जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध | Paryavaran Diwas Marathi Nibandh

Paryavaran Diwas Marathi Nibandh – मित्रांनो आज आपण जागतिक “पर्यावरण दिवस निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Paryavaran Diwas Marathi Nibandh

५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. पर्यावरणात जर आम्ही समतोल राखला तर मानवजात सृष्टीत टिकून राहील. पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील आणि पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचा समतोल. हा समतोल राखण्यात वृक्ष, झाडे आम्हाला खूप मदत करतात म्हणूनच भारतीय संस्कृती मधील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वृक्षांची, रोपांची पूजा करण्याची परंपरा खूप दूरदृष्टीची म्हणावी लागेल. “paryavaran diwas marathi nibandh”

रोज संध्याकाळी तुळशीला पाणी घालून तिच्याजवळ दिवा लावायचा, वड पौर्णिमेला मोठ मोठ्या पारंब्या असणाऱ्या वडाची पूजा करायची. या आणि अशा रितीने वृक्षांचे जतन होते. पर्यावरणाचा समतोल साधतो. झाडे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन बाहेर फेकतात ग्लोबल वॉर्मिंगपासूनही आम्हाला हे वृक्ष वाचवतात.

एकाच ठिकाणी उभी राहणारी झाडे उन्ह, वारा, पाऊस सहन करतात आणि दुसऱ्यांना सावली देतात. लाकूड, फळे, फुले, बिया, साल आणि औषधीमुळे सुद्धा आम्हाला हे वृक्षच देतात.

जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध

पक्षी, प्राणी, कृमी असे अनेक जीव झाडांच्या आश्रयाने राहतात. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूचे हे जणू कारखाने आहेत. झाडे वाचली तर पर्यावरण सुरक्षित राहील आणि पर्यावरण आमचे म्हणजे मानव जातीचे रक्षण करील म्हणून जंगलांचे रक्षण आम्ही केले पाहिजे. ही जंगले तयार व्हायला हजारो वर्षांचा काळ जावा लागला.

हा देखील निबंध वाचा »  आमचे स्वातंत्र्य सैनिक निबंध मराठी | Amache Swatantra Sainik Nibandh Marathi

जंगले तोडायला मात्र अगदी थोडे दिवस पुरतात हे आम्ही विसरत आहोत. उद्योग, कारखाने यांची बेफाम वाढ आज होते आहे. माणसे शहराकडे धाव घेत आहेत, या साऱ्यासाठी निर्दयपणे झाडे तोडली जातात.

वृक्षप्रेमाचे हे जुने नाते माणूस विसरला आहे. आता स्वतःच्या सवयी बदलायची वेळी आली आहे. कागदापेक्षा ई-मेलचा अधिक वापर, कमी ऊर्जेचे दिवे, वापरून फेकण्याच्या वस्तूंऐवजी चिनी मातीच्या कपबश्या, पेपर नॅपकीन ऐवजी
सुती टॉवेल, पाण्याचा जपून वापर हे आम्ही करायला हवे.

पर्यावरणाचे भान आम्ही ठेवले तरच मानवजात वाचण्याची शक्यता आहे. जगाला वाचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवसाची योजना करण्यात आली आहे.

तर मित्रांना “Paryavaran Diwas Marathi Nibandh”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

पर्यावरण दिनाची सुरुवात कुठे झाली?

मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषदेत (5-16 जून 1972), ज्याचा परिणाम मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर चर्चा करण्यात आला, संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना केली.

पर्यावरणाचे तीन मुख्य घटक कोणते?

i) जैविक किंवा सजीव ii ) अजैविक किंवा निर्जीव iii ) ऊर्जा घटक

हा देखील निबंध वाचा »  पंडित जवाहर नेहरू निबंध मराठी | Pandit Jawaharlal Nehru Nibandh in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: