What is trading in Marathi – ट्रेडिंग म्हणजे काय?
ट्रेडिंग म्हणजे काय (what is trading in marathi) trading चा मराठी अर्थ आहे व्यापार. व्यापार म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं झालं तर वस्तूंची देवाणघेवाण करणं म्हणजे व्यापार. आजच्या आधुनिक काळात व्यापाराचे स्वरूप खूप बदलले आहे. पूर्वी आपल्याकडे असलेली एखादी वस्तू दुसऱ्याला देणे व त्याच्याकडून मोबदल्यात एखादी वस्तू घेणे याला व्यापार म्हंटले जायचे. पण आज वस्तूच्या बदल्यात वस्तू नव्हे तर पैसे दिले जातात आणि यालाच आजच्या आधुनिक युगात ट्रेडिंग असे म्हटले जाते.
आज प्रत्येक जण ऑनलाईन काम करुन पैसे कमवण्याचा विचार करत आहे. आज ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी share market/ stock market हा एक उत्तम पर्याय आहे. हा देखील एक ऑनलाईन व्यापारच आहे ज्याला की stock trading किंवा मग shares trading म्हटले जाते.
आजच्या लेखात आपण शेअर बाजारातील स्टॉक ट्रेडिंग बद्दल माहिती येणार आहोत. जसे की ट्रेडिंग म्हणजे काय (what is trading in marathi) ट्रेडिंग कशी करावी, trading चे कोणते प्रकार आहेत, इत्यादी
Contents
ट्रेडिंग म्हणजे काय? (What is trading in marathi )
नफा कमावण्यासाठी एखाद्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करणे यालाच सोप्या भाषेत trading असे म्हटले जाते. तुम्ही कोणताही व्यवसाय करा त्याला तुम्ही ट्रेडिंग म्हणू शकता.
उदाहरणात तुमचे कपड्याचे दुकान आहे. तुम्ही दुकानांमध्ये कमी पैशांमध्ये माल भरता आणि हाच माल तुम्ही कस्टमरला थोडे पैसे वाढवून विकता. यातून तुम्हाला नफा मिळतो यालाच तुम्ही ट्रेडिंग असे म्हणू शकता.
तुमच्या आसपास सुरू असलेला प्रत्येक उद्योग हा एक ट्रेडिंग च आहे. जसे तुम्ही फळांच्या दुकानातून फळे विकत घेता . तो फळ विक्रेता बाहेर राज्यातून किंवा जिथे स्वस्त फळे मिळत आहे तेथून विकत आणतो आणि तुम्हाला थोडे पैसे वाढवून विकतो. यात त्याचा नफा होतो तर ही देखील एक ट्रेडिंग च आहे.
थोडक्यात trading म्हणजे तो प्रत्येक उद्योग जो की तुम्ही नफा मिळवा म्हणून एखाद्या वस्तूंची खरेदी विक्री करता.
मला वाटतं तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय आता समजले असेल.
Stock trading म्हणजे काय ? (What is stock trading in marathi )
Stock मार्केटमध्ये शेअर्स ची खरेदी व विक्री करणे आणि त्यातून नफा कमावणे याला डिजिटल भाषेत स्टॉक ट्रेडिंग असे म्हटले जाते.
Stock ट्रेडिंग मध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता आणि त्या कंपनीचे शेअर्स ची किंमत वाढल्यानंतर ते विकून त्यापासून भरपूर नफा कमावू शकता.
यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. Investor आणि trader.
Investor कोण असतो (meaning of investor in marathi)
Investor हे असे लोक असतात जे की भविष्यात पैसे कमावण्याच्य हेतूने ते स्टॉक मार्केटमध्ये पैसे invest करतात. म्हणजे ते अशा कंपन्याचे शेअर्स खरेदी करतात की ज्या कंपन्या भविष्यात नक्कीच जास्त नफा मिळवतील आणि त्यांच्या शेअर्सची देखील किंमत वाढेल.यातून त्यांना खूप नफा मिळतो.
Investor हे कोणताही शेअर हा long term साठी खरेदी करतात त्यामुळे या व्यवहाराला long term trading असे देखील म्हटले जाते. तसेच यामध्ये नुकसान होण्याची संभावना फार कमी असते.
Trader कोण असतो ( meaning of trader in marathi )
Stock मार्केट मध्ये आणखी एका प्रकारचे लोक असतात ज्याला traders असे म्हटले जाते. हे ट्रेडर्स नेहमी कमी कालावधी साठी शेअर्स खरेदी करतात आणि ते काही वेळातच विकून नफा कमातात. Traders हे प्रत्येक शेअर जास्तीत जास्त एखाद्या महिन्यापर्यंत च ठेवतात.
Traders हे shares फार कमी वेळासाठी खरेदी करतात म्हणून त्यांच्या या व्यवहाराला short term trading असे देखील म्हटले जाते. यामध्ये बहुदा शेअर्स हे खरेदी करून एका दिवसाच्या आतचं विकले जातात. त्यामुळे यामध्ये खूप जोखीम असते.
Stock trading चे प्रकार (types of stock trading in marathi)
Shares खरेदी व विक्री करण्याच्या कालावधी नुसार stock trading चे खालीलप्रमाणे प्रकार आहेत :
Intraday trading म्हणजे काय?
एका दिवसातच शेअर्स ची खरेदी आणि विक्री करणे म्हणजे intraday ट्रेडिंग असे म्हटले जाते.
जेंव्हा एखादी व्यक्ती एखादा शेअर्स खरेदी करते आणि त्या शेअर्स ला शेअर मार्केट बंद होण्यापूर्वी त्याच दिवशी विकते तर या प्रकारच्या ट्रेडिंग ला intraday trading किंवा मग एक दिवसीय व्यापार असे म्हटले जाते.
शेअर बाजारामध्ये प्रत्येक सेकंदाला शेअर्सच्या किमतीमध्ये उतार चढाव होत असतो काही जण याच गोष्टीचा फायदा घेऊन दररोज शेअर विकत घेतात आणि त्याची किंमत वाढली की लगेच विकून पण टाकतात. अशा प्रकारचा व्यवहार करणाऱ्या ट्रेडर्स ला intraday trader असे म्हटले जाते. यातून फार कमी नफा मिळतो.
Intraday ट्रेडिंग खूप risky असते. कारण यामध्ये प्रत्येक वेळा नफाच होते असे नाही तर कित्येक वेळा नुकसान ही सहन करावे लागते. यामध्ये खूप रिस्क असते. त्यामुळे फार कमी लोकच यशस्वी intraday trader बनतात. यात बहुतेक लोकांचे नुकसानच होते.
Positional trading म्हणजे काय?
यामध्ये शेअर्स हा एका दिवसापासून ते एका आठवड्याच्या कालावधीसाठी विकत घेतला जातो.
यामध्ये प्रत्येक कंपनीच्या शेअर्स चे analysis केले जाते. शेअर्स च्या किमतीमध्ये होणाऱ्या चढ उताराचा अभ्यास केला जातो. या आठवड्यात कधी एखाद्या शेअर ची किंमत वाढेल आणि कधी कमी होईल असे तर्क लावले जातात आणि त्यानुसार शेअर्स खरेदी केले जातात.
यामध्ये देखील रिस्क असते पण ही रिस्क intraday ट्रेडिंग पेक्षा कमी असते. कारण यात तुम्हाला शेअर्स विक्री करण्यासाठी ६-७ दिवसांचा वेळ असतो.
Swing trading म्हणजे काय?
यामध्ये शेअर्स खरेदी केल्यानंतर त्याची विक्री एका आठवड्यापासून ते एका महिन्यापर्यंत च्या कालावधीत केली जाते. यालाच swing trading असे म्हटले जाते.
यामध्ये trader शेअर्स एका महिन्यासाठी खरेदी करतो आणि किंमत वाढली की विकतो. त्यामुळे याला short term trading असे देखील म्हटले जाते.
यात देखील नुकसान होण्याची जोखीम असते पण ही जोखीम intraday trading पेक्षा फार कमी असते. तसेच यातून नफा मिळण्याची शक्यता पण जास्त असते.
Stock trading कशी करावी ?
Stock मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुमच्याकडे तीन अकाउंट असणे गरजेचे आहे. जेथून की तुम्ही स्टॉक ट्रेडिंग चा पूर्ण व्यवहार सांभाळू शकाल. ते तीन अकाउंट खालीलप्रमाणे आहेत :
- Trading account – या अकाऊंटमध्ये तुम्ही शेअर्स ची खरेदी आणि विक्री करता. यातूनच तुम्ही खरेदी किंवा विक्री केलेल्या शेअर्सची ऑर्डर stock exchange ला पाठवली जाते. त्यामुळे investor असो की मग trader त्याला trading account ओपन करावेच लागते.
- Demat account – ट्रेडिंग अकाउंट सोबतच दुसरे एक अकाउंट ओपन केले जाते ज्याला की demat account असे म्हटले जाते. हे अकाउंट तुमच्या ट्रेडिंग अकाउंट सोबत लिंक असते. त्यामुळे तुम्ही जे शेअर्स खरेदी करता ते सर्व डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात. तसेच विकलेले शेअर्स demat account मधून delete होतात. हे अकाउंट तुमच्या शेअर्स च storage म्हणून काम करतं.
- Bank account – तुमचे कोणत्याही एखाद्या राष्ट्रीय बँकेत अकाउंट असणे फार गरजेचे असते. कारण शेअर बाजारात पैश्यांचे सर्व व्यवहार याच अकाउंट मार्फत केले जातात. हे अकाउंट तुमच्या ट्रेडिंग अकाउंट सोबत लिंक असते. म्हणजे तुम्ही जर एखादा शेअर्स खरेदी केला तर त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा होते आणि जर एखादा शेअर्स विकला तर त्याची मिळालेली रक्कम देखील तुमच्या याच बँक खात्यात जमा होते. त्यामुळे तुमचे स्वतःचे बँक खाते असणे फार गरजेचे आहे.
Stock broker कोण असतो ( stock broker meaning in marathi )
Stock ब्रोकर हा stock exchange आणि trader/invester यांच्यातील दुवा असते. Stock broker ही अशी व्यक्ती असते जी trader/investor ला stock exchange सोबत जोडण्याचे काम करते.
ही व्यक्ती trader आणि investor ला एक असा प्लॅटफॉर्म मिळवून देते जेथून शेअर्स खरेदी केले जातील. तसेच स्टॉक ब्रोकर trader आणि investor ला शेअर्स खरेदी करण्यासाठी टिप्स देखील देत असते.
ही व्यक्ती trader आणि investor ला वेळोवेळी मार्गदर्शन करत असते की त्यांना कोणता शेअर्स कधी खरेदी करावा व कोणता शेअर्स कधी विकावा. कारण stock broker का trader/investor च्या नफ्यातील काही टक्के नफा मिळत असतो.
तुम्ही काय शिकलात ?
मित्रांनो या पोस्टमध्ये आपण ट्रेडिंग म्हणजे (what is trading in marathi) काय बद्दल संपूर्ण माहिती घेतली. तसेच मी तुम्हाला स्टॉक ट्रेडिंग म्हणजे काय (what is stock trading in marathi), intraday trading म्हणजे काय, ट्रेडिंग चे प्रकार, स्टॉक ब्रोकर कोण असतो, इत्यादी माहिती दिली.
मला अशा आहे की तुम्हाला ही what is trading in marathi माहिती नक्कीच आवडली असेल. या पोस्टला तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. अशीच मजेशीर आणि उपयुक्त माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट देत रहा, धन्यवाद…!!!