Marathi Romantic Poems for Girlfriend 2022 latest

नमस्कार मित्रांनो आज आपण marathi poems for girlfriend पाहणार आहोत, मुलं सर्वात जास्त गर्लफ्रेंड साठी काही शोधत असतील तर ते म्हणजे marathi kavita for girlfriend काही वेळेस ते गर्लफ्रेंड च्या वाढदिवसाला marathi kavita for girlfriend birthday अस सर्च करतात.त्यांना romantic poems for girlfriend किंवा love poems for girlfriend पाहिजे असतात तर काही जन prapose करण्यासाठी marathi propose kavita for girlfriend तर काही गर्लफ्रेंड ला marathi sad kavita for girlfriend अस पाहतात.

मग मित्रांनो तुम्ही काय शोधत आहात ते सगळ मी खाली लेखात पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कविता कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा किंवा जर तुम्ही पण काही अश्या कविता लिहीत असाल तर आम्हाला नक्की पाठवा तुम्ही आम्हाला कमेन्ट द्वारे किंवा ईमेल द्वारे पण कविता पाठऊ शकता.तुम्ही आम्हाला Instagram वर संपर्क साधू शकता.

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल.

वेड मन हरवलय माझे तुझ्या प्रेमात,
त्याला समजवू तरी कसे?
मैत्री बदलते ग प्रेमात
पण प्रेमाला मैत्रीचे नाव देउ
तरी कसे..

रुसवे फुगवे
हे पुरावे प्रेमाचे
तुला मानवण्या
थोडे हे बहाणे मनाचे..

विचारांच्या गर्दीत मनाच्या
भावना होत्या मनात साचल्या
कविता लिहिताना तुझ्यावर
त्या ओळी ही वाहू लागल्या..

अचानक मिठीत घेता
मज तू साजणा
शहारुन जातं मन माझं
होऊन जीव बावरा…

पाहतेस अशी तू
माझ्याकडे
हिरावून घेतेस
कटाक्ष माझा
शब्द मनातले
शोध घ्यावा
लागतो मला नंतर
माझ्या हरवलेल्या
मनाचा.

शृंगार तुझा असा
पाहून तो चंद्र ही लाजेल
अपूर्ण सौंदर्य त्याचं
तो तुझ्यात शोधेल.

बदलता ऋतु हा
तुला आठवायला निमित्त देतो
आठवणीतला शब्द
तुझ्यावर कविता करून जातो..

तुझ्या केसतील फूल
सारखा मुसू मुसू रडत होते,
कारण काही झाले तरीही
ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत नवते………..

अंग तिचे शहारले होते
मन तिचे बावरले होते
चेहऱ्यावरच्या बटांना मी
ओठांनी सावरले होते
शब्द मनातले
गुंतली होती ती माझ्यात
विसरून गेली ती भान सारे
देह भिन्न आमचे पण
हृदय एक आम्हा जाणवले होते.

हृदय एक आपुलं
त्यास एकाच स्पंदनांची साथ
उंबरा ओलांडून बंधनांचा
लिह प्रेमाची नवी बात.

प्रेमाच्या या सरितेत
वाहत असेच जावे
उगवत्या सुर्यासोबत
प्रेम सागरास जावून मिळावे

काळजीचा ठोका येतो
प्रत्येक स्पंदना मधी
शब्द मनातले
कसे सांगू तू दूर असता
होते काय अवस्था माझी
पर्ण जरी हलले वृक्षाचे
तुला पाहतो मी आधी.…

प्रेम म्हणजे… ?
समजली तर भावना…
पाहिले तर नाते…
म्हटले तर शब्द…
वाटली तर मैत्री…
घेतली तर काळजी …
तुटले तर नशीब….
पण मिळाले तर स्वर्ग….!!!

तुलना करणं तुझ्याशी
कुणालाच शोभत नाही
तुझ्या सारखा रंग असा
त्या इंद्रधनतही नाही .

आठवून तुला
मनाचा दर्पण सजला
पाहून तुझी सुंदरता
तो क्षणही लाजला.

Short Poem for Girlfriend

तो वारा नदी काठचा
अजूनही शहारे आणून देतो
गोड आठवणी जुन्या
परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या….
इतका पण हळवा नव्हतो मी कधी….

माझ्या हृदयात फक्त
तुझ्यासाठीच जागा आहे
आपल्याला नात्यात बांधणारा
प्रेमाचा एकच धागा आहे

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल

तू आहेस सोबत म्हणूनच
शब्द बोलत आहेत
अबोल्याचे क्षण त्यांनी
कित्येक दिवस पाहिले आहेत

तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया….

निरपेक्ष प्रेम असतं काय
तुझ्यामुळेच मला समजलं
माझं नावं तुझ्या नावाशी
तेव्हांच आहे मी जोडलेलं !

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: