छत्रपती शिवाजी महाराज वंशावळ | Shivaji Maharaj Vanshaval

शिवाजी महाराज हे थोर होते त्यामुळे फक्त महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण भारत त्यांना त्यांनी केलेल्या महान कार्यांमुळे पुजतो आहे. शिवाजी महाराजांची लहानपणातच स्वराज स्थापन करण्याचे महान कार्य केले. त्यांनी जुन्या आणि द्रुष्ट राज्यांकडून होणाऱ्या जुलमांपासून प्रजेचे रक्षण केले, असंख्य किल्ले आपल्या स्वराज्यात सामील करवून घेतले, जुन्या वाईट प्रथा मोडून काढल्या.

आपल्या शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये थोर राजे होऊन गेले त्यामुळे त्या सर्वांबद्दल आपल्याला कळावे म्हणून मी ही chhatrapati shivaji maharaj vanshaval आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. आवडली तर नक्कीच कळवा. chhatrapati shivaji maharaj family tree हे पोस्ट लिहताना काही
चुकी झाल्यास कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवा

Contents

shivaji maharaj family tree

शिवाजी महाराज वंशावळ

बाबाजी भोसले

बाबाजी भोसले यांचा जन्म १५३३ मध्ये झाला होता.
बाबाजी यांना दोन पुत्र होते प्रथम पुत्र हे मालोजी भोसले त्यांच्या पत्नीच नाव हे उमाबाइ, त्या फलटणच्या निंबाळकर घराण्याच्या कन्या होत्या.

बाबाजी यांचे द्वितीय पुत्र म्हणजेच विठोजी ,पत्नी आउबाई. याना ८ पुत्र होते सम्भाजी, खेलोजी, मालोजी, कबाजी, नागोजी, परसोजी, त्रिम्बकजी, ककाजी आणि १ कन्या होती त्यांचं नाव अम्बिकाबाइ होती.

मालोजी भोसले

मालोजी यांचा जन्म हा १५४२ तर मृत्यू १६१९ सालचा पुणे जिल्ह्यातील पुणे आणि सुपे जहागिरी मालोजी यांच्याकडे होत्या. त्यांना दोन पुत्र होते शहाजी आणि शरीफजी

शहाजी भोसले

सन १५९४ ते सन १६६४

शहाजीराजे हे निजामशाहीत आणि त्यानंतर आदिलशाहीत सरदार होते. शाहाजी भोसले यांना जिजाबाई, तुकाबाई, नरसाबाईपुत्र ह्या तीन पत्नी होत्या त्यात जिजाबाई यांना दोन पुत्र ते म्हणजे सम्भाजी तर दुसरे शिवाजी महाराज तर दुसऱ्या पत्नी तुकाबाई यांचे पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे होते. तसेच तिसऱ्या पत्नी नरसाबाई यांच्या पुत्राचे नाव संताजी होते

छत्रपती शिवाजी महाराज

सन १६३० ते सन १६८०

Shivaji Maharaj Information in Marathi

नाव ( Name ) शिवाजी शहाजी भोसले (महाराज)
जन्म (Birth date) 19 फेब्रुवारी 1630
जन्मठिकाण (Birthplace) शिवनेरी किल्ला (Shivneri fort)
पिता (Father Name) शहाजीराजे भोसले
मातोश्री (Mother Name) जिजाबाई भोसले
शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावे
(Wife Name)
सगुणाबाई, सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई,
लक्ष्मीबाई, सकवारबई, काशीबाई, काशीबाई, गुणवंतबाई
राज्याभिषेक (Rajyabhishek) 6 जुन 1674( रायगड किल्ल्यावर )
मुलांची नावे (Children Name) संभाजी, राजाराम, अंबिकाबाई,
रानुबाई, कमलाबाई, राजकुंवरबाई, दिपाबाई,सखुबाई,
तलवारीचे नाव (Name of Sword) भवानी तलवार (Bhavani Sword), जगदंबा तलवार (Jagdamba Sword)
तुळजा तलवार (Tulja Sword)
घोड्याचे नाव (Name of Horse) मोती, इंद्रायणी, रणबीर, तुरंगी, विश्वास, गजरा,व कृष्णा
धार्मिक गुरु (Religious Teacher) समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami)
मृत्यु दिन (Death) ३ एप्रिल १६८० (५० व्या वर्षी )
मृत्यूस्थळ (Death Place)  रायगड किल्ल्यावर (Raigad Fort)

shivaji maharaj fort list | शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील काही किल्ले

shivaji maharaj fort list

शिवनेरी रायगड सिंहगड
तोरणा सज्जनगड राजगड
पुरंदर विशाळगड लोहगड
जंजिरा पन्हाळागड रामसेज
विजयदुर्ग अंजदीव बोरगड
सिंधुदुर्ग साल्हेर प्रतापगड
भुईकोट किल्ला वाईचा पांडवगड देवगिरी
हरिहर किल्ला वसई किल्ला हरिश्चंद्रगड
कर्नाळा पाणकोट नळदुर्ग
shivaji maharaj fort list

शिवाजी महाराज यांना आठ पत्नी होत्या त्यांची नावे सगुणाबाई, सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबई, काशीबाई, काशीबाई, गुणवंतबाई

i) सगुणाबाई ह्यांना राजकुवर नावाची कन्या होती
ii) सईबाई ह्या नाईक निम्बाळकर यांच्या कन्या होत्या त्याचे पुत्र म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज होते व तीन पुत्री होत्या त्या म्हणजे सखुबाई, राणुबाई व अंबिकाबाई.
iii) सोयराबाई ह्या हंबीर राव मोहितेंच्या बहीण होत्या त्यांचे पुत्र राजाराम तर पुत्री बळीबाई होत्या.
iv) सकवारबाई ह्या गायकवाड घराण्यातील होत्या त्यांना कमळाबाई नावाची पुत्री होती.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

सन १६५७- ते सन १६८९

shivaji maharaj vanshaval मध्ये संभाजी हे महाराज हे खूप पराक्रमी आणि थोर राजे होते त्यांना धर्मवीर असेही म्हणतात. संभाजी महाराज यांच्या माता सईबाई होत्या. संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई पासून त्यांना शाहू हे पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ मध्ये पुरंदरच्या किल्ल्यावर झाला आणि महाराष्ट्राला दुसरे छत्रपती लाभले. संभाजी महाराजांना छावा आणि शंभूराजे असे देखील म्हटले जाते.

परंतु त्यांच्या जन्मानंतरच दोन वर्षांत त्यांची आई सईबाईंचे निधन झालं16 जानेवारी 1681 या दिवशी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला त्यांनी मराठा साम्राज्याची जवाबदारी सांभाळली. त्यानंतर 1689 ला झालेल्या विश्वासघातामुळे संभाजी महाराज मोगलांच्या ताब्यात सापडले. मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची हत्या करण्यात आली.

छत्रपती राजाराम महाराज

सन १६७० ते सन १७००

सन १६७० ते सन १७००
छत्रपती राजाराम महाराज हे सोयराबाई यांचे पुत्र होते तर त्यांच्या पत्नी ताराबाई (सरसेनापती हबीरराव मोहिते यांच्या कन्या), जानकीबाई (शिवाजी महाराजांचे सेनाप्रमुख प्रतापराव गुजर यांच्या पुत्री), राजसबाई ह्या होत्या त्यांना ताराबाई यांच्या पासून पुत्र शिवाजी २ रे (१६९६-१७२६) हे होते. तर पत्नी राजसबाई पासून पुत्र सम्भाजी २ रे (१६९८-१७६०) हे होते राजाराम महाराजांचा मृत्यु सन १७०० मध्ये सिंहगडावर झाला.

शाहू महाराज १ ले

सन १६८२ ते सन १७४९

सम्भाजी महाराजांचा अमानुषपणे छळ आणि हत्या केल्यानंतर येसूबाई व ७ सात वर्षाचा शाहू यांना मुघलांनी बंदी बनवले ते १८ वर्षे म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत शाहू हे त्यांच्या कैदेत होते. त्यानंतर औरंगजेबाच्या मुलाने शाहूला मुक्त केले. त्यानंतर बालाजी पेशव्यामूळे त्यांना बादशाही कडून स्वराज सरदेशमुखी चे हक्क मिळाले इकडे राजारामाची पत्नी ताराबाइ यांनी सातारा गादी ताब्यात घेतली.

पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू महाराज व ताराबाई यांच्यात लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. राज्याभिषेक करून घेतला. शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई होत्या त्यांना सकवारबाई, सगुणाबाई, राजसबाई व अंबिकाबई ह्या पत्नी होत्या तसेच शाहू महाराजांना संतान नव्हते.

वरील chhatrapati shivaji maharaj vanshaval माहितीवरून असे दिसून येते की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या स्वराज्याची विभागणी ही दोन गाद्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये झाली असे सांगता येईल . ही दोन राज्ये म्हणजेच सातारा आणि कोल्हापूर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याच्या गादीचे किंवा राज्याची स्थापना केली. तर छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी आपल्या पुत्रास म्हणजेच दुसऱ्या शिवाजीस छत्रपती घोषित करून त्यांना कोल्हापूरच्या गादीवर बसविले.

सातारा जिल्ह्याचे खासदार श्री उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. ते 2019 या वर्षी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षामधून निवडणूक लढून विजयी झाले आहे .तर कोल्हापूरच्या राज्याच्या गादीचे वंशज म्हणजेच युवराज संभाजी राजे छत्रपती हे BJP या राजकीय पक्षातर्फे 2016 या साली राज्यसभेत खासदार म्हणून नेमले गेले होते.

तर अशी आहे chhatrapati shivaji maharaj vanshaval तर मी अपेक्षा करतो ह्या पोस्ट मधून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन माहिती वाचायला मिळाली असेल. आणि नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल आम्ही नेहमीच अश्या विविध प्रकारची माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आमच्या ब्लॉग ला व भेट देत राहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: