डॉ राजेंद्र प्रसाद बद्दल माहिती मराठीत – Dr Rajendra Prasad information in Marathi
हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला डॉ राजेंद्र प्रसाद बद्दल माहिती मराठीत – Dr Rajendra Prasad information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – गौतम बुद्ध
१] | नाव – | डॉ राजेंद्र प्रसाद |
२] | जन्म – | ३ डिसेंबर इ.स. १८८४ जेरादेई, बंगाल प्रांत, बिहार |
३] | मृत्यू – | २८ फेब्रुवारी इ.स. १९६३ पाटणा |
४] | आई – | कमलेश्वरी देवी |
५] | वडील – | महादेव प्रसाद |
Contents
डॉ राजेंद्र प्रसाद परिचय – Dr Rajendra Prasad information in Marathi
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे नाव सर्व भारतीयांना परिचित आहे. बिहारमध्ये सारन नावाच्या जिल्ह्यातील जीरादेई या गावी त्यांचा ३ डिसेंबर १८८४ रोजी जन्म झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव बाबू चौधरलाल श्रीवास्तव तर आईचे नाव कामेश्वरी. त्या दोघांना अपत्ये झाली. त्यापैकी राजेंद्रप्रसाद हे सर्वात धाकटे. राजेंद्रबाबूंचे प्राथमिक शिक्षण हे एका मौलवीकडे झाले.
अगदी थोडयाच अवधीत ते उर्दू व फारशी या भाषा शिकले. १८९३ साली छपरा येथील हायस्कुलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर ते पाटण्याच्या टी.के. घोष यांच्या शाळेत गेले.
शिक्षण चालू असतानाच वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला. १९०८ साली ते मॅट्रिक पास झाले. या परीक्षेत ते पहिले आले. त्यांना अनेक बक्षिसे व शिष्यवृत्या मिळाल्या.
त्यानंतर कलकत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला तेथून बी.ए. पुढे एम.ए. व नंतर एल.एल.बी. ह्या पदव्या त्यांनी घेतल्या. कॉलेजमध्ये त्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविले गेले.
वाचन, वकृत्व व लेखन हे तिन्ही छंद त्यांनी उत्तम प्रकारे जोपासले होते.बालपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती. आध्यात्मिक ग्रंथांचा त्यांचा व्यासंग खूप दांडगा होता.
राजकीय क्षेत्रात कार्य – Dr Rajendra Prasad information in Marathi
आपल्या जीवनातील सर्वोच्च ध्येय हे देशसेवा आहे, असे राजेंद्रबाबुंनी मानले. काँग्रेसच्या १९०६ सालच्या कलकत्याच्या अधिवेशनात राजेंद्रबाबूंनी स्वयंसेवकाचे १९९१ सालच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
१९१३ सालच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे ते सभासद झाले तर १९३४ साली ते काँग्रसचे अध्यक्ष झाले. काही दिवसत त्यांनी मुझफरपूर येथील कॉलेजात इंग्रजीचे व कलकत्ता येथील सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.
कायद्याविषयीच्या उत्तम ज्ञानामुळे ते वकिली करु शकलं याचवेळी गोपाळ कृष्ण गोखले यांनी भार सेवक समाज स्थापन केला होता. त्यांना तरुण लोक देशकार्यासाठी हवे होते.
राजेंद्र बाबूंवर त्यांच फार मोठा प्रभाव पडला. १९१२ साली कलकत्ता येथे हिंदी साहित्य संमेलन झाले त्या संमेलनाचे ते मुख्य चिटणीस होते.
याचवेळी त्यांची चंपारण्यमें महात्मा गांधी व मेरे युरोप के अनुभव ही दोन पुस्तके प्रसिध्द झाली, बंगाल व बिहारमध्ये पूर आल्यानंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी फार मोठे कार्य केले. चंपारण्यात निळीच्या लागवडीच्यावेळी गोरे लोक शेतकऱ्यांना त्रास देत.
स्त्रियांवर अत्याचार करीत. अशावेळी महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहात ते सामील झाले. सत्याग्रहाची पूर्ण माहिती देणारे पुस्तक त्यांनी १९१८ साली प्रसिध्द केले. महात्मा गांधीच्या असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला.
६ जानेवारी १९२१ ला पाटणा येथे बिहार राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना झाली. त्यात त्यांचा सहभाग मोठा होता. खादीचा प्रसारही त्यांनी प्रकर्षाने केला. बिहारमध्ये जागोजागी खादीकेंद्र उघडण्यात आली. त्यानंतर १९२४ साली ते पाटणा, म्युनिसिपाल्टीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
१९४२ मध्ये ब्रिटिशांच्या सत्तेविरुध्द झालेल्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला.पाटणा येथील बाकीपूर तुरुंगात त्यांना ठेवले गेले.
तेव्हा १०४२ दिवस कारागृहात व्यतीत करीत असतांना, त्यांनी द्विखंड भारत हा ग्रंथ लिहिला व तो १९४६ ला प्रसिध्द झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५२ रोजी प्रजासत्ताक भारताचे ते पहिले राष्ट्रपती झाले राष्ट्रपतीपद त्यांनी जवळपास १२ वर्षे सांभाळले.
१९५८ साली जपानमधील ओहतानी व रियुकोकु या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. १९६२ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला राजेंद्रबाबुंनी राजकारणातून निवृत्त झाले.
२८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांच्या जीवनाचा अध्याय संपला. राजेंद्रबाबु अत्यंत साधे होते. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांनी साधे कपडेच परिधान केले. परोपकार हा त्यांचा जीवनाचा स्थायीभाव होता.
देशप्रेमाने भारुन जाऊन स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी हिररीने भाग घेतला. त्यांनी समाजाची सेवा अगदी निःस्पृहपणे केली. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ते समतोल बुध्दीने वागले.
डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या खोलीत एक सुभाषित लिहिलेले होते ते असे
हरियायी न हिंमत विरियाई ना हरिको नाम ।
जही विधे रखियाई राम वही विधे रहिये।
हिंमत सोडू नका व ईश्वराला विसरू नका. राम जसे ठेवील तसे राहावे.
काय शिकलात?
आज आपण डॉ राजेंद्र प्रसाद बद्दल माहिती मराठीत – Dr Rajendra Prasad information in Marathi पाहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.