Essay on makar sankranti in marathi – मकर संक्रांती निबंध

Essay on makar sankranti in marathi – नमस्कार मंडळी ! आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे मकर संक्रांती या सणावर निबंध. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की शालेय जीवनात आपल्याला नेहमी निबंध लिहायला सांगितला जातो. तसेच परीक्षेत देखील हा निबंध हमखास विचारतात. तर चला मग सुरू करूया मकर संक्रांत सणावर निबंध essay on makar sankranti in marathi

मकर संक्रांत सणावर निबंध – essay on makar sankranti in marathi

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतीशी संबंधित अनेक सण उत्सव साजरे केले जातात. यामध्ये काही सण शेतामध्ये पेरणी झाल्यानंतर पिकाची उगवण चांगली झाल्याच्या खुशिमध्ये साजरे केले जातात तर काही सण हे सुगीच्या वेळेस म्हणजेच पीक काढणीच्या वेळी साजरे केले जातात.

यापैकीच मकर संक्रांती हा सण देखील शेतीशी संबंधित च आहे. हा सण बहुधा हिवाळ्यात येतो आणि यामध्ये शेतातील जी फळे व भाज्या या ऋतूमध्ये येतात त्या एकमेकांना वान म्हणून देऊन हा सण साजरा केला जातो.

हिंदू संस्कृतीतील बहुधा सण हे चंद्र आणि सूर्य यांच्या संक्रमण कालावधी तसेच त्यांचा उगवण्याचा व मावाळण्याचा कालावधी यावरच अवलंबून असतात.

सूर्य जेंव्हा एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या क्रियेला विज्ञानामध्ये “संक्रमण” असे म्हटले जाते. सूर्य जेंव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला “मकर संक्रमण” असे म्हटले जाते. ज्या दिवशी सूर्य धन राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी भारतातील जवळपास सर्व हिंदू लोक हा मकर संक्रांत सण साजरा करतात.

मराठी महिण्याणुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा सण जानेवारी महिन्यातील १४ तारखेला साजरा केला जातो. हिंदू धर्मातील कोणत्याच सणाची तारीख निश्चित नसते पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो दरवर्षी जवळपास १४ जानेवारीला येतो.

याकाळात सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे मार्गक्रमण करीत असतो. तसेच असेही म्हटले जाते की या काळात दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान असते.

मकर संक्रांतीच्या दिवशी कशी तयारी केली जाते ( preperation during makar sankranti festival )

मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप खास व महत्वाचा असतो. या दिवशी स्त्रिया हिवाळा ऋतूमध्ये शेतात जी कोणती फळे येतात ती सर्व एकमेकींना वान म्हणून देतात. तसेच या दिवशी सूर्याला व देवाला तीळ गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे या दिवसात शरीराला उष्णता देणारे तीळ आणि गूळ या पदार्थांना फार महत्व असते. या दिवशी सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला सुगडाचा वसा देतात.

सुगडाचा वसा  म्हणजे छोट्या मडक्यात वेगवेगळ्या फळांचे तुकडे जसे की गाजर, पेरू, बोरं, उसाचे काप, गव्हाच्या बोंब्या , भुईमागाच्या शेंगा तसेच इतर फळे यात टाकून त्यांना हळदी कुंकू लावून ते सुवासिनिला दिले जाते. याला “सुगडे वसने” असे म्हटले जाते. तसेच या दिवशी तीळ आणि गूळ यांपासून लाडू बनवले जातात. ते लाडू एकमेकांना देऊन “तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” असे उद्गार काढले जातात.

या दिवशी जेवणामध्ये खासकरून गुळाची पोळी बनवली जाते आणि तूप असते.

मकर संक्रांत सणाचे महत्त्व ( importance of makar sankranti festival )

हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांत (makar sankranti) या सणास फार महत्व आहे. हा सण भारतभर सर्वत्र मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात या सणाला “मकर संक्रांती” ( makar sankranti ) असे संबोधले जाते. तसेच पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यामध्ये हा सण नवीन येणाऱ्या पिकाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो.

या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. बाजारामध्ये रंगीबेरंगी पतंग आणि मांजा घेण्यासाठी लोकांची गर्दी असते. पतंग उडवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा धागा वापरला जातो त्याला “मांजा” असे म्हणतात. या दिवशी सर्वजण पतंग उडवताना त्यामुळे सर्व आकाश पतांगानी व्यापून घेतल्यासारखे भासते.

सांस्कृतिक दृष्ट्या देखील या सणाला खूप महत्व आहे. या दिवशी लेक एकत्र येतात आणि तिळाचे लाडू एकमेकांना देऊन “तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणतात. या दिवशी भांडणे वैर विसरून सर्वजण एकमेकांना तिळगूळ देतात आणि गोड बोलून सलोख्याचे संबंध निर्माण करतात. या दिवशी ज्या लोकांचे संबंध चांगले आहेत त्यांचे संबंध आणखीच दृढ होतात.

माझा आवडता सण मकर संक्रांती – my favourite festival makar sankranti

मकर संक्रांत सणाच्या (makar sankrant festival essay in marathi) काळात काळया वस्त्रांना खूप महत्व दिले जाते कारण असे म्हणतात की काळे वस्त्र उष्णता शोषून घेतात. त्यामुळे बाजारात काळया रंगाचे कपडे घेण्यास लोक गर्दी करतात.

हा सण नवविवाहित स्त्रियांसाठी खूप खास असतो. लग्नानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीला नवविवाहित मुलीला काळया रंगाचे वस्त्र दिले जातात व भेटवस्तू ही दिल्या जातात. या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. यात सर्व सुवासिनी मिहीलांचा समावेश असतो. यात स्त्रिया एकमेकींना कुंकू लावून त्यांची ओटी भरतात.

महाराष्ट्रात हा सण तीन दिवसाचा असतो. पहिल्या दिवसाला भोगी म्हटले जाते, दुसऱ्या दिवसाला संक्रांत म्हटले जाते व तिसऱ्या दिवसाला कांक्रात असे म्हणतात.

या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिला जातो व तसेच या सणाच्या शुभेच्छा देखील देतात.

मकर संक्रांत कथा ( makar sankrant story )

मकर संक्रांत निमित्त अनेक कथा प्रचलित आहेत. यातील एका कथेत सांगितले जाते की, फार वर्षापूर्वी एक संकासुर नावाचा दृष्ट राक्षस होता. तो तेथील गरीब जनतेला खूप त्रास देत असे व त्याला मारणे सामान्य जनतेसाठी फार कठीण होते. अशा वेळी त्या लोकांची मदत करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण करून संकसुराचा वध केला होता. त्यामुळे तेथील जनता खूप आनंदित झाली होती. तेंव्हापासून हा मकर संक्रांत सण (makar sankranti festival ) साजरा केला जातो.

टीप : मित्रांनो हा मकर संक्रांत सण निबंध ( essay on makar sankranti in marathi ) तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा. अशाच इतर कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध हवा असेल तर ते ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

मित्रांनो मकर संक्रांती निबंध ( makar sankranti festival essay in marathi ) तुम्ही पहिली पासून ते दहावी – बारावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता. तसेच तुम्ही यात तुमचे मकर संक्रांतीचे अनुभवही समाविष्ट करा जेणेकरून makar sankranti essay आणखीनच सुंदर बनेल.

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: