blog, blogger आणि blogging म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या blogging meaning in marathi

blogging meaning in marathi-  नमस्कार मित्रांनो! काय आपण विचार करत आहात की blogging म्हणजे काय? Blog म्हणजे काय? आपण हा शब्द खूप वेळा ऐकला असेल, हो ना! आपण हा लेख वाचताय म्हणजे आपल्याला blogging काय आहे जाणून घेण्यात रुची आहे. परंतु तुम्हाला त्या बद्दल नेमकी माहिती नसेल.

आज आपण या लेखामध्ये नेमकं तेच जाणून घेणार आहोत की blog म्हणजे काय? blogging म्हणजे काय? आणि blogging कशी करावी याबद्दल.त्यामुळे आपण हा लेख संपूर्ण वाचा आपल्या ब्लॉग आणि ब्लॉगींग विषयक सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सोशल मीडिया जसे की facebook, twitter, instragram, whatsapp, इत्यादी है आपले विचार व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. परंतु सोशल मीडियावर आपण आपले विचार फक्त मर्यादित लोकांपर्यंत च पोचवतो जे की आपले सोशल मीडिया वर मित्र आहेत किंवा आपल्याला फॉलो करतात किंवा एकाध्या ग्रुप मधील सर्व सदस्या पर्यंत.

पण आज आपण अशा एका प्लॅटफॉर्म बद्दल जाणणार आहोत की त्याच्या मदतीने आपण आपले विचार केवळ मर्यादित लोकांपर्यंत च नव्हे तर संपूर्ण जगापर्यंत पोहचाऊ शकतो आणि पैसे देखील कमावू शकतो. त्या प्लॅटफॉर्म च नाव आहे blogging. आपण जर एकदा blog लिहून google वर publish केला तर जगातील कोणत्याही व्यक्ती तुमच्या ब्लॉग ला वाचू शकतो आणि तुम्ही ब्लॉगींग करून लाखो पैसे देखील कमावू शकता.

आजकाल खुप लोक रिकाम्या वेळेत घरी बसल्या ऑनलाईन काम करण्याच्या संधी शोधत आहेत. तुम्ही जर google वर सर्च केलं की ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात प्रभावी मार्ग तर आपल्या समोर दोन नाव येतील एक म्हणजे blogging आणि दुसरा youtube. हे दोन्ही मार्ग ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी खुप प्रचलित आहेत. या दोन मार्गांचा अवलंब करून आज खूप लोक लाखों रुपये कमवत आहेत, तुम्ही देखील कमावू शकता!

Youtube वरून पैसे कसे कमवायचे हे मी तुम्हाला पुढच्या लेखामध्ये सांगतो या लेखामध्ये आपण blogging बद्दल माहिती घेऊया. तर चला मग आपण जाणून घेऊया blogging meaning in marathi?

blog म्हणजे काय ( blog meaning in marathi)

मित्रांनो blog म्हणजे एक प्रकारची वेबसाईट जिथे आपण आपले विचार व्यक्त करू शकतो, लोकांपर्यंत माहिती, ज्ञान पोहचाऊ शकतो. लोकांसोबत विचारविनिमय करू शकतो. ब्लॉग द्वारे लोकांसोबत विचारविनिमय करणं हे थोड विलक्षणच वाटतंय हो न! पण हे सत्य आहे आपण ब्लॉग्स वर लोकांना केवळ माहिती वाचायला देत नाही तर आपण comment द्वारे त्यांच्याशी विचारविनिमय देखील करू शकतो.

उदाहणादाखल मी आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला ब्लॉगींग बद्दल माहिती देतोय, जर तुम्हाला ब्लॉगींग मध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून विचारू शकता, तुमच्या प्रतिक्रियांना मग मी उत्तर देईल अशा प्रकारे आपल्यामध्ये एका ब्लॉगच्या माध्यमातून संवाद साधला जाऊ शकतो.

पण प्रसारमाध्यमांचा तसं नाही, प्रसारमाध्यमे जसे की वर्तमानपत्र, आकाशवाणी, टेलिव्हिजन हे आपल्या पर्यंत बातम्या, माहिती, विचार तर पोचवतात परंतु बतमिदारशी संपर्क साधणं किंवा त्यांना आपल्या शंका विचारणं फार कठीण काम आहे व त्यामुळे बहुतेक लोक आपली माहितीची भूक भागवण्यासाठी blog चा सहारा घेतात आणि आपल्याला हवी ती माहिती मिळवतात.

आणि विशेष म्हणजे तुम्ही ब्लॉग लिहून, त्यावर जाहिराती द्वारे पैसे देखील कमावू शकता. त्यामुळे मला तरी वाटतं blog हे आपले विचार मांडण्याचं, जगभरातील लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचं आणि जाहिराती द्वारे पैसे कमावण्याचा एक प्रभावी माध्यम आहे! आपल्याला काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

Blogger म्हणजे काय आणि तो कोण असतो (blogger meaning in marathi)

मित्रांनो आपल्याला ब्लॉग काय असतो तर समजलंच असेल, पण तुम्हाला blogger म्हणजे काय? किंवा blogger कुणाला म्हणतात? माहिती आहे!

जो व्यक्ती ब्लॉग लिहितो, ब्लॉगमध्ये पोस्ट लिहून लोकांपर्यंत माहिती, ज्ञान पोचवतो त्या व्यक्तीला blogger म्हणल जात. जसं उदाहरणादाखल मी हा ब्लॉग लिहितोय, तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवतो म्हणजे तुम्ही मला blogger म्हणू शकता.

ज्याप्रमाणे आपण बातमी लिहिणाऱ्या ला बातमीदार म्हणतो, कविता लिहिणाऱ्या ला कवी म्हणतो, लेख लिहिणाऱ्या ला लेखक म्हणतो त्याचप्रमाणे blogging मध्ये blog लिहिणाऱ्या ला blogger म्हटलं जातं.

आता हा blogger कुणीही असू शकतो! एकदा व्यक्ती ब्लॉग द्वारे आपला buissness ची उत्पादने ऑनलाईन आपल्या ग्राहकांना विकतो तर तो blogger आहे, एकादी गृहिणी विविध पाककला ब्लॉग च्या मदतीने इतर गृहिणी पर्यंत पोहचवते तर ती blogger जर तुम्ही एकदा ब्लॉग तयार कराल तर तुम्ही देखील स्वताला ब्लॉगर म्हणू शकता. blogger होन खुप सोपं आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पात्रतेची अट देखील नाहीं.

Blogpost म्हणजे काय (blogpost meaning in marathi)

ब्लॉगमध्ये उपलब्ध प्रत्येक लेखाला blogpost म्हटलं जातं. आता तुम्ही जे वाचताय blogging meaning in marathi तर ही देखील एक blogpost आहे. blog मध्ये blogpost च्या साह्याने माहिती चे वर्गीकरण केले जाते.

म्हणजे विविध category मध्ये या blogpost ला वीभागल जातं.उदाहरणात माझ्या ब्लॉग मध्ये blogging, adsense आणि seo या जर तीन कॅटेगरी आहेत तर मी लिहिलेले सर्व लेख त्यामध्ये कशाबद्दल माहिती आहे यांच्यावरून या तीन कॅटेगरी मध्ये विभागले जातात त्यासाठी मला लेख लिहिताना त्याची कॅटेगरी ठरवावी लागते. यामुळे वाचकांना कॅटेगरी च्या साह्याने ब्लॉग मधील blogpost शोधणं सहज होतं.

Blog ची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ब्लॉग मध्ये लिहिलेली प्रत्येक नवीन blogpost सर्वात वरती दिसते. त्यामुळे वाचकांना नवीन माहिती लगेच सापडते. परंतु आपण डायरी लिहिताना लिहिलेली प्रत्येक नवीन पोस्ट ही डायरी च्या शेवटी असते.

blogging म्हणजे काय (blogging meaning in marathi)

ब्लॉग लिहून त्याद्वारे पैसे कमावण्याच्य प्रक्रियेला blogging म्हणतात.ब्लॉगींग हे एक ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात प्रचलित स्रोत आहे. Blogging करून तुम्ही अमर्याद पैसे कमावू शकता येते पैसे कमावण्यासाठी कुटल्याही प्रकारची मर्यादा नाही.

नवीन टॉपिक वर blogpost लिहून, नवी नवी माहिती लकांपर्यंत पोहचवणे म्हणजेच blogging करणे.

माहिती, ज्ञान लोकांपर्यंत पोचवणे, लोकांच्या समस्यांचे समाधान करणे, कमेंट बॉक्स च्या साह्याने जगभरातील लोकांसोबत जुडणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि blogging च्या साह्याने पैसा व प्रसिद्धी मिळवणे या सर्व गोष्टी ब्लॉगींग द्वारे केल्या जातात.

Blogging कशी करावी?

 1. ब्लॉगींग करन फार सोपं आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ज्या विषयी ब्लॉग मध्ये माहिती लिहायची आहे त्यानुसार blog साठी एक niche निवडायचा आहे. Niche म्हणजे तुमच्या ब्लॉग चा टॉपिक जसं की technology, food, travel, health, beauty, इत्यादी
 2. एकदा का ब्लॉग चा niche निवडला की मग ब्लॉग तयार करून त्यामध्ये ब्लॉग च्या टॉपिक नुसार नियमित लेख लिहायचे आहेत.
 3. नंतर तुमच्या ब्लॉग वर जशी लेखांची संख्या वाढत जाईल, तुमचा ब्लॉग जुना होईल आणि भेट देणाऱ्या लोकांची संख्या संख्या देखील वाढेल.
 4. नंतर तुम्ही मग google adsense ला apply करून ब्लॉग ल मंजुरी मिळाल्यानंतर ब्लॉग वर जाहिराती लाऊन लाखों पैसे कमावू शकता.

Blogging करण्याचे फायदे (advantages/benefits of blogging in marathi)  :

ब्लॉगींग करण्याचे खुप सारे फायदे आहेत त्यातील काही मुख्य फायदे खाली नमूद केले आहेत

 • तुमच्या लेखनामध्ये सुधार होईल
 • तुम्ही ब्लॉग लिहून तुमचे विचार लोकापर्यंत पोहाचाऊ शकता
 • तुम्हाला इंटरनेट वर प्रसिद्धी मिळेल
 • तुम्ही जाहिराती द्वारे पैसे कमवू शकता
 • तुम्ही तुमचा buissness ऑनलाईन चालवू शकता
 • तुम्ही ब्लॉगींग द्वारे तुमच्या उत्पादनांची ऑनलाईन मार्केटिंग देखील करू शकता

Blogging करण्याचे नुकसान (disadvantages of blogging in marathi):

ज्याप्रमाणे blogging चे खुप सारे फायदे आहेत त्याचप्रमाणे ब्लॉगींग करण्याचे काही नुकसान देखील आहेत

 • आपण जर विद्यार्थी असाल तर आपल्या आभ्यासावर परिनाम होऊ शकतो
 • तुमचा जास्त वेळ वाया देखील जाऊ शकतो
 • तुम्हाला सोशल मीडिया वर वेळ व्यतीत करण्याची सवय लागेल
 • तुम्ही परिवाराच्या सदस्यांना कमी वेळ देऊ शकाल

निष्कर्ष: blogging meaning in marathi

मित्रांनो तर आज आपण blog म्हणजे कायblogging म्हणजे काय व blogging meaning in marathi या सर्व गोष्टींची माहिती घेतली. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.

माझ्या आजच्या लेखाचं उद्दिष्ट होतं की तुम्हाला blogging म्हणजे काय समजून सांगावे. मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती मित्रांना नक्की सोशल मीडिया वर शेअर करा, धन्यवाद…!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: