Google Search Console And Analytics In Marathi

तुम्ही तुमचा ब्लॉग तयार केल्यानंतर तुम्हाला जर ऑरगॅनिक ट्रॅफिक पाहिजे असेल तर तुम्हाला गूगल च्या काही सेवा तुम्ही वापरल्या पाहिजे. तुम्ही google analytics आणि google search console या मध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग कनेक्ट जरूर करावा. पण नक्की google search console काय असते आणि त्याचा आपल्याला काय फायदा आहे.

google analytics and search console in the Marathi language

Contents

Google search console

जेव्हा  तुमच्या ब्लॉग वर ५ – १० पोस्ट असतील तेव्हा तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी sitemap तयार करा. तुमचा ब्लॉगर वर ब्लॉग असेल तर तुम्ही नेट वर काही वेबसाइट्स आहेत त्या वरून तुमच्या ब्लॉग चा sitemap तयार करा. xml-sitemaps या वेबसाईट वरून तुम्ही sitemap मोफत तयार करू शकता तसेच अजून बऱ्याच वेबसाईट आहेत त्या वरून तुम्ही sitemap तयार करू शकता अगदी मोफत. जर तुमचा ब्लॉग wordpress वर असेल तर तुम्ही Yoast seo या plugin द्वारे  website चा sitemap आपोआप बनवता येतो

sitemap म्हणजे नक्की काय?

आता आपण google search engine च काम थोडक्यात पाहू. जेव्हा आपण एखादी गोष्ट google वर  search करतो तेव्हा google तुम्ही जो शब्द(keyword) search करण्यासाठी वापरला असेल त्याच्या आधारे तुम्हाला वेगवेगळे result दाखवतो. seo नुसार google आपल्याला result देतो. साइटमॅप म्हणजे आपल्या ब्लॉग वर pages,post,homepage,author या गोष्टी असतात साइटमॅप काय करतो कि या गोष्टीची प्रत्येक वेगळी फाईल बनवून ठेवतो. एकदा तुम्ही साइटमॅप बनवला कि search engine तुमचा पूर्ण ब्लॉग चेक करत नाही. जेव्हा तुम्ही काही बदल करता किंवा नवीन पोस्ट करता तेव्हा त्या साइटमॅप च्या त्या फाईल मध्ये बदल होत असतो.

एकदा तुम्ही sitemap वबनवला कि search engine फक्त त्या sitemap file वर लक्ष ठेवत असतो. जर त्या फिले मध्ये काही बदल दिसला कि ते लगेच चेक करतो आणि मग तुमची पोस्ट search engine मध्ये जमा होते आणि मग जर कोणी search केला तर तुमची पोस्ट तिथे दिसायला लागते. पण ती कुठल्या page वर हे seo वर असते. पण तुम्ही साइटमॅप तयार करा आणि google search console मध्ये साइटमॅप ची फाईल ऍड करा.

google search console चा आपल्याला काय फायदा आहे?

Google search console हे आपल्याला अनेक प्रकारची ,माहिती देत असतो.

तुमचा ब्लॉग search engine मध्ये किती वेळा दिसला जर कोणी तुमच्या ब्लॉग संबंधी काही search केले तर.

जर दिसला तर किती जणांनी तुमच्या पोस्ट वर क्लिक केले.

तुमच्या कुठल्या पोस्ट ल काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला सांगतो.

कुठल्या देशा मधून तुमचा ब्लॉग search होत आहे

desktop/mobile वरून तुमचा ब्लॉग search केला जात आहे

अश्या अनेक गोष्टीची माहिती आपल्याला मिळते

ह्या माहितीचा आपल्याला फायदा होतो

आपला ब्लॉग Google search console ला कसा कनेक्ट करायचा

तुम्ही तुमच्या gmail ने पहिले Google search console चे अकाउंट काढा

जेव्हा तुम्ही main page वर येता तेव्हा डाव्या कोपऱ्यात क्लिक करा

add property येथे क्लिक करा

तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील

1.Domain

2.Url prefix

जर तुमचा ब्लॉग ब्लॉगस्पॉट वर असेल(मोफत डोमेन abcd.blogspot.com)

तुम्ही url prefix हा पर्याय निवडा

१. तुमच्या ब्लॉग ची लिंक कॉपी करून त्यात पेस्ट करा continue करा

२. तुमचा ब्लॉग ऍड होईल

जर तुमचा ब्लॉग ला स्वतःचे डोमेन असेल (होस्टिंग नसेल उदा. mymarathistatus.in)

  • तुम्ही डोमेन हा पर्याय निवडा
  • तुमच्या ब्लॉग चा ऍड्रेस टाका आणि continue करा
  • एक txt file तयार होईल ती कॉपी करा
  • तुम्ही डोमेन management मध्ये जावा
  • तिथे dns setting मध्ये जावा
  • तिथे txt हा एक पर्याय असेल मग तिथे तुम्ही फक्त ते कॉपी केलेलं पेस्ट करा(२ नंबरच्या जागेत)
  • save करा आणि थोडा वेळ थांबा मग तिकडे search console मध्ये जावा आणि verify करा.

जर तुम्ही होस्टिंग वापरत असाल तर  ती cpanel मध्ये जाऊन domain section madhe वर सांगितलेली प्रोसेस करा

google-analytics

हे आपल्याला याच्या नावावरून समझू शकत. आपल्या ब्लॉग वर येणाऱ्यांची माहिती मिळते. तसेच live user यांची माहिती देत असतो.याच्या साठी तुम्ही तुमचे अकाउंट कनेक्ट करा. तुम्ही पहिले analytics चे अकाउंट उघडा email च्या साहाय्याने. त्यात add property हा पर्याय असेल तिथे तुमच्या ब्लॉग चा ऍड्रेस टाका. एव्हडीच याची प्रक्रिया आहे.

तुम्हाला आम्ही पुढच्या पोस्ट मध्ये पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे कसे कनेक्ट करायचे google analytics and google search console

Marathi Online

It is our aim to make all the information available in our own regional language Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: