माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध – Eassy on diwali in marathi

Eassy on diwali in marathi – नमस्कार मित्रांनो ! मराठी संग्रह ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण माझा आवडता सण दिवाळी eassy on diwali in marathi या विषयावर निबंध लिहिणार आहोत.

शालेय व महावद्यालयीन जीवनामध्ये आपल्याला परीक्षेत एकदा तरी माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहायला असतो. आपण हमखास दिवाळी वर निबंध लिहितो कारण बहुतेक जणांचा आवडता सण हा दिवाळीच असतो.

Contents

दिवाळी वर मराठी निबंध – eassy on diwali in marathi

माझा आवडता सण हा दिवाळी आहे. दिवाळी म्हटलं की आपल्याला आटावतात विविध प्रकारचे फटाके, दिवाळीची सजावट आणि सर्वांच्या आवडीचे फराळाचे पदार्थ. दरवर्षी भारतीय लोक इंग्रजी महिन्यातील ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी साजरी करतात. दिवाळी सणाची तारीख निश्चित नसते. दिवाळी सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात पण निश्चित या दोन्हीपैकी एका महिन्यातच असतो.

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. हा सण केवळ भारतातच साजरा होत नाही तर अश्या अनेक राष्ट्रामध्ये साजरा केला जातो जिथे भारतीय लोक राहतात. कारण दिवाळी हा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या खूप जिव्हाळ्याचा सण आहे. दिवाळी हा सर्वपंथिय सण आहे म्हणजेच हा सण केवळ हिंदूच साजरा करतात असे नाही तर हिंदुशिवाय अनेक मुस्लिम, सिख, ख्रिश्चन धर्मातील लोक देखील हा सण खूप आनंदाने साजरे करतात.

“Information of diwali in marathi”

दिवाळी हा सण प्रभु रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या १४ वर्षांच्या वनवसातून परत आल्याच्या खुशी मध्ये साजरा केला जातो. या दिवशी प्रभु रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण हे १४ वर्षांचा वनवास भोगून आयोधेत परत आले होते तेंव्हा आयोधेतील लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते आणि आनंद साजरा केला होता. तेंव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

लहानपणी दिवाळीला आपण आईसोबत मामाच्या गावाला जातो आणि मामाच्या गावाला जायचे म्हणलं की एक वेगळीच मज्जा असते. मामा न्यायला येणार म्हणून आपण सकाळी लवकरच उठून बसतो आणि अंघोळ करून, नवीन कपडे घालून मामाच्या गावाला जायला तयार होतो. आपल्याला त्यावेळी एक गाणं नक्की आठवत ते म्हणजे ” मामाच्या गावाला जाऊया

झुकझुक झुकझुक आगिन गाडी

धुरांच्या रेषा हवेत काढी

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया…

दिवाळी ही बहुधा तीन दिवसाची असते. पहिल्या दोन दिवसांना पाहिलं पाणी आणि दुसरं पाणी असे म्हटले जाते. तिसरा दिवस असतो भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन. या दिवशी बहीण आपल्या भावाला वोवाळते आणि भावाला दीर्घायुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना करते.

लक्ष्मपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे म्हणजेच धनाची पूजा केली जाते. या दिवशी दुकाने, ऑफिस, कार्यालये यांची देखील पूजा केली जाते.

दिवाळी मराठी निबंध

दिवाळीमध्ये फटाके वाजवण्याची एक वेगळीच मजा असते. दिवाळीत संध्याकाळी दिवे लावल्यानंतर आपण आनंद व्यक्त करण्यासाठी खूप सारे फटाके फोडतो. त्यात फुलझाड, हवाईनळे, रॉकेट, सुतोळी बॉम्ब, भुईचक्र आणि लक्षमितोटे हे काही माझे आवडते आयटेम. फुलझाड वाजवताना तर एक वेगळीच मजा असते.

दिवाळीच्या अगोदर आपण सर्व घर स्वच्छ धुवून घराची साफ सफाई करतो. घराला विविध वस्त्र दालनानी साजवतो. आपण घर सुंदर चमकदार दिसण्यासाठी घरावर लायटिंग सोडतो आणि दिवाळीची शोभा म्हणजे आकाशकंदील तर लावतोच लावतो. दिवाळीच्या सीझन मध्ये विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकर्षक कंदील बाजारात विकायला येतात. त्यामुळे बाजारात आकाशकंदील घेण्यासाठी लोकांची आफाट गर्दी होते.

घरातील स्त्रिया फराळाचे पदार्थ तयार करण्यात रमलेल्या असतात. दिवाळी मध्ये बुंदीचे लाडू, अनारसे, करंज्या, बालुषाई, चकल्या, चिवडा आणि तोंडाला पाणी आणणारे रसरशीत गुलाब जामून बनवले जातात. हे सर्व पदार्थ दिवाळीमध्ये आवडीने खाल्ले जातात. दिवाळीमध्ये पाहुण्यांना फराळाला बोलावले जाते. दिवाळीमध्ये एकमेकांना विवध भेटवस्तू ही दिल्या जातात.

दिवाळीच्या दिवशी घरचे सर्व सदस्य पहाटेच उटतात. आई आत्या सर्वांना उटनं लावतात. या दिवशी उटनं लावण्याची प्रथा आहे. हे उटनं हळद, तीळ व गव्हाचे पीठ यापासून बनवले जाते. आजकाल उतन्याचे रेडीमेड पॅकेट मिळत आहेत. त्यात आपल्याला काहीही मिसळायची गरज नाही. सरळ पॅकेट फोडून त्यात पाणी घालून त्याचे कालवण तयार करायचे आणि ते अंगावर लावायचे.अंगोळ झाल्यानंतर आपण दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालतो.

दिवाळीच्या दिवशी मी व माझी बहिण मिळून एक सुंदर घरगुती आकाशकंदील बनवतो. माझे बाबा देखील आम्हाला आकाशकंदील बनवायला व त्याची छान सजावट करण्यासाठी मदत करतात. नंतर आम्ही त्यात एक रंगीबेरंगी लाईट सोडतो त्यामुळे आकाशकंदील आणखीनच शोभनिय दिसतो आणि नंतर आम्ही हा आकाशकंदील घराभोवती लावतो. त्यामुळे आमच्या घराला आणखीनच शोभा येते.

माझ्या बहिणीला रांगोळी काढण्याचा खूप छंद आहे आणि तिला खूप छान छान रांगोळी देखील काढता येतात. दिवाळीमध्ये दररोज घरासमोरील अंगणात सडा टाकून रांगोळी काढण्याचा तिचा उपक्रम ठरलेला असतो. ती दिवाळीमध्ये गूगल, यूट्यूब वरील सुंदर रांगोळी शोधून आमच्या अंगणात काढण्याचा प्रयत्न करते.

दिवाळी हा खूप आनंदाचा आणि मजेचा उत्सव आहे. या दिवशी फटाके वाजवण्याची आणि फराळ खाण्याची एक विलक्षण मजा असते. त्यामुळे दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.

टीप : मित्रांनो हा निबंध माझा आवडता सण दिवाळी eassy on diwali in marathi तुम्ही पहिली पासून ते दहावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता. तुम्ही तुमचे दिवाळीचे अनुभव देखील यात समाविष्ट करा त्यामुळे दिवाळी मराठी निबंध आणखीनच सुंदर बनेल.

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी एखाद्या विषयावर निबंध हवा असेल तर तेही कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयावर निबंध लिहू.

तुम्ही खालील विषयासाठी देखील हा निबंध वापरू शकता:

  • माझा आवडता सण
  • दिवाळी मराठी निबंध
  • Eassy on diwali in marathi
  • Information of diwali in marathi

धनयवाद….!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: