Useful Chrome Extension For Bloggers In Marathi

आजच्या पोस्ट मध्ये आपण (Useful chrome extension for bloggers in Marathi) असे काही गूगल chrome एक्स्टेंशन पाहणार आहोत कि जे  ब्लॉगिंग साठी उपयोगी ठरतील. कारण आपण जेवढे जास्त टूल्स चा वापर करू तेवढा जास्त फायदा आपल्याला ब्लॉगिंग साठी नक्कीच होईल. आज आपण जेवढ्या टूल्स (एक्स्टेंशन) विषयी बोलणार आहोत ते बहुतेक मोफत आहेत. यासाठी तुम्हाला फक्त गूगल chrome हे browser असणे महत्वाचे आहे. chrome browser मध्ये आपल्याला एक्स्टेंशन हे वापरायला मिळतात ज्यामुळे आपल्याला त्यांचा अनेक गोष्टी साठी फायदा होईल

1.Grammarly

जेव्हा आपण एखादी पोस्ट लिहत असतो त्यामध्ये जर काही spelling किंवा ग्रामर चुका झाल्या तर ते थोडे खराब impression तयार होतं. ग्रामरली हे आपल्या चुका सुधारायला मदत करत असत. ज्यामुळे आपण आपल्या चुका अगदी आरामात सुधारू शकतो. यामुळे आपली पोस्ट मध्ये कोणत्या प्रकारच्या चुका शक्यतो कमी होतात.

2.lastpass

जेव्हा आपण ब्लॉगिंग करत असतो तेव्हा अनेक प्रकारचे पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. कधी आपण एखादा पासवर्ड विसरलो तर त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. lastpass या मध्ये तुम्ही तुमचे अनेक प्रकारचे पासवर्ड ठेवू शकता. ज्यामुळे पासवर्ड  तुमच्या लक्षात ठेवावे लागणार नाहीत. हे एक सुरक्षित माध्यम आहे आपले पासवर्ड ठेवण्यासाठी.

3.google input tools

जर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा मधून टायपिंग करावी लागत असेल तर गूगल चे हे टूल तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्हाला ज्या भाषेत लिहायचे आहे त्या भाषेत तुम्ही यामुळे लिहू शकता. यामुळे आपली पोस्ट मध्ये कोणत्या प्रकारच्या चुका शक्यतो कमी होतात.

4.mailtrack

हे एक्स्टेंशन जर तुम्ही ई-मेल मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. यामुळे  whatsapp सारखे आपल्याला समजते कि आपला मेल वाचला आहे कि नाही ज्यांना आपण पाठवला आहे. यामुळॆ आपल्याला समजते कि आपण मेल पाठवलेला समोरच्या व्यक्तीने वाचला आहे का नाही. नसेल वाचला तर आपण पुन्हा मेल पाठवू शकतो आणि त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल

5.SimilarWeb – Traffic Rank & Website Analysis

या एक्स्टेंशन मध्ये तुम्हाला कोणत्याही वेबसाईट च जर रँकिंग आणि ट्रॅफिक थोडक्यात हवे असेल तर हे एक्स्टेंशन फायदेशीर होईल. तुम्ही एखादी वेबसाईट search केली कि त्या बद्दल माहिती हे एक्स्टेंशन आपल्याला देते. आपल्याला त्या वेबसाईट बद्दल त्यांची गूगल रँकिंग, अलेक्सा रँकिंग, बॅकलिंक्स, वेबसाईट कधी सुरु झाली आहे अश्या प्रकारची माहिती तुम्हाला या एक्स्टेंशन द्वारे तुम्हाला मिळेल.

6.keywords everywhere

हे एक्स्टेंशन आपल्याला keywords विषयी माहिती देतो. आपण जर एखादी गोष्ट आपण chrome मध्ये search केली तर त्याविषयी असणारे keywords आपल्याला या एक्स्टेंशन द्वारे मिळतात. हे एक keywords साठी फायदेशीर एक्स्टेंशन आहे.

7.tube buddy

हे एक्स्टेंशन youtuber असाल तर तुमच्या साठी फायदेशीर ठरेल. youtube चॅनेल विषयी संपूर्ण माहिती या एक्स्टेंशन द्वारे आपल्याला मिळते. किती views येतात तसेच रोज किती subscriber वाढतात. चॅनेल ची अंदाजे earning किती होते अश्या प्रकारची माहिती तुम्हाला या एक्स्टेंशन द्वारे आपल्याला मिळते

Marathi Online

It is our aim to make all the information available in our own regional language Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: