प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश, कविता आणि #Banner background Marathi

नमस्कार मित्रांनो🙏

🙏
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

आज 26 जानेवारी. आपला प्रजासत्ताक दिन आपण या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे का म्हणतो? त्याचे खरे उत्तर म्हणजे प्रजा म्हणजे जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता स्वातंत्र्य जनतेला मिळालेली सत्ता म्हणजे प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना अमलात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना उदयास आणली. आपल्या हाती पूर्णपणे सत्ता सोपवून इंग्रज त्यांच्या देशी निघून गेले.

त्याआधी त्यांनी आपल्यावर खूपच निर्दयी व्यवहार केला. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणुन अनेक देशभक्त स्वतःहून पुढे येऊन देशासाठी लढले काहीं फासावर गेले. त्यांचे विचार एकच होते ध्येय सुद्धा नेकच होतें ते फक्त आणि फक्त देशाला स्वातंत्र्य जुलूम शाही दडपशाही त्यांना सहन झाली नाही. म्हणून देशाच्या देशभक्तांनी मिळून एकच विचार केला तो म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला स्वातंत्र्य देऊन स्वतःचे बलिदान दिले. असे महात्मे असे क्रांतिकारक आणि असे देशहितकारक पुन्हा होणे नाही.

स्वातंत्र्य लढ्यातील सर्व देशभक्तांना आजच नव्हे तर क्षणा, क्षणाला आठवले तरी कमीच आहे. सर्व देशभक्तांना मानाचा मुजरा. आपला प्रजासत्ताक दिन आनंदाने होईल साजरा. खऱ्या अर्थानं आपण आता हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही. याची काटेकोरपणे दक्षता घेतली पाहिजे. अजूनही आपल्या देशात घुसखोरी करु पाहणारे शेजारी काही देश आहेत. त्यांचे मनसुबे उधळून लावणारे मातृभूमी रक्षणार्थ आपल्या सीमेवरचे आपले वीर जवान सज्ज आहेत. म्हणुन आपले जिवन हे आपण निवांत पणे जगत आहोत.

देशसेवा हेच ध्येय मनात ठेवून साऱ्यांनी जगले तर हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाणे कधीच शक्य नाहीं.
भावा भावात, गावा गावात एकीचे सूत्र असले पाहिजे. प्रत्येक चांगले काम देशहित साधते हा विचार करून मार्गक्रमण करीत पुढे जावे. भारत भूमि ही आपली माता तिच्या रक्षणार्थ झुकवू माथा, जाणून साऱ्यांच्या व्यथा.
देशसेेवेची चालवू प्रथा. या ओळींना सदैव ध्यानी घेऊन स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करूया आणि देशसेवा हेच ध्येय आपल्या मनात रुजवूया.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आपला कवी/साहित्यिक मित्र
जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.(महाराष्ट्र)
@जनार्दन ©®

हा सुंदर असा लेख पाहिल्या नंतर आता आपण पाहू काही शुभेच्छा संदेश आणि कविता संग्रह..

Contents

प्रजासत्ताक दिनानिमित्त कविता संग्रह

तिरंगा

पारतंत्र्याच्या कालरात्रीतून तेजोमय
गोळा कड्कड् कडाडला
स्वातंत्र्याचा तिरंगा असा
फड्फड् फडकला।।धृ।।

माना फासावर गोळ्या छातीवर
झाला रक्ताभिषेक मातृभूमिवर
त्यातून त्यागाचा भगवा रंग झळकला
…असा तिरंगा फड्फड् फडकला।।1।।

पांढरा रंग प्रतीक अहिंसेचे
निरंतर श्रम गतीमान अशोकचक्राचे
शांतीचा सफेद रंग उजाळला
…असा तिरंगा फड्फड् फडकला।।2।।

हरितक्रांतीची मशाल घेण्यास
नापाकांना धडा शिकविण्यास
सुजला-सफला व पवित्रतेचा
हिरवा रंग सळसळला
…असा तिरंगा फड्फड् फडकला।।3।।

श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

🌸🌸

🌸

आला दिवस २६ जानेवारीचा
घेऊन नवा उत्सव लोकतंत्राचा
अभिमान भारतीयांना या दिवसाचा
आंम्हा स्वतंत्र हक्क मिळाला गणतंत्राचा!!

आला दिवस २६ जानेवारीचा
तिरंगा उंच आकाशी फडकविण्याचा
मनोभावे तिरंग्याला अभिवादन करण्याचा
तिरंगा मनामनांत रुजवण्याचा!!

आला दिवस २६ जानेवारीचा
भारतभुमीत माझ्या लोकतंत्राचा वास
नको इथे मताचा वापर विपर्यास
नाही कुणाचा ऐकुन बहाणा

प्रत्येक नागरीक झाला आता शहाणा
आपले अमुल्य मत तो आता नाही विकणार
याच निश्चयाने प्रजासत्ताक दिन साजरा करणार!!
आला दिवस २६ जानेवारीचा

या दिवसासाठी झाले अनेक संघर्ष
प्रजासत्ताक मुळेच झाला लोकांचा उत्कर्ष
सारे मिळून करावी एकच प्रतिज्ञा
मानुन संविधान कुणीही करणार नाही त्याची अवाज्ञा
याच निश्चयाने प्रजासत्ताक दिन साजरा करणार !!

Mrs.Pawar ✨

🌸🌸

🌸

२६ जानेवारी १९५०
सगळ्या भारतीयांसाठी दिवस तो खास…
पूर्ण स्वराज्य मिळालं त्या दिवशी…
प्रजासत्ताक नावाने गणला तो दिवस दाही दिशी…

७० वर्ष पूर्ण गेली…
भारताच्या इतिहासात मुख्य दिवसात नोंद झाली…
तिरंगा फडकावला जातो गगनी…
आपली देशाची राजधानी असते नटलेली…

आपल्या एकतेचे आणि संस्कृतीचे चित्र उभे केले जाते…
देशाच्या प्रधानमंत्रीचेही मनोगत देशवासीयांसाठी सादर केले जाते…
प्रत्येक राज्य आपल्या चित्ररथाबरोबर देशाची मान उंचावते…
आपले सैनिकही शिस्तप्रिय कवायत करतात

आपले अस्त्र शस्त्र दाखवून आपली
ताकद दुश्मनांना जाणवत…
परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रण असते
आपल्या देशाची शान अधिक उंचावते…
पाणवता डोळे जेव्हा मेडल दिले जाते…

देशासाठी लढत असलेल्या शौर्यासाठी
तर कधी देशासाठी आपल्या प्राणाची
आहुती देणाऱ्या सैनिकांसाठी…

Mrs Pawar ✨

प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा संदेश

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✨✨

✨

तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

✨✨

✨

उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

✨✨

✨

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨

✨

स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨

✨

मी हनुमान, देश माझे राम आहेत
छाती फाडून पाहून घ्या
आत बसलेले “हिंदुस्थान” आहे

✨✨✨

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨✨

स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✨✨✨

तन मन बहरूदे नवीन जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…

✨✨✨

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨✨

तनी मनी बहरू दे
नव जोम
होऊ दे पुलकित
रोम रोम
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨✨

रक्ताची खेळू होळी,
देश धोक्यात असेल तर
नाही घाबरणार आम्ही,
बलिदान देऊन होऊ अमर
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨✨

फूल सुकते, गवते वलल्ते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत
झलेली ओळख कायं रहते
कधी हसायचं असते
कधिरुसयच असत
मैत्रीरुपी रुक्सल आयुष्भर जपायचा असत
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✨✨✨

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨✨

आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान.
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

✨✨✨

घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✨✨✨

देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा
देश विविधता जपणार्या एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

✨✨✨

देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा ,

✨✨✨

लढले होते मातीसाठी
जसे तिच्याचसाठी घडले होते.
वीरपुरूष ते मातेसाठी
मृत्यूलाही भिडले होते!
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: