटतो.

वेलीवरची सुंदर फुले सुद्धा काटेरी भासतात.

तू सोबत नसताना… बहरलेला श्रावण ऋतु सुद्धा उजाड वाटतो.

मनी दु:खाचे ढग दाटून येतात आणि अश्रूंचा पाऊस पडू लागतो.

तू सोबत नसताना… अमृताचे प्याले सुद्धा कडवट लागतात.

लख्ख प्रकाशात सुद्धा जीवन अंधारमय वाटते आहे.

तू सोबत नसताना… आयुष्यातील क्षण सुद्धा युगा सारखे वाटतात.

आठवण येताच तुझी आजही नयनी अश्रु दाटतात.

तुला नाही माहीत…

आठवण येताच तुझी मी मध्यरात्री अचानक दचकून उठायचो.

मोबाइल मधील तुझा फोटो पाहून स्वत:च्या मनाला सावरायचो.

तुला नाही माहीत…

तुला नाही माहीत की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे.

तुझ्या पासून दूर आलोय कारण तुला जिंकलेल पाहन्यासाठी मी रोज हरतो आहे.

तुला नाही माहीत…

लांब असेल की प्रेम वाढते म्हणून तू दूर राहतेस तुझ्या

अलगत जवळ आल्यावर तू रागाने का पाहतेस…

#marathi prem charolya, कुसुमाग्रज प्रेम कविता

हसत नाही

आजकाल माझ्याकडे पाहून तू

पहिल्यासारखी हसत नाही सध्या

तूझी मीठी ही मला घट्ट अशी बसत नाही……

#marathi prem kavita charolya

तुझी खोडी

तुझा हिरमुसलेला चेहरा

मला खरच पाहवत नाही

तूझी खोडी काढून

हसविल्या शिवाय मला

अगदी राहवत नाही…

#prem charolya,मराठी कविता प्रेमाच्या आठवणी

अश्रू

आपल्या डोळ्यांतील अश्रू

आपणच पुसायचे असतात

मदतीचे हात देणारे नेहमी

स्वार्थ का शोधत असतात?

# प्रेम कविता sms

भेट पहिली

विसरणार न कधीही

भेट पहिली दोघांची…

एकाच त्या दृष्टीत

पेटली ज्योत प्रीतीची…

पाहुनी तुझे नेत्र

हसरे मन माझे मोहवले…

अन तुझ्या मिलनास्तव

हृदय माझे ओढावले…

पहिल्या वहिल्या त्या भेटी

ओठांवर न शब्द आले…

निःशब्द नेत्रांनी परंतु

अंतरीचे भाव कथिले….

#प्रेम कविता चारोळ्या

सांग सखे

सांग सखे गुलाबासारखी जीवनात येशील कधी…

काट्याप्रमाणे टोचत राहशील कधी…

सांग सखे साखरेची गोडी

पण मधुमेहाची भीती देशील कधी…

सांग सखे दिव्यासारखे जळत राहून

माझ्या जीवनात प्रकाश देशील कधी…..

#marathi charoli

आयुष्य भर हसवेन

आयुष्यभर हसवेन तुला

पण मला कधी रडवून जाऊ नकोस,

काळजी घेईन तुझी

पण मला कधी सोडून जाऊ नकोस …

एकतर्फी प्रेम कविता

Style मारणारी

Style मारणारी मुलगी

काही क्षणासाठी आकर्षित करू शकते..

पण मुलाला खऱ्या प्रेमात फक्त

Simple वाली मुलगीच पाडू शकते….

मी श्याम रंग

मी शाम-रंग माझा, तू पुष्पगुच्छ साजा

बिलगून गंध दे मज, इतके च शब्द साधे

डोळ्यात बोचते मज, माझेच रूप आधे

वाटे तुला ना काही, श्रीकृष्ण वाट पाही

गोपी असूच दे मग, रुसवा कशास मागे

डोळ्यात बोचुदे मज, माझेच रूप आधे…

एक गुपित

पाण्यात आणि प्रेमात

माणसाने नेहमीच पडावं

पण एक गुपित माञ

आपण लक्षात घ्यावं…

इतक खोल जाऊ नये की,

वर येणं कठिण होईल

इतक वरही राहू नये की,

मजा घेणं अशक्य होईल.

पाण्याच्या आणि प्रेमाच्या

बाबतीत समतोल

राखला तर सारं

काही छान असत…

चारोळ्या

चमकणाऱ्या काजव्यांना

रात्रीचा अंधार घालवता येत नाही

आणि त्या रात्रीला देखील

काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही

रातराणीचं आयुष्य म्हणतात

एका रात्रीचं असतं

एका रात्रीचं असल तरी

मोठ्या खात्रीचं असतं

इथे प्रत्येकाला वाटते

आपण किती शहाणे

यावर उपाय एकच

सर्व शांतपणे पाहणे

इथे प्रत्येकाला

प्रत्येकाचा भूतकाळ आहे

मला जगानं खूप छळलं

हा प्रत्येकाचा आळ आहे

जमिनच हरवली तर

मुळांनी कुंज्यायाच ?

ज्यांचा जीवावर फुलायचं

ते पाणी कोठून आणायचं

जमिनीतले पाणी मिळते

मूळ तेव्हा रुजते

निष्पर्ण झाडावर प्रेम बसरते

तेव्हा त्यालाही पालवी फुटते

कुणीतरी आपल्यासाठी…..

का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते

कुणीतरी आपल्यासाठी असावे

ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे

आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे

रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे

मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे

उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे

पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे

केव्हा नटता सावरता आपण

त्याने मनापासुन कौतुक करावे

का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..

कुणीतरी आपल्यासाठी असावे…

…नागेश पाटील

प्रेमाचा अर्थ

सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा

चेहरा पाहण्याची इच्छा होते ….ते प्रेम आहे

मंदिरा मध्ये दर्शन करताना जी

जवळ असल्याचा भास होतो …ते प्रेम आहे

भांडून सुधा जिचा राग येत नाही.. ते प्रेम आहे

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण

दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते… ते प्रेम आहे

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन

मोकळे झाल्यासारखे वाटते…ते प्रेम आहे

स्वताला कितीही त्रास झाला तरीही

जिच्यासाठी ख़ुशी मागता …..ते प्रेम आहे

जिला लाख विसरण्याचा प्रयत्न

करा विसरता येत नाही…. ते प्रेम आहे

कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत

जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते.. ते प्रेम आहे

जिच्या चुकीना रागावतो आणि

नंतर एकांतात हसू येते ….ते प्रेम आहे

हि पोस्ट वाचताना प्रत्येक

ओळीला जिची आठवण आली… ते प्रेम आहे.

जीवनात नाती

जीवनात नाती तशी

अनेकच असतात,

पण ती जपणारी लोक

फार कमीच असतात……|

काही नाती असतात रक्ताची,

तर काही हृदयाची……|

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,

तर काही.. ‘ काही क्षणापुरतीची ‘…….|

काही नाती असतात,

केसांसारखी न तुटणारी,

पण वेळ आलीच तर वाकणारी…..|

काही नाती असतात,

लांबुनच आपले म्हनणारी,

जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी…..|

काही नाती असतात,

पैशाने विकत घेता येणारी,

तर काही प्रेमाने आपलेसे करणारी……|

काही नाती असतात,

न जोडता सुद्धा टिकणारी,

तर काही जोडून सुद्धा तुटणारी………

*****************************

Top 51+ मराठी प्रेमावरच्या चारोळ्या, कविता

प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी प्रेम कविता आणि चारोळ्या नेहमीच एक सुंदर मार्ग आहेत. प्रेमाची गोडी, त्याची दुःखे आणि सुखी क्षण अशा सर्व गोष्टी सुंदर शब्दात व्यक्त करणे हे एक कला आहे. खाली दिलेल्या प्रेमावरच्या चारोळ्या आणि कविता तुमच्या मनाच्या गाभ्यात असलेल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यास मदत करतील.

1. प्रेमाची गोडी

तुझ्या चेहऱ्यावर हसू,
माझ्या हृदयात धडधड,
तुझ्या ओठांतून बोलणारी प्रेमाची गोडी,
माझ्या हिशोबात आजूनही वाजतं ते.

2. प्रेमाच्या गप्पा

तुझ्याशी बोलताना काळ थांबत असतो,
तुझ्या जवळ असताना रस्ता जिंकून जातो,
प्रेमाच्या गप्पांमध्ये कुठेही असू नये
अशा शब्दात शब्द कमीच पडत असतो.

3. हृदयाची धडधड

तू जवळ असताना हृदय धडधडतं,
तुझं प्रत्येक शब्द अगदी स्पर्शात येतं,
आठवणी आणि तुझ्या गोष्टींनी वाचतं,
तुझं प्रेम मला आणखी व्रण बनवतं.

4. प्रेमात रंगलेला आकाश

तुझ्या प्रेमात रंगलेला आकाश,
तुझ्या जणु ताऱ्यांनी सुंदर होतो,
प्रत्येक क्षणांत प्रेमाचं रंग ओततं,
आणि सर्व सुंदरतेचं यश मिळवतो.

5. गोड विचार आणि प्रेम

तुझं प्रेम हे गोड विचार,
तुझ्या मनातील गोडी कधीच विझत नाही,
तुझ्या प्रेमाच्या गोड शब्दांनी,
मन माझं अद्वितीय होऊन जातं.

6. माझं प्रेम

प्रेमाचं जीवन जणू स्वप्न,
ते तूच आहेस ज्यामुळे मी जीवंत,
तुझ्या हसण्याने साकार झाली,
माझी जिंदगी खूप सुंदर.

7. एक वचन प्रेमाचं

माझं प्रेम तुझ्यावर आजूनही आहे,
तुझ्या आठवणींमध्ये माझं हृदय हसते,
एक वचन, एक वादा प्रेमाचा,
आणि प्रेमाच्या मार्गावर सोडून जाता.

8. प्रेमातील खोटं

प्रेमात न झडलेली अशी काही वादा,
जे कधीही उमठून येतात,
तुमच्या प्रेमाचा अर्थ मला कळतो,
सकारात्मक नोंदात जडला आहे त्याचा.

9. प्रेमाची मजा

तुझं प्रेम म्हणजेच एक गोड वास,
जो सन्मानाने उंचावतो आणि चांगलं टिकवतो,
हे प्रेम होऊन जाऊ न दे,
तुमचं गोड प्रेम हसवतं.

10. प्रेमाची वादळ

प्रेम होणार असं वादळ,
शब्दांचे गडगड वाजत,
वाऱ्याच्या वेगाने,
प्रेम तुझं चांगला खेळ होऊन राहीलं.

11. प्रेमाच्या रेषा

तुझ्या प्रेमात ती रेषा,
जी माझ्या जीवनात ओलसर होतं,
हसताना त्या वाऱ्यांमध्ये,
शब्द निघून जातं.


Top 51+ Marathi Love Poetry / Kavita

12. प्रेमाचं गोड रूप

तुझ्या गोड शब्दांत अडकलेलं प्रेम,
माझ्या जीवनात वाजतं ते एक गोड संगीत,
हे प्रेम कधीही नातं वाढवणार,
तुझं प्रेम पिऊन, झळांनी ममता बनते.

13. हृदयाचं गीत

हृदयात जपलेल्या प्रेमाची ध्वनी,
तूच आहेस जी माझं गोड गाणं सांगते,
प्रेमाचं परिपूर्ण वचन,
आजू बाहेर प्रेमाचा संसार बनवतो.

14. दूर असलेल्या प्रेमाच्या आठवणी

तुझ्या आठवणी आणि ओठाच्या गोड लहरी,
जणू माझ्या हृदयात तुझ्या नुसत्याच इन्स्पिरेशन बनवतात,
सर्व उंचांच्या समजूतदार मार्गाने,
हे साचे प्रेम कधीच हरतं.

15. प्रेमाच्या तप्त स्पर्श

तुझ्या कातडयात, सासरी मी एकच विशेष,
तुझ्या ओठांच्या गोड छापात शिंपलेलं प्रेम,
आयुष्यात खरी खरी वाचावं त्यासाठी झटका देण्याचा,
कधी कधी हास्य, प्रेम वर्क.

16. ऐक, आठव तो प्रेमाचा क्षण

तुझ्या सोबत हे प्रेमाच्या आकारात जुळवला गेला,
तुझ्या काढी मार्गे सुरु झाली, त्या गडबड मागून तो प्रेम होता,
कधी विस्मयत्वामध्ये असे ठेवलेले हसत,
प्रेमाचं मार्ग मिळवता तू!

Exit mobile version