संगणक म्हणजे काय? | computer information in marathi

नमस्कार मित्रांनो! आजच्या या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत संगणक म्हणजे काय? computer information in marathihistory of computer in marathi, कंप्युटर चा शोध कुणी लावला या सारखी कंप्युटर बद्दल सर्व उपयुक्त माहिती.

मित्रांनो आजच्या आधुनिक युगात आपण दिवसभरात खूप वेळा कंप्युटर चा वापर करतो.जवळपास सर्वच सुविधा आज या कंप्युटर च्याच मदतीने पूर्ण केल्या जातात. जसे रेल्वेचे तिकीट काढणे, दुकानामध्ये मालाची पोचपावती घेणे, इंटरनेट वर माहितीचा शोध घेणे, करमणुकीचे साधन म्हणून या सर्व कामासाठी आपण दिवसभर कंप्युटर चा वापर करत असतो.

शाळा, महाविद्यालये , ऑफिस, दवाखाना, सैन्य, विविध कंपन्या या सर्वच ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर वाढत आहे. त्यामुळे आपल्याला या कंप्युटर बद्दल मूलभूत माहिती असणं गरजेचं आहे.

म्हणूनच आजच्या या पोस्ट मध्ये आपण माहिती घेणार आहोत की कंप्युटर म्हणजे काय computer information in marathi आणि computer history in marathi तसेच आपण कंप्युटर बद्दल खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

संगणक मराठी माहिती | Computer information in marathi

या लेखात आपण कंप्युटर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जसे की कंप्युटर चा शोध कधी लागला, कुणी लावला, कॉम्पुटर चे प्रकार, कॉम्पुटर चे उपयोग, इत्यादी.

संगणक म्हणजे काय | what is computer in marathi

कंप्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे की युजर कडून माहितीच्या (data) स्वरूपात इनपुट घेतो आणि त्या माहितीवर प्रक्रिया करून आपल्याला आवश्यक ते परिणाम दाखवतो.

जसे आपल्याला कंप्युटर च्या मदतीने बेरीज करायची असेल तर आपण काय करतो दोन संख्या आपण इनपुट म्हणून कंप्युटर ला देतो आणि कंप्युटर त्या इनपुट वर प्रक्रिया करतो म्हणजेच त्या दोन संख्याची बेरीज करून आपल्याला उत्तर देतो त्यालाच आपण आऊटपुट असे म्हणतो.

कंप्युटर ला मराठीत संगणक असे म्हटले जाते. Computer हा शब्द लॅटिन भाषेतील compute या शब्दापासून तयार झाला आहे त्याचा मराठीत अर्थ होतो गणना करणे. सुरुवातीचे कंप्युटर हे फारच साधे होते त्यांचा वापर हा बहुदा फक्त गणना (calculations) करण्यासाठीच केला जायचा त्यामुळेच या इलेक्ट्रॉनिक यंत्राला computer संगणक असे नाव देण्यात आले.

पण आजचे कॉम्प्युटर्स हे खूपच प्रगत आहेत. ते फक्त गणना करण्या पुरतेच मर्यादित न राहता आज प्रत्येक क्षेत्रात या कंप्युटर चा वापर होताना दिसत आहे. आज शाळा महाविद्यालये पासून ते अवकाशयान प्रक्षेपण करण्यापर्यंत सर्वत्र कॉम्प्युटर्स उपयोगात आहेत. अहो आपला मोबाईल हा देखील एक छोटा संगणकच आहे.

कॉम्प्युटर चा फुल फॉर्म | Full form of computer

Computer चा स्टॅंडर्ड असा कुठलाही फुल फॉर्म नाही. परंतु कंप्युटर चे महत्व आणि कार्य समजून घेण्यासाठी विवध संस्था आणि वैज्ञानिकांनी कॉम्प्युटरचे काही फुलं फॉर्म तयार केलेले आहेत. खाली एक कॉम्प्युटरचा फुलं फॉर्म दिला आहे जो की सर्वाधिक प्रचलित आहे आणि कंप्युटर चे उत्तम हुबेहूब वर्णन करतो.

  • C – Commonly
  • O – Operated
  • M – Machine
  • P – Particularly
  • U – Used for
  • T – Technical and
  • E – Educational
  • R – Research

या फुल फॉर्मच्या मते ” कंप्युटर ही एक अशी मशिन आहे ज्याचा उपयोग बहुदा तांत्रिक आणि शैक्षणिक रिसर्च करण्यासाठी केला जातो “

कंप्युटर ची व्याख्या – defination of computer

कंप्युटर ची व्याख्या
कंप्युटर ही एक अशी मशिन आहे जी माहितीच्या स्वरूपात वापरकर्त्याकडून input घेते, ते इनपुट आधी मेमोरीमध्ये साठवते आणि नंतर त्या माहितीवर प्रक्रिया करून आपल्याला output च्या स्वरूपात आवश्यक परिणाम दाखवते.

कंप्युटर ची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कारण कंप्युटर आज सैकडो कार्य करण्यात तत्पर आहे त्यामुळे त्याच्या प्रत्येक कर्यानुसार त्याची वेगवेगळी व्याख्या होऊ शकते.

उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या gamer ला विचारलं की कंप्युटर काय आहे तर तो सांगेल की, कंप्युटर हे एक गेम इंजिन आहे ज्यावर आपण विवध गेम खेळू शकतो, एखाद्या इंटरनेट वापरकर्त्याला विचारलं तर तो सांगेल की हे एक माहितीचा उत्तम स्रोत आहे जेथे आपण हवी ती माहिती मिळवू शकतो. एखाद्या type writer ला विचारलं तर तो सांगेल की हे एक टायपिंग यंत्र आहे ज्यावर आपण विविध लेख टाईप करू शकतो.

याप्रमाणे प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. मी वरती दिलेली व्याख्या ही कॉम्पुटर ची मूलभूत व्याख्या आहे.

संगणकाचा इतिहास – History of computer in marathi

संगणकाचा इतिहास थोडक्यात:

  • संगणकाचा इतिहास history of computer in marathi हा खूपच जुना आहे. याची सुरुवात तेंव्हा झाली जेंव्हा चीनमध्ये abacus नावाच्या यंत्राचा शोध लागला.
  • अबॅकस हे एक मेकॅनिकल यंत्र होतं ज्यामध्ये एका पाटीवर अनेक मनी होते आणि त्या मण्यांच्या साह्याने संख्यांची गणना केली जायची.
  • त्यानंतर सन १६४२ मध्ये Blaize pascal नावाच्या शास्त्रज्ञ न एडिऺग मशीन चा शोध लावला. पण या मशीनमध्ये केवळ बेरीज आणि वजाबाकी करता यायची. यामध्ये गुणाकार आणि भागाकार होत नसे.
  • त्यानंतर १८२२ मध्ये Charles Babage नामक शास्त्रज्ञ न difference engine चा शोध लावला.
  • Difference engine च्या यशाने प्रेरित होऊन नंतर Charles Babage यांनी पाहिले प्रगत गणना यंत्र तयार केले. ज्यामध्ये सर्व मूलभूत गणितीय क्रिया केल्या जाऊ शकत होत्या. त्या यंत्राला नाव देण्यात आलं Analytical engine
  • हे analytical engine म्हणजेच जगातील सर्वात पाहिले कंप्युटर मानले गेले आणि charles babage यांना संगणकाचा जनक म्हणून संबोधित केले.
  • त्यानंतर कॉम्प्युटरचा पिढीमध्ये बदल होत गेले आणि आजचे प्रगत संगणक तयार झाले.

संगणकाची पिढी – Generation of computers

क्र. पिढी (Generation) कार्यकाळ (period) शोध (invention)
पाहिली पिढी ( first generation) १९४६ – १९५६ vaccume tube
दुसरी पिढी (second generation) १९५६ – १९६४ transistor
तिसरी पिढी (third generation) १९६४ – १९७० integrated circuit (IC)
चोथी पिढी (fourth generation) १९७० – १९८५ VLSI
पाचवी पिढी (fifth generation) १९८५ – आतापर्यंत ULSIC

Computer चा शोध कुणी व कधी लागला ?

कंप्युटर चा शोध हा charles babage नामक शास्त्रज्ञ न लावला आहे. Charles babage हा ब्रिटिश गणितीय शास्त्रज्ञ होता त्यांचे कंप्युटर तयार करण्यामध्ये फार मोलाचे योगदान आहे. म्हणून त्यांना कंप्युटर चा जनक देखील म्हटले जाते.

Charles babage यांनी १८३३ ते १८७१ मध्ये पहिला कंप्युटर तयार केला होता आणि त्या कंप्युटर चे नाव होते Anytical engine. हा कंप्युटर आकाराने खूपच मोठा होता. आजच्या युगातील सर्व कंप्युटर या analytical engine कंप्युटर च्या संकल्पनेवर आधारित कार्य करतात. त्यामुळे या कंप्युटर ला कंप्युटर चे basic module मानले जाते.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे संगणकाचे मुख्य घटक आहेत. या दोन्हींनी मिळूनच संपूर्ण कंप्युटर तयार होतो. यातील एक जरी घटक अनुपलब्ध असेल तर कंप्युटर कार्य करण्यास अक्षम आहे. कारण संगणाकमध्ये कोणतेही कार्य हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या मेलातूनाच होते.

हार्डवेअर म्हणजे काय? What is hardware in marathi

संगणकाच्या सर्व भौतिक अंगाना हार्डवेअर असे म्हटले जाते. म्हणजेच संगणाचे जे घटक आपण डोळ्याने पाहू शकतो किंवा त्यांना स्पर्श करू शकतो ते सर्व हार्डवेअर आहेत.

उदाहरणात मॉनिटर, माऊस, कीबोर्ड, सीपीयू, साऊंड, प्रिंटर, इत्यादी हे सर्व कंप्युटर चे हार्डवेअर आहेत.

सॉफ्टवेअर म्हणजे काय ? What is software in marathi

वापरकर्त्या कडून संगणकाला दिलेल्या सूचनांचे संचाला सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. या सॉफ्टवेअर मध्ये कोडींगच्या मार्फत विविध सूचना संगणकाला दिल्या जातात आणि जेंव्हा आपण हा सॉफ्टवेअर run करतो तेंव्हा कंप्युटर सर्व दिलेल्या सूचनांचे पालन करतो आणि आपल्याला आवश्यक परिणाम दाखवतो.

Operating syetem, calculator, web browser तसेच संगणकातील सर्व ऍप्लिकेशन आणि खेळ हे सॉफ्टवेअर चे काही उदाहरणं आहेत.

सॉफ्टवेअर ला संगणकाचे हृदय असे म्हटले जाते. कारण सॉफ्टवेअर हार्डवेअर ला निर्देश देतो की त्यांना कोणते कार्य करायचे आहे. सॉफ्टवेअर च्या सूचनेनुसार हार्डवेअर कार्य करते.

Computer कसे कार्य करते?

कंप्युटर बद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कदाचित एकदा तरी हा प्रश्न पडला असेल की कंप्युटर त्याचे सर्व कार्य कसे करते? त्याच्यामध्ये सर्व क्रिया इतक्या जलद कश्या होतात?

कॉम्प्युटरमध्ये कोणतेही कार्य हे तीन टप्यातून पार पडते input, processing आणि output. या तीन रित्या यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आपल्याला योग्य तो परिणाम मिळतो.

इनपुट (input) :

ही कॉम्प्युटरची सर्वात मुलभूत क्रिया आहे. यामध्ये आपल्याला कंप्युटर कडून जे कार्य करून घ्यायचे आहे त्याबद्दल प्राथमिक माहिती ही इनपुट च्या साह्याने कंप्युटर ला द्यायची असते.

प्रक्रिया (pricessing) :

यामध्ये युजर कडून इनपुट स्वरूपात मिळालेली प्राथमिक माहिती अगोदर कंप्युटर च्या मेमोरी मध्ये साठवली जाते. नंतर युजर कडून मिळालेल्या सूचनांनुसार इनपुट वर प्रक्रिया केली जाते.

परिणाम (output) :

इनपुट वर प्रक्रिया केल्यानंतर जे परिणाम निर्माण होतात ते आऊटपुट च्या साह्याने कंप्युटर आपल्याला स्क्रीनवर दाखवतो.

या तीन क्रियेतून च कोणतेही कार्य संगणकमध्ये सफल होते.

कंप्युटर चे प्रकार ( Types of computer in marathi ):

कंप्युटर चे त्यांच्या क्षमतेनुसार, आकारानुसार खूप सारे प्रकार पडतात पण आज आपण फक्त त्याच कंप्युटर च्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत जे की आपण दैनंदिन जीवनात वापरतो.

Desktop computer:

हा कॉम्प्युटरचा सर्वात प्रचलित प्रकार आहे. हा प्रकार जगभरामध्ये सर्वाधिक वापरला जातो. डेस्कटॉप कंप्युटर तुम्ही शाळा, ऑफिस, रेल्वे स्टेशन, दवाखाना, इत्यादी ठिकाणी जरूर पाहिले असतील. यामध्ये मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीऊ यांचा एक संच असतो.

हे कॉम्प्युटर्स आकाराने थोडे मोठे असतात आणि ते बहुदा टेबलावर (desk) वर ठेवलेले असतात म्हणून त्यांना desktop computer असं नाव आहे.

Laptop :

लॅपटॉप हे डेस्कटॉप च्या पुढची पिढी आहे. हे कॉम्प्युटर्स आकाराने डेस्कटॉप पेक्षा थोडे लहान असतात. ज्याप्रमाणे आपण पुस्तकांना उघडू शकतो आणि बंद करू शकतो त्याच प्रकारची सुविधा आपल्याला लॅपटॉप मध्ये पाहायला मिळते म्हणून त्यांना notebook असे देखील म्हटले जाते.

हे कॉम्प्युटर्स आकाराने लहान असल्यामुळे आपण त्यांना बॅग मध्ये घेऊन कुठेही जाऊ शकतो त्यामुळे हे डेस्कटॉप पेक्षा जास्त सोयीस्कर आहेत. विशेष म्हणजे हे कॉम्प्युटर्स chargeble आहेत, त्यांना आपण एकदा चार्ज केल्यानंतर ५-६ तास लाईट शिवाय वापरू शकतो. लॅपटॉप हे डेस्कटॉप पेक्षा जास्त कार्यक्षम असतात.

Tablet:

हे आधुनिक कंप्युटर आहेत जे की टच स्क्रीन या संकल्पनेवर आधारित आहेत. हा एक लॅपटॉप चाच प्रकार आहे फक्त या कंप्युटर मध्ये कीबोर्ड आणि माऊस  नसतो, सर्व कार्य हे बोटाने टच करून केले जातात.

Smartphone :

होय, स्मार्टफोन देखील एक प्रकारचा कंप्युटर च आहे. हा आकाराने खूप छोटा असतो आणि वापरण्यास देखील खुप सोयीस्कर. कंप्युटर ची बरीचशी कार्य स्मार्टफोन मध्ये होतात. तुम्हाला स्मार्टफोन बद्दल अधिक माहिती देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्मार्टफोन बद्दल सर्व गोष्टी जाणत असाल कारण आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे.

कंप्युटर ची वैशिष्टय (characteristics of computer in marathi)

  • Speed (जलद)
  • Power of rememberence (उच्च स्मरणशक्ती)
  • High storage capacity ( माहिती साठवून ठेवण्याची उच्च क्षमता )
  • Accuracy ( अचूकता )
  • Automation ( स्वयांचालन)
  • Multitasking ( बहु कार्य )

आपण काय शिकलो?

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण computer बद्दल माहिती आणि इतिहास computer information in marathi आणि history of computer in marathi जाणून घेतली. मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल.

मित्रांनो आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला कंप्युटर चे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे कारण यापुढे प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटरची आवश्यकता भासणार आहे. म्हणूनच सर्वांना कंप्युटर बद्दल माहिती मराठीतून मिळावी या उद्देशाने मी हा लेख लिहिला आहे. कारण गूगल वर कंप्युटर ची मराठीतून पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

या पोस्ट ला तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा त्यामुळे त्यांनाही कंप्युटर बद्दल माहिती मिळेल, धन्यवाद…!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: