How To Select Blog Topic In Marathi|ब्लॉग चा विषय निवडणे
आपण how to select blog topic हे पाहूया. मित्रानो ब्लॉग चा विषय निवडणे सर्वात महत्वाचे आहे. ब्लॉग चा विषय निवडताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो. ब्लॉग चा विषय एकदा निवडला कि बदलता येत नाही त्यामुळे काळजी पूर्वक निवडावा लागतो. असा विषय निवडा कि जास्त लोकांना त्या विषयी इंटरनेट वर माहिती पाहिजे असेल. आम्ही काही गोष्टी खाली नमूद केल्या आहेत त्यांचा अभ्यास करून ब्लॉग चा विषय निवडा
blog topic tips
एक्स्पर्ट
तुम्ही जो विषय निवडणार त्या मध्ये तुम्ही एक्स्पर्ट असले पाहिजे
शक्यतो दुसऱ्या ब्लॉगर चा विषय कॉपी करू नका
तुमचा विषय तुमच्या आवडीचा असायला हवा
ब्लॉग साठी तुमच्याकडे कन्टेन्ट असला पाहिजे त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ लिहू शकता असा विषय निवडा
भाषा
ब्लॉग ची भाषा तुमच्या आवडीची निवडा ज्यात तुम्ही छान प्रकारे लिहू शकता
जी भाषा निवडाल ती तुम्हाला व्यवस्तीत आली पाहिजे
तुम्ही इंग्रजी,मराठी,हिंदी या भाषेत तुम्ही लिहू शकता
जर तुम्ही इंग्रजी भाषा निवडली तर –
तुम्ही प्रादेशिक भाषेच्या तुलनेत इंग्रजी भाषे मुळे भारताच्या बाहेरील ट्रॅफिक मिळेल
इंग्रजी भाषेत तुम्हाला इतर भाषेच्या तुलनेत जास्त पैसे मिळतात
इंग्रजी भाषेत स्पर्धा जास्त असते इतर भाषेच्या तुलनेत
जर तुम्ही हिंदी भाषा निवडली तर –
हिंदी भाषे मुळे ट्रॅफिक खूप मिळते
इंग्रजी भाषेच्या तुलनेत पैसे कमी मिळतात
हिंदी भाषा मुळे तुम्हाला विषय निवडण्यात खूप पर्याय मिळतील
इंग्रजी भाषेच्या तुलनेत कन्टेन्ट कमी आहे इंटरनेट वर
जर तुम्ही मराठी भाषा निवडली तर –
फक्त मराठी भाषिक लोक तुमचे ब्लॉग पाहतील
इतर भाषेच्या तुलनेत ट्रॅफिक कमी असेल
महाराष्ट्र मधील विषय निवडू शकता
सध्या मराठी भाषेत स्पर्धा कमी आहे
इंग्रजी भाषेच्या तुलनेत पैसे कमी मिळतात
कन्टेन्ट
जर तुम्हाला चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग करायचे असेल तर तुम्हाला दीर्घकाळ चालेल असा विषय निवडला पाहिजे
असा विषय निवडू नका जो लगेच संपेन
असा विषय निवडा कि ज्यात तुम्ही खूप शकता
तुमचा ब्लॉग जेवढा जुना असेल तेवढा फायदा आहे
तुमचा कन्टेन्ट हा स्वतः चा असला पाहिजे तुम्ही इंटरनेट वरून माहिती घेऊ शकता पण लिहताना स्वतः च्या भाषेत लिहा
रिसर्च
तुम्ही जो विषय निवडणार आहे तो इंटरनेट वर लोक सर्च करतात का ते पहा
जेवढे जास्त जण ब्लॉग वर येणार तेवढा फायदा असतो
तुम्ही तुमच्या विषया संबंधी keyword रिसर्च करा
असा विषय निवडा जो जास्त सर्च केला जातो
पैसे
तुम्हाला ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे असतील तर सुरुवातीला तुम्हाला थोडे पैसे खर्च करायला लागतील
तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग साठी पैसे खर्च करावे लागतील
एक गोष्ट लक्षात ठेवा ब्लॉगिंग मध्ये खूप पैसा आहे पण त्यासाठी वेळ लागतो
इंटरनेट हि काय जादु नाही कि तुम्हाला लगेच लखपती बनवेल त्यासाठी वेळ आणि कष्ट लागतात
लगेच पैसे मिळवण्या साठी शॉर्टकट वापरू नका त्याचा जास्त फायदा होत नाही
सर्वात महत्वाचे तुम्हाला ब्लॉगिंग साठी संयम पाहिजे
how to select blog topic या पोस्ट मुळे तुम्हाला नक्कीच सोपे जाईल तुमच्या ब्लॉग चा विषय निवडणे.
जर तुम्हाला वयक्तिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला कनेक्ट व्हा