जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध | Paryavaran Diwas Marathi Nibandh
Paryavaran Diwas Marathi Nibandh – मित्रांनो आज आपण जागतिक “पर्यावरण दिवस निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.
Paryavaran Diwas Marathi Nibandh
५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. पर्यावरणात जर आम्ही समतोल राखला तर मानवजात सृष्टीत टिकून राहील. पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील आणि पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचा समतोल. हा समतोल राखण्यात वृक्ष, झाडे आम्हाला खूप मदत करतात म्हणूनच भारतीय संस्कृती मधील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वृक्षांची, रोपांची पूजा करण्याची परंपरा खूप दूरदृष्टीची म्हणावी लागेल. “paryavaran diwas marathi nibandh”
रोज संध्याकाळी तुळशीला पाणी घालून तिच्याजवळ दिवा लावायचा, वड पौर्णिमेला मोठ मोठ्या पारंब्या असणाऱ्या वडाची पूजा करायची. या आणि अशा रितीने वृक्षांचे जतन होते. पर्यावरणाचा समतोल साधतो. झाडे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन बाहेर फेकतात ग्लोबल वॉर्मिंगपासूनही आम्हाला हे वृक्ष वाचवतात.
एकाच ठिकाणी उभी राहणारी झाडे उन्ह, वारा, पाऊस सहन करतात आणि दुसऱ्यांना सावली देतात. लाकूड, फळे, फुले, बिया, साल आणि औषधीमुळे सुद्धा आम्हाला हे वृक्षच देतात.
जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध
पक्षी, प्राणी, कृमी असे अनेक जीव झाडांच्या आश्रयाने राहतात. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूचे हे जणू कारखाने आहेत. झाडे वाचली तर पर्यावरण सुरक्षित राहील आणि पर्यावरण आमचे म्हणजे मानव जातीचे रक्षण करील म्हणून जंगलांचे रक्षण आम्ही केले पाहिजे. ही जंगले तयार व्हायला हजारो वर्षांचा काळ जावा लागला.
जंगले तोडायला मात्र अगदी थोडे दिवस पुरतात हे आम्ही विसरत आहोत. उद्योग, कारखाने यांची बेफाम वाढ आज होते आहे. माणसे शहराकडे धाव घेत आहेत, या साऱ्यासाठी निर्दयपणे झाडे तोडली जातात.
वृक्षप्रेमाचे हे जुने नाते माणूस विसरला आहे. आता स्वतःच्या सवयी बदलायची वेळी आली आहे. कागदापेक्षा ई-मेलचा अधिक वापर, कमी ऊर्जेचे दिवे, वापरून फेकण्याच्या वस्तूंऐवजी चिनी मातीच्या कपबश्या, पेपर नॅपकीन ऐवजी
सुती टॉवेल, पाण्याचा जपून वापर हे आम्ही करायला हवे.
पर्यावरणाचे भान आम्ही ठेवले तरच मानवजात वाचण्याची शक्यता आहे. जगाला वाचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवसाची योजना करण्यात आली आहे.
तर मित्रांना “Paryavaran Diwas Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
पर्यावरण दिनाची सुरुवात कुठे झाली?
मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषदेत (5-16 जून 1972), ज्याचा परिणाम मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर चर्चा करण्यात आला, संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना केली.
पर्यावरणाचे तीन मुख्य घटक कोणते?
i) जैविक किंवा सजीव ii ) अजैविक किंवा निर्जीव iii ) ऊर्जा घटक
खाली दिला आहे “पर्यावरण दिन” (Paryavaran Diwas) या विषयावर सुंदर व सोपा मराठी निबंध — शालेय उपक्रम, भाषण किंवा प्रोजेक्टसाठी उपयुक्त:
🌍 पर्यावरण दिन – निबंध
(Paryavaran Diwas Nibandh in Marathi)
🔹 प्रस्तावना:
पर्यावरण म्हणजे आपले जीवन, आपली सृष्टी.
जगातील सर्व सजीव प्राण्यांच्या जगण्याचा आधार म्हणजेच पर्यावरण.
परंतु आज याच पर्यावरणाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.
त्यामुळे दरवर्षी ५ जून रोजी “जागतिक पर्यावरण दिन” साजरा केला जातो.
🔹 पर्यावरण दिन का साजरा करतात?
-
संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) १९७२ साली पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली.
-
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करणे आणि प्रकृतीच्या रक्षणासाठी प्रयत्नशील होणे.
🔹 पर्यावरणाचे महत्त्व:
-
स्वच्छ हवा, पाणी, झाडे, प्राणी, नद्या आणि जंगलं हे सगळं पर्यावरणाचाच भाग आहे.
-
पर्यावरण शुद्ध असेल तरच आपलं आरोग्य, शेती, आणि संपूर्ण जीवन सुरक्षित राहील.
🔹 आजच्या काळातील संकट:
-
वृक्षतोड, प्रदूषण, प्लास्टिक वापर, जंगलांची नासधूस, आणि औद्योगिक वाढ यामुळे पर्यावरण नष्ट होत आहे.
-
यामुळे जागतिक तापमानवाढ (Global Warming), पूर, दुष्काळ, आणि रोगराई वाढत आहे.
🔹 आपण काय करू शकतो?
-
दरवर्षी झाडे लावा.
-
प्लास्टिक टाळा.
-
पाणी, वीज वाचवा.
-
सायकलचा वापर करा.
-
कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित करा.
-
इतरांनाही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजवा.
🔹 निष्कर्ष:
पर्यावरण हे आपले घर आहे.
त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.
आपण जर आज निसर्ग जपला नाही, तर उद्या तो आपल्याला वाचवू शकणार नाही.
🌱 “पर्यावरण वाचवा – भविष्य सुरक्षित करा!”
🌿 “एक झाड लावा, हजारो जीव वाचवा!”
हवे असल्यास हा निबंध छोट्या विद्यार्थ्यांसाठी १००–१५० शब्दांत संक्षेप करून देऊ शकतो.
तुमची इयत्ता सांगाल का?