What is freelancing in marathi (Freelancing म्हणजे काय?)

नमस्कार मित्रांनो ! आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की freelancing म्हणजे काय what is freelancing in marathi आणि फ्रीलांसर कसे बनावे ?

आजच्या युगातील जवळपास प्रत्येक जण हा ऑनलाईन पद्धतीने पैसे कमावण्याचा विचार करत आहे. कारण ऑनलाईन काम करण्याचे अनेक फायदे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने पैसे कमावणे देखील खूप सोपे आहे. यामध्ये यूट्यूब, ब्लॉगिंग सारखे मार्ग ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी सर्रास वापरले जाणारे आहेत.

आज आपण असाच एक मार्ग जाणून घेणार आहोत जो की ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आज आपण माहिती घेणार आहोत freelancer आणि freelancing बद्दल. तर चला मग what is freelancing in marathi जाणून घेऊया…

Freelancing म्हणजे काय – What is freelancing in marathi

मित्रांनो freelancing हा ऑनलाईन पैसे कमावण्याचा सर्वात प्रसिद्ध आणि सोपा मार्ग आहे. Freelancing हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही लोकांची कामे ऑनलाईन घरी बसल्या करून देता आणि लोक तुम्हाला त्या बदल्यात पैसे देतात. यामध्ये तुम्हाला web designing, graphics designing, content writing, photo – video editing यासारखी कामे ऑनलाईन करायची असतात.

Freelancing मध्ये तुम्हाला अगोदर fiever, upwork यासारख्या freelancing sites वर अकाउंट तयार करावे लागते आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बद्दल थोडी माहिती लिहावी लागते. जसे की तुमचं नाव, शिक्षण, पत्ता, छंद, जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्याबद्दल थोडी माहिती. तसेच तुम्हाला अवगत असणाऱ्या कलाविषयी देखील तुम्हाला लिहावे लागेल.

तुम्ही ज्या कला नमूद केल्या आहेत त्यानुसार तुम्हाला फ्रीलन्सिंग मध्ये काम मिळते. उदाहरणात एखाद्याने जर फोटो – व्हिडिओ एडिटिंग लिहिले असेल तर त्याला सर्व कामे photo – video edit करण्याबाबत च मिळतील. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील अकाऊंटमध्ये त्याच कला नमूद करायच्या आहेत ज्यात तुम्ही पारंगत आहात.

What is freelancing in marathi ( freelancing म्हणजे नेमकं काय?)

Freelancing बद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यावर कुणीही काम करू शकते. म्हणजेच freelancer बनण्यासाठी कुठलीही अट नाही. तुम्हाला शिक्षणाची किंवा वयाची देखील अट नाही. कोणत्याही वयातील व अशिक्षित लोक देखील freelancing मधून पैसे कमावू शकतात. फक्त तुम्हाला एखादी कला अवगत असणे गरजेचे आहे ज्याद्वारे तुम्ही freelancing मध्ये काम करू शकाल.

Freelancer म्हणजे काय – what is freelancer in marathi

Freelancer एक असा व्यक्ती असतो जो लोकांना freelancing sites वर काम करून देतो व त्यांच्या कामात मदत करतो. Freelancer लोकांना ऑनलाईन काम करून देण्याची सेवा पुरवतो आणि याबदल्यात त्याला कस्टमर पैसे देतो.

थोडक्यात freelancing sites वर ऑनलाईन काम करून पैसे कमावणारे व्यक्तीला freelancer म्हटले जाते.

Freelancer कसे बनावे ? (What is freelancing in marathi )

अगदी वरती सांगितल्याप्रमाणे फ्रीलॅन्सर बनण्यासाठी कुठलीही अट नाही. जसे आपल्याला एखादी नोकरी करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते, आपल्याकडे निदान एक तरी डिग्री असावी लागते. पण freelancing हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेवरून नाहीं तर तुम्हाला अवगत असणाऱ्या कला व तुमच्या कौशल्यामुळे काम मिळते.

  • Share market म्हणजे काय?
  • Programming म्हणजे काय?
  • Algorithm म्हणजे काय?

त्यामुळे freelancer बनणे खूप सोपे आहे. तुम्ही देखील फ्रीलन्सर बनू शकता. त्यासाठी तुम्हाला freelancing sites वर अकाउंट तयार करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही लोकांची कामे ऑनलाईन करून देऊ शकता.

Freelancer बनणे जरी सोपे असले तरी सुरुवातीला freelancing मध्ये चांगले काम मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. सुरूवातीला तुम्हाला कामाचा मोबदला कमी मिळू शकतो पण जसा जसा तुमचा अनुभव वाढेल आणि तुमचे कौशल्य विकसित होईल तसे तसे तुम्हाला कामाचे पैसे देखील जास्त मिळू शकते.

त्यामुळे तुम्हाला जर freelancer बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्यातील कला ओळखाव्या लागतील. तुम्हाला शोधावे लागेल की तुम्ही कोणत्या गोष्टीत पारंगत आहात आणि त्यानुसार freelancing sites वर काम करायला चालू करावे लागेल.

त्यासाठी तुम्ही photo – video editing, graphics design, content writing यासारखे विविध कोर्सेस जॉईन करून देखील शिकू शकतात आणि त्याद्वारे काम करू शकता.

Freelancing sites कोणत्या आहेत ?

मित्रांनो तुम्हाला freelancing बद्दल तर माहिती मिळाली परंतु त्याचबरोबर उत्तम freelancing sites कोणत्या आहेत ? कोणत्या साईट वर चांगले काम व पैसे मिळू शकतील? हे देखील माहिती असणे गरजेचे आहे !

Freelancing मध्ये दोन व्यक्ती खूप महत्वाचे असतात ते म्हणजे Freelancer आणि customer. Freelancing मध्ये जो व्यक्ती काम करून देतो त्याला freelancer म्हणतात आणि freelancer ज्याच्यासाठी काम करतो त्याला कस्टमर असे म्हणतात. Freelancer आणि customer या दोघांनाही freelancing sites वर अकाउंट तयार करणे गरजेचे असते.

या दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होण्यासाठी त्यांच्यात बातचीत होणे गरजेचे असते. जेंव्हा कस्टमर आपली समस्या freelancer ला सांगेल तेंव्हा तर कस्टमर त्याच्या समस्यांचे निराकरण करू शकेल.

अशावेळेस freelancing sites कस्टमर आणि फ्रीलांसर् ला एकत्रित मिळवण्याचे काम करतात. त्यांच्यात बातचीत घडवतात आणि नंतरच त्यांच्यात व्यवहार होतात.

Top 5 freelancing sites in india

मित्रांनो इंटरनेट वर अनेक freelancing sites आहेत जेथे तुम्ही काम करून पैसे कमावू शकता. पण या सर्व वेबसाइट्स मध्ये कामाचे मूल्य कमी जास्त आहे. त्यामुळे कोणत्या साइटवर कामाचे मूल्य जास्त मिळते, आपण कोणत्या वेबसाइट्स मधून जास्त पैसे कमावू शकू हे जाणणे फार महत्वाचे आहे.

तसेच काही freelancing sites तर work specific आहेत. म्हणजे अशा काही वेबसाइट्स आहेत ज्या फक्त एखाद्या विशिष्ट कामासाठीच प्रसिद्ध आहेत, तेथे त्याप्रकारे कामच जास्त मिळते. Graphics design साठी काही प्रसिद्ध वेबसाइट्स आहेत, web developement साठी काही आहेत, इत्यादी.

म्हणजे तुम्हाला जर समजा फक्त graphics design च उत्तम येत असेल तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग साठी स्पेशल आणि प्रसिद्ध असणाऱ्या वेबसाइट्स वर काम केलेलेच फायदेशीर ठरेल कारण येथे तुम्हाला कामाचा मोबदला पण जास्त मिळेल आणि तुम्हाला काम पण भरपूर मिळेल.

तर चला मग मी तुम्हाला भारतात प्रसिद्ध आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या top 5 freelancing sites सांगतो. जिथे तुम्ही काम करून भरपूर पैसे कमावू शकता.

  1. Fiever
  2. Upwork
  3. Freelancer
  4. Truelancer
  5. Design 99

Freelancing मध्ये सर्वात सोपे काम कोणते ?

  • Freelancing मध्ये असे अनेक कामे आहेत की जी खूप सोपी आहेत आणि ती करण्यासाठी कुठलीही ट्रेनिंग ची आवश्यकता नसते.
  • जसे की photo editing, video editing, data entry, captcha filling, surveys, इत्यादी ही अशी काही काम आहेत जी की खूप सोपी आहेत. ही सर्व कामे तुम्ही youtube च्या मदतीने देखील शिकू शकता.
  • यामध्ये data entry हे काम सर्वात सोपे आहे. यामध्ये तुम्हाला फक्त टायपिंग चे काम असते. तुम्हाला विविध कंपन्यांच्या फॉर्म्स मध्ये दिलेली माहिती भरायची असते.
  • हे फक्त टायपिंग चे काम आहे. यात तुम्हाला कुठल्याही विशेष कौशल्याची आवश्यकता नाही. हे काम सोपे असल्या कारणाने खूप लोक करतात.
  • मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या की data entry सारख्या अगदी सोप्या कामात वेळ वाया जाऊ नये म्हणून data entry चे सर्व कामे freelancing sites वर टाकून देतात आणि freelancer कडून करून घेतात.
  • पण data entry हे काम सोपे असल्यामुळे आणि हे काम करण्यासाठी जास्त स्पर्धा असल्यामुळे कामाचा मोबदला फार कमी मिळतो.
  • कारण freelancing मध्ये कामाचा मोबदला हा कामावर आणि कौशल्यावर अवलंबून असतो. म्हणजे जर काम अवघड असेल आणि त्याच्यासाठी स्पर्धा कमी असेल तर मोबदला देखील जास्त मिळतो. सोप्या कामाला नेहमी कमी मोबदला मिळतो.

जास्त पैसे मिळवून देणारे freelancing jobs ?

  • मित्रांनो freelancing मध्ये असे काही कामे आहेत ज्यांचा मोबदला freelancer ला सर्वाधिक जास्त मिळतो.
  • काही कामामध्ये तर 50$ per hour देखील मिळतो. म्हणजे एका तासाला जवळपास ३५०० रुपये. यावरून तुमच्या लक्षात येऊ शकते की freelancing jobs मध्ये किती स्कोप आहे तर.
  • पण ही कामे करणे काही सोपे काम नाहीये यासाठी तुम्हाला विविध कोर्सेस जॉईन करावे लागतील, programming , computer science चे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही ही कामे करू शकाल.
  • चला जाणून घेऊया सर्वाधिक मोबदला मिळवून देणारे freelancing jobs कोणते आहेत तर…

Top 7 highest paying freelancing jobs in india

  1. Accountant
  2. Graphic designer
  3. Programmer
  4. Software developer
  5. Web developer
  6. Technical writer
  7. Animator

निष्कर्ष :  freelancing information in marathi

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेतले की freelancing म्हणजे काय what is freelancing in marathi आणि तसेच आपण पाहिले की freelancer म्हणजे काय, feelancer कसे बनावे, top freelancing jobs in india, इत्यादी.

मला अशा आहे की तुम्हाला मराठी संग्रह ब्लॉग चे सर्व लेख निश्चितच आवडत असतील. आम्हाला असेच support करत रहा. आमच्यासोबत जुडण्यासाठी व सर्व नवनवीन लेख सर्वात अगोदर वाचण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर नक्कीच सबस्क्राईब करा, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: