शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ | Shivaji maharaj ashtapradhan mandal

शिवाजी महाराजांचे हे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांच्या राजकार्यात मोलाचा वाट उचलत होते

शिवाजी महाराजांच्या Ashtapradhan mandal मध्ये आठ प्रकारचे मंत्री समाविष्ट होते

Shivaji maharaj ashtapradhan mandal names । Shivaji maharaj administration

  1. पंतप्रधान ( पेशवे )
  2. अमात्य / मुजुमदार / अर्थमंत्री
  3. पंत / सचिव / सुरणवीस
  4. वाकनीस / मंत्री
  5. सरसेनापती / सरनौबत
  6. पंत सुमंत / डाबीर
  7. पंडितराव
  8. न्यायाधीश

स्वराज्याच्या प्रारंभीच्या वेळेस शिवाजी महाराजांचे सैन्याचा आकार हा लहान होता. त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात आपले बालपणीचे सवंगडी यांना सोबत घेऊन केली होती. .

त्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतल्यावर आणि छत्रपती झाल्यावर मराठी माणसाला चेतना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते.  राज्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची निरंकुश सत्ता चालत होती.

शिवाजी महाराजांनी ०६ जून १६७४ रोजी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची व्यवस्था सुसज्ज ठेवण्यासाठी आठ पात्र लोकांची नियुक्ती केली, त्या मंत्री लोकांना “अष्टप्रधान” या नावाने ओळखले जाऊ लागले, शिवाजी महाराजांचे Ashtapradhan mandal शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतरही शिवाजी महाराजांच्या वंशावळीमध्ये खूपवेळ चालू राहिल होते. शिवाजी महाराजांनी विश्वासू यांना सहकारी विविध प्रकारची राजव्यवस्थेची कामे देऊन त्यांच्या क्षमतेचा स्वराज्य वाढवण्यासाठी आणि राजकारभार सुरळीतपणे व चांगल्याप्रकारे चालवण्यासाठी त्यांचा पुरेपूर वापर केला.

या अष्टप्रधान मंत्रिमंडळाच्या अंतर्गत पदे, तसेच त्या पदाधिकाऱ्यांचे म्हणजेच मंत्र्यांचे अधिकार आणि कर्तव्ये यांची स्पष्ट नियम तयार करण्यात आले होते. .स्वराज्याचा राज्य कारभाराला दोन भागांमध्ये विभागले गेले होते १)सामान्य प्रशासन २) इतर लष्करी शक्ती या सर्वांचे कार्य हे याच अष्टप्रधानांच्या देखरेखीखाली सुरळीत चालत असायचे

तसेच शिवाजी महाराज आपल्या या Ashtapradhan mandal च्या कार्याकडे लक्ष ठेवून असायचे

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची वेगवेगळ्यातऱ्हेची कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली असली तरी ते आपल्या कामाबद्दल छत्रपतींना जबाबदार असत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती अमलात आणली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या या आठ मंत्र्यांना आपल्या कर्तबगारीनुसार संस्कृत भाषेतून नावे दिली.

या शिवाजी महाराजांच्या Ashtapradhan mandal मध्ये आठ प्रकारचे मंत्री समाविष्ट व कार्यरत होते.

१) पंतप्रधान किंवा पेशवे

शिवाजी  महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवे हे पद सर्वात मुख्य पद होते. पेशवे म्हणजेच मुख्य प्रधान किंवा पंतप्रधान.शिवाजी महाराजांचे राज्यस्थापनेच्या वेळी प्रथम मुख्य प्रधान म्हणजेच पेशवे हे शामराजपंत नीळकंठ रांजेकर होते. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हे पेशवे पद मोरोपंत पिंगळे यांच्याकडे गेले मोरोपंत पिंगळे यांनी या पेशवे पदावर दीर्घकाळ काम केले.महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मोरोपंत पंतप्रधान होते.

स्वराज्यावर शिवाजी महाराजांनंतर पेशवे यांचा अधिकार चालत असे. राज्याच्या सर्व कारभारावर पेशवे यांना नजर ठेवावी लागत असे. तसेच शिवाजी महाराजांच्या गैर उपस्थितीत राज्यकारभार पंतप्रधानालाच म्हणजेच पेशवे याना सांभाळावा लागत असे यावरुन पेशवे पद हे किती महत्वाचे आहे हे आपण समजू शकाल.

पंतप्रधानाचा पगार : वार्षिक १५ हजार होन.

२) अमात्य/मजुमदार/अर्थमंत्री

अमात्य यांचे कार्य हे राज्यातील कर जमा करणे तसेच  त्याचा हिशेब ठेवणे हे होते .शिवाजी महाराजांचे अमात्य रघुनाथपंत हणमंते ​​हे होते. सैनिकांची नियुक्ती, हिशेबांची देखरेख करण्यासाठी, सैनिकांचा पगार ठरविणे,  कर वसूल करण्याची प्रणाली  तसेच उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब ठेवणे, आर्थिक विभागाशी संबंधित कागदपत्रांवर लक्ष ठेवणे , राज्याला वित्त व अर्थ पुरवठा करणे आणि पैशासंबंधित प्रकरणांमध्ये अधिकृतता मंजूर करणे तसेच पूर्ण जमा खर्च अहवाल हा शिवाजी महाराजांसमोर सादर करणे ही अमात्य या पदाधिकाऱ्यांची  मुख्य जबाबदारी होती.

अमात्य यांचा पगार : वार्षिक १२ हजार होन.

३) पंत सचिव/सुरनवीस

सुरनवीस हे शिवाजी महाराजांच्या Ashtapradhan mandal पैकी अजून एक सर्वात महत्त्वाचे मंत्रीपद होते. शिवाजी  महाराजांचे सुरणवीस ‘“अण्णाजीपंत दत्तो” हे होते . पंत सचिव यांचे कार्य म्हणजेच शिवाजी महाराज यांनी केलेला सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, अधिकृतता पत्रे आणि स्वीकृती पत्रे यावर शिक्का मारून ती अधिकृत करणे व त्याचा हिशेब ठेवणे हे त्याचे कार्य होते .

तसेच त्यांना सर्व येणार्‍या तसेच जाणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे , खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे देणे , परकीय राज्ये यांच्याशी पत्रव्यवहार करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सर्व सुभेदार व इतर राजकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाठवलेल्या आज्ञापत्रावर लक्ष ठेवणे.

पंत सचिवांचा पगार : वार्षिक १० हजार होन 

४) मंत्री / वाकनीस

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी वाकनीस या पदाचे नवीन नाव मंत्री असे ठेवण्यात आले.

महाराजांच्या या पदाधिकाऱ्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवणे, खाजगी, कौटुंबिक बैठक ठरविण्याची कामे तसेच शिवाजी महाराज्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे तसेच शिवाजी महाराजांच्या संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, विविध प्रकारच्या गुप्त माहितीची सत्यता जाणून घेणे व त्यानुसार कारवाई करणे, स्वराज्यात घडणाऱ्या घटना व घडामोडींवर नजर ठेवणे तसेच शिवाजी महाराजांना त्याच्या बद्दल सूचित करणे ही कामे करावी लागत असत. शिवाजी महाराजांनी प्रथम या पदावर गंगाजी पंतांची नियुक्ती केली होती . मात्र महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस हे मंत्रीपद दत्ताजी त्र्यंबक यांना सोपवण्यात आले.

 मंत्री यांचा पगार : वार्षिक १० हजार होन  

५) सरसेनापती / सरनौबत

अष्टप्रधान मंत्रिमंडळातील सेनापती म्हणजे स्वराज्यमधिल आपल्या सैनिकांवर नजर ठेवणारा आणि त्यांना राजाच्या आज्ञेनुसार हुकूम देणारा करणारा प्रमुख सेनापती असायचा .पूर्वीच्या काळात हे पद ‘सरनौबत म्हणून म्हणून ओळखले जात असायचे. सरसेनापती हा सैनिकांचे दोन्ही भाग म्हणजे पायदळ व दुघोडदळ याना हुकूम देत असे तसेच त्यांच्यावर नजर ठेवत असे

पुढे राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या पदाचे नाव ‘सेनापती’ असे ठरवले . सरसेनापती यांचे मुख्य कार्य म्हणजे नवीन सैनिकांची सैन्यात भरती करून घेणे ,त्यांना उच्च प्रतीचे लढाई प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामगिरी नुसार त्यांना पदोन्नती देणे , त्यांचे मानधन ठरविणे , सैन्याला पुरवणाऱ्या शस्त्रास्त्रांची व्यवस्था ठेवणे , नवीन शस्त्रे बनवून घेणे, तसेच सैनिकांना रसद पुरवठा व सैन्याबद्दल शिवाजी महाराजांना माहिती देणे अशी विविध प्रकारची कामे ही सेनापतीची प्रमुख कामे होती.

शिवाजी महाराजांनी आपले पहिले सरसेनापती नूरखान बेग यांची नेमणूकक केली होती. त्यांच्यानंतर येसाजी कंक नेताजी पालकर, प्रतापराव गुजर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्याभिषिकावेळी सरसेनापती  म्हणून हंबीरराव मोहिते यांना निवडले. कारण हंबीरराव मोहिते हे एक कर्तबगार पराक्रमी योद्धा होते.

 सरसेनापती यांचा पगार : वार्षिक १० हजार होन 

६) सुमंत / डाबीर

सुमंत हे मंत्रिपद पूर्वी डाबीर म्हणून ओळखले जात असे. सुमंतची मुख्य जबाबदारी म्हणजे परकीय राज्यांतून येणाऱ्या राजकीय प्रतिनिधींशी आणि दूतांसोबत संवाद साधणे, त्यांचे स्वागत करून त्यांच्यासाठी राहण्याची योग्य ती व्यवस्था करणे,  तसेच आवश्यकतेनुसार इतर परकीय राज्यांना भेटी देणे . परकीय राज्यामध्ये दूत पाठविणे, तसेच आपले गुप्तहेर तयार करणे , त्यांना प्रशिक्षण देणे , त्यांच्या कडून माहिती घेऊन ती माहिती गुप्तपणे शिवाजी  महाराजांकडे पोहोचविणे हे कामे सुमंत यांची होती .

शिवाजी महाराजांचे पहिले सुमंत म्हणून सोनोपंत हे काय बघत होते त्यापुढे राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी सुमंत म्हणून रामचंद्र त्र्यंबक यांची नेमणूक केली.

पंत सुमंतांचा पगार : वार्षिक १० हजार होन  

७) पंडितराव / धर्मस्व / दानाध्यक्ष

पंडितराव पदाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. शिवाजी महाराज खूप धार्मिक होते त्यामुळे त्यांनी धर्मकार्य करण्यासाठी विशेषम्हणून या पदाची निर्मिती केली होती. पंडितरावचे कार्य म्हणजे धर्मग्रंथानुसार धार्मिक विषयात मत देणे, दान करणे, समाजातील विविध धार्मिक गोष्टींना प्रोत्साहन देणे, राज्यातील धार्मिक गुरूंना आश्रय व संरक्षण देणे हि मुख्य कार्ये होती. राज्याभिषेकाच्या वेळी रघुनाथ पंत यांची नेमणूक पंडितराव म्हणून करण्यात आली . महाराजांनी पंडितरावांना युद्धा मोहिमांपासून मुक्त ठेवले होते.

रघुनाथराव पंडीत यांना दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही कामे होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंडीतराव दानाध्यक्ष यांचा पगार : वार्षिक १० हजार होन 

८) न्यायाधीश / काझी-उल-ऊझत

शिवाजी महाराज हे न्यायिक राजे होते ते नेहमी न्याय करायचे त्यामुळे त्यांनी आपली न्यायव्यवस्थाला प्रशासकीय स्वरूप दिले होते त्यामुळे जे न्यायिक खटले आहेत ते जलदगतीने संपून सर्वांना न्याय मिळेल या हेतूने त्यांनी न्यायाधीश हे पद तयार केले

शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या या मंत्रिपदामुळे प्रत्येकाला तात्काळ व योग्य न्याय मिळायाला लागला . शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या मंत्रीपदाला ‘न्यायाधीश’ असे नाव ठेवण्यातआले.आणि या पदावर निराजी रावजी यांची नेमणूक करण्यात आली. निराजी रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी अशाप्रकारचे गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्याय देणे, आणि त्यांच्याबदलची माहिती हि शिवजी महाराजांना देणे हे न्यायाधीसह यांचे कार्य होते

 न्यायाधीश यांचा पगार : वार्षिक १० हजार होन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: