What Is Hosting In Marathi|होस्टिंग मराठी

what is hosting in marathi| होस्टिंग म्हणजे काय?

आपण what is hosting in marathi सविस्तर पाहूया. मित्रानो आपण डोमेन म्हणजे काय हे जाणून घेतले. आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग चा जो ऍड्रेस असतो ते म्हणजे डोमेन. आपण जो मोबाइल किंवा कॉम्पुटर वापरत असतो तेव्हा त्या वरील सर्व डाटा जसे कि फोटो ,विडिओ आणि बाकी सर्व हे एका मेमरी कार्ड किंवा हार्ड डिस्क मध्ये असते. पण आपलं डोमेन हे मोबाइल किंवा कॉम्पुटर सारखे आपल्या कडे नसते. कारण आपण ज्या कंपनी मार्फत डोमेन घेत असतो त्यांच्या सर्वर वरती आपला डोमेन असत.जेव्हा आपल्याला आपल्या वेबसाईट वरती फोटो , व्हिडिओ किंवा डेटा टाकायचा असतो त्यासाठी आपल्याला होस्टिंग ची गरज लागते.

जसे मेमरी कार्ड आणि हार्ड डिस्क हे हे आपला डेटा त्यांच्यामध्ये साठवून ठेवतात. तेच काम होस्टिंग आपल्यासाठी करत असते . जी कंपनी आपल्याला होस्टिंग देते त्यांच्या सर्व्हर मध्ये आपला डेटा साठवून ठेवतात असतो.

Hosting advantages|होस्टिंग आपल्या वेबसाईट साठी का महत्वाची असते?

 • होस्टिंग कंपनी आपली वेबसाईट २४ * ७ इंटरनेट वर चालू ठेवायची काम करत असते.
 • आपला डेटा त्यांच्या सर्वर वर असल्याने आपल्या वेबसाईट चा स्पीड वाढतो.
 • जेव्हा काही कारणाने आपली वेबसाईट down होते तेव्हा त्यांचा कस्टमर सपोर्ट आपल्याला मिळतो.
 • होस्टिंग मध्ये bandwidth हि संकल्पना आहे ती म्हणजे तुमच्या वेबसाईट वर किती जण येतात. जर तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक जास्त झाले तर तुमची वेबसाईट डाउन होण्याचे शक्यता असते.
 • तुम्ही ट्रॅफिक नुसार प्लॅन घेऊ शकता.
 • जर तुमचे अनेक डोमेन असतील तर ते संभाळणे सोपे होते.
 • होस्टिंग मध्ये अनेक प्लॅन असतात ते तुम्ही तुमच्या गरजे नुसार निवडा.

जसे तुमच्या ब्लॉग ला डोमेन ची गरज असते तसेच होस्टिंग ची गरज सुद्धा असते. होस्टिंग पुरवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. जर तुम्ही सुरवात करत असाल तर एका ब्लॉग साठी होस्टिंग घेऊ शकता आणि जर तुमच्या एका पेक्षा जास्त ब्लॉग वाढले तर अजून मोठा प्लॅन घेऊ शकता.

Hosting provider comapnies|होस्टिंग ची सेवा देणाऱ्या काही कंपनी

 • https://www.hostinger.in/ – Hostinger  hosting
 • https://in.godaddy.com/  – Go daddy hosting
 • https://www.hostgator.in/ – Hostgator hosting
 • https://www.bigrock.in/   – Big rock hosting

मित्रानो सुरुवातीला होस्टिंग निवडणे थोडे अवघड जाते. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या इंस्टग्राम वरती आमचे मार्गर्दर्शन मिळवू शकता.

 • मराठी ऑनलाईन हे आमचे इंस्टाग्राम अकाउंट आहे.
 • तिथे तुम्हाला व्यक्तिगत मार्गदर्शन मिळेल.
 • आमच्या अकाउंट ची लिंक.

आम्ही आशा करतो कि तुम्हाला what is hosting in marathi हे समजले असेल.

Marathi Online

It is our aim to make all the information available in our own regional language Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: