अढळपदीचा ध्रुवतारा
राजा उत्तानपाद ह्याला सुरुची अन् सुनीती ह्या नावाच्या दोन राण्या होत्या. त्यातली सुरुची ही राणी अत्यंत रूपवान आणि राजाची फार लाडकी राणी होती. ती त्याची पट्टराणी होती. तर गुणवान असून ही सुनीती ही मात्र राजाची नावडती होती. ह्या दोन्ही राण्यांना दोन मुलगे पण होते. सुरुचीचा मुलगा ‘उत्तम’ तर सुनीतीचा मुलगा हा ‘ध्रुव.’ एकदा काय झालं, आवडत्या राणीचा मुलगा उत्तम हा उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसलेला असताना राजाचा दुसरा मुलगा म्हणजे ध्रुव तिथे आला.
त्या बालमनाला असे वाटले की, आपणही उत्तमाप्रमाणेच आपल्या पित्याच्या मांडीवर बसावे. मात्र उत्तानपाद राजाने ना ध्रवाला प्रेमाने आपल्याजवळ बोलाविले ना त्याला आपल्या मांडीवर घेतले. उलट आवडत्या सुरुचीराणीने त्या ध्रुवाला जवळ येत असताना दूर लोटले, त्याला ढकलून दिले, त्याचा अपमान केला. नावडतीचा पोर म्हणून ती रूपगर्विता त्या बाळ ध्रुवाला नाही-नाही ते बोलली.
तिने त्याला राजगादीच काय; पण राजाच्या, त्याच्या हक्काच्या पित्याच्या मांडीवरही बसू दिले नाही. त्याला त्या सुखापासूनही वंचित केले. स्वाभिमानी बाळ ध्रुवाच्या मनाला ती कृती, ते बोलणं, तो दुस्वास ह्याचं फार दुःख झालं. तो रडत-रडत आपल्या आईकडे म्हणजेच सुनीतीकडे गला. तिनं दरबारात पित्याच्या भेटीला गेलेला ध्रुव रडताना, खाली मान घालून आलेला पाहिला. तिनं त्याला रडण्याचं कारण विचारलं. ध्रुवानं शांत होत दरबारात झालेला तो सर्व प्रकार मातेला सांगितला.
तेव्हा ध्रुवाला प्रेमानं जवळ घेत, त्याच्या गालावरची आसवे पुसत ती म्हणाली, “बाळा, काही अधिकार, काही पदे ही कुणाकुणाला जन्मजातच मिळतात; तर कुणाकुणाला ती स्वकर्तृत्वाने मिळवावी लागतात.” तिनं कशीबशी ध्रुवाच्या बालमनाची समजूत काढली अन् ती छोट्या ध्रुवाला झोपवायला महालात घेऊन गेली. आईच्या मांडीवर डोकं ठेवून ध्रुव झोपण्याचा प्रयत्न करीत होता, पण झोप येत नव्हती. उलट तोच प्रसंग त्याच्या नजरेसमोर परत परत येत होता.
आणि एकदा बाळ ध्रुवाने आपल्या आईला असे विचारले की, “आई,जगातलं सर्वांत श्रेष्ठ अन् उच्च स्थान मला कोण देईल गं? की, ज्या स्थानावरून मला कुणी कधीच खाली खेचणार नाही? असं अढळपद मला कसं मिळेल? ते मला कोण देईल?” बाळ ध्रुवाचा तो थोडासा विचित्र प्रश्न ऐकला मात्र आणि आता ह्याचं नेमकं काय उत्तर द्यायचं, असा ती विचार करू लागली. आता काही तरी सांगून, त्याची समजूत काढायला तर हवीच होती. तेव्हा आई म्हणाली, “बाळा,अरे,कुणाला काय अन् किती काळ द्यायचं ; हे सारं तो एक नारायणच ठरवत असतो.”
त्यावर ध्रुवाने लगेच दुसरा प्रश्न केला की, “आई,मला हा नारायण कुठे भेटेल गं?” तेव्हा सुनीती म्हणाली, “बाळा, देव ना? तो भेटतो दूर… अरण्यात…..वनात…” “असं का? बरं मग ठीक आहे’, असे म्हणत तो शांत झाला. त्याला असा शांत झालेला पाहून सुनितीला थोड बर वाटल. मात्र दुसऱ्याच दिवशी ‘आई मी येतो गं’, असं सांगून छोटा ध्रुवबाळ जो त्या राजवाड्यातून बाहेर पडला, तो सरळ घनदाट अरण्यातच गेला. घनदाट अरण्यं, मोठ-मोठे वृक्ष, दाट झाडी, हिंस्र प्राणी…. पण ध्रुव बाळ मात्र निश्चयानं एक-एक पाऊल टाकत पुढे-पुढे जातच राहिला.
आणि एके दिवशी ध्रुवाला एका विशाल वृक्षाखाली मृगजीनावर बसलेले सात ऋषी दिसले. पुढं होऊन बाळ ध्रुवाने त्यांना मनोभावे वंदन केले. त्या दाट जंगलात हा एवढासा पोर, तोही एकटाच अन् दुःखी कष्टी का? अन् कशासाठी फिरतोय? त्याला काय हवंय, म्हणून त्या ऋषीमुनींनी त्याची मोठ्या प्रेमाने चौकशी केली. “जिथून मला कुणीही कधीही खाली खेचू शकणार नाही, असं अढळपद मला कोण देईल? मी काय करू? कोणत्या देवाला शरण जाऊ?’ असं त्यानं विचारले.
तेव्हा ध्रुवाच्या बालमनातली श्रद्धा, निष्ठा, स्वाभिमान अन भक्ती पाहून त्याच्यावर प्रसन्न हात एकेका ऋषींनी त्याला नेमकं काय कर, कसं कर, ह्याची माहिती दिली. सर्व ऋषींनी बाळ ध्रवाला त्याचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी जी नारायण उपासना करायला सांगितली, ती ऐकन ध्रव म्हणाला, “मुनिवर, आपण सर्वांनी नेमकी कोणाची उपासना करायची ते सांगितलेत; पण आता ती उपासना, ते तप मी कसं करायचं? त्यासाठी त्यासाठी सोपा मंत्र कुठला, हे पण आपण मला सांगा.
मी ती उपासना अवश्य करीन.” असे म्हटल्यावर त्या ऋषींनी ध्रवाला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः।’ हा मंत्र जप, असे सांगितले. तेव्हा धूवाने पुढे होऊन सात ऋषींना वंदन केले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तपासाठी जागा शोधण्यासाठी म्हणून ध्रुव निघाला. फिरतफिरत ध्रुव मथुरानगरीतील पापनाशक तीर्थावर आला. तेथे त्याने स्नान केले. जवळच एका शांत, प्रसन्न अशा जागी त्याने आपले आसन मांडले. पद्मासन घातले. माता-पिता ह्यांना मनोमन वंदन केले. अरण्यात भेटलेल्या त्या सात ऋषींना गुरुस्थानी मानून, त्यांना नम्र अभिवादन करून मनोमन त्यांचे आशीर्वाद घेऊन; त्यांनी दिलेल्या त्या सिद्ध मंत्राचा ध्रुवाने जप सुरू केला.
पाहता-पाहता ते बालक त्या नामस्मरणात इतके रंगून गेले की, अन्न, पाणी, तहान-भूक ह्या सर्वांचाच त्याला विसर पडला. भक्तीचा हा मार्गसुद्धा वाटतो तितका साधा अन् सोपा नाही, बरं का! कारण ह्या भक्तिसाधनेतसुद्धा भक्ताला अनेक संकटे, प्रलोभने ह्यांना तोंड द्यावे लागते. ध्रुव बाळाला ही ह्या भक्तीपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न झाले, तरी त्याने दृढ निश्चयाने त्या सर्वांवर मात केली. देवदेवतांनी पण त्या बालभक्ताच्या अनेक परीक्षा घेतल्या, कसोट्या पाहिल्या. त्याला कडक ऊन, प्रचंड पाऊस, झंझावात ह्या नैसर्गिक संकटांनी भक्तीपासून दूर करण्याचे प्रयत्न करून पाहिले.
पण त्या सर्वांवर आपल्या दृढ निष्ठेने, अनन्य शरणांगत भावाने धृवाने मात केली. आपली नामसाधना, तप, ध्यान, हे कायम ठेवले. मात्र, ह्या भक्तीसामर्थ्याने इंद्रादिक देव घाबरले. त्यांना आपल्याला स्थानांची, पटांची चिंता वाटू लागली. ते सर्व जण भगवान विष्णू ह्यांच्याकडे गेले, तेव्हा विष्णू त्यांना म्हणाले, “हे पाहा, तुम्ही उगाच चिंता करू नका. तो तुमच्यापैकी कुणाचे स्थान घेण्यासाठी हे तप करीत नाही. त्याला काय हवे आहे, ते मी त्याला देणारच आहे.” आणि खरोखरच ती वेळ आली.
बालध्रुवाच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले अन् म्हणाले, “वत्सा, डोळे उघड. मी आलो आहे तुला दर्शन द्यायला, तुझी इच्छा जाणून घ्यायला आलो आहे. बोल… तुला काय हवंय?” ध्रुवाने तो गोड स्वर ऐकला. हळूहळू डोळे उघडून समोर पाहिले, तो काय! शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले भगवान विष्णू हे त्यांच्यासमोर उभे होते. ध्रुवानं मोठ्या विनम्रपणे त्यांना त्रिवार नमस्कार केला. तेव्हा देवानं त्याला विचारले, “बाळ ध्रुवा! अरे, तू हे घोर तप का करतोस? तुला काय हवं आहे?” तेव्हा ध्रुव हात जोडून म्हणाला, “देवा, तू सर्वसाक्षी, सर्वज्ञाता, सर्वव्यापी आहेस. मला काय हवं आहे, हे तू जाणतोस.
आता ते देणं किंवा न देणं ही तुझी मर्जी, तुझी इच्छा !” बाल ध्रुवाच्या त्या विनयशील अशा बोलण्याने भगवान विष्णू अति प्रसन्न झाले. तरी पण आणखी एक परीक्षा घेण्यासाठी देव त्याला म्हणाले, “बाळा! अरे,पद काय किंवा अधिकार काय,हा कधीच कायम टिकून राहत नाही. तू तर म्हणतोस की, तुला अढळपद हवे; होय ना?” “होय…. देवा, मला खरोखरच असे पद, अशी जागा हवी आहे की, जिथे तू एकदा मला बसवलेस म्हणजे मला तिथून कुणीच अन् कधीच उठ म्हणणार नाही.
मानवाने मिळवलेले पद, अधिकार, स्थान हे कायम राहत नाही. पण तू जे देतोस; ते अक्षर असतं. म्हणून तर मी इतरांकडे काही न मागता तुझ्याकडे मागायला आलो आहे.” ध्रुवाच्या त्या चाणाक्ष उत्तराने भगवान अति प्रसन्न झाले. त्यांनी नभांगणात ग्रहताऱ्यांमध्ये त्याला एक अढळ, मानाचे स्थान मिळवून दिले. ध्रुव त्या स्थानावर विराजमान झाला. ग्रह-नक्षत्र मालिकेतला तळपणारा जो ध्रुव तारा, तोच ध्रुव होय.
तात्पर्य : अधिकार, मान-सन्मान, पद हे मोठ्या मेहनतीनं मिळवावे लागते. मोठ्या प्रयत्नानेच ते टिकवावे पण लागते.
अढळपदीचा ध्रुवतारा (The Fixed Pole Star)
ध्रुवतारा हा आकाशातील एक अत्यंत महत्त्वाचा तारा आहे. प्राचीन काळापासूनच हा तारा यांत्रिक आणि नकाशांची दिशा ठरवण्यासाठी वापरला जातो. ‘अढळपदीचा ध्रुवतारा’ हे एक रूपक आहे जे त्याच्या स्थिरतेची, न बदलणाऱ्या स्थितीची, आणि निश्चित दिशेची उपमा देतं.
Contents
1. ध्रुवतारा म्हणजे काय?
ध्रुवतारा (North Star) किंवा पोलारिस (Polaris) हा आकाशातील एक तारा आहे जो पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या जवळ स्थित आहे. या तार्याची एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, तो आपल्या स्थानावर कायम स्थिर असतो. पृथ्वीच्या फिरण्यामुळे अन्य सर्व तारे हळूहळू हलताना दिसतात, पण ध्रुवतारा नेहमीच एकाच ठिकाणी स्थिर राहतो, ज्यामुळे तो नेहमी उत्तर दिशेला दर्शवतो.
2. अढळपदीचा ध्रुवतारा – प्रतीकात्मक अर्थ:
‘अढळपदीचा ध्रुवतारा’ या वाक्याचा वापर अनेक वेळा एक स्थिर, न डळणार्या किंवा न बदलणाऱ्या दिशेचे प्रतीक म्हणून केला जातो. जर एखादी गोष्ट ‘अढळपदी’ असे म्हटली तर ती कायम स्थिर, विश्वासार्ह, आणि न बदलणारी आहे असे दर्शवते. हे प्रतीक आपल्या जीवनातल्या दृष्टीकोन, ध्येय, किंवा कार्यांमध्ये वापरले जाते, जे काहीही संकटं येत असले तरी स्थिर राहतात.
3. ध्रुवताऱ्याचा उपयोग:
-
नाविकांची दिशा: प्राचीन काळात, शिपिंग किंवा नामक नकाशे वापरून समुद्रातील नाविक ध्रुवताऱ्याचा वापर करून नेहमी उत्तर दिशेची ओळख पटवायचे. ते आकाशातील ध्रुवताऱ्याचा सहारा घेत उत्तर ध्रुवाकडे मार्गदर्शन करीत.
-
अशा स्थिरतेचे प्रतीक: ध्रुवतारा एक स्थिर बिंदू असतो, ज्यामुळे तो जीवनातील अशा मार्गाचे प्रतीक बनतो ज्यावर मार्गदर्शन करण्याचा विश्वास ठेवता येईल. प्रचंड अस्तित्व आणि बदलांमध्येही जर काही गोष्ट अढळपदावर राहण्याची क्षमता राखते, तर ती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते.
4. ध्रुवताऱ्याचे वैज्ञानिक महत्त्व:
-
पोलारिस किंवा ध्रुवतारा हा पृथ्वीच्या अक्षाच्या बहुतांश प्रचंड फेरफाराच्या दरम्यान एका ठराविक बिंदूवर स्थिर राहतो. यामुळे, इतर तार्यांप्रमाणे तो आपली स्थिती बदलत नाही आणि पृथ्वीच्या हलण्याच्या कारणाने त्याचे स्थान न बदलता, तो नेहमीच एक दिशा दाखवतो.
-
या स्थिरतेमुळे, लोक त्याच्याशी दिशा शोधतात. उदाहरणार्थ, उत्तरेकडील वाऱ्याचा दिशा आणि यांत्रिक निर्णय घेण्यासाठी या तार्याचा वापर केला जातो.
5. ध्रुवतारा आणि संस्कृती:
अनेक संस्कृतींमध्ये, ध्रुवताऱ्याला एक प्रतीक म्हणून देखील मानले जाते. हिंदू धर्मात, तसेच इतर संस्कृतींमध्ये, ध्रुवताराला एक विशेष आदर्श मानला जातो. त्याला एक शाश्वत आणि विश्वसनीय मार्गदर्शक म्हणून संबोधित केले जाते. तसंच, ध्रुवताराच्या माध्यमातून निरंतर उन्नती, अडचणींवर मात करणं, आणि ध्येयाची निस्सीम प्रतिज्ञा केली जाते.
6. अढळपदीचा ध्रुवतारा – जीवनातील उपमा:
जीवनाच्या अनेक अडचणी आणि आव्हानांमध्ये, “अढळपदीचा ध्रुवतारा” हा शब्द त्या गोष्टीला दर्शवतो जी सशक्त, न डळणार्या, आणि स्थिर आहे. जो खरा मार्गदर्शक आहे, जो आपल्याला योग्य दिशेने वाट दाखवतो, तो सापेक्ष संकटांमुळे बदलत नाही. ध्रुवताराच्या स्थिरतेचे प्रतीक म्हणून ‘अढळपदीचा ध्रुवतारा’ अनेक वेळा वापरले जाते.
निष्कर्ष: अढळपदीचा ध्रुवतारा हे एक अद्वितीय आणि अतिशय महत्त्वपूर्ण प्रतीक आहे जे स्थिरता, विश्वास आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून, शास्त्रशुद्ध मार्गदर्शनासाठी ध्रुवताऱ्याचा वापर केला जातो आणि तो आजही जीवनातल्या स्थिरतेचा आदर्श म्हणून वापरला जातो.