jivdani mandir virar | जीवदानी मंदिर विरार

जीव म्हणजे जीवन आणि दाणी म्हणजे देणारी, अश्या नावाने जीवदानी म्हणून आईला ओळखतात.   jivdani temple हे पालघर जिल्ह्यातील विरार येथे असलेले एक सुंदर आणि भव्य मंदिर आहे. या जागेला मोठे धार्मिक मूल्य आहे. जीवदानी देवीचे हे मंदिर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. जीवदानी माता मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 फूट उंचीवर विरार जवळील एका डोंगरावर आहे.

Contents

jivdani mata 

जीवदानी आई हि नवसाला पावते त्यामुळे  jivdani temple येथे येणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप जास्त असते. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा पूर्ण भारतातून भक्त येथे जीवदानी आई च्या दर्शनासाठी येत असतात, तरी येथे उत्तर भारतातील भक्त हे जास्त दिसून येतात.

About jivdani mandir virar | जीवदानी मंदिराबद्दल

मंदिराच्या पर्वतावर चढण्यासाठी एकूण पायऱ्या सुमारे  1400 आहे. तरी काही ठिकाणी पायऱ्या नाहीत. देवीच्या गडावर जाणारा रस्ता हा अतिशय सुरक्षित आहेत. या जीवदानी गडावर चढण्यास किंवा उतरण्यासाठी दोन रस्ते आहेत.

विरारमधील विशाल आकाराच्या गडावरील जीवदानी देवी या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे या गडावरून विरार शहरातील सुंदर दृश्ये आपल्याला बघायला मिळतात जसे की समोरच असलेला अरबी समुद्र, विरार शहर मधील उंच उंच इमारती,  आणि वायू वेगाने चालणाऱ्या train. ही सगळी सुंदर दृश्ये पाहत गडावर चढताना आपण आपला थकवा पूर्ण विसरून जातो.

जीवदानी आईचे हे मंदिर म्हणजे ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. मंदिरातील देवीची सुंदर आणि मनमोहक मूर्ती भक्तांचे मन वेधते. मंदिरातील ही मूर्ती संगमरवर पासून बनवली आहे.

सुट्टीच्या दिवशी आणि देवीचा वार म्हणजे मंगळवार या दिवशी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक लांब लांबून येत असतात. मंदिराच्या गर्भगृहाला लागून अजुन काही मंदिरे आहे श्रीकृष्ण गुहा, काळभैरव, महाकाली, बारोंडा मंदिर, वाघोबा मंदिर.

jivdani mandir virar च्या पायथ्याशी सुरुवातीला असलेल्या  श्रीगणेशाचे एक मंदिर आहे. भाविक मंदिरात गडावर जाण्याअगोदर या मंदिरात दर्शन घेऊन वर जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात करतात. नवरात्रीत मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे येथे भाविकांची एकच गर्दी होते. शिवाय मंदिरात चैत्र महिन्यातील नवरात्रही साजरी होते.

तुम्हाला डोंगराच्या एका बाजूला ओम तर दुसऱ्या बाजूला स्वास्तिक ही चिन्हे दिसतील

सुंदर स्थापत्यकलेनुसार बांधलेले हे मंदिर आतून खूप भव्य आहे त्यामुळे हजारो भाविक एकच वेळी येथे दर्शन घेऊ शकतात. मंदिराच्या आतील वातावरण हे खूप शांत असते. त्यामुळे मंदिराच्या आत मध्ये गेल्यावर मनाला शांती मिळते आणि मन प्रफुल्लित होऊन जाते.

jivdani mandir virar History | इतिहास

jivdani temple history एकूण ५१ शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या १८ शक्तिपीठांमधील  jivdani temple हे त्यांपैकी एक शक्तिपीठ आहे.जिवदानीच्या या गडावर १७ व्या शतकामध्ये जिवधन नावाचा किल्ला होता. आजही काही ठिकाणी या किल्ल्याच्या तटाच्या बांधकामाचे दगड पडलेल्या अवस्थेत आढळून येतात . त्यानंतर पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पां यांनी हा जीवधन किल्ला ३१ मार्च १७३९ रोजी जिंकून आपल्या ताब्यात घेतला

तसेच जीवदानी आईचे जीवदानी हे नाव आणि jivdani mandir virar ची झालेली  स्थापना या सर्वामागे एक महाभारत कालीन कथा आहे. जीवदानी माता मंदिराच्या स्थापना हि पांडव काळात पांडवानी केली होती. असे म्हणतात कि पांडव हे वनवास भोगत असताना पाच पांडवांनी शूरपारक म्हणजे आताचे नालासोपारा येथे आले होते.

त्यांनी भगवान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वराच्या पवित्र मंदिराला भेट दिली आणि प्रवासात वैतरणा नदीच्या काठावर थांबले या एकवीरा देवीची पूजाअर्चना केली आणि जवळच्या डोंगरांवर गुहाही बांधल्या. त्यांनी या एकवीरा आईच्या या रूपाला जीवदानी देवी असे नाव दिले आणि तिला त्यांनी बनवलेल्या डोंगरावरील एका गुहेत बसवले.

कलयुगात गुरु स्वामी शंकराचार्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्यांच्याकडून प्रेरित व शिक्षा प्राप्त झालेल्या एका गुराख्याच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली होती आणि नंतर देवीने त्यांना या पर्वतावर प्रकट होऊन त्या गुराख्याला मोक्ष प्रदान केला होता.

असे म्हणतात कि त्या गुराख्याची भक्ती इतकी शुद्ध होती की स्वतः कामधेनू ही गाय सुद्धा त्यांच्या गुरांच्यामध्ये सहभागी होत असे. यामुळेच या डोंगरावर वसलेल्या मंदिराच्मध्ये कामधेनूचे मंदिरही आहे. असे मानले जाते की कामधेनू सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. या कारणास्तव कामधेनू च्या या मंदिरात लोक लाल कापडाच्या तुकड्याने गाठी बांधतात.

ट्रस्ट द्वारे पुरवण्यात येणाऱ्या सुविधा | Services provided by jivdani mandir virar trust

जीवदानी मंदिर ट्रस्ट ची स्थापना ही २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये झाली होती.

जीवदानी आई ट्रस्ट द्वारे jivdani mandir virar जवळ अनेक सुविधा पुरवल्या जातात. जसे की स्वस्त दरात भोजन हे भोजन खूप चविष्ट आणि घरघुती पद्धतीने बनवलेले असते विशेष म्हणजे ट्रस्ट हे जेवण फक्त 10 रुपयांत उपलब्ध करून देते. त्यामुळे हजारो भाविक रोज या देवीच्या महाप्रसादाचा लाभ घेतात व पोटभर जेवतात.

ट्रस्ट द्वारे अजूनही काही सुविधा ह्या पुरवल्या गेल्या आहेत जसे की 20 रूपाया मध्ये आपल्याला चविष्ट प्रसाद दिला जातो जो खूपच स्वादिष्ट असतो तसेच मंदिर जवळ पार्किंग ची सुविधा पुरवली गेली आहे आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली गेली आहेत इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधा ट्रस्टद्वारे पुरवल्या जातात.

गडावर कसे जाल | How to get on jivdani mandir virar

By train

Jivdani mataचे हे मंदिर पालघर मधील एक मोठे मंदिर आहे त्यामुळे या मंदिरात वर्षभर सततची गर्दी असते. हे ठिकाणावर पोहोचणे खूपच सोपे आहे. तुम्हाला इथे ट्रेनने यायचे असल्यास तुम्हाला वेस्टर्न लाईन ट्रेनने ठाणे किंवा मुंबई पासून विरार दिशेला यावे लागेल यावे लागेल.

By Auto

विरार स्टेशन पासून गडावर जाण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात शेअरिंग ऑटो, तसेच टॅक्सी उपलब्ध आहेत जे प्रति सीट सुमारे 15 ते 20 रुपये घेतात.

By Bus

Mumbai पासून जीवदानी  jivdani temple जवळपास 64 किमी आहे. तसेच ठाणे पासून 47 किमी आहे त्यामुळे तुम्हाला येथून बस मिळतील

तसेच तुम्ही विरार पर्यंत ट्रेन मध्ये आल्यावर स्टेशन गडावर जाण्यासाठी सरकारी (MSRTC) च्च्या बसेस देखील उपलब्ध आहेत. विरार स्टेशन पासून तुम्हाला गडाच्या पायथ्याशी पोहचण्यास सुमारे 10 ते 12 मिनिट एवढा कालावधी लागेल.

हेच अंतर बाईक वर तुम्ही 5 ते 7 मिनिटात पार करू शकाल.

jivdani temple ropeway

गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर तुम्ही जवळपास 1500 फूट उंचीचा aai jivdani चा डोंगर पाहू शकाल. वृध्द लोक तसेच आरोग्य समस्या असलेल्या लोकांना गडावर जाण्यास त्रास नको म्हणून येथे नुकतीच jivdani temple ropeway सेवा सुरू करण्यात आली आहे ज्यामधून आपण 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात मंदिराच्या डोंगरावर पोहचू शकत. यासाठी तुम्हाला 100 रुपये प्रति व्यक्ती द्यावे लागतील. तुम्ही जर गडावर जाण्यासाठी jivdani temple ropeway चा पर्याय निवडला असेल तर देवीचे पूजेचे सामान किंवा ओटीचे सामान हे शक्यतो खालूनच घ्या कारण तुम्ही रोपवे ने वर गेल्यास तुम्हाला हे समान खरेदी करण्यासाठी दुकाने मिळणार नाहीत

तुम्हाला पायऱ्या चढून गडावर जायचे असल्यास वर जाण्यासाठी दोन वाजून पायऱ्या आहेत. सुमारे 1400 पायऱ्यां चढल्यानंतर तुम्ही jivdani mandir virar वर पोहोचाल.

गरज असल्यास पाण्याची बाटली सोबत ठेवा कारण ते तुम्हाला सोयीचे पडेल. वर चढताना ऊन असल्यास शक्यतो आरामदायक आणि हलके कपडे घाला जे तुम्हाला गडावर चढताना comfortable असतील कारण तापमान वाढल्यास तुम्हाला जाड कपड्यांचा त्रास होऊ शकतो.

रविवारी आणि मंगळवारी गडावर असणाऱ्या गर्दीचे प्रमाण जास्त असते.

मात्र सकाळीच वर गेलात तर कमी गर्दी मिळेल.

jivdani temple वर पायऱ्या चढताना तुम्हाला रस्त्यावर अनेक लहानमोठी दुकाने मिळतील तिथे थांबून तुम्ही विश्रांती करू शकता, तसेच येथे तुम्हाला शीतपेये आणि इतर खाण्याचे पदार्थ मिळतील जे तुम्हाला तुमचा थकवा दूर करण्यास मदत करतील.आणि तुम्हाला हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करतील

तसेच देवीची ओटी भरण्यासाठी पूजेचे समान घेऊ शकता. या पूजेच्या सामनामध्ये नारळ, लाल कापड, मिठाई, साडी, फुले, हार इत्यादी पूजेचे समान असते. ज्या आपण मंदिरात गेल्यावर दर्शन घेताना देवीला अर्पण करू शकतो. तसेच या दुकानामध्ये आपण आपले चपला आणि इत्यादी समान सुरक्षित पणे ठेऊ शकतो.

मंदिरात दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर तुम्ही वर आजू शकता जिथे पक्षी संग्रहालय आहे तिथे तुम्हाला पोपटाच्या निरनिराळ्या जाती बघायला मिळतील. तसेच तुमहाला तेथे माकडे सुद्धा बघायला मिळतील, तुम्हाला तिथे भूक लागल्यास काही खाऊन घेण्यासाठी विविध प्रकारची दुकाने आहेत जिथे तुम्ही ice cream , वडा पाव, चहा,विविध फळे हि खाण्यासाठी घेऊ शकता.

त्यानंतर jivdani temple मधून उतरताना तुम्हाला अनेक दुकाने लागतील जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खरेदी करू शकता. या दुकानांमध्ये प्रसाद, देवीचे फोटो, विविध प्रकारचे शोभनीय वस्तू, विविध खेळणी, अश्या प्रकारच सामान तुम्हाला येथें घेता येईल.

jivdani temple timings

jivdani mandir virar timing

Morning Aarti | सकाळची आरती – 05:30 am

Afternoon Aarti | दुपारची आरती – 12:00 pm

Evening Aarti | संध्याकाळची आरती – 07:30 pm

jivdani temple address

Shree Jivdani Devi Sansthan Trust

Registration No. A-397 (Thane), Shree Jivdani Mandir Road, Virar East,

Palghar 401305, Maharashtra, India

jivdani temple website : https://jivdanidevi.com/

jivdani temple contact number

jivdani mandir virar contact no : 0250-2523698 / 0250-2523398 / 0250-2521777

FAQ

how many steps in jivdani mandir ?

you have to climb about 1400 steps, To reach the Jeevdani temple

How to reach jivdani mandir virar ?

there are lot of options available to reach jivdani mandir, you can get bus or train from mumbai or thane, after reaching virar railway station you can get rikshaw or cab to reach jivdani temple ?

is jivdani temple open ?

yes, jivdani temple in now open after covid-19 situation

Is ropeway available at Jivdani?

yes, ropeway is available at Jivdani temple, it will cost you about ₹ 100-150 per person

What hotels are near Jivdani Temple?

there are lot of hotels available near jivdani temple but here is the top 3 list – 1)Hotel Sai Residency, २) Vishnu Banquet and Executive,3) Hotel Hill View Lodging,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: