शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी | Shalecha Pahila Divas Nibandh Marathi
Shalecha Pahila Divas Nibandh Marathi – मित्रांनो आज “शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखली जाते ती शाळा.
परंतु शाळेत फक्त अभ्यासू ज्ञानच मिळत नाही, तर शाळेतील अनेक गंमती-जमती, मित्र- मैत्रिणीतील मजा-मस्ती अशा अनेक शाळेच्या आठवणी असतात. आपण कितीही मोठे झालो तरीही शाळेच्या आठवणी नेहमी आपल्या चेह-यावर हसू घेऊन येतात.
Contents
Shalecha Pahila Divas Nibandh Marathi
उन्हाळी सुटीचा मे महिना संपला आणि जून महिना सुरू झाला की शाळेची चाहूल लागते. दीड-दोन महिन्यांचा विरंगुळा झाला की शाळेत जाण्याची हौस प्रत्येकाला असते. त्याचप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवसाची वाट मी आतुरतेने पाहत असते.
शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मी लवकर उठून तयार झाले. नवीन वहया, नवीन डबा, बाटली हे सर्व साहित्य दप्तरामध्ये भरले. शाळेचा नवीन गणवेश घालून मी शाळेत जाण्यासाठी तयार झाले. Shalecha Pahila Divas Nibandh Marathi
पावसाची चाहूल लागल्यामुळे मी माझा रेनकोट ही दप्तरात ठेवला. शाळेतील मित्र– मैत्रिणींना भेटण्यासाठी मी उत्सुक झाले होते. आमचे रिक्षावाले काका मला घ्यायला आले आणि आम्ही शाळेत जाण्यासाठी निघालो.
शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
शाळेत जाताना माझ्या मनात अनेक विचार येत होते जसे की, आम्हाला नवीन वर्गशिक्षक कोण असतील? नवीन वर्ग कसा असेल? वर्गात कोण नवीन मित्र- मैत्रिणी येतील ? अशा अनेक विचारांनी मी शाळेत पोहोचले.
नवीन वर्गात पोहोचल्यावर मी माझ्या मित्र-मैत्रिणींना भेटले आणि आमच्या सुटीतील गप्पा सुरू झाल्या. थोडया वेळात आमचे वर्गशिक्षक वर्गात आले. त्यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला स्वतःची ओळख करून देण्यास सांगितले. वर्गशिक्षक मिळाल्यामुळे आम्ही खूश झालो. “Shalecha Pahila Divas Nibandh Marathi”
राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणायला आम्ही सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणावर गेलो. मुख्याध्यापकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सर्वांचे स्वागत केले. शाळेच्या नवीन वर्षासाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. मागील वर्षी वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
Shalecha Pahila Divas Nibandh Marathi
परीपाठ संपल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या वर्गात आलो. पहिला दिवस असल्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होता. शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. वर्गशिक्षक वर्गात आल्यावर त्यांनी आम्हाला सुटीतील गंमती-जमती विचारल्या.
आम्ही सुटीत काय शिकलो, सुटटीतील आमचे नवीन अनुभव याची त्यांनी विचारपूस केली. शाळेतील नवीन विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेची ग्रंथालय, थोडक्यात माहिती सांगितली. शाळेतील प्रयोगशाळा, संगणक लॅब सर्वांना दाखविली. ‘Shalecha Pahila Divas Nibandh Marathi’
त्यानंतर आम्हाला त्यांनी शाळेतील नवीन अभ्यासक्रमाबदद्ल आमची मधली सुटी माहिती सांगितली. त्यानंतर झाली. आम्ही सर्व मैत्रिणींनी एकत्र डबा खाल्ला. मैत्रिणींसोबत एकत्र बसून गप्पा मारत डबा खाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यानंतर आम्ही शाळेत फेरफटका मारला, मैदानात खेळलो.
शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
शाळेची घंटा झाल्यावर आम्ही पुन्हा वर्गात आलो. शाळेतील शिपाई काकांनी नवीन पुस्तकांचे गळे वर्गात आणले. वर्गशिक्षकांनी सर्वांना पुस्तकांचे वाटप केले. नवीन कोया करकरीत पुस्तकांचा वास घ्यायला मला खूप आवडते. Shalecha Pahila Divas Nibandh Marathi
एवढेच नव्हे तर शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पांढ-या शुभ्र वहीच्या पहिल्या पानावर लिहिण्याचे मला फार कुतुहल आहे. पुस्तकांचे वाटप झाल्यावर आमच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला छान गोष्ट सांगितली.
Shalecha Pahila Divas Nibandh Marathi
शाळा सुटल्यानंतर आम्ही मैत्रिणी गप्पा मारत रिक्षातून दंगा करत घरी आलो. एकंदरीत माझ्या शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप खास होता. अभ्यास किंवा परीक्षेची चिंता नव्हती. नवीन काय शिकायला मिळणार? याची उत्सुकता होती. त्या दिवशी मी खूप खूश होते. त्यामुळे तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.
तर मित्रांना “Shalecha Pahila Divas Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.