+59 विरह व दुरावा मराठी कवितांचा संग्रह | Best विरह कविता

प्रेमा मदला दुरावा खूप वेदना देतो आणि ती व्यक्त करण्यासाठी प्रेमी युगल आपल दुःख कविता चारोळी मध्ये व्यक्त करतात.अशा मराठी कविताआम्ही घेउन आलोय.तुम्ही अजून बऱ्याच कविता पाहू शकता जसे की फुलांवर कविता # Marathi sad Kavita,virah Kavita in marathi

* विरह चारोळ्या, विरह प्रेम कविता

सांगायचे होते तुजला
खेळ ते विरहाचे होते
क्षणात नाते आपले
विलग झाले होते.

कोरे ठेऊन पान मनाचे
आठवणीत का बोलतेस
बंद दरवाजे मिलनाचे
स्वप्नातच का भेटतेस.

मनातलं सर्व माझ्या तिला
केव्हापासून सांगायचं होतं
सांगताच ती लाजून म्हणाली
मला तर आधीच माहीत होतं.

घटका विरहाची भरली
विरहाची सांगता होत आहे
तुझ्या माझ्या प्रेमाचा बंध
नव्याने एक होत आहे.

टिक टिक घड्याळाची
करिते क्षणांस जाचक,
होत नाही महन ते एकटेपण,
आठवणींच्या दुनियेत रमून,
होते भूतकाळाचे चित्रीकरण
नयन मिटताच….
ते रूप तुझे,तो सहवास
तुझा,ते दुःख तुझे,
ती काळजी तुझी,
जणू भासते ती व्हावी
आत्ताच परिधान,
पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो
थेंबांचा प्रवाह नयन उघडताच…

तुझी मिठी म्हणजे
चंद्र चांदण्यांचा भास
मिलन ह्रदयाचा व्हावं
एकत्र येऊन तुझा-माझा श्वास..

मनाच्या खोल कुठेतरी
विचारांचं खळबळ माजलयं…
विरहाचं धुकं नात्यात दाटलयं
अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी
तुला दिलेल्या एका वचनापायी
गालांवरच्या खोट्या हास्यात
मी त्यांना अडवलंय.

Contents

अश्रू फुले विरहाची

विरहात रात्र रात्र
सरली आठवणीत
कधीकाळी होता एक
प्रियकर तो मनात…

शपथ घेतली होती
कधी भावी मिलनाची
मार्गच आता चुकला
दोर तुटली भाग्याची…

शांत त्या सागरतीरी
काढले नाव वाळूत
किना-याला यावी लाट
गेले घेऊन ते आत…

बाग ती बहरलेली
राघू-मैना त्यात होते
आता एकटीच मैना
विरहाचे गीत गाते…

संकटे असावी तिथे
साथ असता दोघांची
ईश्वरा नसावी अशी
“अश्रू फुले विरहाची”

श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

फक्त तुझ्यासाठी

आता परत नाही जायचे त्या शहरात
जिथे आपलं मन रमत नाही

तु रहा नेहमी खुश पण
मला तुझ्याशिवाय जमत नाही

जिच्यासाठी सोडली साथ माझी
राहो नेहमी जोडी तिची तुझी

आता राहील ना आयुष्यात तुझ्या
परत ना ये जीवनात माझ्या

माझी साथ सोडली तशी नको सोडू तिची
नाहीतर स्वप्न राहतील अपूर्ण तुझ्या आयुष्याची

नवी सुरुवात नव्या जीवनाची
धडपड फक्त स्वतःसाठी जगण्याची

आता ना कोणासाठी झुरण्याची
ओढ फक्त आता आनंदी राहण्याची

कसे सांगू तुजला
मी ही विरहात जळत आहे
एकांताला समजावताना
आठवणी तुझ्या माळत आहे.

 

तुझ्या विरहाचे स्वप्न

तुझ्या विरहाचे स्वप्न

मला काल रात्री पडले होते

पण ते लगेचच खरे होईल

असे मुळीच वाटले नव्हते

🌸
🌸विरह प्रेम कविता मराठी🌸🌸

नयनात नाही प्रतीक्षा माझ्या

रात्र केव्हाच गेली उलटुनी,

गुलाबाचे कोमेजणेच नशिबी त्याच्या.

खेळ झाला हा सगळा प्रेमाचा

वेळ निघून गेली आता

आता काहीच नुरले माझे,

प्राण नाहीत शब्दांत माझ्या.

भिजते तरी आजही आसवांनी उशी

एक आस धरून बसते वेडी मी मनाशी

माहिताहे आता परतुनी दिवस नाही येणार,

समजाविते मी कठोर मनास माझ्या.

मित्रानो, या प्रेमाची परिणती इतकी विदारक होईल असे वाटले नव्हते.

काय सांगू

काय सांगू

त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहे

हसऱ्या चेहऱ्याच्या मागे

खरा चेहरा लपवतो आहे

एक स्वर तुझा पडावा

कानी म्हणून झुरतो आहे

मला तू दिलेला प्रत्येक आवाज

मजला आजही वाटतो कोकिळे समान

त्या सुमधुर आवाजस

मी पोरका झालो

माझीच ती चूक हाती

कोणास दुसने देनार

त्याची शिक्षा फार भोगली

माफी मागण्याची सोयच नाही

तुझ नाव कानी पडताच

नजर स्वैरभैर न्याहळते चेहरे

त्या चेहऱ्याआड दुसऱ्याचा

चेहरा पाहून मन खिन्न

पुनः नव्या दमाने नाव तुझं

ऐकण्या मनात हुरहूर

काय सांगू

त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहे

हसऱ्या चेहऱ्याच्या मागे

खरा चेहरा लपवतो आहे

एक स्वर तुझा पडावा

कानी म्हणून झुरतो आहे

-स्वरचित

सुनीत Sonnet

आठवतात ते अवीट क्षण

आठवतात ते अवीट क्षण

दिसतात त्या पाऊल खुणा

वाटते करावे पुन्हा सिंहावलोकन

काही खुणा सुखवणाऱ्या

काही मनाला टोचणाऱ्या

हरवून जातो त्या क्षणामध्ये

एवढेच माझ्या हातामध्ये

दोन तापानंतर सुमधुर स्वर

पुन्हा कानी पडला

माझं नाव ऐकताच तुलाही

सर्व काही आठवलं असणार

मन पुन्हा तारुण्यात गेलं

बागडलं बेधुंद मधहोश झालं

आठवणीतील तो प्रत्येक क्षण

स्मरण पटलावरून पुढे सरकला

वास्तवात आलो तेव्हा आकांताने

पुन्हा त्या नगरी शोध घेतला

ना भेटलीस ना दिसलीस तू

तरी ही आनंदी बेभान मी

काही तरी शोध लागला

शोध लागला

शोध लागला

-स्वरचित

सुनीत Sonnet

एका चुकीची किती हि शिक्षा

एका चुकीची किती हि शिक्षा

ते रूप पाहण्या देवाकडे भिक्षा

कितीही तिरस्कार माझा झाला

तुझी वाट पाहणे नित्य क्रम झाला

तुझी छबी पाहण्या जीव व्याकुळ

कधी तरी दिसशील तू मणी तळमळ

आठवीत ते सुंदर रूप तुझे

घालवितो दुःखद क्षण माझे

जितका तुझपासून दूर मी गेलो

तितक्या आठवणीत नाहून गेलो

आता आठवण तुझी

जीवनाची सखी सोबती माझी

-स्वरचित

सुनीत Sonnet

हे गीत माझ्यासाठी तर लिहिलं गेलं नाही ना असच वाटतं. आजपर्यंत हे गीत माझं जीवन गाणं केव्हा झालं हे मलाच कळलं नाही. आजपर्यंत लाखो वेळा हे गाणं ऐकलंय. करोडो अश्रू ढाळलेत. हतबलता काय असते याच जिवंत उधाहरण मी च आहे.

कवि मन पुन्हा जागी झालं

कवि मन पुन्हा जागी झालं

पुन्हा कविता करायला लागलं

पूर्वी प्रेम कविता करू लागलेलं

आता विरह गीत लिहायला लागलं

याला सर्वस्वी मीच जबाबदार

मग कोणावर रागे भरणार

रागे भरण्याचा पूर्ण अधिकार

तिचाच तर असणार

कवितांचा मीच गीतकार

मीच श्रोता असणार

एकदा तरी माझी कविता वाचणारं

माझ प्रेम पुन्हा डोकावणार?

-स्वरचित

सुनीत Sonnet

अजून ही मी जिवंत आहे

अजून ही मी जिवंत आहे*

श्वासाशी घट्ट मैत्री करून ठेवली आहे

दीर्घ श्वास घ्यायचा आहे अजून मला तुझ्या मांडीवर

किती दिवस लावणार आहेस कोणास ठाऊक तू

नजरेवर अजून किती भार देऊ सांग

मी गुन्हे गार होईल गं त्या नजरेचा

मी खूप त्रास देतोय तिला सताड उघड ठेऊन….

हे ऐकून…..

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील

रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे……

मृत्यू रोज येतो ग मला वाटेत आडवा

पण त्याला रोज विनववणी करतो मी

अरे ती येईल शेवटचं ओवाळेल मला

मग निवांत घेऊन जा बिनधास्त पणे

असा डोई वर पदर घेऊन आवरून सावरून

येईलच ती त्या वाटेवरून जिथून ती गेली होती

त्या वाटेला अजून किती थांबवू सांग तू

मी गुन्हेगार होईल ग त्या वाटेचा

मी खूप त्रास देतोय तिला रोज विश्वास देऊन….

हे ऐकून…

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील

रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे…..

अस सहजच सोडून जाईल वाटलं तुला

अगं वेडे प्रेम केलंय मी तुझ्यावर जिवापाड

तुला आठवतंय ना का ते पण विसरलीस तू

नाही ना सांग ना नाही ना मग असा का वेळ लावलास

काळजाची धडधड ही विचार करून ठोके देते गं आता

नाही राहवत पण काय करू शब्द पाळतोय तू दिलेला

एकांतात बसून कोऱ्याकागदावर रेखाटतोय तुला

त्या कागदाला किती दोष देऊ सांग तू

मी गुन्हेगार होईल गं त्या कागदाचा

मी खूप त्रास देतोय त्याला तुझे चित्र रेखाटून….

हे ऐकून….

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील

रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे…..

आता शेवटच विचारणं धाडलं आहे बघ

जमलं तर ये नाय तर येऊ नकोस तू

पण हो तुझ्या नावाचं नव कापड पाठवून दे तेव्हडं

मी चालवून घेईल तेव्हढीच तुझी शेवटची भेट

तेव्हडीच थोडी शांत झोप येईल गं बाकी काही नाही

तुला त्रास नाय देणार आता तू निवांत सुखी रहा

फक्त एक निरोप पाठवून दे त्याला लटकवून ठेऊ नका

त्याला मोकळं करा बंधनातून प्रेम विरहाच्या

बस्स बाकी काही नको…..

कारण त्या दोरीला किती दोष देऊ सांग तू

मी गुन्हेगार होईल गं त्या दोरीचा

मी खूप त्रास देतोय तिला असं एकांतात लटकून….

हे ऐकून…..

कदाचित तुझे ही डोळे पाणावतील

रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे……

रडू नकोस मी अजून ही जिवंत आहे……

✍🏻

कविराज…अमोल शिंदे

छोट्या विरह कविता

डोळ्यातून आसवे

डोळ्यातून आसवे का पाझरतात, एकांतात तिच्या आठवणी का येतात, आसवे पुसून कोणी हे सांगेल का, दूर असणाऱ्यांच्या आठवणी नेहमी का सतावतात.

🌸🌸

मराठी प्रेम कविता चारोळ्या🌸🌸

स्वप्न माझे हे संपल तरीही मनात तूच उरणार आहे. तुझ्यात मी नसेल तरी माझ्यात तूच सापडणार आहे.

🌸

🌸वेदना कविता मराठी#वेदना🌸🌸

आता तुझा एक

आता तुझा एक हि शब्द कानी पडत नाही जो आवाज जेव्हा सतत सोबत असायचा आता तोच आवाज जराही जाणवत नाही

🌹

दुःख कविता मराठी🌹

मला विचारले देवाने

मला विचारले देवाने, तुझा हसरा चेहरा उदास का ? तुझ्या डोळ्यात कुणाची आस का ? ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू आले, तेच तुझ्यासाठी खास का ?

🌸

🌸प्रेम विरह चारोळ्या🌸🌸

तुझे काय ते

तुझे काय ते तुला माहित प्रेम माझे खरे होते तुला ओळखता आले नाही मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

🌸

🌸virah kavita🌸
🌸

तू रुसलीस कि तुझी..

तू रुसलीस कि तुझी.. समजूत काढायला खूप आवडते, पण या रुसा रूसीच्या खेळामध्ये.. तू खरच रुसून जाण्याची तर भीतीच वाटते.

🌸🌸marathi dukhi prem kavita🌸🌸

पाऊल वाटांवर…

पुन्हा त्या पाऊल वाटांवरती

वळू लागले माझे पाऊल

जिथे तू भेटली होती आणि पाऊसाची झाली होती चाहूल

🌹🌹🌹

🌸🌸marathi virah kavita🌸🌸

प्रेमात दूर

प्रेमात तुला दूर करणे कठीण आहे. हा विरह सहन करणे कठीण आहे… सोपे वाटते तुझ्या आठवणीत मरणे, कारण तुला विसरून जगणे फार कठीण आहे ..!!

🌸🌸marathi dukhi prem kavita🌸🌸

सांग सख्या..

सांग सख्या तुझी नि माझी

भेट शक्य

कशी म्हणू…. मावळतीला जाणारा सूर्य तू अन् उगवणारी मी रात्रच जणू..

🌸🌸प्रेम विरह कविता मराठी🌸🌸

दुःख होत नाही

दुःख याचेच वाटते आता,

कि मनाला दुःखच होत नाही पोकरुन गेलं
आहे मन असे, ज्यात आता भावनाच उरल्या नाही.

🌸🌸virah marathi kavita🌸🌸

अपराधी

असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर.
मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व वजा कर…

🌸🌸प्रेम विरह कविता🌸🌸

हरवलोय मी

हरवलोय मी कुठेतरी शोध ना तु मला ,
धुंडाळून बघ स्वतातच सापडतो काय तुला

🌸🌸प्रेम विरह कविता🌸🌸

बघ जरा

दुःखास आज माझ्या भोगून बघ जरा जाळ्यात पैजणांच्या गुंतून बघ जरा

घायाळ ह्या मनाला पररवून घे जरा थोडे मनातले तू सांगून बघ जरा

🌸🌸durava marathi kavita🌸🌸

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे
सादाविना कळावे संगीत लोचनांचे…

🌸🌸viraha kavita🌸🌸

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं;
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

🌸🌸dukh kavita marathi🌸🌸

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला मी भेटेन

तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…

🌸🌸marathi prem kavita🌸🌸

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले
भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही

🌸🌸प्रेमभंग कविता🌸🌸

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो
आपल्याला वाईट व्यक्ती समजतो
हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

🌸🌸virah marathi quotes🌸🌸

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे

सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

🌸🌸sad love🌸🌸

माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा
हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या
प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …

🌸🌸 prem kavita marathi text🌸🌸

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं

त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

🌸🌸मराठी कविता प्रेमाची चारोळी🌸🌸

अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे?
जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

🌸🌸sad kavita marathi🌸🌸

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील
का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

🌸🌸marathi prem kavita charolya🌸🌸

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

🌸🌸marathi prem kavita charolya🌸🌸

काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत

जसं कि लोकांनी केलेले खोटे Promises!

🌸🌸मराठी कविता प्रेमाच्या🌸🌸

गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता

🌸🌸प्रेम विरह संदेश मराठी🌸🌸

तुम्ही त्याला प्रेम पण

कसं काय म्हणू शकता,

जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं,

तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात..

🌸🌸मराठी कविता प्रेमाच्या🌸🌸

कसं काय विसरून जाऊ तिला..

मरण माणसाला येतं,

आठवणींना नाही..

🌸🌸प्रेम विरह संदेश मराठी🌸🌸

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील

तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…

🌸🌸मराठी कविता प्रेमाच्या🌸🌸

वास्तवात येशील की नाही

काहीच अंदाज नाही पण,

माझ्या मनात तुझी हक्काची जागा

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल..

🌸🌸विरह प्रेम कविता🌸🌸

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..

कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

🌸🌸दुःख कविता🌸🌸

तुला मिळवण्याची इच्छा

तेव्हा अजूनच वाढली..

जेव्हा तू म्हटली,

‘मी तुझी होऊच शकत नाही..’

🌸🌸प्रेम कविता मराठी चारोळ्या🌸🌸

लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,

ज्यांना माझ्या असल्याने किंवा

नसल्याने काही फरक पडत नाही..!!

🌸🌸प्रेम विरह🌸🌸

प्रेम होतं,

आता पण आहे..

फरक फक्त एवढा आहे की,

पहिले तिच्यावर होतं,

आता तिच्या आठवणींवर आहे..

🌸🌸durava marathi kavita🌸🌸

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

🌸🌸viraha kavita🌸🌸

गर्दीत असूनही

एकटं असल्यासारखं वाटत आहे

फक्त तुझ्या एकटीच्या कमी मुळे..

🌸🌸dukh kavita marathi🌸🌸

आपल्यात हवं तर थोडं अंतर राहू दे,

पण एकदा मला तुला डोळे भरून पाहु दे..

🌸🌸मराठी प्रेम कविता चारोळ्या🌸🌸

कधी कधी असं वाटतं

कोणालाही न सांगता

मरुन जावं निवांत..!!

🌸🌸वेदना कविता मराठी🌸🌸

आज खूप दिवसांनी

मनभरुन रडावं वाटलं..

मनातलं सारं दु:ख डोळ्यांद्वारे

मोकळं करावं वाटलं..

कारण कुणाला कितीही जीव लावा,

कुणीच कुणाचं नसतं..

🌸🌸🌸🌸

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?

अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

🌸🌸🌸🌸

आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…

🌸🌸🌸🌸

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही..
सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही..

🌸🌸🌸🌸

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…
पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

🌸🌸🌸🌸

आपल्यामुळे नाही कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे.

🌸🌸🌸🌸

उपेक्षित मी या जगाला

वेगळी ओळख माझ्या जगण्याला…

🌸🌸🌸🌸

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

🌸🌸🌸🌸

एकदा फक्त मागे वळून बघ मी सदैव तुझ्यासाठी असेन…

🌸🌸🌸🌸

ओंठ जरी माझे मिटलेले …
डोळे मात्र उघडे होते….
तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली…
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

🌸🌸🌸🌸

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,

तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

🌸🌸🌸🌸

जे नशीबात नव्हते ते च मागितले

म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले

🌸🌸🌸🌸

जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही

🌸🌸🌸🌸

जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं

तेव्हा सगळेच Busy असतात..

🌸🌸🌸🌸

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली

🌸🌸🌸🌸

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

एक गोष्ट अजूनही मला समजली नाही..

दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने….

🌸🌸🌸🌸

ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील
एकदा का होईना,आठवण माझी काढशील …

🌸🌸🌸🌸

🌸🌸🌸🌸

उरल्यात फक्त आठवणी-विरह कविता

“मूक आसवांची तुला श्रद्धांजली”

 

 

मजकडे ते एकटक पहाणे

वाटत,ऐकावं तुझे-ते मधुर बोलणे

पण उलटून गेलीय रात्रकाळी केव्हाची,

मज आज एकाकीच ठेवून.

माझं जीवन तूच होतीस

माझं मनही तूच होतीस

डोळ्यांतून वहातंय आज पाणी,

आता उरल्यात फक्त आठवणी.

रोज वाटत तू येशील

तिन्हीसांजेला, कमानीस हलकेच टेकतो

क्षितिजावरल्या त्या गडद पखरणीत,

मी तुझी तीच छबी पाहतो.

काळाने सर्व घेतलं होत हिरावून

माझे सुख,माझा प्राण, सर्वकाळ

त्याच काळाने विसरावयास लावलाय,

माझा भूतकाळ,आजचा वर्तमानकाळ.

वाटचाल भविष्याची करताना नकळत

पावलांत पावले होती अडखळली

डोळ्यांतून दोन भावना-फुले टपटपली,

हीच मूक आसवांची तुला श्रद्धांजली.

–श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)

🌸🌸🌸🌸

तुला निरोप देताना

तुला निरोप देताना

जरासा वाराही मंद झाला,

थरारल्या सावल्या

अन डगमगल्या बाहुल्या.

तुला निरोप देताना

स्तब्ध झाली शब्द,

ओस पडली राणे

अन दाही दिशांची वने.

तुला निरोप देताना

पाझरल्या पापण्या,

पडल्या भिंतीनाही चिरा

अन आटला तो झरा.

तुला निरोप देताना

मुक्या झाल्या त्या वाटा,

पुन्हा भेटण्याच्या आता

लागल्यात आशा,आता लागल्यात आशा …..

संजय रायभान माकोणे

🌸🌸🌸🌸

🌸🌸🌸🌸

🌸🌸🌸🌸

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी

🌸🌸🌸🌸

” भिजते आजही आसवांनी उशी “

सजणाचे नाही परतणे आता

🌸🌸🌸🌸

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: