Kohoj Fort Information In marathi | कोहोज किल्ला माहिती 2023-24

ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांसाठी हा गड सर करणे किंवा kohoj fort trek करणे हि एक पर्वणीच असते

आपल्यापैकी बहुतेक जणांनी आतापर्यंत कोहोज किल्ल्याला नक्कीच भेट दिली असणार पण काहीच जणांना आपल्या कोहोज किल्ल्याच्या इतिहासाबद्द्ल माहिती असणार म्हणून मी हि माहिती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय.

Contents

किल्ल्यावर कसे जाल ? | How to reach on kohoj fort ?

मुबई अहमदाबाद महामार्गावरिल मनोर पासुन 10 km किमी अंतरावर आहे. मनोरवर पोहोचल्यावर तुम्हाला नवीन बांधलेल्या उड्डाणपुलाखाली उजवे वळण घ्यावे लागेल आणि मनोर – वाडा रस्त्याला जावं लागेल.उजवीकडे कोहोज किल्ला पाहू शकतो.तसेच वाडा वरून जाताना वाडा – मनोर रोड ला सरळ गेल्यावर कंचाड गावाजवळ वाघोटे येथून डोंगरावर जाण्यासाठी रास्ता आहे.

Kohoj Fort map

कोहोज किल्ल्याचा इतिहास | History of kohoj fort

Kohoj fort palghar हा जवळपास 800 वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की कोहोज किल्ला गुजरातच्या राजाकडून पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात ताब्यात घेतला होता. त्यानंतर हा kohoj fort उद्ध्वस्त आणि जीर्ण झाला होता. त्यापुढे नंतर हा किल्ला 1737 मध्ये पेशव्यांनी घेतला होता.

असेही म्हणतात की पुरंदर च्या तहात 11 जून 1665 रोजी 22 किल्ले जे शिवाजी महाराजांनी मुघलांकडे सोपवलं होते त्यापैकी एक किल्ला म्हणून कोहोज किल्ल्याचा उल्लेख आढळतो. दुर्देवाने त्याचा ठोस पुरावा आणि संदर्भ आम्ही येथे देऊ शकत नाही

यांच्यानंतर ११ जून १६७० रोजी मराठयांनी हा गड परत जिंकला आणि आपल्या स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या कारकीर्दीत मुघलांचा जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव याने ७ एप्रिल १६८८ रोजी कोहोज किल्ल्याचा ताबा घेतला. असा हा विविध प्रकारची वैशिष्टय लाभलेला कोहोज किल्ला. पालघर जिल्ह्यात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करतो

कोहोज किल्ल्याबद्दल | About Kohoj Fort

किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५७६ मीटरआहे
किल्ल्याच्या पायथ्याशी पाझर म्हणून ओळखले जाणारे तलाव आहे. हे तलाव आकाराने खूप मोठे आहे
किल्ल्यावरून ह्या तलावाकडे बघताना एवढा निसर्गरम्यदेखावा बघून मन हरवून जाते. तसेच पावसाळ्यात कोहोज गडाला भेट देऊन निसर्गाचा काही वेगळाच अनुभव घेता येतो. कोहोज गडावरून आजूबाजूचे हिरवेगार डोंगर बघण्याची मजा हि खरे सांगितले तर पावसाळ्यातच येते.

वाघोटे गावाजवळून किंवा शेलटे गावाजवळून आपल्याला kohoj fort trek सुरू करता येतो. गावातून kohoj killa वर जाणारी वाट ही कच्ची आहे ही वाट भात लागवड केलेल्या शेतांमधू होत जाते. त्याचा पुढे तुम्हाला पाझर तलाव दिसेल हा तलाव खूप मोठा व सुंदर आहे तसेच या तलावाचे पाणी हे स्वच्छ आहे तुम्ही याच्या काठाला असलेल्या झाडांखाली जरा विश्रांती करू शकता.

हा पाझर तलाव kohoj fort वरून खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. पाझर तलावाला शेलटे तलाव असेही म्हणतात कारण हा तलाव शेलटे गावात आहे. पाझर तलावानंतर kohoj fort trek चा हा रस्ता हा घनदाट व उंच झाडे असलेल्या जंगलातून जातो. नवीन ट्रेकर्स ने रस्ता चुकू नये म्हणून येथील गावकऱ्यांनी रस्त्याचा बाजूला दगडांवर आणि झाडांवर बाणांच्या खुणा केल्या आहेत. तुम्ही त्यांच्यपाठोपाठ kohoj fort वर जाऊ शकता.

जवळपास 1.30 ते 2 तासांच्या kohoj fort trek नंतर तुम्ही गडाच्या वर पोहोचाल. कोहोज किल्ला trek करण्यासाठी त्तुम्ही जवळपास पूर्ण किल्ल्याला परिक्रमा करून वर पोहचाल असे म्हणता येईल.

कोहोज किल्ला हा पुरातन असल्यामुळे आता जरा जीर्ण अवस्थेत आहे . कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शेलटे आणि वाघोटे गावातून किल्ल्यावर पोहोचायला सुमारे दोन ते अडीच तास लागतात.

किल्ल्याच्या मैदानावर पोहोचल्यावर भगवान शंकराचे सुंदर आणि कोहोजाईचे मंदिर दिसू शकते. मंदिराजवळून वर जाण्यासाठी रस्ता आहे . त्या रस्त्याला थोडे वर गेल्यावर तुम्हाला तेथे काही कुंड दिसतील.

तेच त्या मार्गावरून वर जाताना तुम्हाला हनुमंताचे एक लहान मंदिर दिसेल त्याच्या जवळच 3 कुंड आहेत. त्यातील एका कुंडात स्वच्छ पाणी असते बहुतेक लोक हे पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे तुम्हीही हे पाणी पिण्यासाठी वापरू शकता गडावर इतर कुठंही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे तुम्हाला हे पाणी प्यावे लागेल किंवा सोबत पाणी बाळगावे लागेल. या स्वच्छ कुंड लगतचे इतर दोन कुंड खराब झाले आहेत. त्यामुळे या कुंडांमधिल पाणी थोडे खराब आहे.

त्यानंतर Kohoj fort वर अजून पुढे गेल्यावर हनुमंताचे अजून एक लहान मंदिर तुम्हाला दिसेल , त्या मंदिरामधील मारुतीचे शिल्प खूप सुंदर घडवलेले आहे. कोहोज किल्ल्याच्या मध्यभागी मानवी आकाराचे दोन सुळके असून, या दोन्ही सुळक्यांच्या वर जाता येते. त्याच्यावरून आसपासचा परिसर खूपच सुंदर दिसतो.

गडावर काही ठिकाणी तटबंदी दिसते. एक वाट हि मंदिराच्या उजव्या बाजूने डोंगरात पसरली आहे. येथे तुम्हाला एक राधा कृष्ण मंदिर मिळेल तेथे तुम्ही भगवान श्री कृष्णाचे दर्शन घेऊ शकता.

किल्ल्यावर पाण्याचा दुसरा स्रोत नाही त्यामुळे कुंडामधील पाणी प्यावे किंवा आपल्या सोबत पाणी आणावे.
तसेच किल्ल्यावर कुठल्याही प्रकारचे शॉप, किंवा राहण्याची आपली जेवणाची तसेच राहायची सोय आपल्यालाच करावी लागते

मकरसंक्रातीच्या दिवशी येथे एक छोटी जत्रा भरते या जत्रेत फिरताना तुम्हाला खूप मजा येईल त्यामुळे जमल्यास त्याचाही आनंद घ्यावा.

Conclusion

तसे बघायला घेले तर palghar District fort list मध्ये खूप किल्ले येतात मात्र कोहोज किल्ला हा त्यामध्ये आपल्याला kohoj fort trek आणि फॅमिली ट्रीप साठी वेगळीच अनुभूती देईल.

पालघर मधील हा किल्ला पावसाळा ऋतूमध्ये खूप गजबजलेला असतो. ही गर्दी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी अजून जास्त असते कारण येथील निसर्ग हा पावसाळ्यात बहरतो आणि पावसाळ्यात सगळीकडे असलेली हिरवळ आणि गडावर असताना अंगाला लागणारे ढगांचा गारगार वारा हा अनुभव खूपच कमी ठिकाणी आपल्याला मिळतो.

आपण अजून पर्यंत जर या किल्ल्याला भेट दिली नसेल तर आवर्जुन एकदा भेट द्या आणि आम्हाला सुद्धा कळवा कसा वाटला तुम्हाला कोहोज गड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: