काळदुर्ग किल्ला | Kaldurg fort palghar | Kaldurg Killyachi mahiti

जर तुम्ही trekking चे फॅन असला आणि तुम्ही पावसाळ्यातील ट्रेक साठी ठिकाणे शोधत असाल, तर Kaldurg fort palghar मधील ट्रेकिंग साठी सर्वोत्तम असे ठिकाण आहे. हा काळदुर्ग किल्ला पालघर जिल्ह्यात आहे. हे ठिकाण मुघलकालीन आहे असे म्हटले जाते.

हे ठिकाण पालघर वरून मनोर कडे जाताना असणाऱ्या रस्त्यावर आहे. Kaldurg Fort हा एक डोंगरावरील किल्ला आहे जो निसर्गप्रेमी, आणि ट्ट्रेकिंग ची आवड असणाऱ्या लोकांसाठी महत्वाचा पॉईंट आहे.

हा किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम आणि साहसी एकदिवसीय ट्रेक आहे. काळदुर्ग हा किल्ला समुद्रसपाटीपासून जवळपास  १५५० फूट उंचीवर आहे. त्यामुळे त्याच्यावर चढण्यासाठीतुम्हाला साधारण १:00 ते 1:30 तास लागेल

कालदुर्ग किल्ल्याच्या इतिहास | Kaldurg Fort History

इतिहासामध्ये Kaldurg Fort Palghar चा उल्लेख हा काळमेघ आणि नंदिमाळ अश्या विविध नावांने सुद्धा केलेला आहे. किल्ल्याच्या बांधकामाबाबत मात्र पुरावे आपल्याला सापडत नाही. तरीही असे म्हणतात की हा किल्ला माहिमच्या बिंब राजाच्या काळात बांधला गेला असेल असे अनुमान लावले जाते.

त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला होता. तसेच त्यापुढे महाराज संभाजी राजांच्या वेळेस हा किल्ला थोड्या अवधिसाठी कालदुर्ग किल्ला मराठ्यांच्या राज्यात समाविष्ट झाला होता पण त्यापुढे परत तो किल्ला पोर्तुगीजांकडे गेला.

ट्रेकिंग सुरुवात | starting the trekking

ट्रेकिंग साठी काळदुर्ग किल्ल्याजवळ पोहोचल्यावर तुम्हाला तिथे एक वाघोबा मंदिर दिसेल. तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. व आपला काळदुर्ग गडावर पुढे जाण्याच्या प्रवास सुरु करू शकता. वाघोबा मंदिराजवळ असणाऱ्या  माकडांपासून जरा सावध राहावे. वाघोबा मंदिर हे वाघोबा देवाला समर्पित आहे तसेच त्या मंदिरात शिवलिंगहि आहे तुम्ही तेथे दर्शन घेऊ शकता. व पुढचा प्रवास चालू ठेवू शकता.

तसेच मन्दिराच्या पायथ्याशी एक दुकान आहे जेथे तुम्ही पाण्याच्या बॉटल्स, कोल्ड्रिंक्स, नाश्ता आणि स्नॅक्स विकत घेऊ शकता आणि तुमचा पुढचा प्रवास चालू ठेऊ शकता. मंदिराच्या मागे पाण्याची बोरिंग आहे. तुम्हाला पाणी विकत घायचे तुम्ही या बोअरिंग मधून पिण्याचे पाणी भरुन घेऊ शकता. त्या बोरिंगजवळून तुम्हाला गडावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतील . या पायर्‍या मुख्यतः दगड आणि मातीच्या आहेत.

पावसाळ्यात वाटेत पाण्याचे प्रवाह आणि पाऊस पडून साचलेले पाणी असते हा रस्ता पावसाळ्यात चिखलाने भरलेला असल्याने वर जाण्याचा रास्ता थोडा निसरडा असतो आणि कीटकांनी भरलेला असतो त्यामुळे आपली पाऊले टाकताना ती जपून टाकावीत .

वर जाण्यासाठी शक्यतो पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालण्याचाप्रयत्न करावा आणि पायात मजबूत आणि टिकाऊ shoes असावे कारण वाटेत तीक्ष्ण काटे असू शकतात हे तुमच्या पायाला लागून तुम्हाला इजा होऊ शकते.  तसेच तुमचा तुमच्या जवळ कमीत कमी सामान बाळगावे ज्यामुळे तुम्हाला वर चढायला सोपे जाईल. मात्र सोबत पाणी, स्नॅक्स आणि इतर आवश्यक वस्तू ठेवायला विसरू नका.सुट्टीच्या वेळेस आजूबाजूच्या भागातील अनेक नागरिक येथे नियमित येत असतात.

किल्ल्यावर काय बघाल | What You Can See

कालदूर्ग गडावर जाण्यासाठी पायथ्याहून निघाल्यावर  पुर्व दिशेला बघितल्यास तुम्हाला किल्ल्याचे दर्शन होइल. किल्ल्याचा वरचा भाग चौकोनी आकाराचा आहे आणि त्याच्या चार बाजुला कातळकडे आहेत. या वाटेने पुढे चढुन आल्यावर गडावर उजव्या बाजूला एक छोटासा सुळका दिसतो तर डाव्या बाजूला बघितल्यास किल्ल्याचा माथा दिसतो.

गडाचा जास्तीत जास्त भाग हा कातळाचा बनलेला आहे. या कातळाच्यावर अनेक कृत्रिम खळगे कोरलेले आढलून येतात. कातळाच्या या खळग्यात लाकडे ठेऊन तिथे पहारेकऱ्यासाठी निवारे उभारण्यासाठी हि खळगी बनविण्यात आली असावी याचा अंदाज येतो.

Kaldurg fort वर पाण्याच्या दोन टाक्या आहेत ज्याचा वापर जुन्या काळात पिण्याचे पाणी साठवण्यासाठी केला जात असे. काळदुर्ग किल्ला गडमाथा व गडाचे खालील पठार अश्या दोन भागांमध्ये विभागला गेला आहे याच्यामध्ये असलेले पाणी आता मात्र पिण्यायोग्य नाही. ह्या दोन तक्यांमधील एक टाकी गडावर पोहचण्याच्या आधी उजव्या बाजूला आहे तर त्यातील दुसरी टाकी kaldurg fort च्या पठारावर आहे.

वातावरण स्वछ असल्यास तुम्हाला या गडावरून सह्याद्री रांजमधील आजूबाजूचे अनेक प्रसिद्ध डोंगर दिसतील जसे की कोहोज किल्ला, अशेरी गड अश्या खूप ठिकाणांना तुम्ही येथून पाहू शकाल.

तस बघायला गेले तर kaldurg fort palghar या किल्ल्यावर किल्ल्यासारखी शिल्पे नाहीत मात्र तिथे किल्ल्याच्या संरचनेचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतील. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. तुम्ही पावसाळ्यात या kaldurg किल्ल्यावर जाण्याचा बेत करत असाल तर तुम्हाला तिथे  आजूबाजूला अनेक लहानमोठे धबधबे बघायला मिळतील तिथे तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता.

गडाचा च्या वर आयताकृती आकाराचा भाग आहे. या किल्ल्याचा आकार हा आयताकृती असल्यामुळे तो तुम्हाला किल्ल्यापासून असले तरीसुद्धा डोंगऱ्यांच्या गर्दीत लगेच दिसून येतो. गडावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उंच उंच जंगली झाडे दिसून येतील यामुळे येथील हिरवळीमुले पावसाळ्यात या गडाची सुंदरता बघण्याजोगी असते. तेथे कसे जायचे ते हे आहे.

तुम्ही गडाचा पूर्ण ट्रेक हा 3 ते 4 तासमध्ये पूर्ण करू शकता मात्र जर तुम्हाला तेथे रात्री राहायचे असेल तर तुम्हाला तेथे टेन्ट घेऊन जावे लागेल तुम्हाला तेथे पूर्ण रात्र काढण्यासाठी आवश्यक सामान सुद्धा घेऊन जावे लागेल

गडमाथा लहान असला तरी आपल्याकडे टेन्ट असेल तर आपण येथे रात्री राहू शकता.

कसे जाल | How  to reach 

BY train 

जर तुम्ही मुंबईबाहेरून प्रवास करत येथे येत असला तर पालघर येथे येणारी ट्रेन पकडू शकता तेथून तुम्हाला पालघरमार्गे मनोर या रस्त्याला येणाऱ्या अनेक बस तसेच ऑटो रिक्षा मिळतील. मुंबई मधून पालघर येथे येण्यासाठी मुंबई विरार हि लोकल तुम्ही पकडू शकता. त्याच्यापुढे येण्यासाठी स्टेशन पासून तुम्हाला बसेस आणि ऑटो रिक्षा मिळतील

By bus 

पालघर पासून काळदुर्ग किल्ला येथे येण्यासाठी MSRTC ची बस सेवा उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला पालघर मार्गे मनोर किंवा वाडा बस पकडावी लागेल तिथे जाण्यासाठी तुम्हाला तेथून अनेक बस मिळतील. पालघर येथून काळदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी जवळपास २० मिनिटे लागतात.

By road 

काळदुर्ग किल्ल्यावर स्वतःचे वाहन घेऊन जात असलयास काळदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी मनोर-पालघर हा महामार्ग आहे हे ठिकाण तुम्हाला पालघर पासून जवळपास 7-8 किमी अंतर पार केल्यावर दिसून येईल.

FAQ

What is Kaldurg Fort trek difficulty level ?

Difficulty level of kaldurg fort trek is medium level.

What is the height of Kaldurg fort?

The height of Kaldurg fort palghar is nearly 1550 ft from sea level.

How to reach Kaldurg fort?

If you are traveling from outside Mumbai, you can catch a train to Palghar. You can catch the Mumbai Virar local to reach Palghar from Mumbai. You will get buses and auto rickshaws from the station to reach there.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: