how to become graphic designer in marathi?

ग्राफिक्स डिझाईनर कसे बनावे (how to become graphics designer in marathi) मित्रांनो आजचा लेख त्या लोकांसाठी फार खास आहे जे आपली डिग्री पूर्ण झाल्यानंतर करिअर बनवण्याचा विचार करत आहेत. त्यांना हे समजत नाहीये की रोजगार मिळवण्याच्या हेतूने संघर्ष करणाऱ्या हजारों लाखों लोकांच्या गर्दीमध्ये कोणत्या क्षेत्राची निवड करायला हवी.जेणेकरून त्यांना अतिशय कमी वेळात उत्तम रोजकर उपलब्ध होईल.

कारण आज बेरोजगारी एवढी वाढली आहे की तुम्ही नोकरीच्या शोधात कुठेही नजर फिरवा तुम्हाला नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची लांबच लांब रांग दिसून येईल. आज प्रत्येक क्षेत्रात competition वाढले आहे. मग तो संघर्ष सरकारी नौकरी साठी असो किंवा मग प्रायव्हेट नौकरी साठी दोन्हीकडे सारखीच प्रतिस्पर्धा आहे. आज एका जागेसाठी लाखों उमेदवाराचे अर्ज येत आहेत

मुळे करिअर साठी योग्य क्षेत्र निवडण फारच गरजेचे झालेले आहे. म्हणूनच आजच्या या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी एक उत्तम करिअर विकल्प घेऊन आलोय जो की तुम्हाला लवकरात लवकर रोजगार मिळवण्यासाठी मदत करेल. तो म्हणजे graphic designing. तर चला मग जाणून घेऊया graphic designer कसे बनावे (how to become graphic designer in marathi )

ग्राफिक डिझाईनर म्हणजे काय (what is graphic designer in marathi)

शब्द, फोटो, आकार आणि रंगाच्या साह्याने एखादा संदेश व्यक्त करण्याची कला म्हणजे graphic designing असे तुम्ही म्हणू शकता. यामध्ये तुम्हाला विविध लग्न समारंभ, party, reception, ceremony, video , games आणि websites यांच्यासाठी ग्राफिक्स डिझाईन करायचे असतात. Graphics designing करणाऱ्या व्यक्तीलाच graphic designer असे म्हटले जाते.

याला communication design च्या स्वरूपात देखील ओळखल्या जाऊ शकते. कारण graphic designing चा मुख्य हेतू आपले विचार लोकापर्यंत प्रभावीपणे मांडणे असतो.

आजच्या आधुनिक युगात graphic designer हा एक लोकप्रिय व्यवसाय बनत चालला आहे. कारण आज प्रत्येक वस्तूची मार्केटिंग मग ती ऑनलाईन असो की ऑफलाईन यात लोकांना आकर्षित करण्यासाठी ग्राफिक डिझायनिंग चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे.

Visual आणि graphics च्या वाढत्या प्रभावामुळे graphics designing चा scope भी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आज जवळपास प्रत्येक कंपनीला ग्राफिक डिझाईनर ची आवश्यकता भासत आहे.

Graphic designing एक असा व्यवसाय आहे जो कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीची वेगळी ओळख लोकांपर्यंत पोहचवत असतो. जर तुम्हाला creativity मध्ये आवड आहे आणि कॉम्प्युटरची बेसिक माहिती आहे तर तुमच्यासाठी graphic designing हा एक उत्तम करिअर बनू शकतो.

Graphic designing हे आजच्या युगात cummunication च प्रभावी साधन ठरत आहे. Graphic design कोणत्याही उद्देशासाठी केली जाऊ शकते जसे की educational, function, ceremony, cultral, political, इत्यादी. म्हणून यात करिअर करणं फायद्याचं ठरू शकतं.

Graphic designer कसे बनावे ( how to become graphic designer in marathi )

मित्रांनो ग्राफिक डिझाईनर बनणे खूप सोपे आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर ग्राफिक्स डिझायनिंग चा एखादा कोर्स कंप्लीट करावा लागेल. आज काल ग्राफिक्स डिझायनिंग चा कोर्स शिकवणाऱ्या अनेक इन्स्टिट्यूट आहेत. जेथून की तुम्ही ग्राफिक्स डिझायनिंग शिकून graphic designer चे सर्टिफिकेट मिळवू शकता. फक्त ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी तुम्हाला आवड असायला हवी तसेच तुम्ही creative देखील असायला हवेत.

कारण ग्राफिक डिझायनिंग मध्ये तुम्हाला एखादया गोष्टीचे ग्राफिक्स डिझाईन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. येथे तुमची creativity कामी पडते. अशा वेळेस जर तुम्हाला काम कंटाळवाणे वाटू शकते. म्हणून अगोदर निश्चित करा की तुम्ही हे काम करू शकता की नाही. नंतरच हा कोर्स जॉईन करा.

ग्राफिक डिझायनिंग सोबत तुम्ही जर आणखी त्याच्या संबंधित फोटोशॉप सारखे कोर्स केले तर ते आणखीनच फायद्याचे ठरेल. तसेच त्यामुळे ग्राफिक डिझायनिंग कंपनीत graphic designer म्हणून लवकर जॉब मिळेल.

फोटोशॉप हा देखील एक graphic designer च्या related च कोर्स आहेत जेथे की तुम्हाला फोटो एडिटिंग चे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे काऊसरे सर्वात अगोदर पूर्ण करा आणि नंतर मग कंपनीत जॉब साठी apply करा.

Graphic designer ची डिग्री कशी मिळवावी?

होय, तुम्ही ग्राफिक डिझायनर करिअर करू शकता तसेच त्यामध्ये डिग्री देखील मिळवू शकता. असे अनेक कॉलेज आहेत जिथे की ग्राफिक डिझायनिंग चे कोर्सेस उपलब्ध आहेत.

त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर दहावी आणि बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागेल. तुम्हाला दहावीत कमीत कमी ७०% आणि बारावीत ६०% च्या वरती गुण असायला हवेत तरच तुम्हाला या कॉलेज मध्ये एडमिशन मिळू शकेल.

दहावी आणि बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला या कॉलेज साठी apply करायचे आहेत. येथे तुम्हाला एक entrance exam देखील द्यावी लागेल. यात तुम्ही पास झालात तरच तुम्हाला येथे एडमिशन मिळू शकेल अन्यथा तुम्हाला येथे एडमिशन मिळणार नाही.

त्यासाठी अगोदर entrance exam ची चांगली तयारी करा. नंतर तुम्हाला या college मध्ये एडमिशन मिळणार. Graphic डिझायनिंग चे कोर्सेस उपलब्ध असणारे कॉलेज फार की आहेत आणि त्यासाठी apply करणारे विद्यार्थी खूप जास्त आहेत. म्हणून हे कॉलेज मिळवण्यासाठी नेहमीच स्पर्धा असते.

त्यामुळे तुम्हाला जर येथे एडमिशन मिळवायचे असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

Graphic desihning ची entrance exam कशी असते?

वरती सांगितल्याप्रमाणे ग्राफिक्स डिझायनिंग साठी एक entrance exam देखील असते जी की तुम्हाला उत्तीर्ण व्हावी लागते या graphic designing कोर्स ला एडमिशन घेण्यासाठी.

यात तुम्हाला गणित आणि विज्ञान चे जास्त प्रश्न विचारले जातात. या परीक्षेमध्ये तुम्हाला बसिक गणित आणि विज्ञान विचारले जाते तसेच तुम्हाला यात इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर देखील असते.

अशा वेळेस तुमच्या गणिताच्या संकल्पना आणि इंग्लिश ग्रामर पक्के असणे गरजेचे असते. म्हणून तयारी करते वेळेस या गोष्टीची नक्की काळजी घ्या की तुम्हाला इंग्लिश ग्रामर नक्कीच यायला हवे आणि इंग्लिश ग्रामर चे नियम देखील पाठ असायला हवेत कारण यावर परीक्षेत भरपूर प्रश्न विचारले जातात.

ही entrance exam १०० गुणांची असते यामध्ये ३० गुण गणिताला असतात , ३० गुण विज्ञानाला असतात, उर्वरित ३० गुण इंग्रजीला असतात आणि १० गुण इंग्लिश ग्रामरला असतात. या सर्व गुणांची नोंद करून ठेवा. तुम्हाला अभ्यास करताना याची आवश्यकता भासेल.

Graphic डिझाईनर ला कोणते काम करावे लागते ?

मित्रानो ग्राफिक डिझाईनर ला graphics designing चे सर्व कामे करायची असतात. जसे की लग्न समांभासाठी, वाढदिवस, सण उत्सव यासाठी शुभेच्या देणारे ग्राफिक्स डिझाईन करणे.

तसेच त्यांना web designing मध्ये देखील logo आणि favicon बनवायचे जॉब असतात. हे सर्व जॉब खूप मजेशीर असतात. हे काम करण्यात आनंद मिळतो तसेच यात कामाचा मोबदला देखील भरपूर मिळतो.

तुम्हाला जर कंपनीमध्ये काम नाही मिळाले तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही स्वतःची graphics designing ची कंपनी देखील सुरू करु शकतात. ज्यात तुम्ही लोकांना ग्राफिक्स डिझायनिंग चे सर्व कामे करून देणार आणि त्यापासून पैसे कमावणार.

तसेच तुमच्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे freelancing. यातून देखील तुम्ही लाखों रुपात कमावू शकता. कारण freelancing मध्ये देखील ग्राफिक्स डिझायनिंग चे अनेक कामे उपलब्ध आहेत. जेथे तुम्ही काम करून पैसे कमावू शकता.

तुम्ही काय शिकलात ?

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेतले की ग्राफिक्स डिझाईनर कसे बनावे (how to become graphics designer in marathi) तसेच graphics designing म्हणजे काय,इत्यादी सर्व माहिती घेतली.

मित्रांनो ग्राफिक्स डिझाईनर कसे बनावे (how to become graphics designer in marathi) याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल, धन्यवाद…!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: