शाळेचे मनोगत मराठी निबंध | Shaleche Manogat Nibandh In Marathi
Shaleche Manogat Nibandh In Marathi – मित्रांनो आज आपण शाळेचे “मनोगत निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.
Contents
Shaleche Manogat Nibandh In Marathi
काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झाल्या आणि अचानक जाणीव झाली. अरे, आपल्या आयुष्यातलं काहीतरी हरवलंय. होना! दहावी झाली आणि आपण नव्या जगात भरारी मारण्यास सज्ज झालो; पण मनाच्या कोणत्या तरी एका कप्प्यात अजूनही शाळा रुंजी घालत आहे.
खरंच, किती लळा लावला होता शाळेने! जीवनातला फुलायचा काळ आपण त्या शाळेत घालवला, खेळलो, बागडलो, मार खाल्ला आणि आज ते सर्व आपल्यालाच परके झाले आहे. ती शाळा, तो बाक आणि ते शिक्षक! होय, ते सर्व आज माझ्या मनात बाहेरच्या पावसासारखंच रुंजी घालत आहेत. ‘shaleche manogat nibandh in marathi’
त्या आठवणीत मी रिमझिम भिजतो आहे आणि वाटतंय महाविद्यालयीन जगात प्रवेश करताना नवे मित्र, नवे शिक्षक भेटतील; पण त्याला शाळेतल्या शिक्षकांची सर येईल, असे मला वाटत नाही. ते प्रेम, ती आपुलकी फक्त शाळेतच प्रत्येकाला घडवण्यात कित्येक शिक्षक हात भार लावतात. पहिलीत शाळेत दुडदुडू पावले टाकल्यावर या नव्या जगात आत्मविश्वासाने चालायला शिकविणारे प्राथमिक शाळेतले शिक्षक. [Shaleche Manogat Nibandh In Marathi]
शाळेचे मनोगत मराठी निबंध
समाजात कसं वागायचं, काय करायचं, काय नाही हे सर्व बाळबोध भाषेत समजावण्याचं काम करावं तर त्यांनीच. आता तर लहान वयात असणाऱ्या सर्व परीक्षांसाठी चिमुरड्यांना सज्ज करण्याचे शिवधनुष्य पेलताहेत ते शिक्षक.
यानंतर हायस्कूलमध्ये आल्यावर विविध विषयांना विविध शिक्षक, प्रत्येकाची वृत्ती वेगळी, प्रवृत्ती वेगळी. एखाद्या इंग्रजीच्या बाई ‘कष्टमेव दशः साध्यम्।’ म्हणून कडक बाणा आचरणाऱ्या, तर मुलांप्रमाणेच नवीन असणारा एखादा शिक्षक मुलांच्या पातळीवर येऊन त्यांचे बुजरे पण सांभाळणारा. यानंतरच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात आपणास अनेक टेकू मिळतात. प्रत्येक शिक्षकाचे खास वैशिष्ट्य. कोणी भूगोलासारखा रूक्ष विषय सोपा करून सांगतो.
कोणी कार्यानुभावाचा खरा आनंद देतो, तर एखाद्या मुलातले टॅलेंट ओळखून त्याला पैलू पाडणारा एखादी विरळ वल्लीही भेटते. या सर्वामुळे मूल घडत जाते. कधी कधी शिक्षकांचा रागदेखील येतो; पण त्या स्नेहापोटी तो सर्व क्षणांचा खेळ खेळतो. एखाद्या शिक्षकांचे विषयातले ज्ञान पाहून आपणच स्वतःला खुजे समजतो. shaleche manogat nibandh in marathi
Shaleche Manogat Nibandh
एखादे शिक्षक गणितातला व्यवहाराचा बाज चढवून त्याला पेश करतात, तर कोणी मराठीचा तास असा काही रंगवतो, की कशाला तास संपला, असं म्हणावेसे वाटते. कोणी नेहमीसारखंच शिकवतो; पण अचानक ते साधेपणदेखील भाव खाऊन जाते. कोणी आपल्या तासात इतर माहितीची अशी काही पाखरण करतो, की आपण अभ्यास करतोय, असं वाटतच नाही.
काहींना एखादी गोष्ट मुलांपर्यंत पोहोचवता येत नाही; पण मग त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न पाहून काय करावं, तेच सुचत नाही. याउलट काही शिक्षक फक्त विद्यार्थ्यासाठी २० किलोमीटर अंतर कापून शाळेत येतात आणि त्याच ताकदीने ज्ञानगंगा रिती करतात. काहींचा दरारा इतका, की दहावीची टारगट मुलेसुद्धा त्यांचे नाव घेतल्यास चळचळ कापतात, तर काही प्रेमाने त्यांना आपलेसे करतात.
काही शिक्षकांमुळे संस्कृत, इतिहास यांचे तास असे रंगतात की बस, विचारायची सोय नाही! या सर्वांत एखादा शिक्षक असा असतो, की त्याच्या शब्दांतूनच नवा आत्मविश्वास संचारतो. एखादा शिक्षक सकाळ ते संध्याकाळ असा अख्खा दिवस मुलांसाठी देतो. पण, हे झालं फक्त शिकवणं, शिक्षकांना फक्त एवढंच काम नसतं. त्यांना एका-एका वर्गातील ८० विद्यार्थ्यांना सांभाळायचे असते. प्रत्येकाच्या स्वभावाला अनुसरून शिकवायचे असते. Shaleche Manogat Nibandh In Marathi
शाळेचे मनोगत निबंध
वाट चुकलेल्या उडाणटप्पू मुलाला योग्य वाटेवर परत आणायचे असते. त्यासाठी कधी शब्दरूपी मोरपिसांचा, तर कधी दंडाचा वापर करावा लागतो. प्रत्येक शिक्षक आपापल्यापरीने मुलांना आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत असतो. पेपर मधल्या गुणांपेक्षा महत्त्वाचे काही सांगत असतो. त्यांना ६० टक्क्यांच्या मुलापासून ९५ टक्क्यांच्या एक्स्ट्रा ऑर्डनरी विद्यार्थ्यांना सांभाळायचे असते. या प्रत्येकाला एकाच तराजूत मापून चालत नाही.
थोडा दंगा करू देताना त्यावर मर्यादाही आणावयाची असते. आपल्या कृतीतून त्यांच्यापुढे आदर्श घालून द्यावयाचा असतो. आपले कौशल्य वापरून त्या मातीच्या गोळ्यातून अभ्यासू मुलांबरोबर कधी उत्तम खेळाडूही बनवायचा असतो. त्याचबरोबर पालकांच्या तक्रारींना तोंड द्यायचे असते. सरकारी कामे पार पाडायची असतात. मग या सर्वामुळे कुठे ना कुठे स्वतःच्या सुखाला मुरड घालावीच लागते. shaleche manogat nibandh in marathi
शाळेतल्या उपक्रमांत जसजसे भाग घेत जाऊ, तस तसे आपल्याला शिक्षकांचे अंतरंग समजू लागते. यातूनच एखादे सर उत्तम शिक्षकच नव्हे, तर उत्तम लेखकही असल्याचे समजते. कोणाच्यातले नेतृत्वगुण प्रकपनि जाणवतात, तर एखाद्या सहलीत कोणातील मिमिक्रीकार जागा होतो. पीटीचे कडक वाटणारे सर कधी तरी एकदम मऊ होतात आणि कधी कोणाच्या ३० वर्षांच्या अनुभवाचे बोल वरचढ ठरतात. {Shaleche Manogat Nibandh In Marathi}
Shaleche Manogat Nibandh Marathi
कधी कोणी तत्त्वनिष्ठ असते, तर कोणी एनसीएची शिस्त अंगात पुरेपूर भिनलेले! कोण विज्ञानातला किडा असतो, तर कोणी इतिहासातला! आणि हे सर्व समजण्याची ताकद निर्माण करतात तेदेखील तेच (शिक्षक). ज्ञानगंगेचे अविरत वहन करणारे हे शिलेदार. असेच काही शिलेदार गेल्या दहा वर्षांत मला भेटले. नव्या जगात जाण्याचे बळ त्यांनीच मला दिले. shaleche manogat nibandh in marathi
त्यामुळे त्यांना माझ्या हृदयात नेहमी आदराचे स्थान आहेच; कारण प्रत्येक शिक्षक हा एक कलाकार असतो. म्हणूनच अलिप्त होऊन निरीक्षण करताना प्रत्येकाच्या स्वभावाचे – कंगोरे हळुवारपणे उघडत जातात. शाळेतला प्रत्येक क्षण ही त्यांची परीक्षा असते आणि त्यात त्यांना उत्तीर्ण व्हावेच लागते. या सर्वांचा मेळ झाल्यानेच दगडाल देवपण येत असते. ते कलाकार आपल्या भविष्यातील आनंदाची जोडणी करत असतात.
हे सर्व अनुभवण्याची, रसास्वाद घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या नजरेतून म्हणूनच शिक्षकविश्व उलगडण्याचा हा प्रयत्नदेखील करता आला.
तर मित्रांना “Shaleche Manogat Nibandh In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “शाळेचे मनोगत मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
शिक्षकाची ओळख काय?
माणसाचे भवितव्य शिक्षक घडवतात आणि ती सुधारणा घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक.
चांगल्या शिक्षकाची खूण काय असते?
एक चांगला आणि प्रभावी शिक्षक तो असतो जो विद्यार्थी, प्राचार्य आणि इतरांसमोर कोणत्याही चुकीच्या कृत्यासाठी झुकत नाही.
शाळेचे मनोगत – मराठी निबंध
शाळा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. शाळेतील अनुभव आणि शिक्षण जीवनभर सोबत राहतात. शाळेचा प्रत्येक दिवस हा नवीन शिकण्याची संधी असतो. शाळेच्या मनोगतातून आपल्याला शाळेची महती, तिचे महत्त्व आणि शाळेतील आपल्या अनुभवांची एक सुंदर ओळख मिळवता येते.
शाळेचे महत्त्व
शाळेचा आदर्श म्हणजेच एक सुवर्णक्षेत्र. शाळा केवळ शिक्षणच देत नाही, तर ती विद्यार्थ्यांना समाजसेवा, शिस्त, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास आणि जीवनातील इतर महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. शाळेतील शिक्षक हे आपले मार्गदर्शक असतात. ते आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक असतात. शाळेतील शिक्षणाने व्यक्तिमत्व विकसित होऊन विद्यार्थ्यांची विचारशक्ती वाढते.
शाळेतील जीवन
शाळेचे जीवन अत्यंत आनंददायक आणि संस्मरणीय असते. शाळेतील खेळ, मित्रांची साथ, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले धडे, कधी गमतीदार तर कधी कठीण अनुभव—हे सर्व जीवनभर लक्षात राहतात. शाळेत केलेली मित्रता तत्त्वज्ञान आणि चांगले मूल्यांचे शिक्षण हे एक महत्वाचे दृषटिकोन असतो. शाळेतील एका मित्राची प्रगती किंवा त्याचे कार्य, शाळेच्या संस्कृतीला दर्शविते.
शाळेतील दररोजच्या घडामोडी, शिक्षकांचे शिकवण, परीक्षा, क्रीडा स्पर्धा, इ. जीवनाच्या मार्गदर्शनाला कधीही विसरता येणार नाहीत.
शाळेतील खेळ आणि शिक्षण
शाळेत असताना खेळ आणि शिक्षण हे एकमेकांशी जोडलेले असतात. शालेय क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी ठरते, जिथे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होतात. शाळेतील इतर उपक्रमही विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी महत्त्वाचे असतात. विज्ञान प्रकल्प, गणिताचे सादरीकरण, कला स्पर्धा, इ. यामुळे विद्यार्थ्यांचे बुद्धिमत्ता आणि कौशल्य अधिक विकसित होतात.
शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या भूमिका
शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील आदर्श असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी योग्य मार्गावर जातात. शिक्षकांचा शालेतील जीवनातील प्रभाव अतिविशाल असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना सुसंस्कृत, योग्य आणि आदर्श नागरिक बनविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना एक आदर्श जीवन शिकवण्याचा प्रयत्न करतो.
शाळेतील मित्र
शाळेतील मित्र हे जीवनाचे खास रत्न असतात. कधी शिकण्याचे, कधी खेळाचे आणि कधी गप्पा मारण्याचे एकमेकांशी संवाद साधण्याचे आनंद शाळेतील मित्रांद्वारे मिळतात. शाळेतील मित्रतेची परिभाषा जीवनभर लक्षात राहते. आपण एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो आणि एकमेकांच्या कष्टांतून शिकतो.
शाळेतील संघर्ष आणि समाधान
शाळेतील जीवनामध्ये काही वेळा संघर्ष आणि त्रास होतो. परीक्षांचे तणाव, शालेय कार्ये, आणि इतर शिकण्याचे अडथळे येऊ शकतात. परंतु, या सर्व संघर्षांमधूनच आपला मानसिक विकास होतो. प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी असते. शाळेतील संघर्ष आणि त्यावर मात करून मिळवलेले समाधान जीवनभर आपल्या सोबत राहते.
शाळेतील शिस्त
शाळेतील शिस्त ही विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी खूप महत्त्वाची आहे. शाळेतील नियमांची पालन करणं, वेळेचे महत्त्व, शिक्षणातील लक्ष आणि एकाग्रता हे सर्व शिस्तीचे भाग आहेत. शाळेतील शिस्त विद्यार्थ्यांना जीवनातील यशाची दिशा दाखवते. शाळेतील शिस्तीमुळे विद्यार्थी एक आदर्श नागरिक बनतात.
निष्कर्ष
शाळेचा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान ठेवतो. शाळेतील शिकलेले धडे, मित्रांची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन, आणि जीवनातील शिकवणी जीवनभर लक्षात राहतात. शाळा फक्त एक शिक्षण संस्थाच नाही, तर ती एक अशी ठिकाण आहे जिथे आपण जीवनातील मुलभूत गोष्टी शिकतो. शाळेतील प्रत्येक दिवस आनंद, शिक्षण, संघर्ष आणि समाधानी क्षणांचा संगम असतो. शाळेचे मनोगत हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक सकारात्मक अनुभव ठरते.
“शाळेचे मनोगत म्हणजेच आपल्या शिक्षणाच्या आणि जीवनाच्या सुरुवातीचे आणि महत्त्वपूर्ण टप्पे.”