उपाली आणि शाक्य तरुणांची दीक्षा

तथागत बुद्ध आपल्या भिक्खूसह लोकांना सदाचरणाचा उपदेश करत गावोगाव फिरायचे. बुद्धांच्या उपदेशाने, वागण्याने प्रभावित होऊन, अनेक लोक धम्माची दीक्षा घ्यायचे आणि संघात प्रवेश करायचे. असेच एकदा भद्दीय, आनंद, अनुरुद्ध, भगू, किमील आणि देवदत्त हे सहा शाक्य तरुण बुद्ध विचारांनी प्रेरित झाले आणि त्यांनी दीक्षा घेण्याचे ठरवले. हे सर्व तरुण अतिशय श्रीमंत आणि शूर अशा शाक्य कुटुंबात जन्मले होते.

शाक्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक शाक्य हे शीघ्रकोपी म्हणजे लवकर चिडणारे होते. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती व सैन्य होते.त्यांच्या सैन्याला ‘चतरंग सेना’ म्हटले जायचे. लहानपणापासन त्यांची सेवा करणारा ‘उपाली’ नावाचा एक नाभिक सेवक सतत त्यांच्यासोबत असायचा. एके दिवशी बुद्धांकडून धम्माची दीक्षा घेण्यासाठी हे सहा तरुण आपल्या चतुरंग सेनेसह नगरातून बाहेर पडले.

उपाली नाभिक सुद्धा त्यांच्या बरोबर होता. नगरपासून दूर गेल्यावर त्या शाक्य तरुणांनी आपली सेना परत पाठवली आणि परराज्यात प्रवेश केला. मग त्या सर्वांनी आपल्या अंगावरचे मौल्यवान दागिने उतरवून ते एका कापडात बांधले. ते उपालीला म्हणाले, ”उपाली, आजपर्यंत तू आमची खूप सेवा केलेली आहेस. कापडात बांधलेले हे सारे दागिने घे आणि परत जा. या दागिन्यांच्या आधारे तू तुझा उदरनिर्वाह कर.” उपालीने दागिन्यांचे गाठोडे हाती घेतले आणि त्या सहा जणांना नमस्कार करून तो परत जायला निघाला.

परत जाताना त्याच्या मनात विचार आला आणि तो स्वतःला म्हणाला, “हे दागिने घेऊन मी चूक तर नाही ना केली? शाक्य तापट आहेत, रागीट आहेत. मी या सहा जणांना मारून दागिने पळवले,असे तर इतर शाक्यांना वाटणार नाही ना?” तो एका झाडाखाली थांबला.अचानक त्याच्या मनात विचार आला, हे सहा शाक्य तरुण आपली सारी संपत्ती, सारे राजवैभव, सारे सुख सोडत आहेत.

घरदार सोडून माणसाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी हे तरुण सर्व प्रकारच्या सुखांचा त्याग करीत आहेत. मग मी तसे का करू नये? मानव हितासाठी जर हे सहा जण इतका मोठा त्याग करू शकतात, तर मग माझ्यासारख्या गरीब सेवकाने दीक्षा का घेऊ नये? त्याच्याही मनात बुद्धांबद्दल, धम्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. लगेच त्याने ते दागिन्यांचे गाठोडे एका झाडाच्या फांदीला बांधले आणि ‘जो पाहील त्याला दिले, त्याने न्यावे’, असे म्हणून तो माघारी फिरला. तो शाक्य तरुणांकडे परत गेला.

उपाली परत आल्याचे बघून ते तरुण त्याला म्हणाले, “उपाली, तू परत का आलास? काय झालं?” तेव्हा उपालीने त्यांना सारी हकिकत सांगितली आणि आपल्याला सोबत घेण्याची विनंती केली. त्या सहा जणांना उपालीचे म्हणणे पटले. उपालीचे बोलणे ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला.. त्यानंतर उपालीला बरोबर घेऊन ते सारे तथागतांकडे गेले. सर्वांनी अतिशय आदराने बुद्धांना वंदन केले आणि शांतपणे एका बाजूला जाऊन उभे राहिले. त्यांच्यापैकी एक शाक्य तरुण पुढे येत बुद्धांना नम्रपणे म्हणाला, ”भन्ते, आम्ही सारे शाक्य तरुण धम्माची दीक्षा घेऊन आपल्या संघात येऊ इच्छितो.

आमच्यासोबत आमचा सेवक नाभिक उपाली सुद्धा आलेला आहे. पण दीक्षा घेण्यापूर्वी आम्हा शाक्य तरुणांची तुम्हाला एक नम्र विनंती आहे. आम्ही शाक्य अभिमानी आहोत. संपत्ती, सामर्थ्य इत्यादींचा अभिमान आम्ही बाळगतो. परंतु धम्माची दीक्षा घेतल्यावर हा अहंकार, हा दुरभिमान गळून पडावा, यासाठी तथागतांनी आधी उपाली नाभिकाला दीक्षा द्यावी. यामुळे तो सेवक असला तरी धम्माच्या बाबतीत आम्हाला ज्येष्ठ ठरेल.

मग आम्ही त्याला उठून सामोरे जाऊ, हात जोडून अभिवादन करू. योग्य अशी इतर कामे करू. असे केल्यामुळे आम्हा शाक्यांचा शाक्य म्हणून असलेला अभिमान नाहीसा होईल. तेव्हा हे सुगत, आपण आधी उपालीला आणि नंतर आम्हाला दीक्षा द्यावी.” बुद्धांनी सारी हकिकत शांतपणे ऐकली आणि हळुवार स्मित केले. मग त्यांनी आधी उपाली नाभिकाला आणि नंतर सहा शाक्य कुमारांना दीक्षा दिली.

अशाप्रकारे उपाली नाभिक आणि सहा शाक्य तरुणांना बुद्धांनी धम्माची दीक्षा दिली. ज्या उपालीने दीर्घकाळ शाक्य तरुणांची सेवा केली. त्यांना अभिवादन केले, तोच पूर्वीचा सेवक उपाली आता संघात शाक्य कुमारांपेक्षा ज्येष्ठ ठरला. त्यामुळे शाक्य तरुण आता त्याला अभिवादन करायला लागले. त्याचा आदर करायला लागले. अशाप्रकारे पूर्वीचा सेवक नाभिक उपाली आणि सहा शाक्यपुत्र बुद्धांच्या संघाचे सदस्य झाले. हेच उपाली पुढे जाऊन बुद्धांचे एक आवडते शिष्य म्हणन नावारूपास आले.

त्यांच्या अंगी असलेल्या जिज्ञासेमुळे, कष्ट करण्याच्या तयारीमुळे संघात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले. त्यांचा अभ्यास, व्यासंग बघून एकदा बुद्ध म्हणाले, “माझ्या शासनामध्ये विनय जाणणारांपैकी उपाली हा अग्रस्थानी आहे.” बुद्धांच्या सहवासात राहून उपाली यांनी अनेक चांगल्या गोष्टी शिकून घेतल्या. पुढे बुद्धांच्या परिनिब्बानानंतर (निधनानंतर) थोड्याच दिवसांनी राजगृह येथे बुद्धांचा धम्म आणि विनय यांचे स्वरूप निश्चित करण्यासाठी पाचशे भिक्खूची एक सभा आयोजित करण्यात आली. हीच सभा पहिली धम्मसंगीती म्हणून ओळखली जाते.

भिक्खूनी कसे वागावे, याविषयीचे नियम तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी सर्वांनी उपाली यांच्यावर सोपविली. या धम्मसंगीती मध्ये भिक्खू महाकस्सप यांनी इतर भिक्खूच्या मनातील प्रश्न उपाली यांना विचारले. उपाली यांनी बुद्धांच्या शिकवणीच्या आधारे या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. उपालींच्या उत्तरांवरून विनयाचे स्वरूप निश्चित करण्यात आले.

इतकेच नव्हे तर बुद्धांनंतर सतत तीस वर्षे उपाली यांनी भिक्खूना विनय शिकविण्याचे काम केले. अशा प्रकारे एका गरीब आणि अतिसामान्य कुटुंबात जन्मलेले, लोकांची सेवा करणारे उपाली नाभिक विनयाचे जाणकार ‘महाद्युति उपाली’ म्हणून इतिहासात अजरामर झाले.

तात्पर्य/बोध – शाक्य तरुणांनी स्वतःच्या संपत्तीचा दुरभिमान बाजूला सारून उपालींना आधी दीक्षा देण्याचे सुचवून त्यांचा गौरव केला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा जात-धर्म संपत्ती इत्यादींचा अहंकार सोडून ज्ञानी माणसाचा गौरव केला पाहिजे. जात-धर्म संपत्ती यापेक्षा व्यक्तीचे गुण महत्त्वाचे आहेत. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून स्वतःचा विकास केला पाहिजे. व्यासंग, जिद्द आणि अभ्यास करण्याची तयारी असेल तर सामान्य माणूस सुद्धा यशस्वी होऊ शकतो.

उपाली आणि शाक्य तरुणांची दीक्षा (Nibandh)

भारतीय समाजात विविध जातीय, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये अनेक प्रकारच्या दीक्षांचा महत्त्व आहे. त्यापैकी, उपाली आणि शाक्य तरुणांची दीक्षा ही एक विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. शाक्य म्हणजे गौतम बुद्धाच्या वंशज, आणि उपाली म्हणजे एक प्रमुख शिष्य, ज्यांनी बुद्धधर्माची उपासना केली होती. या दीक्षांच्या माध्यमातून शाक्य तरुण आणि उपाली हे बुद्धधर्माचा प्रचार-प्रसार करणारे बनले.

शाक्य आणि उपाली तरुणांची दीक्षा:

१. शाक्य तरुणांची दीक्षा: शाक्य म्हणजे गौतम बुद्धांच्या वंशातील लोक, जे त्याच्या उपदेशांना आणि तत्त्वज्ञानाला मान्यता देणारे होते. गौतम बुद्धाने शाक्य समाजातील तरुणांना धार्मिक दीक्षा दिली. त्यांच्यावर बुद्धधर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता, आणि या तत्त्वज्ञानाने त्यांना आध्यात्मिक उन्नती प्राप्त करण्यासाठी एक मार्ग दाखवला. शाक्य समाजाच्या तरुणांना बुद्धाच्या शिकवणीचा अभ्यास करून, त्यांना वैराग्य, समाधी आणि बोधिचित्त या गुणांची दीक्षा मिळाली.

२. उपाली यांचे महत्त्व: उपाली हे गौतम बुद्धाचे एक प्रमुख शिष्य होते. त्यांनी आपल्या जीवनात शाक्य समाजातली दीक्षा घेतली आणि मग बुद्धधर्माचा प्रचार करण्याचा कार्य हाती घेतले. उपालींचे जीवन आणि कार्य हे एक प्रेरणादायक उदाहरण आहे, ज्यामुळे बौद्ध धर्माच्या विचारधारेचा प्रसार झाला. उपालींच्या दीक्षेने शाक्य समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण केली.

दीक्षेचा तात्त्विक दृष्टिकोन:

दीक्षा म्हणजे एक धार्मिक उन्नतीचा मार्ग. ती एक पद्धत आहे, ज्याद्वारे व्यक्ती धार्मिक कार्यात किंवा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो. शाक्य आणि उपाली यांच्या संदर्भात, दीक्षेचा उद्देश आत्मा, तत्त्वज्ञान आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवणे आहे. शाक्य समाजातील तरुणांना आणि उपालींच्या उदाहरणातून जीवनाची अधिक सखोलता, शांती आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.

आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तन:

शाक्य तरुण आणि उपाली यांच्या दीक्षेचा प्रभाव फक्त धार्मिक क्षेत्रातच नव्हे, तर समाजात देखील झाला. बुद्धधर्माने वेगवेगळ्या सामाजिक वर्तनांची पुनर्रचना केली आणि त्यात सामाजिक समानता आणि माणुसकीच्या तत्त्वज्ञानावर जोर दिला. विशेषत: शाक्य समाजातील आणि उपालींच्या वंशातील तरुणांनी या तत्त्वज्ञानाचे पालन करत सामाजिक न्याय, समानता आणि प्रेम यांचे विचार समाजात पसरवले.

निष्कर्ष:

शाक्य आणि उपाली तरुणांची दीक्षा ही बुद्धधर्माच्या प्रसारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होती. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या सर्व मार्गदर्शनाचे शिक्षण प्राप्त झाले आणि त्या शिक्षणाने त्यांचा जीवन मार्गदर्शीत झाला. त्या काळातील शाक्य समाजातील तरुण आणि उपाली हे बुद्धधर्माच्या प्रचारक बनले आणि त्यांच्या जीवनातून बुद्धधर्माचे विचार व परंपरा पुढे जात राहिल्या. आजही शाक्य आणि उपाली यांच्या दीक्षेचा प्रभाव आपल्या समाजात दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: