ऋषिपंचमी माहिती, इतिहास मराठी | Rishi Panchami Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला ऋषिपंचमी माहिती, इतिहास मराठी | Rishi Panchami Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – गणेश चतुर्थी

Contents

ऋषिपंचमी मराठी | Rishi Panchami Information in Marathi

भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमीचे व्रत करतात. हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात. स्त्री बाहेरची असताना म्हणजे रजस्वला अवस्थेत असताना जाणते-अजाणतेपण स्पशप झाला असेल तर तो दूर व्हावा; त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची स्मृती कायम राहावी यासाला अरुंधतीसहित कश्यपादी ऋषींच्या प्रतीकांची पूजा करावयाची असते. अर्थात ऋषी हे स्त्रीपुरुष सर्वांचे आहेत. त्यांनी मानवाला मानव बनविले. त्यांनी मानवांवर उत्तम संस्कार करून त्यांच्या ठिकाणी देवत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मानवाला जीवनाचा सन्मार्ग दाखविला. यासाठी प्रमुख अशा सप्तर्षीचे भक्तिपूर्वक पूजन केवळ स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीही कराव.

ऋषींचे अखिल मानवावर असलेले ऋण कधीही फिटणारे नाही. त्याची आठवण म्हणून या दिवशी ऋषींचे पूजन करावयाचे असते. अनेक प्रकारच्या व्रतादींचे आचरण करून आपल्या भारतीय स्त्रियांनीच भारतीय संस्कृतीचे, श्रेष्ठ परंपरेचे जतन केले आहे. हे ऋषिपंचमीचे व्रत सुद्धा स्त्रियाच करतात. या दिवशी आघाडा या वनस्पतीला फार महत्त्व आहे. म्हणून या दिवशी प्रातःकाळी शाक्य असेल तर नदीवर जाऊन आघाड्याच्या काडीने दात घासून स्नान कराव. नतर घरात सप्तर्षीची पूजा करावयाची असते. ते सात ऋषी असे- १. कश्यप २. अत्री ३. भारद्वाज ४. विश्वामित्र ५. गौतम ६. जमदग्नी व ७. वसिष्ठ.

वसिष्ठांची पत्नी अरुंधती हिलाही या सप्तर्षीच्या पूजनात मानाचे स्थान आहे. म्हणून पूजा करताना ‘अरुंधतीसहित कश्यपादिऋषिभ्यो नमः पूजयामि मी अरुंधतीसहित कश्यपादी ऋषींना नमस्कार करते.’ त्यांची पूजा करते. असे म्हणतात. एका पाटावर किंवा चौरंगावर मठ-मूठ तांदळाच्या आठ राशी ठेवतात. त्या राशीवर उजवीकडून डावीकडे सप्तर्षीची प्रतीके म्हणून एक-एक सुपारी ठेवतात. वसिष्ठांच्या शेजारी म्हणजे आठव्या सुपारीवर अरुंधतीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश चौरंगावर ठेवून त्यात गंध, फूल, अक्षता व सुपारी घालतात.

कलशाला पांढरे वस्त्र गुंडाळतात. मग अरुंधतीसहित कश्यपादी ऋषींची षोडशोपचारे पूजा करतात. या दिवशी कंदमुळांचा, भाज्यांचा आहार घ्यावयाचा असतो. बैलाच्या श्रमाने तयार झालेल्या अन्नाचा आहार घ्यावयाचा नसतो. आपल्या परसात स्वतः श्रम करून तयार केलेल्या भाज्यांचा आहार घ्यावयाचा असतो. एक दिवस तरी स्वतः कष्ट करून तयार केलेले अन्न घ्यावे. श्रमप्रतिष्ठा वाढावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. या ऋषिपंचमी व्रताचे महत्त्व सांगणारी एक प्राचीन कथा आहे ती अशी एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, “हे श्रीकृष्णा! सर्व पातकांचा, जाणतेअजाणतेपणी स्त्री-पुरुषाच्या हातून घडणाऱ्या दोषांचा नाश करणारे असे एखादे श्रेष्ठ व्रत आहे का? असेल तर ते मला सांगावे.” श्रीकष्ण म्हणाला, घरात स्त्रीकडून शिवाशिव झाली तर तो दोष ब्रह्महत्येसमान ठरतो व त्याचे फळ त्या स्त्रीला व तिच्या पतीलाही केवळ याच जन्मी नव्हे तर पुढील जन्मातही भोगावे लागते. म्हणून दरवर्षी भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी ऋषिपंचमीचे व्रत करावे. म्हणजे सर्व पापदोषांचा नाश होतो.

यासंबंधी एक प्राचीन कथा आहे. ती मी तुला सांगतो ती ऐक. “पर्वी विदर्भ देशात सुमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव होते जयश्री. एकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली. तिच्या हातून हा मोठाच दोष घडला. काही काळानंतर त्या सुमित्र ब्राह्मणाला व जयश्रीला मृत्यू आला. जयश्रीला तिच्या पूर्वजन्मातील दोषामुळे कुत्रीचा जन्म मिळाला व सुमित्र ब्राह्मणाला बैलाचा जन्म प्राप्त झाला. त्या जन्मात ते दोघेही त्यांच्या पूर्वीच्या जन्मातील त्यांच्या पुत्राच्या घरी राहत होते.

एकदा त्या पुत्राच्या घरी श्राद्धकर्म होते म्हणून त्याच्या पत्नीने श्राद्धाचा सगळा स्वयंपाक केला. खीर केली. श्राद्धासाठी ब्राह्मणांना भोजनाला निमंत्रण दिले होते. त्या वेळी एक विचित्र घटना घडली. “खिरीचे भांडे उघडे होते. त्यात एका विषारी सापाने तोंड घातले. त्या खिरीत सापाचे विष पडले. दारात असलेल्या कुत्रीने ते पाहिले. तिने विचार केला, ही विषारी खीर ब्राह्मणांनी खाल्ली तर आपल्या मुलाला व सुनेला ब्रह्महत्येचे पाप लागेल म्हणून त्या कुत्रीने स्वयंपाकघरात शिरून त्या खिरीच्या पातेल्याला स्पर्श केला. ब्राह्मणाच्या पत्नीने ते पाहिले. तिला त्या कुत्रीचा अतिशय राग आला.

तिने चुलीतील पेटते लाकूड घेऊन त्या कुत्रीला झोडपले. नंतर तिने ब्राह्मणांसाठी दुसरी ताजी खीर तयार केली. त्या दिवशी त्या कुत्रीला काहीही खायला मिळाले नाही. रात्री ती कुत्री रडत रडत आपल्या पतीकडे म्हणजे त्या बैलाकडे गेली. तिने त्याला घडलेली सगळी हकीकत रडत रडत सांगितली. त्या वेळी तिचा पती म्हणजे तो बैल तिला म्हणाला, ‘तू गेल्या जन्मी तुला शिवायचे नसताना श्राद्धाचा स्वयंपाक केलास. सगळीकडे शिवाशिव केलीस. त्या दोषामुळे तुला हा कुत्रीचा जन्म मिळाला. तू माझी पत्नी असल्यामुळे मलाही दोष लागला. त्यामळे मला हा बैलाचा जन्म प्राप्त झाला.

आज माझ्या मलाने मला दिवसभर नांगराला जुंपले. खूप मारले. मला अन्नपाणी दिले नाही. मी सुद्धा आज तुझ्याप्रमाणे उपाशीच आहे. आज आपल्या पुत्राने केलेले श्राद्ध फुकट गेले.’ “कुत्रीचे व बैलाचे हे बोलणे त्यांच्या त्या पुत्राने ऐकले. त्याला अतिशय वाईट वाटले. त्याने त्या बैलाला भरपूर वैरण घातली. पाणी पाजले. कुत्रीलाही अन्नपाणी दिले. त्या दोघांना त्याने नमस्कार केला. त्याला फार दःख झाले होते.” “दुसऱ्या दिवशी तो रानात गेला.

तेथे त्याला काही ऋषी भेटले. त्याने त्या ऋषींना सगळी हकीकत सांगितली व आपल्या आईवडिलांच्या म्हणजे त्या कुत्रीच्या व बैलाच्या उद्धारासाठी काय करावे, असे त्याने त्या ऋषींना विचारले. तेव्हा ऋषी त्याला म्हणाले, ‘त भाद्रपद महिन्यातील शुद्ध पंचमीला ऋषिपंचमीचे व्रत कर म्हणजे तुझ्या आईवडिलांचा उद्धार होईल.’ “मग त्या ब्राह्मणपुत्राने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे यथाविधी ऋषिपंचमीचे व्रत केले. त्यामुळे त्या कुत्रीचा व बैलाचा म्हणजे त्याच्या आईवडिलांचा उद्धार झाला, व ते स्वर्गलोकी गेले.” या गोष्टीचा बोध इतकाच, की मनुष्याने सदैव पवित्र राहावे.

आपल्या हातून जाणते- अजाणतेपणी अनेक दोष घडतात व त्याचे फळ भोगावे लागते. म्हणून वर्षातून एकदा तरी अरुंधतीसह सप्तर्षीचे स्मरण-पूजन करावे. स्वकष्टाने मिळविलेल्या अन्नाचा आहार घ्यावा. पवित्र राहावे. आपल्या घरी असलेल्या गाय-बैल, कुत्रा इत्यादी प्राण्यांना प्रेमाने अन्न द्यावे. अशा या ऋषिपंचमी व्रताचरणाने घरात सुख नांदते. सर्व तीर्थांच्या स्नानाचे पुण्य लाभते. स्त्रीचा संसार सुखाचा होतो. मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. आपले जीवन सफल होते.

काय शिकलात?

आज आपण ऋषिपंचमी माहिती, इतिहास मराठी | Rishi Panchami Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

खाली “ऋषी पंचमी” विषयी संपूर्ण माहिती मराठीत दिली आहे. ही माहिती शाळेतील प्रकल्प, निबंध, सणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी किंवा सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी उपयुक्त आहे.


🕉️ ऋषी पंचमी माहिती मराठीत (Rishi Panchami Information in Marathi)

🔹 ऋषी पंचमी म्हणजे काय?

ऋषी पंचमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे जो भाद्रपद शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी सप्तऋषींना वंदन केले जाते आणि स्त्रिया व पुरुष आपल्या कर्माचा शुद्धीकरण करण्यासाठी उपवास, स्नान आणि पूजन करतात.


🔹 सप्तऋषी कोण आहेत?

ऋषी पंचमीच्या दिवशी खालील सप्तऋषींची पूजा केली जाते:

  1. अत्री

  2. भारद्वाज

  3. वसिष्ठ

  4. विश्वामित्र

  5. गौतम

  6. जमदग्नी

  7. कश्यप


🔹 सणाचे धार्मिक महत्त्व:

  • या दिवशी स्त्रिया “पापनिवारण” करण्यासाठी उपवास करतात.

  • मासिक धर्माच्या वेळी शारीरिक शुचिर्भूततेचे पालन न झाल्यास जे पाप लागते, त्यातून मुक्ती मिळावी यासाठी ऋषी पंचमीचा उपवास करतात.

  • हे एक प्रकारे स्वच्छता, शुद्धता आणि आत्मशुद्धीकरणाचे प्रतीक आहे.


🔹 कसे साजरे करतात?

  1. उपवास – स्त्रिया विशेषतः उपवास करतात.

  2. स्नान – तिळाने स्नान करून शुद्धीकरण केले जाते.

  3. सप्तऋषी पूजन – सप्तऋषींची पूजा करून त्यांची क्षमा मागितली जाते.

  4. सुपारीच्या रूपात ऋषी बनवले जातात आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो.

  5. काही ठिकाणी नदीत किंवा शुद्ध पाण्यात स्नान करणे अनिवार्य मानले जाते.


🔹 सणाचे सामाजिक महत्त्व:

  • ऋषी पंचमी हे सण स्त्री-शक्तीचे आत्मशुद्धीकरण व निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

  • या निमित्ताने घरात स्वच्छता, मनातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

  • या दिवशी शरीर, मन व आत्मा शुद्ध करण्याचा संकल्प केला जातो.


📌 निष्कर्ष:

ऋषी पंचमी म्हणजे पवित्रतेचे, पश्चात्तापाचे व ऋषींप्रती कृतज्ञतेचे प्रतीक.
या दिवशी आपल्या पूर्वज ऋषींना स्मरण करून आपण त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प करतो.


हवे असल्यास यावर आधारित १० ओळीतील संक्षेप, निबंध, Instagram पोस्टसाठी कॅप्शन, किंवा PDF प्रोजेक्ट करून देऊ शकतो.

तुम्हाला याचं कोणत्या स्वरूपात रूपांतर हवंय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: