Useful WordPress Plugin In Marathi Blogging मराठी ब्लॉगिंग

useful wordpress plugin in marathi blogging

आजची पोस्ट useful wordpress plugin in marathi विषयी आहे. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग करायची असेल तर त्यासाठी तुम्ही वर्डप्रेस वरती तुमचा ब्लॉग सुरु केला पाहिजे. कारण वर्डप्रेस आपल्याला अनेक सुविधा फ्री मध्ये देत असते ज्याचा आपल्या ब्लॉग साठी खूप फायदा होऊ शकतो. वर्डप्रेस मध्ये अनेक प्रकारच्या थिम तसेच प्लगइन उपलब्ध आहेत त्याचा आपल्या ब्लॉग साठी उपयोग करता येतो. आजच्या पोस्ट मध्ये आपण असे काही मोफत प्लगइन पाहणार आहोत जे आपल्या ब्लॉग वर असणे महत्वाचे आहे.

नक्की प्लगइन wordpress (Plugin) म्हणजे काय?

तुम्हाला माहिती असेलच वर्डप्रेस वर तुम्हाला कोडींग करायची गरज नसते. तुम्हाला वेगवेगळे features या प्लगइन द्वारे तुमच्या ब्लॉग वर सुरु करता येतात. डेव्हलपर्स ने कोडींग करून प्लगइन बनवलेले असतात जे आपण आपल्या ब्लॉग वर सुरु करतो आणि ते ही कोडींग न करता. वर्डप्रेस लोकप्रिय असण्याचं प्लगइन हे सुद्धा एक कारण आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बऱ्यापैकी प्लगइन फ्री असतात.

जर तुम्हाला तुमच्या पोस्ट तुमच्या वाचकांनी social media वर share कराव्या असे वाटत असेल तर तुम्ही काय कराल. जर एखाद्या वाचकाला तुमची पोस्ट आवडली तर त्याला जर ती पोस्ट share करायची असेल तर त्यांना त्या पोस्ट ची लिंक कॉपी करून सोसिअल मीडिया वर जाऊन share करावी लागेल. अश्या वेळी प्लगइन खूप मदतीला येतात जर तुम्ही एखादा सोसिअल share प्लगइन इन्स्टॉल केले तर तुमच्या पोस्ट वरती अनेक सोसिअल मीडिया वरती share करण्याचे सुविधा उपलब्ध होतील ज्यामुळे अनेक जण तुमची पोस्ट share करतील. सोप्या भाषेत सांगायला गेलो तर प्लगइन आपले काम सोपे करते.

जेटपॅक (Jetpack)

जेटपॅक हे वर्डप्रेस चे स्वतः चे प्लगइन आहे. या प्लगइन मध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या ब्लॉग साठी फायदेशीर आहेत
१स्पॅम protection बेसिक स्पॅम ला ब्लॉक करून पासून आपल्या ब्लॉग ला हे प्लगइन वाचवत असते.
२. Downtime मॉनिटरिंग – जर काही कारणामुळे तुमचा ब्लॉग बंद झाला तर आपल्याला त्वरित मेल येतो कि तुमचा ब्लॉग काही कारणामुळे down झाला आहे.
३. स्पीड – जेटपॅक तुमच्या ब्लॉग वरील इमेजेस optimize करतो. तसेच तुमच्या ब्लॉग वरील इमेजेस अँड स्टॅटिक file (css, javascript) त्यांच्या स्वतः च्या सर्वर वर ठेवतो ज्या मुळे आपल्या ब्लॉग चे स्पीड चांगले वाढते
अश्या प्रकारचे अनेक सुविधा या प्लगइन मध्ये उपलब्ध आहेत ज्याचा आपल्या ब्लॉग साठी खूप फायदा होतो. हे प्लगइन नक्की तुमच्या ब्लॉग वर इन्स्टॉल करा.

AMP

सध्या इंटरनेट वापरण्यात कॉम्पुटर पेक्षा मोबाईल चा जास्त वापर केला जातो. AMP हे प्लगइन आपला ब्लॉग मोबाइल साठी योग्य असा बनवतो. google amp पेज ला प्राधान्य देत असतो त्यामुळे तुम्ही हे प्लगइन इन्स्टॉल करून आपला ब्लॉग मोबाइल friendly करू शकता.

Yoast/Rankmath – seo plugin.

ब्लॉग वर ट्रॅफिक येण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे seo (Search Engine Optimization. हे २ प्लगइन आपल्याला seo चांगल्या प्रकारे करण्यासाठी महत्वाचे आहेत. कीवर्ड टार्गेट करने, हेडिंग योग्य देणे, मेटा description लिहणे,alt टॅग अश्या अनेक प्रकारचे seo संबंधी हे प्लगइन आपल्याला मदत करतात. हे दोन्ही प्लगइन फ्री मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. दोन्ही प्लगइन चांगले आहेत पण rankmath अजूनच seo साठी फायदेशीर आहे.

Onesignal Push Notification

जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईट वरती जात तेव्हा एक कोपऱ्यात allow notifications असा एक message येतो. जर कोणी allow वरती क्लिक केले तर त्या website वरती नवीन पोस्ट आली की त्यांना नोटिफिकेशन्स जातात. यामुळे तुमच्या ब्लॉग वरती ट्रॅफिक वाढण्यास फायदा होतो. कारण एकदा आलेले वाचक परत येतीलच असे नाही त्यांना नोटिफिकेशन गेले तर ते वाचू शकतात.

 site kit by google

site kit हे गुगल चे प्लगइन आहे. हे प्लगइन तुम्हाला google analytics, search console, page speed insights या गूगल ची माहिती एका dashboard देत. तुम्हाला एकाच ठिकाणी थोडक्यात माहिती मिळते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज लागत नाही.

Shortpixel Image Optimizer

ब्लॉग च्या स्पीड चा seo मध्ये खूप फरक पडतो त्यामुळे तुमच्या ब्लॉग चे स्पीड चांगले असणे महत्वाचे असते. आपण आपल्या ब्लॉग वरती इमेजेस टाकत असतो जर त्या इमेजेस ची size जर जास्त असेल तर त्याचा परिणाम ब्लॉग स्पीड वर होतो. हे प्लगइन तुमच्या इमेजेस optimize करतो म्हणजे image size कमी करतो पण image ची quality कमी न करता. या प्लगइन मध्ये तुम्हाला bulk optimization चा सुद्धा उपलब्ध आहे. या प्लगइन मध्ये महिन्याला १०० image optimize करू शकतो.

w ३ total cache (WordPress plugin for cache)

आपल्या ब्लॉग चे स्पीड वाढण्यासाठी हे cache प्लगइन आहे ज्यामुळे आपल्या ब्लॉग चे स्पीड वाढते. तुम्ही ब्लॉग साठी कोणते ना कोणते cache प्लगइन वापरले पाहिजे ज्यामुळे तुमच्या ब्लॉग चे स्पीड वाढेल.

Updraft plus

आपल्या ब्लॉग चा backup डेटा असणे खूप महत्वाचे आहे चुकून काही कारणाने ब्लॉग डाउन झाला तर तुम्ही backup असल्याने पुन्हा चालू करू शकता. कधी एखाद्या प्लगइन मुळे जर ब्लॉग ला काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या कडे बॅकअप असतो. हे प्लगइन तुमच्या ब्लॉग चा बॅकअप तुमच्या gmail अकाउंट वरती ठेवतो आणि ते ही मोफत.

WP Statistics (WordPress plugin for blog statistics)

हे प्लगइन तुम्हाला तुमच्या ब्लॉग चे सर्व statistics देत असतो. किती user आले , कोणत्या देशातील user होते, मोबाईल कि डेस्कटॉप अशा प्रकारची सर्व माहिती आपल्याला या प्लगइन मुळे मिळते. तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर येणाऱ्या user ची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे प्लगइन वापरले पाहिजे

Internal Links Manager

आपल्या ब्लॉग ला internal linking करणे महत्वाचे असते. internal linking म्हणजे आपल्या पोस्ट एकमेकांना कनेक्ट करणे. वाचक एका पोस्ट वरून वाचता वाचता दुसऱ्या पोस्ट वर जाऊ शकेल. seo मध्ये पण internal linking चे महत्व आहे त्यामुळे तुम्ही हे प्लगइन वापरून तुमच्या ब्लॉग चे इंटरनल लिंकिंग जरूर करा.

या पोस्ट मध्ये useful wordpress plugin in marathi विषयी आहे माहिती दिली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली या विषयी नक्की कंमेंट करा.

Marathi Online

It is our aim to make all the information available in our own regional language Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: