Jagdish Chandra Bose Information in Marathi – जगदीशचंद्र बोस बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Jagdish Chandra Bose Information in Marathi – जगदीशचंद्र बोस बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – होमी भाभा

माहिती – Jagdish Chandra Bose Information in Marathi

सर जगदीशचंद्र बोस मुलांनो, माणसांप्रमाणेच वनस्पतींनासुद्धा भावना असतात, असे म्हटले तर चटकन आपला विश्वास बसत नाही. पण वृक्षतोड करताना त्या वृक्षाला वेदना होतात, दु:ख होते.

हे सर्व सप्रयोग महान भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म पूर्वीच्या पूर्व बंगालच्या (आता बांगलादेश) मध्ये मैमनसिंग येथे ३० नोव्हेंबर, १८५८ रोजी झाला.

त्यांचे शालेय शिक्षण बंगालीमधूनच झाले, त्या काळी इंग्रजी शाळेत शिक्षण घेणे ही अतिशय प्रतिष्ठेची बाब समजली जाई. शाळेत जगदीशच्या बाकावर एका बाजूला त्याच्या वडिलांच्या मुस्लिम साहाय्यकाचा मुलगा,

तर दुसऱ्या बाजूला एक कोळ्याचा मुलगा बसत असे. त्यांच्याकडून जगदीशला प्राणी, पक्षी, जलचर प्राणी इत्यादींच्या सुरस गोष्टी ऐकायला मिळत. त्यामुळे निसर्गामधील घडामोडींविषयी त्याच्या मनात ओढ निर्माण झाली.

१८६९ मध्ये इंग्रजी शिक्षणासाठी जगदीश कोलकात्याला गेला. तो एक अतिशय बुद्धिमान विद्यार्थी म्हणून समजला जाई. १८७९मध्ये त्याने सेंट झेवियर्स कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी संपादन केली.

१८८० मध्ये तो वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला गेला. तेथे त्याने युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये प्रवेश घेतला; परंतु प्रकृत -अस्वास्थ्यामुळे त्याला तेथील शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

मग त्याने केंब्रिज येथील ख्राइस्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नैसर्गिक विज्ञानातील पदवी संपादन करून तो १८८५ मध्ये भारतात परतला. कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये जगदीशचंद्र प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

इंग्रजांच्या वर्णद्वेषाचा वाईट अनुभव त्यांना तेथे आला. तीन वर्षे त्यांनी पगार न घेता प्राध्यापकी केली. एक शिक्षक म्हणून ते अतिशय लोकप्रिय झाले. गोऱ्यांना उशिरा का होईना जाग आली. जगदीशचंद्रांना पूर्ण पगार मिळू लागला.

इतकेच नव्हे तर त्यांना पगाराचा मागील फरकही दिला गेला. प्रकाशाचे विकिरण, अपवर्तन आणि बिनतारी संदेशवहनावर त्यांनी मौलिक संशोधन केले.

पण त्याचे श्रेय मार्कोनी या संशोधकाला दिले गेले मार्कोनीने या शोधाचे पेटंट मिळविण्यापूर्वी एक वर्ष आधीच जगदीशचंद्रांनी तारेविना संदेशवहनाचा प्रयोग सार्वजानिकरित्या करून दाखविला होता.

परंतु ब्रिटिशांची सत्ता व पैशाचे पाठबळ नसल्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या या प्रयोगाची दखल घेतली गेली नाही. अर्धवाहकाचा वापर सर्वप्रथम जगदीशचंद्रांनी केला होता.

नेव्हिल फ्रान्सिस मॉट या संशोधकाने असे म्हटले होते की जगदीशचंद्र जगाच्या कमीत कमी साठ वर्षांनी पुढे आहेत. जगदीशचंद्रांनी आपले लक्ष धातू आणि वनस्पतींवर केंद्रित केले.

रेडिओतरंगांची स्पंदने जाणू शकेल असे कोहेरर नावाचे उपकरण त्यांनी तयार केले. सततच्या वापराने धातूची संवेदनशीलता कमी होते. जर त्यांना थोडी विश्रांती दिली तर संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होते.

वनस्पतींमध्ये अन्नरस ऊर्ध्व दिशेने वाहून नेले जातात. या क्रियेत विद्युतयांत्रिकी स्पंदनांचा सहभाग असतो, असे प्रतिपादन जगदीशचंद्रांनी केले. ही स्पंदने मोजता येतील असे क्रेस्कोग्राफ नावाचे यंत्रही त्यांनी बनविले.

विविध प्रकारच्या बाह्य उद्दीपनांमुळे या स्पंदनांच्या गतीत फरक पडतो, असे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी सिद्ध केले कि प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींना संवेदना असतात.

इतकेच नव्हे तर सुमधुर संगीताचा वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होतो, त्यांची वाढ जास्त चांगल्या प्रकारे होते व कर्कश आवाजात त्यांची नीटशी वाढ होत नाही हे ही त्यांनी सिद्ध केले.

१९२० मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे सभासदत्व देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या महान शास्त्रज्ञाचा अंत २३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला.

काय शिकलात?

आज आपण Jagdish Chandra Bose Information in Marathi – जगदीशचंद्र बोस बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: