101+ आजीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश,कविता,शायरी आणि बरच काही in marathi

नमस्कार मित्रांनो, आजी म्हंटल की नातवांचा जीव की प्राण असते आपल्या लहान पणीची जणू एक परिच असते ती घरातील vip म्हणजेच सर्वात महत्वाची व्यक्तिचं असते तिच्या निर्णया शिवाय घरात पान देखील हालत नाही ती दाखवेल तीच पूर्व दिशा असत आणि सगळे जन तिच्या शब्दा बाहेर नसतात.

हे सगळ असताना जेव्हा ती नातू किंवा नाती बर असते तेव्हा नातू आणि नात हे तर जणू एक घरचे राजेच असतात.जेव्हा बाबा रागवतात तेव्हा देखील आजीच असते जी बाबाच्या रागापासून वाचवते,अश्या लाडक्या आजीचा वाढदिवस असला की सगळ घर गलबळून जात.

जर आपल्या लाडक्या आजी ला खुश करायच असेल तर माझ्या कडे एक कल्पना आहे तुम्ही मस्त असे गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही आजीला एखादी मस्त अशी कविता लिहून एका कार्ड द्वारे पाठाऊ शकता ती खुश होईल की त्याला काही सीमाच राहनर नाही.जर तुम्हाला कविता येत नसेल तर तुम्ही या लिंक वरुण मस्त अश्या आजी साठी मराठी कविता पाहू शकता आणि आजीला पाठाऊ शकता.

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी प्रिय आजी,

आजच्या दिवसाप्रमाणे तू नेहमी आनंदी

आणि निरोगी रहावे अशी माझी देवाकडे प्रार्थना!

माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वडील रागावले की आई वाचवते,

आई रागावली की आजी वाचवते,

खूप प्रेमळ आहे माझी आजी,

जी माझे जग सजवते…!

हॅपी बर्थडे आजी

तुझ्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी

आणि सुखी आहे. तू नेहमी आनंदी व

निरोगी राहावीस हीच आजच्या

दिवशी देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..

आजी म्हणजे जीवनाच्या पुस्तकातील सुंदर पान

आजी म्हणजे संस्काराचा अमूल्य साठा छान

आजी म्हणजे आम्हा नातवंडांना खूप खूप आवडणारी

सर्व लाड पुरवणारी, कुशीत घेऊन झोपवणारी

Happy Brithday Aaji ! Love You…

अंगाखांद्यावर खेळवते ती आजी

छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाचे सार सांगते ती आजी

खरच भाग्यवान असतात ती मुले

ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळते!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी!

खूप विशेष आहे आजी माझी

प्रत्येक वेळी आम्हास हसवते

नशीबवान असतात ते नातू पणतू

ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते

Happy Birthday My Dear Grandmother

मी नेहेमी आनंदी राहतो.

माझ्या आयुष्यात  दुःखाची वादळे येत नाहीत.

कारण आजीरूपी सुरक्षाकवच कायम

माझ्या पाठीशी उभे आहे.

आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा व नमस्कार.

 birthday wishes for aaji in marathi

आजी तुम्ही दररोज मंदिरात जाऊन
आमच्यासाठी प्रार्थना करतात.
आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या
दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!
हॅपी बर्थडे आजी

माझी लाडकी आजी ही माझा

सन्मानआणि माझा मान आहे.

मला नेहमी हिम्मत देणाऱ्या

माझा अभिमान असलेल्या,

माझ्या लाडक्या आजीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद,

आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.

माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे

तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो

जिने मला बोट धरून चालायला शिकवले ,

माझ्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष केले ,

माझे अश्रू पुसून नेहेमी मला कुशीत घेतले,

अशा पर्वतासारख्या कणखर,

सायीसारख्या मऊ आणि साखरेसारख्या

गोड माझ्या आजीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आजी तुझ्या मायेचा स्पर्श उबदार,

नेहेमीच देतेस मला आश्वासक आधार,

अजूनही भरवतेस प्रेमाचे घास ,

भरतेस माझ्या मनात उत्साह आणि विश्वास,

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजी म्हणजे छान छान गोष्टी

आजी म्हणजे बालपणीच्या सुंदर आठवणी

आजी म्हणजे अनुभवांची शिदोरी

आजी म्हणजे मायेची माय, दुधावरची साय!

अशा माझ्या प्रेमळ आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy birthday aaji in Marathi

प्रिय आजी,

मला आठवतंय तेव्हापासून तू

माझी डोळ्यात तेल घालून काळजी

घेतलीस आणि मला तुझ्या मऊ उबदार

कुशीत घेऊन खूप प्रेम दिलेस.

सायीसारख्या मऊ आणि साखरेसारख्या

गोड अश्या माझ्या सगळ्यात आवडत्या

व्यक्तीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी

आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा

हीच प्रार्थना हॅपी बर्थडे आजी

आजी, जेव्हा मी तुझ्या सुंदर व प्रेमळ

डोळ्यांकडे पाहतो तेव्हा मला एक अनुभवी

स्त्री दिसते जिने कायम मला प्रेम दिले

आणि वाईट गोष्टींपासून माझे रक्षण केले!

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!

जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत

तुम्ही करतात मला Guide

तुम्हाला पाहून मला नेहमी वाटते Pride

Happy Birthday My Loving Grand Mother

प्रिय आजी,

तू मला कसे जगावे आणि प्रेम कसे करावे हे शिकवले!

मला तुझा खूप अभिमान आहे. तुझा दयाळूपणा,

प्रेम आणि शहाणपण हे गुण माझ्यात देखील यावेत

असा मला आशीर्वाद दे. आजच्या या खास दिवशी मी

हीच प्रार्थना करतो की देव तुला

निरोगी आणि सुखी आयुष्य देवो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार आजी!

happy birthday aaji wishes in marathi

आईच्या जागेवर दुसरी माय आहेस तू

स्वतः उपाशी राहून मला भरवणारी दुधाची साय आहेस तू

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजी ही मुलांसाठी दुसरी आई असते.

आमच्यासाठी तू आमची आई,

बहीण आणि मैत्रीणही झालीस.

तुझी नातवंड झाल्याचा आम्हाला

खूप अभिमान आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी!

grandmother birthday wishes in Marathi

अनुभवांनी भरलेले जीवन,

काही पावले चालून थकून जाते

जवळ गेले तर न पाहता ओळखते,

ती आजी आहे माझी जी चेहरा पाहून व्यक्ती परखते..!

 आजी तुझ्या मांडीवर डोके ठेऊन गोष्टी

ऐकत मी आकाशातल्या चांदण्या मोजल्या,

तू सांगितलेल्या कथेत मला स्वतःचाच शोध लागला.

माझ्या प्रत्येक स्वप्नामध्ये माझ्या पाठीशी

उभ्या राहणाऱ्या माझ्या स्ट्रॉंग पण

गोड आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये

खरंच खूप ताकत असते

जे हात आपल्याला आयुष्यात

अनुभवाने चालायला शिकवतात.

प्रत्येक परिस्थितीत मला मार्गदर्शन

करणाऱ्या माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजी तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया मला

मिळाली हे माझे भाग्य आहे.

तुला दीर्घायुष्य मिळो हीच देवाकडे प्रार्थना

आहे कारण तुझ्याशिवाय घराला घरपण नाही.

आजी तुझे प्रेम असेच कायम आम्हाला मिळो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिकवले आहे तुम्ही मला नखरे
न करता खायला प्रत्येक भाजी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..!

आजी तुझ्या रूपाने या घरात लक्ष्मीच नांदते आहे.

तुझ्यामुळे या घराला घरपण आहे.

आमचे सगळे दुःख पदरात घेऊन

आमचे सुख द्विगुणित करणाऱ्या आमच्या

लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रत्येक क्षण आनंदी राहतो,
कधीही येत नाहीत वादळे दुःखाची.
कारण सुरक्षाकवच रुपी भिंत,
उभी आहे आहे माझ्या आजीच्या नावाची.
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझ्या आजी.
मला नेहमी हिम्मत देणाऱ्या
माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!

BIRTHDAY WISHES FOR GRANDMOTHER IN MARATHI

आजी, तू आमच्यासाठी खूप काही करतेस,

आमच्यावर किती प्रेम करतेस.

तुझ्या अनुभवी सल्ल्याने आयुष्य बदलते,

तू आमची किती काळजी घेतेआजी,

तुझ्या खास दिवसासाठी एकच इच्छा ,

तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

चालतात वाकून,
हळू आहे त्यांची चाल.
वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..!
Happy Birthday Aaji

तुझ्या सगळ्यात आवडत्या नातवाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

आजी…सगळ्यांसमोर कदाचित तू मान्य करणार नाहीस,

पण मीच तुझा सगळ्यात लाडका आहे.

तू मला सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी एक शिकवण होती. तू दिलेल्या शिकवणीमुळे मी तुझ्यासारखीच चांगली आणि दयाळू व्यक्ती होण्याचा प्रयत्न करतोय.तू मला जे काही शिकवले त्याबद्दल धन्यवाद! आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आजी, आपण एकत्र घालवलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. तू मला तुझे प्रेम आणि तुझ्या अनुभवाची शिदोरी दिली आणि मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली. जगातल्या सगळ्यात बेस्ट आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची मी इतर कोणाशीही तुलना करू शकत नाही. तुझ्यासारखी आजी मिळाल्याने मी धन्य आहे. तू माझी आई झालीस, वेळेला गुरु झालीस आणि थोडीशी मैत्रीणही झालीस ! तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली एक देवदूत आहेस जी माझ्या कठीण काळात माझे रक्षण करते. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!

माझी प्रिय आजी, तुझ्याकडे कायम माझी बडबड ऐकण्यासाठी, माझ्याशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, माझ्याबरोबर हसण्यासाठी वेळ होता. माझ्यासाठी तुझे दरवाजे नेहमीच खुले होते. माझा विश्वास आहे की तुला देवानेच माझ्यासाठी पाठवले आहे. माझ्या गोड आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday My loving grand mother

आजी, तू सगळ्या कुटुंबाला जोडून ठेवणारा एक मऊ पण मजबूत रेशमी धागा आहेस. तुझ्याशिवाय या कुटुंबाची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. देव तुला आणखी शंभर वर्षांचे आयुष्य देवो. वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा आजी!

मायेचा, प्रेमाचा अखंड स्रोत असलेल्या माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! आजी, तुझ्या प्रेमामुळे माझे बालपण व संपूर्ण आयुष्यच आनंदाने भरून गेले आहे.

आई-वडिलांसोबत ज्या आजीनेही

मला खूप प्रेमाने वाढवले

आज वाढदिवस आहे त्या आजीचा

जिने मला लहानपणापासून पडताना सावरले

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी!

मी जेव्हा आजीचे सुरकुतलेले हात माझ्या हातात घेते

तेव्हा मला माझे बालपण आठवते

असं वाटतं त्या रम्य बालपणात परत जावं

आणि आजीच्या उबदार कुशीत गोष्टी ऐकत झोपावं!

Happy Birthday Aaji!

प्रत्येक कामात तुझी स्फूर्ती आणि उत्साह

आम्हाला तुझ्या वाढत्या वयाची

अजिबात जाणीव होऊ देत नाही.

तुझा हाच उत्साह कायम असाच राहो.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी…

चिऊ काऊच्या गोष्टी सांगत मांडीत बसवून मला भरवलेस जेवण

Aaji Birthday Caption & Quotes in marathi

माझ्यावर प्रेम करायला आजी तुला लागत नाही कारण

देवाकडे हीच  प्रार्थना, पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा

आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 माझी आजी खूप खास आहे

आम्हा सगळ्यांना सतत हसवते,

भाग्यवान असतात ते लोक

ज्यांना तुझ्यासारखी आजी मिळते…

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!

तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत

पुढील अनेक जन्मामध्ये तुमचाच नातू बनायचे आहे.

Happy Birthday Aaji

जेव्हा आजीचा प्रेमळ हात डोक्यावर असतो

आणि तिचे प्रेम मिळते

नेहमी सुख आणि आनंदाने

आमचे आयुष्य भरून वाहते

तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य कधीही जाऊ नये

तुझ्या डोळ्यात पाणी कधीही येऊ नये

पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा

प्रत्येक जन्मी तूच आजी म्हणून मिळावी हीच माझी सदिच्छा..!

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईवडिलांसोबत माझ्या

जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या

माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजी, तू रोज देवाकडे आमचे सुख मागतेस

आमच्यासाठी प्रार्थना करतेस

आज मात्र तुझ्या वाढदिवशी

मी देवाकडे तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत आहे!

मला वर्षानुवर्षे आजीचे असेच प्रेम मिळो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी

आईवडिलांसोबतच माझ्या जडणघडणीत ‘

महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या लाडक्या

आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह

आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची

अजिबात आठवण येऊ देत नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी

नेहमी अश्याच निरोगी रहा

जशी सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही

तसेच तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यातील

आनंदाची पूर्ती होत नाही. हॅपी बर्थडे आजी!

आजी, तू म्हणतेस की तुझं वय झालेय,

पण तुझा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.

आमच्या आनंदाच्या झऱ्याला , प्रेमाच्या सागराला

वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा!

माझ्या गोड आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या गोड स्वभावापुढे गोड लाडू, पेढे,  केक आणि

चॉकलेटही फिके आहेत. तुझ्यामुळे

आमच्या आयुष्यात गोडवा भरून राहिला आहे.

सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही

आनंदाचा आहात तुम्ही भंडार,

तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा

देतेय कुटुंब अपार..!

आजी चा वाढदिवस

आजी, इतकी वर्षे आम्हाला

जो गोड गोड खाऊ करून खायला घालते

आहेस, तू त्या लाडवांपेक्षाही जास्त गोड आहेस.

तुझा सहवास आणि तुझे प्रेम असेच आम्हाला

आणखी शंभर वर्षे मिळो.

तुझे पुढचे आयुष्य निरोगी आणि सुखी

असो हीच देवाकडे प्रार्थना आहे.

Happy Birthday Aaji!

जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा

तू नेहमीच माझ्यासाठी उभी राहिलीस.

जेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी आले,

तेव्हा तू नेहमीच तुझ्या कुशीत घेऊन

मला प्रेमाने समजावले.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी,

तुझे प्रेम कायम मला मिळत राहो हीच प्रार्थना!

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंदाची पूर्ती होत नाही.
Happy Birthday Aaji

तू जगातील सगळ्यात बेस्ट आजी आहेस. जर मला नवीन आजी निवडण्याची संधी मिळाली तर मी पुन्हा पुन्हा तुलाच निवडेन! आजी, तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस. तुझ्या अनुभवाच्या शिदोरीने तू मला शहाणे केलेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी.

कोणतीही भेटवस्तू तुझ्यावरचे

माझे प्रेम व्यक्त करू शकत नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!

तुझ्या प्रेमळ हसूइतकी जगात दुसरी

कुठलीच सुंदर गोष्ट नाही.

माझ्या लाडक्या आजीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रिय आजी, क्युटपणा आणि प्रेमळ स्वभावाच्या बाबतीत तुझी बरोबरी कुणीच करू शकत नाही. आम्ही सगळे तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो आणि तुला आणखी शंभर वर्षांचे निरोगी व सुखी आयुष्य लाभो हीच मनोकामना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..

आजी,

तू आमच्यासाठी खूप काही करतेस,

आमच्यावर किती प्रेम करतेस.

तुझ्या अनुभवी सल्ल्याने आयुष्य बदलते,

तू आमची किती काळजी घेतेआजी,

तुझ्या खास दिवसासाठी एकच इच्छा ,

तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

आजी तुम्ही मला दया धैर्य आणि
प्रेमाची शिकवण दिली आहे.
मी आज जे काही प्राप्त केले आहे
ते फक्त आणि फक्त तुमच्या
शिकवणीमुळे शक्य झाले आहे.
Happy Birthday My Grandmother

तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची मी इतर

कोणाशीही तुलना करू शकत नाही.

तुझ्यासारखी आजी मिळाल्याने मी धन्य आहे.

तू माझी आई झालीस, वेळेला गुरु झालीस आणि

थोडीशी मैत्रीणही झालीस ! तू माझ्यासाठी देवाने

पाठवलेली एक देवदूत आहेस जी माझ्या कठीण

काळात माझे रक्षण करते.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!

माझ्या गोड आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या गोड स्वभावापुढे गोड लाडू, पेढे,

केक आणि चॉकलेटही फिके आहेत.

तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात गोडवा भरून राहिला आहे.

happy birthday aaji quotes in marathi

लहान असताना अंघोळ घालून ,
फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही,
कधीही सोडू नका आमची साथ !
हॅपी बर्थडे आजी

मायेचा, प्रेमाचा अखंड स्रोत असलेल्या माझ्या

लाडक्या आजीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

आजी, तुझ्या प्रेमामुळे माझे बालपण व संपूर्ण आयुष्यच आनंदाने भरून गेले आहे.

माझी प्रिय आजी,

तुझ्याकडे कायम माझी बडबड ऐकण्यासाठी,

माझ्याशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी,

माझ्याबरोबर हसण्यासाठी वेळ होता.

माझ्यासाठी तुझे दरवाजे नेहमीच खुले होते.

माझा विश्वास आहे की तुला देवानेच

माझ्यासाठी पाठवले आहे.

माझ्या गोड आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची मी

इतर कोणाशीही तुलना करू शकत नाही.

तुझ्यासारखी आजी मिळाल्याने मी धन्य आहे.

तू माझी आई झालीस, वेळेला गुरु झालीस

आणि थोडीशी मैत्रीणही झालीस !

तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली

एक देवदूत आहेस जी माझ्या कठीण

काळात माझे रक्षण करते.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी!

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: