महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती 2023 – निबंध, भाषण, आत्मकथा

महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma jyotiba phule) यांचे संपूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२७ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद व आईचे नाव चिमणाबाई होते. फुले घराणे हे मूळ सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावचे होते. सुरुवातीचे जोतिबांचे आडनाव हे गोऱ्हे होते. परंतु त्यांचे वडील गोविंदराव हे फुलांचा व्यवसाय करत असत. हाच व्यवसाय त्यांनी खूप काळ करत राहिल्यामुळे व त्यांच्या व्यवसायात मिळवलेल्या यशामुळे त्यांना लोक फुले या नावाने ओळखू लागले. यातूनच नंतर त्यांचे आडनाव गोऱ्हे बदलून फुले असे पडले.

Mahatma jyotiba phule information, biography, speech, eassy in marathi

नंतर गोविंद रावांनी धनकावडीच्या झगडे घराण्यातील चिमणाबाई सोबत विवाह केला. गोविंद रावांना राजाराम व ज्योतिबा अशी दोन मुले झाली. राजाराम हा मोठा होता तर ज्योतिबा हा धाकटा. अगदी बालवयातच म्हणजे ज्योतिराव नवु वर्षांचे असताना त्यांच्या आईचे चिमणाबाईचे दुखःद निधन झाले. त्यामुळे जोतिबाचे नंतर पालनपोषण हे त्यांच्या वडिलांनी केले. त्यांना शाळेत घातले व खूप शिकवले.

महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती – Mahatma jyotiba phule information in marathi

संपूर्ण नाव  ज्योतिबा गोविंदराव फुले
वडिलांचे नाव गोविंदराव
आईचे नाव चिमणाबाई
जन्म २० फेब्रुवारी १८२७
जन्मगाव कटगून
मिळालेली पदवी महात्मा
पत्नीचे नाव सावित्रीबाई
कार्य स्त्री शिक्षण, समाजसुधारक
मृत्यू २८ नोव्हेंबर १८९०

महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. ते एक विचारवंत , लेखक आणि रचनाकार होते. त्यांच्या महान कार्यामुळे लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली.

गोविंद रावांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना सातव्या वर्षापासूनच शाळेत टाकले. परंतु ज्योतिबा फुले हे शूद्र होते आणि ” शुद्रानी शिक्षण घेणे हे महापाप आहे ” असे त्याकाळच्या लोकांचे म्हणणे होते. म्हणून गोविंद रावांनी ज्योतिबा ला शाळेत पाठवणे बंद केले. परंतु महात्मा फुले यांना पुस्तके वाचनाचा खूप छंद होता. ते रिकाम्या वेळामध्ये पुस्तके वाचायचे.

नंतर गोविंद रावांना शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी ज्योतिबाना पुन्हा शाळेत पाठवले. ज्योतिबानी अल्पावधीतच शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांनी शारीरिक शिक्षण देखील घेतले.

त्यांनी थॉमस पेन यांनी लिहिलेले ” The rights of man ” हे पुस्तक वाचले होते आणि या पुस्तकामध्ये थॉमस पेन यांनी मांडलेल्या विचारांचा महात्मा फुले यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. या पुस्तकातून त्यांच्या लक्षात आले की जातीव्यवस्था ही जन्मजात नसून ही माणसांनीच तयार केलेली एक कर्मठ व्यवस्था आहे. या मध्ये लोकांच्या बोलण्यावरून, रंगावरून, जन्मठिकाण आणि संपत्तीवरून लोकांचे विभाजन केले जाते.

“Mahatma jyotirao phule speech in marathi”

तेंव्हापासून ज्योतीरावांना या जातीव्यवस्था विरूद्ध तिरस्कार निर्माण झाला. त्यांनी ही जाती व्यवस्था बदलण्यासाठी आणि समाजातील स्पृश्य अस्पृश्य मानल्या जाणारा भेद बंद व्हावा यासाठी प्रयत्न केले.

त्यांनी आठराव्या शतकातील दीन – गरीब लोकांना व स्त्रियांना योग्य शिक्षण मिळावे, समानतेची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी खूप मोलाचे कार्य केले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांचे दारिद्र्य आणि त्यांचे शोषण यावर देखील पुस्तके लिहून व प्रवचने देऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील दीन दुब्ल्यांचे तसेच स्त्रियांचे शोषण करणाऱ्या विविध चाली- रिती , रुढी – परंपरा बंद केल्या. त्यांनी सती व्यवस्था , बालविवाह, यासारख्या शोषक व कर्मठ चाली रीतीना आळा घातला.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विवाहिक जीवन – married life of mahatma jyotiba phule

इ.स. १८४० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. सुरूवातीला सावित्रीबाई अशिक्षित होत्या. पण पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाल्यानंतर जोतिबांनी सावित्रीबाईंना प्राथमिक शिक्षण दिले. नंतर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले या दोघांनी मिळून मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालवले. म्हणून सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून देखील ओळखल्या जातात.

सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुलेंना त्यांच्या समाज सुधारक कार्यात खूप सहकार्य केले. आज त्यांच्या प्रयत्नामुळेच आपल्याला स्त्रिया मुक्तपणे शिक्षण घेताना आणि प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करताना दिसत आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले – मुलींची पहिली शाळा

आठराव्या शतकातील स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी त्यावेळचा समाज मान्यता देत नसे. त्याकाळी स्त्रियांना फक्त ” चुल व मुल ” येवढाच हक्क होता. स्त्रियांना त्यांच्या मनासारखे मुक्त जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांना फक्त स्वयंपाक करणे आणि मुलांना जन्म देऊन त्यांचा संबाळ करणे येवढाच अधिकार होता.

स्त्रियांना सामाजिक जीवनामध्ये स्थान नव्हते. म्हणून स्त्रियांना शिकवण्यासाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ज्योती रावांनी सफल प्रयत्न केले.

तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार केला असता ज्योती रावांच्या लक्षात आले होते की, हिंदू समाज हा विविध रुढी परंपरानी ग्रासलेला आहे. येथे स्त्रियांना व दीन – दलीत लोकांना मुक्त जगण्याचे स्वातंत्र्य नाही. लोकांमध्ये भेद करणारी जाचक जातीव्यवस्था आहे. हे सर्व घडतंय ते म्हणजे फक्त शिक्षणाच्या अभावामुळे. त्यामुळे समाजातील ही परिस्थिती जर बदलायची असेल तर लोकांना अगोदर शिक्षित करणे आवश्यक आहे, हे ज्योती रावांच्या लक्षात आले होते.

म्हणून त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ज्योती रावांचे हे कार्य तत्कालीन समाज कंठकाना मान्य नव्हते. म्हणून त्यांना सुरुवातीला समाजातून खूप विरोध झाला. पण त्यांनी समाजाला न घाबरता स्त्री शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले.

सुरूवातीला शाळेमध्ये मुलींची संख्या फार कमी होती त्यामुळे ज्योतिराव सर्वांना व्यवस्थित शिकवू शकत. परंतु हळू हळू शाळेतील संख्यापट वाढू लागला, त्यामुळे ज्योती रावांना एका शिक्षकाची आवश्यकता भासू लागली.

म्हणून ज्योतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना घरीच शिकवायला सुरुवात केले आणि शाळेत आणखी एका शिक्षिकेची भरती झाली. ज्योतिराव आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई दोघेही शाळेत मुलींना शकवू लागले. यातूनच नंतर त्यांनी ४ मार्च १८५१ रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा आणि रास्था पेठेत मुलींची तिसरी शाळा चालू केली.

अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी फार मोलाचे योगदान दिले.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले साहित्य – Books written by mahatma jyotiba phule

विद्येविना मती गेली |

मतिविना नीती गेली |

नीतिविना गती गेली |

गतिविना वित्त गेले |

वित्ताविना शूद्र खचले |

एवढे अनर्थ एका अविद्येने केले !

महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एक शिक्षकच नसून ते एक विचारवंत, उत्तम लेखक, रचनाकार, समाज सुधारक व समाजसेवी देखील आहेत. त्यांची अनेक पुस्तके आजही समाज सुधारण्याची कार्य करत आहेत, लोकांना सामाजिक मूल्ये शिकवत आहेत. त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची यादी खाली दिली आहे.

पुस्तक दिनांक
तृतीय रत्न  इ.स. १८५५
ब्राम्हणांचे कसब इ.स. १८६९
गुलामगिरी इ.स. १८७३
इशारा इ.स. २८८५
सार्वजनिक सत्यधर्म इ.स. १८९१
शेतकऱ्याचा आसूड इ.स. १८८३

सत्यशोधक समाज स्थापना

दीन दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये ” सत्यशोधक समाज ” ची स्थापना केली.

तसेच त्यांनी समाजातील सती जाणे, बालविवाह यासारख्या जाचक रुढी परंपरा बंद केल्या. ते स्पृश्य अस्पृश्य भेद मानत नसत. त्यांनी बाल विवाह बंद केले आणि विधवा स्त्रियांच्या विवाहास समाजात मान्यता मिळवून दिली.

त्यांनी गुलामगिरी, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी यासारखी अनेक समाज प्रबोधन करणारी पुस्तके लिहिली. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना १८८८ मध्ये ” महात्मा ” ही पदवी बहाल करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले मृत्यु – death of mahatma jyotiro phule

महात्मा ज्योतिराव फुले या महमानवाचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० मध्ये झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी, अस्पृश्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजातील जाचक व शोषक रुढी परंपरा बंद करण्यासाठी व्यथित केले.

आपल्याला आज ज्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर दिसत आहे , ते फक्त म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. अशा या महामानवास आणि विद्येच्या देवतास माझा कोटी कोटी प्रणाम…!

टीप : मित्रांनो तुम्हाला ही महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती, निबंध, भाषण ( mahatma jyotiba phule information in marathimahatma jyotiba phule speech in marathi) नक्कीच आवडले असेल.

तुमच्याकडे जर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल आणखी माहिती असेल तर आम्हाला कमेंट मध्ये शेअर करा, आम्ही ती माहिती या लेखात नक्कीच update करू, धन्यवाद….!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: